
749 28-Feb-2019, Thu
-
लेडी सिंघम म्हणून ओळख असलेल्या पुणे शहर पोलीस दलातील पोलीस उपायुक्त ज्योती प्रिया सिंह यांची राष्ट्रीय गुप्तचर यंत्रणा (एनआयए) दिल्ली येथे बदली करण्यात आली आहे. चार वर्षांसाठी प्रतिनियुक्तीवर त्यांची नेमणूक नवी दिल्लीतील एनआयएमध्ये करण्यात आली आहे.
-
ज्योती प्रिया सिंह यांनी डेप्यूटेशनवर बदलीसाठी अर्ज केला होता. त्यानंतर त्यांची या अर्जावरून दिल्लीत एनआयएमध्ये 4 वर्षांसाठी प्रतिनियुक्तीवर बदली करण्यात आली आहे. 2008 बॅचच्या आयपीएस अधिकारी ज्योती प्रिया सिंह यांची लेडी सिंघम म्हणून ओळख आहे.
-
तसेच त्यांनी कोल्हापूरमध्ये अतिरिक्त पोलीस अधिक्षक असताना छेडछाडप्रकरणी आलेल्या तक्रारीवर तात्काळ कारवाई करत एका राजकिय नेत्याविरोधात छेडछाडप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. एका दिवसात त्यांनी 40 रोडरोमीयोंना हिसका दाखवला होता.
-
पुण्यात सध्या त्या सायबर आणि आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलीस उपायुक्त म्हणून कार्यरत आहेत. कॉसमॉस बँकेवरील सायबर हल्ला प्रकरणाच्या तपास त्यांच्याकडे आहे. तसेच बीटकॉईन फसवणूक प्रकरणाच्या एसआयटीच्या त्या प्रमुख आहेत.