Maharashtra has won 9 gold medals in National Skills Competition; Maharashtra tops with 23 medals

 1. ‘राष्ट्रीय कौशल्य स्पर्धा २०१८’ च्या विविध श्रेणींमध्ये महाराष्ट्राने उत्तम कामगिरी करत ९ सुवर्ण, ८ रजत आणि ६ कांस्य असे एकूण २३ पदक मिळवित अव्वल स्थान पटकाविले आहे.
 2. यातील सुवर्ण व रजत पदक विजेत्या स्पर्धकांची पुढील वर्षी रशिया येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय कौशल्य स्पर्धेसाठीही निवड झाली असून ते भारताचे प्रतिनिधित्व करणार आहेत.
 3. केंद्रीय कौशल्य विकास मंत्रालयांतर्गत कार्यरत राष्ट्रीय कौशल्य विकास मंडळाच्यावतीने येथील एरोसीटी भागात ३ ते ५ ऑक्टोबर २०१८ या कालावधित पार पडलेल्या राष्ट्रीय कौशल्य स्पर्धेचा निकाल आज घोषित झाला.
 4. विज्ञान भवन येथे केंद्रीय कौशल्य विकास व उद्योजकता राज्यमंत्री अनंतकुमार हेगडे आणि प्रसिध्द दिग्दर्शक माध्यम व मनोरंजन कौशल्य परिषदेचे अध्यक्ष तथा सुभाष घई यांच्या हस्ते आज या पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.
 5. महाराष्ट्राला सर्वाधिक पुरस्कार:-
  1. या स्पर्धेत सर्वाधिक २३ पदक मिळवून महाराष्ट्र देशात अव्वल ठरला आहे.
  2. ओडिशा २१ पदकांसह दुसऱ्या तर प्रत्येकी १६ पदक मिळवून कर्नाटक व दिल्ली तिसऱ्या स्थानावर राहिले आहेत.
 6. महाराष्ट्राची दमदार कामगिरी:-
  1. देशभरातील २७ राज्यांतील ४०० पेक्षा अधिक स्पर्धक या कौशल्य स्पर्धेच्या महाकुंभात सहभागी झाले होते. महाराष्ट्रातून २२ कौशल्य प्रकारात ४४ स्पर्धक सहभागी झाले होते.
  2. या स्पर्धेत महाराष्ट्राने ९ सुवर्ण, ८ रजत आणि ६ कांस्य असे एकूण २३ पदक पटकाविली आहेत.
 7. सुवर्णपदक विजेते:-
  1. तुषार फडतरे या स्पर्धकाने ऑटोमोबाईल टेक्नॉलॉजी प्रकारात सुवर्ण पदकाला गवसणी घातली.
  2. इलेक्ट्रीकल इंस्टॉलेशन प्रकारात वैभव राऊत, इन्फॉर्मेशन नेटवर्क केबलिंग प्रकारात ओंकार खाडे, मेकाट्रॉनिक्स प्रकारात पार्थ साहु आणि रतिकांत मिश्रा, मोबाईल रोबोटिक मध्ये करण पाटील आणि निहार दास, श्रेणीक गुगळे यांनी प्रिंट मीडिया टेक्नॉलॉजी प्रकारात तर संजय कुमार यांनी वॉल अँड फ्लोअर टायलींग प्रकारात सूवर्ण पदक पटकाविले.
 8. रजत पदकाचे मानकरी:-
  1. सूरज पाटील यांना ऑटो बॉडी रिपेअरींग प्रकारात सुवर्ण पदकाने हुलकावणी दिली मात्र त्यांनी उपविजेते ठरत रजत पदकावर नाव कोरले.
  2. क्लाऊट कॉम्प्युटींग प्रकारात ओंकार बहीवाल, ग्राफीक डिझाईन टेक्नॉलॉजीमध्ये श्वेता रतनपुरा, इन्फॉरमेशन नेटवर्क केबलींग मध्ये दिव्या गोडसे, मोबाईल रोबोटिक मध्ये ओंकार गुरव आणि रोहन हानगी, प्रिंट मीडिया टेक्नॉलॉजी मध्ये साहिल जमदार तर वेल्डिंग मध्ये प्रतिक कसारे यांनी रजत पदक मिळविले.
 9. कांस्य पदकाचे मानकरी:-
  1. थ्रीडी गेम आर्ट प्रकारात गंधार भंडारी याने राज्याला कांस्य पदक मिळवून दिले.
  2. ब्युटी थेरपी मध्ये कोमल कोंडलीकर, इन्फॉरमेशन नेटवर्क केबलींग अंकुश देशमुख, फ्लोरिस्ट्रीमध्ये श्रीराम कुलकर्णी, प्रिंट मीडिया टेक्नॉलॉजी मध्ये श्रीनिवास कुलकर्णी तर रेफ्रिजरेशन अँड एयर कंडीशनींग प्रकारात सैफ अली खान याने कांस्य पदक पटकाविले.
  3. रशियातील कझानमध्ये ऑगस्ट २०१९ मध्ये आयोजित होणाऱ्या आंतरराष्ट्रीय कौशल्य स्पर्धेत भारतातील प्रतिभावान युवक -युवतींना सक्षमपणे देशाचे नेतृत्व करता यावे, यासाठी राष्ट्रीय कौशल्य विकास मंडळाच्यावतीने देशातील विविध राज्यांच्या कौशल्य विकास विभागाला सूचित करण्यात आले.
  4. महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास संस्थेने यासाठी जानेवारी २०१८ पासून राज्यातील प्रत्येक जिल्ह्यांमध्ये कौशल्य स्पर्धेचे आयोजन केले.
  5. यात २०२२ स्पर्धकांनी यात भाग घेतला. त्यातून विभागीय, राज्य आणि नंतर देशातील विविध राज्यांचे विविध विभागात विभाजन करून जयपूर व बेंगलुरू येथे राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली.
  6. या सर्व चाळण्यांमधून महाराष्ट्रातील ४४ स्पर्धकांची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली व अंतिमत: महाराष्ट्राने उत्तम कामगिरी करत २३ पदक या स्पर्धेत पटकावत अव्वल स्थान काबिज केले.


