India's National Biofuel Policy-2018

 1. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत ‘राष्ट्रीय जैवइंधन धोरण-2018’ याला मंजूरी देण्यात आली आहे.
 2. ठळक वैशिष्ट्ये:- 
  1. जैवइंधनाचे त्याच्या प्रकारानुसार वर्गीकरण करण्यात आले आहे.
  2. यात पहिल्या पिढीचे जैवइंधन म्हणजे बायोइथेनॉल आणि अत्याधुनिक जैवइंधन; द्वितीय पिढीचे इथेनॉल, महापालिकेचा घनकचरा; तसेच तृतीय पिढीचे जैवइंधन म्हणजे, बायो-CNG इत्यादी.
  3. या वर्गीकरणामुळे प्रत्येक प्रकारातील इंधनाला योग्य आर्थिक मदत किंवा सवलत देणे शक्य होईल.
  4. कृषी उत्पादने जसे की, ऊसाचा रस, बीटामधील साखर, शलगमसारख्या कंदमुळातील साखर, बटाटे, मका यातील स्टार्च, यासह खाण्यायोग्य नसलेल्या कृषी उत्पादनांचा उपयोग इथेनॉल निर्मितीसाठी करता येईल. 
  5. शेतकऱ्याकडे असलेल्या अतिरिक्त धान्यसाठ्याचा उपयोग इथेनॉल निर्मितीसाठी करता येईल.
  6. मात्र, त्यासाठी राष्ट्रीय जैवइंधन समन्वय समितीची मान्यता लागणार.
  7. अत्याधुनिक आणि सुधारित जैवइंधन निर्मिती या दृष्टीने द्वितीय पिढीचे इथेनॉल शुद्धीकरण प्रकल्पासाठी केंद्र शासन येत्या सहा वर्षात 5000 कोटी रुपये निधी खर्च करु शकणार.
  8. जैवइंधन निर्मितीपासून ते पुरवठ्यापर्यंतची एक साखळीच तयार केली जाऊ शकेल.
  9. जैवइंधन निर्मितीसाठी एकत्रित प्रयत्न करण्याच्या हेतूने त्याच्याशी संबंधित मंत्रालये आणि विभागांच्या भूमिकाही निश्चित करण्यात आल्या आहेत.
 3. या धोरणामुळे देशाचे पेट्रोल-डीझेल सारख्या इंधनावरील अवलंबित्व कमी होईल आणि इंधनाची बचत होईल.
 4. पर्यावरणाच्या दृष्टीनेही तसेच सेवनातून मानवी आरोग्यासही जैवइंधन फायद्याचे आहे.
 5. ह्या इंधनाची निर्मिती ग्रामीण भागात होणार असल्याने ग्रामीण भागात पायाभूत सुविधा आणि रोजगार निर्मिती होईल. तसेच घनकचरा व्यवस्थापनामुळे कचऱ्याचा प्रश्नही सुटण्यास मदत होईल.


