
2496 26-Apr-2018, Thu
- भारतीय संशोधकांना गुजरातच्या डांग जिल्ह्यात पश्चिम घाटाच्या अहवा जंगलात जमिनीवर वाढणारे जगातले सर्वात लहान नेचाचे रोप (land fern) आढळून आले आहे.
- नखाच्या आकाराएवढी वाढणारी ही वनस्पती अॅडर्स टंग फर्न या गटामधली आहे.
- ‘ओफिओग्लोसम मालवीए’ नाव देण्यात आलेले हे नेचाचे रोप केवळ एक सेंटिमीटरपर्यंत वाढणारी वनस्पती आहे.
- सूरतच्या वीर नर्मद दक्षिण गुजरात विद्यापीठातील जैवशास्त्र विभागाचे संशोधक मितेश पटेल यांच्या नेतृत्वात 2016 साली चालविलेल्या एका वनस्पतिशास्त्रीय मोहिमेदरम्यान ही वनस्पती आढळून आली होती.