Maldives refuses to participate in India's navy warfare

 1. पुढील महिन्यात भारताने आयोजित केलेल्या बहुराष्ट्रीय ‘मीलन’ या नौदल युद्ध सरावात सहभागी होण्यासाठी दिलेले निमंत्रण मालदीवने फेटाळून लावले आहे.
 2. यासाठी मालदीवमधील सध्याच्या आणीबाणीच्या परिस्थितीत देश सोडून नौदल सरावास येणे योग्य ठरणार नाही, असे स्पष्टीकरण मालदीवच्या अधिकाऱ्यांकडून देण्यात आले.
 3. मालदीवचा हा नकार म्हणजे मालदीवचे विद्यमान सत्ताधारी अब्दुल्ला यामीन आणि भारत सरकारमधील मतभेदांची दरी रुंदावत चालल्याचे लक्षण मानले जात आहे.
 4. भारतीय नौदलाचे प्रमुख अॅडमिरल सुनील लांबा ६ मार्चपासून सुरू होणाऱ्या या ८ दिवसांच्या नौदल सराव कार्यक्रमाची घोषणा केली. यामध्ये एकूण १६ देश सहभागी होणार आहेत.
 5. इंडो-पॅसिफिक क्षेत्रात चीनच्या वाढत्या ताकदीच्या पार्श्वभूमीवर अंदमान-निकोबार द्विपसमूहावर या युद्ध सरावाचे आयोजन करण्यात आले आहे.
 6. मीलनमध्ये विविध देशांचे नौदल प्रमुखही सहभागी होणार असून यावेळी दक्षिण चीन सागरातील चीनच्या वाढत्या दादागिरीवरही चर्चा होईल.
 7. यापूर्वी नौदल सराव कार्यक्रम १९९५साली पहिल्यांदा सहा नौदलांबरोबर, क्षेत्रीय सहकार्य वाढविण्याच्या उद्देशाने केला होता. यात ऑस्ट्रेलिया, मलेशिया, मॉरीशस, म्यानमार, न्यूझीलँड आणि ओमान या देशांच्या नौदलाचा सहभाग होता.
तुम्हाला हे माहीत आहे का?
 1. मालदीवमधील परिस्थिती:- 
 2. मालदीवमध्ये यामीन सरकारने सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय मान्य करण्यास नकार देत न्यायाधीशांनाच बेडया ठोकल्या आहेत.
 3. विरोधकांचा आवाज दडपून टाकण्यासाठी आणीबाणी देखील लागू करण्यात आली.
 4. तसेच ज्यादिवशी आणीबाणी संपणार होती, त्याचदिवशी आणीबाणीचा कालावधी आणखी ३० दिवसांसाठी वाढवण्याचा निर्णय घेण्यात आल्यामुळे आणखी तणाव निर्माण झाला आहे. त्यावर भारताने तीव्र आक्षेप घेत आपली नाराजी नोंदवली.


