
1352 21-Jan-2019, Mon
- हजिरा (गुजरात) येथे उभारण्यात आलेल्या लार्सन अॅण्ड टुब्रो या बहुराष्ट्रीय कंपनीच्या आर्मर्ड सिस्टीम्स कॉम्प्लेक्स या प्रकल्पाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले.
- हा देशातला प्रथम खासगी प्रकल्प आहे, जेथे के-9 वज्र सेल्फ-प्रोपेल्ड होवित्झर तोफेचे निर्मिती केली जाईल. भारतीय लष्कराला ‘के-9 वज्र-टी 155 मि.मी./52 कॅलिबर ट्रॅक्ड सेल्फ-प्रोपेल्ड गन सिस्टम’ याच्या 100 एककांचा पुरवठा करण्यासाठी कंपनीशी करार झाला आहे. हा 4,500 कोटी रूपयांचा करार भारत सरकारच्या "मेक इन इंडिया" या उपक्रमाच्या अंतर्गत करण्यात आला आहे.
- शिवाय तोफेच्या निर्मितीसाठी लार्सन अँड टुब्रो कंपनीने दक्षिण कोरियाच्या हानव्हा कॉर्पोरेशन या कंपनीसोबत तंत्रज्ञानाच्या हस्तांतरणाविषयीचा करार केला.