
1711 12-Aug-2018, Sun
थॉमस रॉयटर्स फाऊंडेशन"चे सर्वेक्षण
- महिलांच्या अधिकारावर काम करणाऱ्या ५५० तज्ज्ञांनी हा सर्व्हे केला आहे.
- यामध्ये १९३ देशांमधून महिलांसाठी १० असुरक्षित आणि धोकादायक देशांची यादी तयार करण्यात आली.
- महिलांच्या लैंगिक शोषणाचे धोके टाळण्यासाठी लक्ष देणारा एकमेव देश अमेरिका असल्याचे या सर्व्हेत म्हटले आहे.
- यापूर्वी २०११ मध्ये करण्यात आलेल्या सर्व्हेमध्ये अफगाणिस्तान, कॉन्गो, पाकिस्तान, भारत आणि सोमालीया हे देश धोकादायक असल्याचे म्हटले होते.
- मात्र यावर्षी महिलांवरील अन्याय, अत्याचारांच्या घटनेत झालेल्या वाढीमुळे भारताने या देशांना मागे टाकले आहे.
- इतकेच नाही तर ६ वर्षापूर्वी झालेल्या निर्भया प्रकरणानंतर देखील महिलांच्या सुरक्षेसाठी कोणतेच ठोस पाऊल भारतात उचलले नसल्याचे म्हटले आहे.
भारत पहिल्या स्थानावर...
- सरकारकडून जाहीर करण्यात आलेल्या अधिकृत आकडेवारीनुसार २००७ ते २०१६ दरम्यान महिलांच्या बाबतीत घडणाऱ्या गुन्ह्यांत ८३ टक्के वाढ झाली आहे.
- दर तासाला ४ महिला अन्याय, अत्याचाराला बळी पडत असल्याची तक्रार नोंद होते.