Signatures of 12 MoUs signed between India and Jordan

 1. 27 फेब्रुवारी ते 1 मार्च 2018 या कालावधीत जॉर्डन देशाचा राजा महाराज अब्दुल्लाह दुसरा बिन अल-हुसेन हे भारत भेटीवर होते.
 2. त्यांच्या नेतृत्वात आलेल्या व्यावसायिक प्रतिनिधीमंडळासोबत झालेल्या चर्चेअंती 12 सामंजस्य करार करण्यात आले आहेत.
 3. 28 फेब्रुवारी 2018 रोजी FICCI, CII आणि ASSOCHAM यांनी संयुक्तपणे भारत-जॉर्डन व्यवसाय मंचाची बैठक पार पाडली. 
 4. या भेटीचे फलित म्हणून दोन्ही देशांमधील द्विपक्षीय संबंध बळकट करण्यासाठी दोघांनीही विविध क्षेत्रात 12 सामंजस्य करारांवर स्वाक्षर्‍या केल्या आहेत.
 5. भारत जॉर्डन संबंध:-
  1. भारताचा जॉर्डनसोबत पहिल्यांदा संबंध 1947 साली सहकार्य आणि मैत्रीपूर्ण संबंधांतून झालेल्या करारामार्फत प्रस्थापित झालेत.
  2. 1950 साली दोघांनीही सर्व दृष्टींनी परिपूर्ण राजनैतिक संबंध औपचारिकरीत्या प्रस्थापित केलेत.
  3. नोव्हेंबर 2014 पासून, भारत सरकारने जॉर्डनसाठी ई-टुरिस्ट व्हिसा सुविधा सुरू केलेली आहे.
12 सामंजस्य करार
 1. संरक्षण क्षेत्रात सहकार्यासाठी - प्रशिक्षण, संरक्षण उद्योग, दहशतवाद विरोध, लष्करी अभ्यास, सायबर सुरक्षा, लष्करी वैद्यकीय सेवा, शांतता, आदी क्षेत्रात सहकार्याच्या अंमलबजावणीसाठी तरतूद करणे.
 2. राजनैतिक आणि अधिकृत पारपत्र (passport) धारकांसाठी व्हिसा सवलत – दोन्ही देशांच्या राजनैतिक आणि अधिकृत पारपत्र धारकांना परस्परांच्या देशांमध्ये व्हिसाशिवाय प्रवास करण्याची परवानगी देणे.
 3. सांस्कृतिक आदान-प्रदान कार्यक्रम (CEP) – सन 2018 ते सन 2022 या कालावधीत साहित्य, कला व संस्कृती आणि युवा कार्यक्रमांच्या क्षेत्रात आदान-प्रदान करणे.
 4. मनुष्यबळ क्षेत्रात सहकार्यासाठी - जॉर्डनमधील भारतीय नागरीकांच्या कंत्राटी रोजगारातील प्रशासनात सर्वोत्तम पद्धतींच्या वापराला प्रोत्साहन देणे.
 5. आरोग्य आणि औषध क्षेत्रात सहकार्यासाठी - सार्वत्रिक आरोग्य सेवा, आरोग्य क्षेत्रातील सेवा आणि माहिती तंत्रज्ञान, आरोग्य संशोधन, राष्ट्रीय आरोग्य सांख्यिकी, क्षय रोगाचे निदान, उपचार आणि औषधे, औषधे आणि वैद्यकीय उपकरणांचे नियमन अश्या परस्पर सहकार्याच्या विविध मान्यता प्राप्त क्षेत्रांमध्ये सहकार्य करणे.
 6. जॉर्डनमध्ये नवीन पिढीचे उत्कृष्टता केंद्र उभारण्यासाठी - आगामी पाच वर्षात जॉर्डनच्या किमान 3000 माहिती तंत्रज्ञान व्यावसायिकांच्या प्रशिक्षणासाठी नवीन पिढीचे उत्कृष्टता केंद्र स्थापन करणे आणि भारतात संसाधन केंद्र स्थापन करणे.
 7. रॉक फॉस्फेट आणि खते/NPK च्या दीर्घकालीन पुरवठ्यासाठी - जॉर्डनमध्ये फॉस्फरीक अम्ल/DAP/NPK खते यांसाठी उत्पादन सुविधा उभारणे आणि भारताला 100% पुरवठ्यासाठी रॉक फॉस्फेटचे खाणकाम.
 8. सीमाशुल्क क्षेत्रात सहकार्यासाठी - दोन्ही देशांमधील सीमाशुल्क कायद्यांच्या योग्य वापरासाठी परस्पर सहकार्य करणे.
 9. आग्रा (भारत) आणि पेट्रा (जॉर्डन) यांना ‘जुळे’ शहर बनविण्यासाठी - पर्यटन, संस्कृती, क्रीडा आणि आर्थिक क्षेत्रात परस्पर सहकार्यासाठी विविध उपक्रमांद्वारे सामाजिक संबंधांना प्रोत्साहन देण्यासाठी आग्रा आणि पेट्रा शहरांच्या दोन महापालिका एकत्र आणणे.
 10. भारतीय जनसंपर्क संस्था (IIMC) आणि जॉर्डन मिडिया इन्स्टिट्यूट (JMI) यांच्यात सहकार्यासाठी - दोन संस्थांमधील संयुक्त प्रकल्पांचा विकास, शैक्षणिक आणि वैज्ञानिक उपक्रमांची संयुक्त संघटना आणि कर्मचारी, विद्यार्थी आणि समान हिताच्या सामुग्रीचे आदान-प्रदान करणे.
 11. प्रसारण क्षेत्रात सहकार्यासाठी - भारताचे प्रसार भारती आणि जॉर्डन रेडियो अँड टीव्ही कॉर्पोरेशन दरम्यान कार्यक्रमांचे आदान-प्रदान आणि सहनिर्मिती, कर्मचार्‍यांचे प्रशिक्षण आणि अन्य समन्वय क्षेत्रात सहकार्य करणे.
 12. हिंदी भाषेचा विभाग उभारण्यासाठी - जॉर्डन विद्यापीठात हिंदी भाषेसाठी ICCR चा विभाग स्थापन करण्यासाठी भारतीय सांस्कृतिक संबंध परिषद (ICCR) आणि जॉर्डन विद्यापीठ यांच्यात सहकार्यासाठी करार झाला.


