Inauguration of Pandit Deendayal Upadhyay Archaeological Society at Greater Noida

 1. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दिनांक 9 मार्च 2019 रोजी उत्तरप्रदेश राज्यातल्या ग्रेटर नोएडा या शहरात ‘पंडित दीनदयाल उपाध्याय पुरातत्त्व संस्था’ याच्या परिसराचे उद्घाटन करण्यात आले.
 2. या संस्थेचा परिसर 25 एकर क्षेत्रफळाच्या क्षेत्रात उभारण्यात आला आहे.
 3. संस्थेबाबत:-
  1. 1959 साली प्रसिद्ध पुरातत्त्व शास्त्रज्ञ बी. बी. लाल यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय पुरातत्त्वीय सर्वेक्षण (ASI) कडून ‘स्कूल ऑफ आर्किऑलॉजी’ हे विद्यालय सुरू केले गेले.
  2. पुढे 1983 साली या संस्थेला ‘पुरातत्त्व संस्था’ (Institute of Archaeology) हे वर्तमान नाव प्राप्त झाले.
  3. ही संस्था संस्कृती मंत्रालयाच्या अंतर्गत भारतीय पुरातत्त्वीय सर्वेक्षण (ASI) याचा एक शैक्षणिक विभाग आहे.
  4. ही संस्था पुरातत्त्वशास्त्र विषयात विद्यार्थ्यांना एक समर्थक, उत्साही आणि आव्हानात्मक शैक्षणिक वातावरण प्रदान करते.
  5. पुरातत्त्वशास्त्राच्या जुन्या क्षेत्रात उत्कृष्टता प्राप्त करण्यासाठी विद्यार्थ्यांना संधी प्रदान करणे हा या संस्थेचा मुख्य उद्देश आहे.


"Geneva Agreement" protecting war prisoners

 1. भारताच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने हे स्पष्ट केले की पाकिस्तानवर केलेल्या कारवाईदरम्यान दिनांक 27 फेब्रुवारी 2019 रोजी भारताचे एक विमान कोसळले आणि भारतीय हवाई दलाचा एक पायलट पाकिस्तानच्या हद्दीत उतरला आणि तो आता पाकिस्तानाच्या ताब्यात होता. त्या व्यक्तीचे नाव म्हणजे - विंग कमांडर अभिनंदन.
 2. विंग कमांडर अभिनंदन यांना अलीकडेच पाकिस्तानने आपल्या ताब्यातून सोडले आणि भारताला सोपवले. ही सर्व प्रक्रिया जिनेव्हा करारनामानुसार चालली.
 3. जिनेव्हा करारनामा:- 
  1. जिनेव्हा करारनामा ही खरं तर सन 1864 ते सन 1949 ह्या काळात झालेल्या एकूण चार करारांची एक मालिका आहे.
  2. युद्धकैदी म्हणून ताब्यात असलेल्या सामान्य नागरिक व सैनिकांवर गंभीर परिणाम होऊ नयेत किंवा त्रास होऊ नये म्हणून हे करार करण्यात आले आहेत.
  3. दिनांक 12 ऑगस्ट 1949 रोजी ह्या चार करारांना जिनेव्हामध्ये मान्यता देण्यात आली.
  4. 1977 साली ह्या कायद्याच्या अंतर्गत सैनिकांसह सामान्य नागरिकांनाही संरक्षण मिळावे ह्यावर शिक्कामोर्तब झाले. रेड क्रॉसचे संस्थापक हेन्री ड्युनन्ट ह्यांनी 1864 साली झालेल्या युद्धाच्या वेळी जखमींना मदत करण्यासाठी वाटाघाटी केल्यामुळे हे करार अस्तित्वात आले आहेत.
  5. करारमालिकेच्या पहिल्या करारामध्ये आजारी किंवा जखमी सैनिकांना पकडण्यापासून संरक्षण, तसेच आजारी व जखमी सैनिकांना उपचार ह्याबद्दल नियम आहेत.
  6. दुसऱ्या करारात सर्व सैनिकांना कुठल्याही प्रकारचा भेदभाव न करता चांगली व समान वागणूक देणे ह्याबद्दल नियम आहेत.
  7. तिसऱ्या करारामध्ये युद्धकैद्यांबद्दल मार्गदर्शक तत्वे स्पष्ट केली आहेत. ह्यात कुणाला युद्धकैदी समजण्यात यावे आणि त्यांना कशी वागणूक मिळावी व त्यांना कुठल्या प्रकारची वागणूक देण्यात येऊ नये ह्याबद्दलचे नियम आहेत.
  8. चवथ्या करारामध्ये रेड क्रॉसच्या चिन्हाचा उपयोग माणसांना ओळखण्यासाठी व रेड क्रॉसच्या उपकरणांची ओळख पटवण्यासाठी करणे ह्याबाबत नियम आहेत.
  9. तिसऱ्या करारात युद्धकैद्यांना विस्तृत संरक्षण देण्यात आले आहे. युद्धकैद्यांच्या हक्कांबाबत तसेच त्यांना सोडून देण्याबाबत माहिती व ते ताब्यात असताना त्यांना देण्यात येणारी वागणूक ह्याबाबत विस्तृतपणे नियमावली देण्यात आली आहे.
  10. ‘युद्धकैदी’ ही संज्ञा तिसऱ्या करारात स्पष्ट केली आहे. आंतरराष्ट्रीय युद्धादरम्यान पकडल्या गेलेल्या सैनिकांनाच युद्धबंदी किंवा युद्धकैदी ही संज्ञा लागू पडते.
  11. नियमांप्रमाणे युद्धकैद्यांनी शत्रूवर थेट कारवाई केलेली असली तरी त्या गुन्ह्याअंतर्गत शत्रूराष्ट्र त्यांच्यावर कारवाई करू शकत नाही.
  12. त्यांना फक्त ह्यासाठी त्याब्यात घेण्याची परवानगी असते की त्यांना अधिक कारवाई करता येऊ नये. युद्ध संपल्यानंतर लगेच ह्या युद्धकैद्यांना सोडून देण्यात यावे असा नियम आहे.


