india won 10 medals in internatioanl wrestling

 1. इस्तानबुल येथे पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी एकूण १० पदकांची कमाई केली आणि त्यात ७ पदके महिलांनी जिंकली आहेत.
 2. पिंकी ही महिलांमध्ये सुवर्णपदक जिंकणारी एकमेव खेळाडू ठरली. तिने ५५ किलो वजनी गटात युक्रेनच्या ओल्गा श्नेएडरवर ६-३ असा विजय मिळवला.
 3. राष्ट्रकुल विजेत्या बजरंग पुनियाने सलग दुसऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदकाची (७० किलो गट) कमाई केली. महिन्याच्या सुरूवातीला जॉर्जियात झालेल्या स्पर्धेतही त्याने सुवर्णपदक जिंकले होते.
 4. ६१ किलो वजनी गटात संदीप तोमरवर इराणच्या मोहम्मदबाघेर याखकेशीने ८-२ अशी मात केली. त्यामुळे संदीपला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.


hiv patient ration as decreses by UN Aids report

संयुक्त राष्ट्रसंघाच्या एचआयव्हीसंदर्भात कार्यरत असलेल्या सहयोगी संस्थेने (यूएन एड्स) जागतिक पातळीवरील ‘माइल्स टू गो’ हा अहवाल नुकताच जाहीर केला.

या अहवालात २०१० ते २०१७ दरम्यानची एचआयव्ही संबंधित आकडेवारी देण्यात आली आहे.

जागतिक पातळीवर एचआयव्ही रोखण्यासाठी अपेक्षित वेगाने काम होत नसल्याची धोक्याची घंटा या अहवालाद्वारे वाजवण्यात आली आहे.

नव्याने एचआयव्ही बाधितांचे प्रमाण अद्यापही कमी झालेले नसल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

जागतिक पातळीवर गेल्या सात वर्षांमध्ये एचआयव्ही बाधितांचे प्रमाण केवळ १८ टक्क्यांनी कमी झाले.

एचआयव्ही बाधितांची संख्या २०१०मध्ये २२ लाख होती. २०१७मध्ये ती १८ लाखांवर आली आहे. नव्या एचआयव्ही बाधितांपैकी ९७ टक्के रुग्ण पूर्व युरोप आणि मध्य आशियातील आहेत.

एचआयव्हीमुळे मृत्यू होण्याचे प्रमाण १ लाख ६० हजार वरून ६९ हजार इतके कमी झाले. तर एचआयव्हीसह जगणाऱ्यांचे प्रमाण २३ लाखांवरून २१ लाखांवर आल्याचे अहवालाद्वारे स्पष्ट झाले.

भारतासह कंबोडिया, थायलंड, म्यानमार आणि व्हिएतनाम या देशांनी विशेष लक्ष दिल्यामुळे २०१०च्या तुलनेत २०१७मधील एचआयव्ही बाधितांचे प्रमाण लक्षणीयरीत्या कमी झाले आहे. फिलिपिन्स आणि पाकिस्तानमध्ये मात्र एचआयव्ही बाधितांचे प्रमाण वाढतेच आहे.

भारतात २०१०मध्ये एचआयव्ही आढळून आलेल्या नव्या रुग्णांचे प्रमाण जवळपास १ लाख २० हजार होते. २०१७मध्ये ते कमी होऊन जवळपास ८८ हजारांवर आले आहे.


sargio marconi passed away

 1. फियाट-क्रायस्लर कंपनीचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) सर्गियो मार्कियोनीयांचे २५ जुलै रोजी निधन झाले. त्यांचे वय ६६ वर्षे होते.
 2. आधी फियाट आणि नंतर क्रायस्लर या दोन्ही कंपन्यांना कर्जाच्या गर्तेतून बाहेर काढून पुन्हा स्थिरस्थावर करण्यात सर्गियो मार्कियोनी यांचा सिंहाचा वाटा होता.
 3. २००४मध्ये त्यांनी प्रथम फियाट कंपनीचे सीईओ पद स्वीकारले आणि त्यांनी अल्पावधीतच फियाट कंपनीला तोट्याच्या फेऱ्यातून बाहेर काढले.
 4. फियाट-५०० या चिमुकल्या मोटारीला त्यांनी नव्याने बाजारात आणले. फियाट कंपनीसाठी ती अत्यंत लाभदायी खेळी ठरली.
 5. मंदीसदृश परिस्थितीमुळे २००८मध्ये अमेरिकेतली क्रायस्लर कंपनी डबघाईला आली. त्यांनी फियाटला मदतीसाठी पुकारले. फियाट-क्रायस्लर कंपनीची जबाबदारीही मार्कियोनी यांच्याकडे आली.
 6. मार्कियोनी यांचे नेतृत्व आणि मोक्याच्या पदांवर (लीडरशिप टीम) योग्य माणसे नेमण्याची त्यांची क्षमता फियाट-क्रायस्लरलाही नव्या वाटेवर घेऊन गेली.
 7. मार्कियोनी यांना भारताविषयी प्रेम आणि रतन टाटांविषयी नितान्त आदर होता. फियाट कंपनीने टाटांच्या सहकार्याने भारतात बस्तान मांडण्याचा अपयशी प्रयत्न केला होता.
 8. फियाट कंपनीचे उत्कृष्ट इंजिन उपलब्ध असतानाही टाटांनी देशी बनावटीचे इंजिन विकसित केले आणि यशस्वीरीत्या वापरून दाखवले याचे मार्कियोनी यांना विलक्षण कौतुक होते.
 9. त्यांनी सतत नवीन उपायांचा, धोरणांचा विचार केला. जुलै २०१८मध्ये त्यांनी आपल्या सर्व पदांवरुन राजीनामा दिला आणि काही दिवसांनी त्यांचे निधन झाले.


Top

Whoops, looks like something went wrong.