Cabinet approval for action plan for development of important service sectors

 1. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने वाणिज्य व उद्योग मंत्रालयाने ओळखलेल्या 12 निर्धारित महत्त्वपूर्ण सेवा क्षेत्रांच्या विकासावर भर देत त्यांची क्षमता सिद्ध करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या कृती योजनेच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे.
 2. 12 निर्धारित महत्त्वपूर्ण सेवा क्षेत्रांमध्ये माहिती तंत्रज्ञान आणि माहिती तंत्रज्ञान सक्षम सेवा, पर्यटन आणि आदरातिथ्य सेवा, वैद्यकीय मूल्यांकन भ्रमंती, परिवहन आणि मालवाहतूक सेवा, लेखा आणि वित्त सेवा, दृकश्राव्य सेवा, कायदेशीर सेवा, दळणवळण सेवा, बांधकाम आणि संबंधित अभियांत्रिकी सेवा, पर्यावरण सेवा, वित्तीय सेवा आणि शिक्षण सेवा यांचा समावेश आहे.
 3. या उपक्रमामुळे केंद्रित आणि देखरेख ठेवलेल्या कृती योजनांच्या अंमलबजावणीच्या माध्यमातून भारताच्या सेवा क्षेत्रांची स्पर्धात्मकता वाढणार, ज्यामुळे सकल देशांतर्गत उत्पन्न (GDP) दर वाढणार, रोजगार निर्मितीत वाढ होणार आणि जागतिक बाजारात निर्यात वाढणार आहे.
 4. संबंधित मंत्रालये/विभाग यांनी तयार केलेल्या कार्यान्वित कृती योजनांमधून 2022 साली या निर्धारित महत्त्वपूर्ण क्षेत्रांपैकी प्रत्येकासाठी एक संकल्पना विकसित होऊ शकणार आहे.

योजनेच्या मुख्य बाबी व उद्दिष्टे

 1. योजनेच्या मुख्य बाबी:-
  1. कृती योजनांच्या उपक्रमांना साहाय्य करण्यासाठी 5,000 कोटी रुपयांचा एक समर्पित निधी स्थापन करण्याचा प्रस्ताव आहे.
  2. संबंधित मंत्रालये योजनेच्या अंमलबजावणीसाठी जबाबदार असणार आहेत. सोबतच मंत्रिमंडळ सचिवाच्या नेतृत्वात स्थापित सचिवांच्या समितीच्या मार्गदर्शनाखाली एक देखरेख यंत्रणा तयार केली जाणार.
 2. योजनेची उद्दिष्टे:-
  1. भारताच्या सेवा क्षेत्राचा वाटा जागतिक सेवांच्या निर्यातीत 2015 साली 3.3% होता, जो 2014 साली 3.1% इतका होता. या नवीन उपक्रमानुसार, सन 2022 साठी हे उद्दिष्ट 4.2% ठेवण्यात आले आहे.
  2. भारताचा सकल मूल्य वर्धित (GVA) मध्ये सेवा क्षेत्राचा वाटा वर्ष 2015-16 मध्ये सुमारे 53% होता. सन 2022 साठी हे उद्दिष्ट 60% ठेवण्यात आले आहे.


Pakistan FATF's Gray List

 1. दहशतवादी संघटनांना निधी पुरवणाऱ्या देशांवर नजर ठेवणारी संस्था फायनान्शिअल अॅक्शन टास्क फोर्सने (FATF) पाकिस्तानला ‘ग्रे लिस्ट’ मध्ये टाकले आहे.
 2. दहशतवादी संघटनांना आर्थिक मदत केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. यामुळे आता आंतरराष्ट्रीय स्तरावरून पाकिस्तानवर नजर ठेवली जाणार आहे.
 3. प्रत्येक परिस्थितीत पाकिस्तानची साथ देणाऱ्या चीनने यावेळी मात्र पाकला समर्थन दिले नसून या मुद्द्यावर माघार घेतली आहे.
 4. त्यामुळे पॅरिसमध्ये सुरु असलेल्या FATFच्या बैठकीत सर्वसहमतीने पाकला ‘ग्रे लिस्ट’ मध्ये टाकण्याचा निर्णय घेण्यात आला.
 5. पाकिस्तानला याआधी पैशांची अफरातफर केल्याच्या प्रकरणात वर्ष २०१२ ते २०१५ दरम्यान वॉच लिस्टमध्ये टाकण्यात आले होते.
 6. तसेच काही महिन्यांपूर्वी दहशतवादी संघटनांना आश्रय दिल्यामुळे अमेरिकेने पाकिस्तानची आर्थिक मदतही रोखली आहे.


