Mukesh Ambani is seventh on the list of the richest people in the country

 1. बार्कलेज हूरून इंडीयाने मंगळवारी भारतातील श्रीमंत व्यक्तींची यादी जाहीर केली आहे.
 2. यामध्ये रिलायन्स इंडस्ट्रीजचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी देशात सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत. अंबानी यांच्या मिळकतीत वर्षभरात दररोज ३०० कोटी रुपयांची वाढ झाली आहे.
 3. मुकेश अंबानी यांची एकूण संपत्ती ३ लाख ७१ हजार कोटी असून, श्रीमंतांच्या या यादीत ते सलग सातव्या वर्षी अग्रस्थानी आहेत.
 4. त्यांची संपत्ती दुसऱ्या, तिसऱया आणि चौथ्या क्रमांकावरील श्रीमंतांच्या एकूण संपत्तीहूनही अधिक आहे.
 5. बार्कलेज हुरुन इंडियाच्या यादीत ज्यांची संपत्ती १ हजार कोटी रुपयांहून अधिक आहे, अशा भारतीय श्रीमंतांचा समावेश करण्यात आला आहे.
 6. २०१८च्या यादीत गेल्या वर्षीच्या यादीच्या तुलनेत २१४ अधिक व्यक्तींचा समावेश झाला आहे.
 7. २०१७ मध्ये या यादीत ६१७ लोकांचा समावेश होता.
 8. भारतातील श्रीमंत व्यक्तींची यादी :–
  1. मुकेश अंबानी (३,७१,००० कोटी रुपये)
  2. एसपी हिंदुजा अॅण्ड फॅमिली (१,५९,००० कोटी रुपये)
  3. एलएन मित्तल अॅण्ड फॅमिली (१,१४,५०० कोटी रुपये)
  4. अझीम प्रेमजी (९६,१०० कोटी रुपये)
  5. दिलीप संघवी (८९,७०० कोटी रुपये)
  6. उदय कोटक (७८,६०० कोटी रुपये)
  7. सायरस एस. पूनावाला (७३,००० कोटी रुपये)
  8. गौतम अदानी अॅण्ड फॅमिली (७१,२०० कोटी रुपये)
  9. सायरस मिस्त्री (६९,५०० कोटी रुपये)
  10. शापूर मिस्त्री (६९,४०० कोटी रुपये)


maharashtra kanya van samruddhi yojana

 1. महिला सक्षमीकरण व सबलीकरण सोबत वृक्ष लागवडीस प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत कन्या समृद्धी योजना राबविण्यास मान्यता देण्यात आली.
 2. पर्यावरण संवर्धना सोबत महिला सक्षमीकरण साधले जावे यासाठी वनविभागातर्फे ही योजना तयार करण्यात आली आहे.
 3. या योजनांतर्गत मुलगी जन्माला येणाऱ्या शेतकरी कुटुंबात वृक्ष लागवडीसाठी सरकारकडून मदत केली जाणार आहे.
 4. त्यांतर्गत मुलगी जन्माला येणाऱ्या शेतकरी कुटुंबात सरकारकडून साग आंबा फणस जांभूळ व चिंच अशी झाडांची दहा रोपे विनामूल्य देण्यात येणार आहे.
 5. या झाडांपासून मिळणारे उत्पन्न मुलींचे भवितव्य घडवण्यासाठी वापरणे अपेक्षित आहे या योजनेचा लाभ जास्तीत जास्त दोन मुलींसाठीच दिला जाईल.
 6. या योजनेचा लाभ घेण्यासाठी 1 एप्रिल ते 31 मार्च या कालावधीत जन्म झालेल्या मुलींच्या पालकांनी ग्रामपंचायतीकडे अर्ज केल्यानंतर त्यांना वनविभागाकडून दहा रोपे उपलब्ध करून देण्यात येतील.


