indian chandrayan mission got success

 

 1. नासाच्या शास्त्रज्ञांनी चंद्रावर गोठलेले पाणी आढळल्याच्या माहितीला दुजोरा दिला आहे. महत्त्वाचे म्हणजे नासाने भारताकडून 10 वर्षांपुर्वी प्रक्षेपित करण्यात आलेल्या अंतराळ यान चांद्रयान-1 कडून मिळालेल्या माहितीच्या आधारे हा निष्कर्ष काढला आहे.
 2. नासाने चंद्राच्या सर्वात थंड आणि अंधाऱ्या ध्रुवीय क्षेत्रात गोठलेल्या अवस्थेत पाणी आढळल्याची माहिती दिली आहे.
 3. ‘पीएनएएस’ जर्नलमध्ये प्रकाशित लेखात बर्फ इकडे तिकडे विखुरलेल्या अवस्थेत असल्याचं सांगण्यात आले आहे. दक्षिण ध्रुवावर सर्वाधिक बर्फ ल्यूनर क्रेटर्सजवळ जमा झालेला आहे.
 4. उत्तर ध्रुवावर बर्फाचे प्रमाण जास्त असून तो विखुरलेल्या अवस्थेत आहे. शास्त्रज्ञांनी मून मिनरेलॉजी मॅपरकडून (एम3) प्राप्त झालेल्या आकड्यांचा वापर करत चंद्रावर गोठलेले पाणी उपलब्ध असल्याचे सांगितले आहे.
 5. नव्या माहितीनुसार, बर्फ चंद्रावरील ध्रुवीय क्षेत्राजवळ असणाऱ्या खड्ड्यांमध्ये जमा झाला आहे, जेथील किमान तापमान-156 डिग्री सेल्सिअसपेक्षा जास्त असत नाही. तिथे सुर्यप्रकाशही पोहोचत नाही.
 6. चंद्राच्या पृष्ठभागावर योग्य प्रमाणात बर्फ आढळल्याने आता आगामी मोहिमांसाठी, तसेच चंद्रावर राहण्याच्या दृष्टीनेही पाणी उपलब्ध होण्याच्या शक्यतेचे स्पष्ट संकेत मिळाले आहेत.


michel jonson declared retirement

 1. ऑस्ट्रेलियाचा दिग्गज क्रिकेटपटू मिचेल जॉनसन याने 19 अॉगष्ट 2018 रोजी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्व प्रकारामधून निवृत्ती घेतल्याची घोषणा केली आहे.
 2. •36 वर्षांच्या मिचेल जॉनसनची आंतरराष्ट्रीय कारकिर्द 10 वर्षांची होती.त्याने 73 टेस्ट,153 वनडे आणि 30 टी-20 मॅच खेळल्या आहेत.
 3. •मिचेल जॉनसन हा आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स, कोलकाता नाईट रायडर्स आणि किंग्ज ईलेव्हन पंजाबकडून खेळला आहे. या तिन्ही टीमकडून खेळताना जॉनसननं 54 मॅचमध्ये 28 च्या सरासरीने 61 विकेट घेतल्या आहेत.
 4. मिचेल जॉनसननं मागच्या महिन्यातच ऑस्ट्रेलियाची टी-20 लीग बिग बॅशमधून निवृती घेत असल्याची घोषणा केली होती.पण आयपीएल आणि इतर टी-20 लीगमध्ये खेळणार असल्याचं जॉनसन त्यावेळी म्हणाला होता.त्यावेळी त्याने बिग बॅश लीगमधून निवृत्त होण्याचा निर्णय वाढत्या सामन्यांचे कारण देत घेतला होता.परंतु आता मात्र जॉनसननं सगळ्या प्रकारच्या क्रिकेट स्पर्धांमधून निवृत्ती घेत असल्याचं सांगितलं.
 5. मिचेल जॉनसननं 2005 साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये न्यूझीलंडविरुध्द पदार्पण केले होते.त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकूण 590 विकेट घेतल्या आहेत.
 6. टेस्ट क्रिकेटमध्ये त्याची सर्वोत्तम कामगिरी इंग्लंडविरुद्ध होती.त्याने इंग्लंडविरुद्ध 19 मॅचमध्ये 87 विकेट घेतल्या. तर वनडेमध्ये त्यानं भारताविरुद्ध सर्वोत्तम कामगिरी केली.जॉनसननं भारताविरुद्ध 27 वनडेमध्ये 43 विकेट घेतल्या आहेत.
 7. मिचेल जॉनसननं 73 टेस्ट मॅचमध्ये 28 च्या सरासरीने 313 विकेट घेतल्या आणि 2065 रनही केल्या आहेत व यामध्ये एका शतकाचा समावेश आहे.
 8. 153 वनडेमध्ये 25 च्या सरासरीने 239 विकेट आणि 951रन यामध्ये 73 नाबाद सर्वोत्तम आहेत.तर टी-20 च्या 30 सामन्यात 38 विकेट आणि 109 रन व यामध्ये 28 सर्वोत्तम आहेत.