Rashid Khan Cricket's youngest captain in the world

 1. अफगाणिस्तानचा फिरकीपटू राशिद खान क्रिकेट विश्वातील आतापर्यंतचा सर्वात युवा कर्णधार ठरला आहे.
 2. राशिदचे वय सध्या १९ वर्षे आणि १५९ दिवस असून, असगर स्टॅनिकजईऐवजी राशिद खानकडे अफगाणिस्तानच्या संघाचे नेतृत्व देण्यात आले आहे.
 3. अफगाणिस्तान संघातील प्रमुख गोलंदाज असलेल्या राशिद खानने नुकतेच आयसीसी टी-२० गोलंदाजांच्या क्रमवारीत पहिले स्थान पटकावले आहे.
 4. राशिद खानने ३७ एकदिवसीय सामन्यात ३५ डावांमध्ये ३.८२ च्या इकॉनामीने ८६ विकेट मिळवल्या आहेत. १८ धावांच्या बदल्यात ७ बळी ही त्याची सर्वोत्कृष्ट कामगिरी आहे.
 5. तर टी-२०च्या २९ सामन्यात त्याने ४७ विकेट टिपल्या आहेत. टी-२० मध्ये त्याने एका डावात ३ धावा देऊन ५ विकेट ही सर्वोत्कृष्ट कामगिरी केली आहे.
 6. क्रिकेट इतिहासातील युवा कर्णधार:-
  1. राशिद खान (अफगाणिस्तान) : १९ वर्षे १५९ दिवस
  2. रोडनी ट्रॉट (बर्मुडा) : २० वर्षे ३३२ दिवस
  3. राजिन सलेह (बांगलादेश) : २० वर्षे २९७ दिवस
  4. तेतेंदा तैबू (झिम्बाब्वे) : २० वर्षे ३४२ दिवस
  5. नवाब पतोडी (भारत) : २१ वर्षे ७७ दिवस


The Importance of Today's Day in History 3

 1. महत्वाच्या घटना:-
  1. १८६१: अमेरिकेच्या १६ व्या राष्ट्राध्यक्षपदी अब्राहम लिंकन यांची निवड झाली.
  2. १९५१: नवी दिल्ली येथे राष्ट्रपती डॉ. राजेंद्रप्रसाद यांच्या हस्ते पहिल्या आशियाई खेळांचे उद्घाटन झाले.
  3. १९६१: इंग्लंडमध्ये १९४६ साली बनवलेली विमानवाहू युद्धनौका भारतीय नौदलात आय. एन.एस. विक्रांत नावाने दाखल झाली.
  4. १९९६: चित्रकार रवी परांजपे यांना कॅग हॉल ऑफ फेम हा राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार जाहीर.
  5. २००१: पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या हस्ते गुरुदासपूर येथील रणजितसागर धरण देशाला अर्पण केले.
 2. जन्म:-
  1. १८६८: चलत चित्रपटाचे प्रवर्तक हरीश्चंद सखाराम भाटवडेकर यांचा जन्म.
  2. १९७३: भारतीय दिग्दर्शक आणि पटकथालेखक चंद्र शेखर येलेती यांचा जन्म.
  3. १९८६: इंस्ताग्राम चे सहसंस्थापक माईक क्रीगेर यांचा जन्म.
 3. मृत्यू:-
  1. १९२५: रवीन्द्रनाथ टागोर यांचे मोठे भाऊ बंगाली साहित्यिक आणि चित्रकार ज्योतीन्द्रनाथ टागोर यांचे निधन. (जन्म: ४ मे १८४९ – कोलकाता, पश्चिम बंगाल)
  2. १९४८: भारतीय राजकारणी आणि हिंदू महासभेचे संस्थापक बाळकृष्ण शिवारम मुंजे यांचे निधन. (जन्म: १२ डिसेंबर १८७२)
  3. १९५२: नोबेल पारितोषिक विजेते ब्रिटीश जैवरसायन शास्रज्ञ सर चार्ल्स शेरिंग्टन यांचे निधन. (जन्म: २७ नोव्हेंबर १८५७ – आयलिंग्टन, लंडन, इंग्लंड)
  4. १९९२: सकाळ च्या प्रकाशिका आणि सकाळ पेपर्स प्रा. लि. च्या संचालिका शांताबाई परुळेकर यांचे निधन.
  5. १९९९: भारतीय विमानोड्डाणाचा पाया घालणारे, एअर इंडियाचे पहिले कर्मचारी विठ्ठल गोविंद गाडगीळ यांचे निधन.


Top

Whoops, looks like something went wrong.