World Space Week: October 4-10

 1. यंदाचा म्हणजेच 2018 सालचा जागतिक अंतराळ सप्ताह (World Space Week) हा "स्पेस युनाइट्स द वर्ल्ड" (म्हणजेच अंतराळ क्षेत्राद्वारे जागतिक ऐक्य साधणे) या विषयाखाली पाळला जात आहे.
 2. यावर्षी जागतिक अंतराळ सप्ताह साजरी करणारी महाराष्ट्र राज्यातली नाशिक महानगरपालिका ही देशातील पहिली महापालिका ठरली आहे.
 3. 1957 साली 4 ऑक्टोबर या तारखेला ‘स्पुतनिक 1’ या नावाचा कृत्रिम उपग्रह रशियाने अंतराळात पाठवला होता. तर 10 ऑक्टोबर 1967 या दिवशी संयुक्त राष्ट्रासंघाच्या सदस्य देशांनी एकत्रित येत एक करार केला.
 4. यात अंतराळाचा वापर माणसाच्या कल्याणासाठी आणि शांततेसाठी व्हावा आणि उपग्रहांचा वापर मानवाच्या कल्याणासाठी व्हावा असा करार करण्यात आला आहे.
 5. या घटनेच्या स्मरणार्थ संयुक्त राष्ट्रसंघाच्या महासभेने डिसेंबर 1999 मध्ये 4-10 ऑक्टोबर हा कालावधी जागतिक अंतराळ सप्ताह म्हणून पाळण्याचा निर्णय घेतला.
 6. विक्रम साराभाई यांच्या यांच्या पुढाकाराने 1975 साली भारतात दूरदर्शनसंचाद्वारे (TV) माहिती प्रसारणाचा पहिला प्रयोग यशस्वी झाला.
 7. अंतराळ तंत्रज्ञानाच्या मदतीने जागतिक सुरक्षितता, भूकंप, त्सुनामी, हवामान, नैसर्गिक धोके आदींविषयी माहिती देणारे तंत्रज्ञान विकसित करण्यातही मोलाची भूमिका बजावली आहे.
 8. आतापर्यंत ISROने 168 मोहिमा केल्या असून त्यापैकी 45 यानांचे यशस्वीपणे प्रक्षेपण केले आहे.


Top