
2539 26-Jan-2018, Fri
- भारतीय प्रजासत्ताक दिन हा भारत प्रजासत्ताकात दरवर्षी 26 जानेवारी रोजी पाळला जातो.
- 26 जानेवारी 2018 रोजी भारताचा 69 वा प्रजासत्तक दिन साजरा होत आहे. यानिमित्त दिल्लीत लाल किल्ल्यावर रंगारंग कार्यक्रम आणि भारतीय बळाचे प्रदर्शन केल्या जाणार आहे.
- कार्यक्रमादरम्यान भारतीय फौजफाट्यामधील (नौदल, पायदळ, वायुदल) वेगवेगळे विभाग, शस्त्रास्त्रे आणि अद्ययावत प्रणाली यांचे प्रदर्शन तसेच भारतातील विविधांगी संस्कृतींची झलक प्रस्तुत केली जाते. त्यामध्ये सर्व राज्यांच्या चित्ररथांचा सहभाग असतो.
- खास बाब:-
- यावर्षी प्रथमच प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमामध्ये 10 आशियाई देशांचे प्रमुख सहभाग घेणार आहेत.
- पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आमंत्रणाचा स्वीकार करून दिनाच्या सोहळ्यासाठी थायलंड, व्हिएतनाम, इंडोनेशिया,मलेशिया, फिलिपीन्स, सिंगापूर, म्यानमार, कंबोडिया, लाओस आणि ब्रुनेई या देशांचे राष्ट्राध्यक्ष भारतात आले आहेत.
पार्श्वभूमी |
|