The first dog park in the country will be made in Hyderabad

 1. तेलंगणा राज्यातील हैदराबादमध्ये पाळीव कुत्र्यांसाठी खास "डॉग पार्क'ची निर्मिती केली जात आहे.
 2. यामध्ये सर्व प्रकारच्या आधुनिक सुविधांचा समावेश असणार आहे.
 3. ग्रेटर हैदराबाद महापालिकेने कोंडापूरमध्ये हे पार्क विकसित केले आहे.
 4. यामध्ये वॉकिंग ट्रॅक आणि क्लिनिकची सुविधाही आहे. ज्या ठिकाणी हे पार्क बनविण्यात आले आहे, त्या ठिकाणी आधी कचऱ्याचे डम्पिंग यार्ड होते.
 5. पालिकेचे विभागीय आयुक्त डी. हरिचंदना यांनी वृत्तसंस्थेला सांगितले, की या पार्कमध्ये कुत्र्यांना प्रशिक्षण दिले जाणारे उपकरण, कसरतीचे उपकरण, स्प्लॅश पूल, लू कॅफे, दोन लॉन, एक ऍम्पी थिएटर, मोठ्या आणि छोट्या कुत्र्यांसाठी वेगवेगळे अडथळे यांसह अनेक सुविधा आहेत.
 6. ते म्हणाले, की हे पार्क देशातील पहिले नोंदणीकृत डॉग पार्क आहे. या ठिकाणी एक पशुवैद्यकीय अधिकारी, कुत्र्यांचा प्रशिक्षक, प्रोटोकॉलनुसार स्वच्छता आणि कुत्र्यांना मोफत लसीकरणाचीही सुविधा असेल.
 7. आम्ही अशा प्रकारचे डॉग पार्क अन्य देशांमध्ये पाहिले होते आणि आपल्या देशातही अशा प्रकारचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे पार्क का होऊ शकत नाही, या विचारातून हे पार्क तयार करण्यात आले आहे.
 8.  लोक आपल्या पाळीव कुत्र्यांना या ठिकाणी घेऊन येऊ शकतात आणि पार्कमधील सुविधांचा फायदा घेऊ शकतात, असे हरिचंदना यांनी स्पष्ट केले.
 9. या पार्कचे उद्घाटन पुढील दहा दिवसांत होणार आहे.
 10. असे आहे पार्क-
  1. 1.1 कोटी रुपये : पार्कनिर्मितीचा खर्च
  2. 1.3 एकर : जागेत पार्कची निर्मिती


During the 28th to 30th September, 2018, the Parakram Parva will be celebrated throughout the country

 1. भारतीय सैन्याने 2016 साली पाकव्याप्त काश्मीरमध्ये सर्जीकल हल्ले करुन असाच पराक्रम गाजवला होता.
 2. या पराक्रमाचा गौरव करण्यासाठी आणि भारतीय सैनिकांच्या धैर्याला वंदन करण्यासाठी 28 ते 30 सप्टेंबर 2018 या काळात देशभर “पराक्रम पर्व” साजरे केले जाणार आहे.
 3. या निमित्त नवी दिल्लीतील राजपथावर मुख्य कार्यक्रम होईल.
 4. त्याशिवाय 51 शहरातल्या 53 ठिकाणी भारतीय सैन्याचे शौर्य दाखवणाऱ्या विविध घटना आणि कार्यक्रम केले जातील.
 5. 28 सप्टेंबरला संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांच्या हस्ते या पराक्रम पर्वाचे उद्‌घाटन होईल.
 6. यावेळी या विद्यार्थ्यांशीही संवाद साधतील. सैनिकांच्या शौर्य गाथा सांगणारे चित्रपट आणि फोटो यावेळी दाखवले जातील.
 7. विद्यार्थ्यांनी सैनिकांना लिहिलेल्या पत्रांचे प्रदर्शनही भरवले जाईल.
 8. जम्मू आणि काश्मीरमधून दहशतवाद्यांकडून हस्तगत केलेली शस्त्रे देखील यावेळी सर्वसामान्यांना बघता येतील.


Luca Modrica Award for "Best Footballer"