gopalkrushna gandhi got rajiv gandhi national sadbhavana award

 

 1. माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या 74 व्या जयंतीनिमित्त, पश्चिम बंगालचे माजी राज्यपाल गोपाळकृष्ण गांधी यांना ‘राजीव गांधी राष्ट्रीय सद्भावना पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात आले आहे.
 2. राजीव गांधी राष्ट्रीय सद्भावना पुरस्कार हा सांप्रदायिक सद्भावना, राष्ट्रीय एकात्मता आणि शांती प्रस्थापित करण्यात केलेल्या उल्लेखनीय योगदानासाठी दिला जाणारा एक भारतीय पुरस्कार आहे.
 3. या पुरस्काराची स्थापना 1992 साली करण्यात आली.
 4. हा पुरस्कार अखिल भारतीय काँग्रेस समितीतर्फे दिला जातो.
 5. पुरस्काराच्या स्वरुपात 10 लक्ष रूपयांची रोख रक्कम बक्षीस म्हणून दिली जाते.


marathwada university honour lifetime achivement award

 1. वेगवेगळ्या क्षेत्रात ठसा उमटवलेल्या आठ जणांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातर्फे जीवनगौरव पुरस्कार देण्यात येणार आहे.
 2. तसेच यामध्ये ‘सकाळ माध्यम समूहा’चे अध्यक्ष प्रतापराव पवार, सुलभ इंटरनॅशनलचे संस्थापक बिंदेश्‍वर पाठक, बुलडाणा को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोयायटीचे राधेश्‍याम चांडक, युनेस्कोचे संचालक राजेंद्र शेंडे, ज्येष्ठ साहित्यिक प्राचार्यरा.रं. बोराडे, आदर्शग्राम पाटोदाचे सरपंच भास्कर पेरे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सुरक्षारक्षक तुकाराम जनपदकर गुरुजी, साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त नामदेव कांबळे या मान्यवरांचा समावेश आहे.
 3. विद्यापीठाच्या हीरक महोत्सवी वर्धापनदिनी गुरुवारी (23 ऑगस्ट रोजी) पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे.
 4. विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते हा कार्यक्रम होईल.
 5. मानपत्र आणि मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप असल्याची माहिती कुलगुरू डॉ. बी.ए. चोपडे यांनी दिली.


s k arora who tobacco day 2017 award

 

 1. ते सध्या दिल्ली सरकारमध्ये अतिरिक्त आरोग्य संचालक या पदावर कार्यरत आहेत.
 2. त्यांना प्रतिष्ठित WHO जागतिक तंबाखू विरोधी दिन 2017 पुरस्कार देण्यात आला आहे.
 3. त्यांना हा सन्मान तंबाखू नियंत्रणाबद्दल केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल देण्यात आला.
 4. WHO चे भारतातील प्रमुख हेंक बेकनहँड यांच्या हस्ते 16 ऑगस्ट रोजी हा सन्मान प्रदान करण्यात आला.
 5. 31 मे रोजी जागतिक तंबाखू विरोधी दिन साजरा केला जातो


dalbir singh suhag honoured with legion of honour by america

 

 1. दलबीर सिंग सुहाग माजी भारतीय लष्कर प्रमुख आहेत.
 2. 17 ऑगस्ट रोजी त्यांना अमेरिकेचा 'लीजन ऑफ ऑनर' (Degree of commander) हा सन्मान देण्यात आला.
 3. हा सन्मान प्राप्त करणारे ते दुसरे भारतीय लष्कर अधिकारी ठरले आहेत.
 4. यापूर्वी हा सन्मान 1946 मध्ये जनरल राजेंद्रसिंहजी जाडेजा यांना प्राप्त झाला होता.

हा पुरस्कार पुढील चार श्रेणीमध्ये दिला जातो :-
1) Degree of Chief Commander
2) Degree of commander
3) Degree of the officer
4) Degree of Legionnarie.


Top

Whoops, looks like something went wrong.