
2905 15-Mar-2018, Thu
- जगभरात 14 मार्च (3/14) रोजी आंतरराष्ट्रीय पाय दिन साजरा केला जातो.
- पाय (Pi) (ग्रीक अक्षर "π") हे गणितामध्ये एक अचल संख्या दर्शवण्यासाठी वापरलेले प्रतीक आहे.
- वर्तुळाचा परिघ आणि त्याचा व्यास यांचे गुणोत्तर म्हणजे पाय होय, जो साधारणपणे 3.14159 आहे.
- पाय दशांश बिंदूपासून एक लाख कोटीपेक्षा जास्त अंकांनी मोजला गेला आहे.
- एक परिमेय संख्या म्हणून ते कोणत्याही पुनरावृत्ती किंवा निश्चित संरचनेशिवाय अमर्यादपणे गणली गेली आहे. याचा आजवर कधीही पूर्ण भागाकार झालेला नाही.
- गणितामधील ही एक मजेशीर आणि तशीच आव्हानात्मक बाब आहे.
- 1988 साली सॅन फ्रान्सिस्को एक्सप्लोरेटोरियम येथे लॅरी शॉ यांनी पाय दिनाची अधिकृत सुरुवात केली होती. या ठिकाणी शॉ भौतिकशास्त्रज्ञ म्हणून काम करीत होते.