Padma Lakshmi: The new goodwill ambassador of the UNDP

 1. 8 मार्चला आंतरराष्ट्रीय महिला दिनी, संयुक्त राष्ट्रसंघ विकास कार्यक्रम (UNDP) तर्फे त्याच्या नव्या सदिच्छा दूत (गुडविल अॅम्बेसेडर) पदी भारतीय वंश असलेल्या अमेरिकेच्या निवासी असलेल्या पद्मा लक्ष्मी यांची निवड करण्यात आली आहे.
 2. पद्मा लक्ष्मी या जगभरात असलेल्या असमानता आणि भेदभावविरोधी लढ्याचे समर्थन करणार आहेत.
 3. त्या एक प्रसिद्ध व्यक्तिमत्व, उद्योजिका आणि लेखिका आहेत. त्या अमेरिकन सिव्हिल लिबर्टीज युनियनच्या दूत आहेत.
 4. संयुक्त राष्ट्रसंघ विकास कार्यक्रम (UNDP):-
  1. हे संयुक्त राष्ट्रसंघातर्फे (UN) राबविण्यात येणारा एक प्रमुख विकास कार्यक्रम आहे.
  2. 1965 साली याची स्थापना करण्यात आली आणि याचे मुख्यालय अमेरिकेच्या न्यूयॉर्क शहरात आहे.
  3. हा कार्यक्रम संयुक्त राष्ट्रसंघ आमसभेच्या सहा विशेष मंडळांपैकी एक असून तो आर्थिक व सामाजिक परिषदेच्या अखत्यारीत येतो.
  4. ह्या कार्यक्रमद्वारे जगातील 177 देशांमध्ये नागरिकांना राहणीमान सुधारण्याची संधी उपलब्ध केली जाते.
  5. दारिद्र्य निर्मुलन, HIV/एड्स इत्यादी रोगांचे उच्चाटन, लोकशाहीचा प्रसार तसेच मानवी हक्कांसाठी लढा इत्यादी अनेक लोकोपयोगी उपक्रम यामार्फत चालवले जातात.


New scheme of Ministry of Textiles for women empowerment

 1. हातमाग आणि हस्तकला क्षेत्रातल्या कामगार स्त्रियांच्या सशक्तीकरणासाठी वस्त्रोद्योग मंत्रालयाने नव-नव्या योजना तयार केल्या आहेत.
 2. त्या पुढीलप्रमाणे आहेत -
 3. हातमाग क्षेत्र:-
  1. 2009-10 सालाच्या तिसऱ्या हातमाग जनगणनेनुसार देशात सुमारे 43.31 लक्ष हातमाग विणकर आणि सहयोगी कामगार आहेत, ज्यापैकी 77% स्त्रिया आहेत.
  2. त्यांच्यासाठी चार योजना सादर करण्यात आल्या आहेत -
  3. राष्ट्रीय हातमाग विकास कार्यक्रम (त्याचे घटक – विभागीय समूह; हातमाग विपणन सहाय्यता, सवलती पत/विणकर मुद्रा योजना)
  4. हातमाग विणकरांची व्यापक कल्याणकारी योजना
 4. धागा पुरवठा योजना
  1. व्यापक हातमाग गट विकास योजना
 5. हस्तकला क्षेत्र
  1. ‘पेहचान’ पुढाकार या कार्यक्रमाच्या अंतर्गत हस्तकला कारागीरांना ओळखपत्र दिले जात आहे.
  2. देशभरात हस्तकला क्षेत्रात सुमारे 7 दशलक्ष कारागीर आहेत, त्यात स्त्रियांची टक्केवारी 56.07% एवढी आहे.
 6. रेशीम क्षेत्र
  1. ‘सिल्क समग्र’ या कार्यक्रमाच्या अंतर्गत, भारत सरकारने 38500 दशलक्ष टन कच्चा रेशीम उत्पादनाचे लक्ष्य ठेवले आहे. भारतात सुमारे 55% स्त्रिया रेशीम क्षेत्राशी संबंधित श्रृंखलेमध्ये गुंतलेल्या आहेत.
  2. याशिवाय, भारत सरकारने 2020 सालापर्यंत 10,000 ‘बुनियाद’ रीलिंग यंत्रे पुरवून आरोग्यास अहितकारक असलेली पारंपरिक पद्धत दूर करण्याचा निर्णय घेतला आहे.
 7. पॉवरलूम क्षेत्र
  1. ‘स्टँड-अप इंडिया’ योजनेच्या अंतर्गत अनुसूचीत जाती/जमाती तसेच स्त्री उद्योजकांना नवीन पॉवरलूम संयंत्रासाठी एकूण खर्चाच्या 25% एवढी मदत दिली जाते.
 8. एकात्मिक कौशल्य विकास योजना (ISDS):-
  1. वस्त्रोद्योग क्षेत्रासाठी लागणार्‍या महत्त्वपूर्ण कौशल्याचे प्रशिक्षण देण्यासाठी वस्त्रोद्योग मंत्रालयाने ही योजना सादर केली.


Top