 1. क्रोएशियाचा अव्वल मध्यरक्षक आणि रेयाल माद्रिद संघाचा आधारस्तंभ लुका मॉड्रिकने जागतिक फुटबॉल महासंघाचा (फिफा) यंदाच्या वर्षातील सर्वोत्तम फुटबॉलपटू हा प्रतिष्ठेचा पुरस्कार पटकावताना भल्याभल्यांना हादरा दिला.
 2. लुका मॉड्रिकने हा पुरस्कार मिळविल्यामुळे पोर्तुगालचा अग्रगण्य खेळाडू ख्रिस्तियानो रोनाल्डो आणि अर्जेंटिनाचा महान खेळाडू लियोनेल मेस्सी या श्रेष्ठ फुटबॉलपटूंची या पुरस्कारावरील सुमारे दशकभरापेक्षा अधिक काळ चालू असलेली मक्तेदारी संपुष्टात आली आहे.
 3. जागतिक फुटबॉल महासंघाने यंदाच्या वर्षासाठीचे पुरस्कार आज जाहीर केले.
 4. त्यातील सर्वोत्तम फुटबॉलपटू या पुरस्कारासाठी ख्रिस्तियानो रोनाल्डो आणि लियोनेल मेस्सी यांच्यासह इजिप्तचा विश्वचषक स्पर्धा गाजविणारा आघाडीवीर मोहम्मद सालाह यांच्यात चुरस असल्याची चर्चा होती.
 5. परंतु या तिघांनाही मागे टाकत लुका मॉड्रिकने हा बहुमान पटकावला.
 6.  ब्राझिलच्या मार्टाने विक्रमी सहाव्यांदा “जगातील सर्वोत्तम महिला फुटबॉलपटू’ हा पुरस्कार जिंकला. तर रेनाल्ड पेड्रोस यांनी महिलांचा सर्वोत्तम प्रशिक्षक हा पुरस्कार मिळविला.
 7. लुका मॉड्रिकने रेयाल माद्रिद व क्रोएशिया या दोन्ही संघांकडून यंदाच्या वर्षी नेत्रदीपक कामगिरी बजावली.
 8. त्याने वयाच्या 33 व्या वर्षी जगभरातील अव्वल खेळाडूंशी टक्कर देताना रेयाल माद्रिद संघाला सलग तिसऱ्यांदा चॅम्पियन्स करंडक जिंकून देण्यात मोलाचा वाटा उचलला.
 9. तसेच त्याने क्रोएशियाला फिफा विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारून दिली. क्रोएशियाने ही कामगिरी इतिहासात पहिल्यांदाच केली आहे.
 10. लंडन येथे काल पार पडलेल्या झगमगाटी समारंभात हे पुरस्कार प्रदान करण्यात आले.
 11. त्या वेळी रोनाल्डो व मेस्सीसह अनेक प्रमुख खेळाडू अनुपस्थित होते.
 12. अधिकृत प्रवक्त्याच्या सांगण्यानुसार रोनाल्डो युव्हेन्टस संघाकडून, तसेच मेस्सी बार्सिलोना संघाकडून खेळण्यात व्यस्त असल्याने या सोहळ्याला हजर राहू शकला नाही. परंतु इतक्या महत्त्वाच्या समारंभाला रोनाल्डो व मेस्सी यांची गैरहजेरी टीकेचा विषय ठरली.
 13. खुद्द लुका मॉड्रिकने वेगळ्या शब्दांत रोनाल्डो व मेस्सी या समारंभाला हजर नसल्याबद्दल नाराजी व्यक्त केली.
 14. प्रत्येकाकडे आपली कारणे असतातच, असे सांगून मॉड्रिक म्हणाला की, हे दोन महान खेळाडू पुरस्कार वितरण समारंभाला आले असते तर मला खरोखरीच आनंद झाला असता. परंतु ते आले नाहीत.
 15. लुका मॉड्रिकच्या सनसनाटी पुरस्कार विजयामुळे रोनाल्डो आणि मेस्सी यांच्यातील बरोबरी कायम राहिली आहे.
 16. रोनाल्डो आणि मेस्सी या दोघांनीही सर्वोत्तम फुटबॉलपटू हा पुरस्कार प्रत्येकी पाच वेळा जिंकला आहे.
 17. इजिप्तच्या महंमद सालाहने पदार्पणाच्याच मोसमात तब्बल 44 गोल करताना सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
 18. “वर्षातील सर्वोत्तम गोल’ हा पुरस्कार सालाहने पटकावला. मर्सीसाईड डर्बी स्पर्धेत इव्हर्टनविरुद्ध त्याने केलेल्या गोलला हा पुरस्कार देण्यात आला.
 19. फ्रान्सला विश्वचषक जिंकून देणारे प्रशिक्षक दिदियर देस्चॅम्प्स यांना वर्षातील सर्वोत्तम प्रशिक्षक हा पुरस्कार देण्यात आला.
 20. खेळाडू आणि प्रशिक्षक या दोन्ही भूमिकांमध्ये विश्वचषक जिंकणारे देस्चॅम्प्स हे जगातील केवळ तिसरे खेळाडू ठरले आहेत. बेल्जियमच्या थिबॉट कोर्टाइसने “सर्वोत्तम गोलरक्षक’ हा पुरस्कार पटकावला.
 21. जागतिक फुटबॉल महासंघाने जाहीर केलेला सर्वोत्तम फुटबॉलपटू पुरस्कार हा अविश्वसनीय गौरव असल्याचे सांगून लुका मॉड्रिक म्हणाला की, हे संपूर्ण वर्ष माझ्यासाठी आश्चर्यकारकरीत्या चांगल्या कामगिरीचे ठरले.
 22. विश्वचषक स्पर्धेतील माझी कामगिरी मला स्वत:लाच अनपेक्षित होती. लुका मॉड्रिकने फिफा विश्वचषक स्पर्धेत डेन्मार्क व रशियाविरुद्धच्या लढतीत दोन गोल केले. शिवाय पेनल्टी शूट-आऊटमध्येही गोल करीत क्रोएशियाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.
 23. परंतु या गोलपेक्षाही सहकाऱ्यांना गोल करण्यासाठी सर्वोत्तम संधी मिळवून देण्याच्या त्याच्या कौशल्यामुळेच मॉड्रिकला “गोल्डन बॉल’ हा मानाचा पुरस्कार देण्यात आला.


Top

Whoops, looks like something went wrong.