68 percent of the world's population lives in urban areas by 2050: UN

 1. संयुक्त राष्ट्रसंघ आर्थिक व सामाजिक कल्याण विभाग (UN DESA) याच्या लोकसंख्या विभागाने ‘जागतिक शहरीकरण शक्यतांचा आढावा-2018’ अहवाल प्रसिद्ध केला आहे.
 2. संयुक्त राष्ट्रसंघाच्या नव्या अंदाजानुसार 2028 सालच्या आसपास दिल्ली जगातला सर्वाधिक लोकसंख्या असलेला शहर बनण्याची शक्यता आहे.
 3. शिवाय 2050 सालापर्यंत जगातल्या शहरी लोकसंख्येत भारताचे योगदान सर्वाधिक होण्याची शक्यता आहे. 
 4. ठळक बाबी:-
 5. भविष्यात जगातल्या शहरी लोकसंख्येचा आकार वाढण्याचा अंदाज आहे.
 6. भारत, चीन आणि नायजेरिया सन 2018 आणि सन 2050 या कालावधीत जगातली शहरी लोकसंख्येच्या अंदाजित वाढीचा 35% भाग असणार.
 7. 2050 सालापर्यंत भारत 41.6 कोटी शहरी नागरिकांना, चीन 25.5 कोटी आणि नायजेरिया 18.9 कोटी शहरी नागरिकांना जोडणार.
 8. 2050 सालापर्यंत जगातली 68% लोकसंख्या शहरी क्षेत्रात राहण्याचा अंदाज आहे. वर्तमानात जगातली 55% लोकसंख्या शहरी क्षेत्रात राहते. 
 9. भारताची सर्वाधिक ग्रामीण लोकसंख्या 89.3 कोटी आहे आणि त्यानंतर चीनचा (57.8 कोटी) क्रमांक लागतो. 
 10. टोकियो 3.7 कोटी नागरिकांच्या समूहासह जगातला सर्वात मोठा शहर आहे.
 11. त्यानंतर नवी दिल्ली (2.9 कोटी), शांघाय (2.6 कोटी) आणि मेक्सिको शहर आणि साओ पाउलो (प्रत्येकी 2.2 कोटी) यांचा क्रमांक लागतो. काहिरा, मुंबई, बीजिंग आणि ढाका या शहरांमध्ये जवळपास 2 कोटी नागरिक आहेत. 
 12. सन 2028 च्या आसपास दिल्ली जगातला सर्वाधिक लोकसंख्या असलेला शहर बनण्याचा अंदाज आहे.
 13. 2028 साली दिल्लीची अंदाजित लोकसंख्या जवळपास 3.72 कोटी असेल, जी टोकियोच्या 3.68 कोटीहून अधिक आहे.
 14. अंदाजानुसार ग्रामीण भागातून शहरी भागात लोकांच्या मार्गक्रमणामुळे 2050 सालापर्यंत शहरी भागात एकत्रितपणे जगाच्या लोकसंख्येत आणखी 2.5 अब्जची भर पडू शकते, ज्यातील 90% वाढ आशिया आणि आफ्रिका खंडात दिसून येईल.
 15. वर्तमानात सर्वाधिक शहरी भागांमध्ये उत्तर अमेरिका (2018 साली शहरी क्षेत्रात त्यांची 82% लोकसंख्या), लॅटिन अमेरिका आणि कॅरिबियन (81%), युरोप (74%) आणि ओशिनिया (68%) यांचा समावेश आहे. 
 16. आशियातील शहरीकरणाचा स्तर अंदाजे 50% इतका आहे. त्याउलट आफ्रिकेमध्ये बहुतेक ग्रामीण भागात राहतात आणि 43% लोकसंख्या शहरी भागात राहते.
 17. 2030 सालापर्यंत जगामध्ये एक कोटीपेक्षा जास्त रहिवाशांसह 43 मेगा शहरे असण्याची शक्यता आहे, त्यातील बहुतांश विकसनशील देशांमध्ये असतील.
 18. जगभरात 33 मेगा शहरांमध्ये आठ लोकांपैकी एक राहतात.


 Approval of setting up of AIIMS in Jharkhand

 1. झारखंड राज्यातल्या देवघर शहरात नवीन अखिल भारतीय वैद्यकीयशास्त्र संस्था (AIIMS) उभारण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाने आपली मंजूरी दिली आहे.
 2. भारत सरकारच्या प्रधान मंत्री स्वास्थ्य सुरक्षा योजनेंतर्गत हे AIIMS उभारण्यात येणार असून त्यासाठी 1103 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे.
 3. 750 खाटाची क्षमता असलेले रुग्णालय, 100 विद्यार्थ्यांसाठी वैद्यकीय महाविद्यालय, परिचारिका महाविद्यालय आणि आयुष विभाग व अन्य सुविधा यामध्ये असणार आहे.
 4. ‘पंतप्रधान आरोग्य सुरक्षा योजना’:-
  1. देशात विविध भागांमध्ये आरोग्य सुविधांना सर्वांसाठी समरूपता उपलब्ध करून देण्यासाठीच्या उद्देशाने सुरू करण्यात आली आहे.
  2. योजनेंतर्गत देशातल्या मागास राज्यांमध्ये वैद्यकीय शिक्षणास गुणवत्तापूर्ण करण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देण्याचे लक्ष्य निर्धारित केले आहे.
  3. या योजनेला मार्च 2006 मध्ये मंजूरी दिली गेली.
  4. योजनेंतर्गत आतापर्यंत भुवनेश्वर, भोपाल, रायपुर, जोधपुर, ऋषिकेश आणि पटना या ठिकाणी AIIMS स्थापित केले गेले आहे.
 5. अखिल भारतीय वैद्यकीयशास्त्र संस्था (All India Institutes of Medical Sciences -AIIMS):-
  1. हा उच्च शिक्षणासाठी स्वायत्त सार्वजनिक वैद्यकीय महाविद्यालयांचा एक समूह आहे.
  2. AIIMSला संसदीय कायद्याखाली ‘राष्ट्रीय महत्त्व असलेल्या संस्था’ म्हणून घोषित करण्यात आले आहे.
  3. सर्वप्रथम AIIMS दिल्लीची 1956 साली स्थापना झाली.


Top