Nashik ranked 23rd in the Smart City list

 1. केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटीच्या यादीत देशपातळीवर नाशिक 23 व्या क्रमांकावर आले आहे. विशेष म्हणजे पहिल्या 25 शहरांमध्ये पाच शहरे ही महाराष्ट्रातील असून, 367 गुण मिळवत नागपूरने देशात अव्वल क्रमांक पटकविला आहे.

 2. केंद्र सरकार देशभरातील 100 शहरांना स्मार्ट रूप देण्याचे काम करीत आहेत. या शहरांमध्ये विविध पायाभूत सुुविधांसह उच्च प्रतीच्या सोयी-सुविधा देण्यावर भर आहे.

 3. दरम्यान, स्मार्ट सिटीत नागपूर मनपा अग्रेसर असून, त्यांना विविध विभागांमध्ये 368 गुण मिळाले आहेत. नागपूर देशात अव्वल ठरले आहे. याव्यतिरिक्त अमरावती 214 गुणांसह दहाव्या स्थानी तर 213.5 गुणांसह पुणे 11 व्या स्थानी आहे. तसेच पिंपरी-चिंचवड शहराने 166.61 गुण मिळवत या यादीत 19 वा क्रमांक प्राप्त केला आहे.


ADB's 'Asian Development Outlook 2019' report is famous

 1. मनिला येथील आशियाई विकास बँकेनी (ADB) 'एशियन डेव्हलपमेंट आऊटलुक (ADO) 2019' या शीर्षकाखाली त्याचा अहवाल प्रसिद्ध केला आहे.
 2. कमकुवत जागतिक मागणी आणि महसुलातल्या तूटीतली वाढ त्यामुळे 2019-20 या आर्थिक वर्षासाठी भारताचा वृद्धीदर पूर्वीच्या 7.6% यावरून 7.2% एवढा अंदाजित केला आहे.
 3. महत्वाचे मुद्दे:-
 4. भारत:-
  1. 2019-20 या आर्थिक वर्षात भारत ही सर्वात वेगाने वाढणारी मोठी अर्थव्यवस्था ठरणार.
  2. 2019 साली वृद्धीदर 7.2% एवढा तर 2020 साली 7.3% एवढा असण्याची शक्यता आहे.
  3. महागाई दर (CPI) 2019-20 या आर्थिक वर्षात 4.3% पर्यंत वाढण्याचा आणि 2020-21 या आर्थिक वर्षात 4.6% पर्यंत वाढण्याचा अंदाज आहे.
  4. चालू खात्यातली तूट 2019-20 या आर्थिक  वर्षात 2.4% पर्यंत वाढण्याचा आणि 2020-21 या आर्थिक वर्षात 2.5% पर्यंत वाढण्याचा अंदाज आहे.
 5. दक्षिण आशिया:-
  1. आशियात धिमी वाढ दिसून येणार आहे.
  2. आशियातल्या उच्च उत्पन्न घेणार्‍या नवीन औद्योगीक अर्थव्यवस्थांना वगळता, वृद्धीदरात 2018 सालाच्या 6.4 टक्क्यांवरून 2019 साली 6.2% आणि 2020 साली 6.1% पर्यंत घट होण्याची अपेक्षा आहे.


About 100 people were given 'Maharshi Badrayan Vyas Samman'

 1. शास्त्रीय भाषांच्या क्षेत्रात विद्वानांनी केलेल्या कार्याचा सन्मान करण्यासाठी, उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू यांच्या हस्ते सुमारे 100 जणांचा 'महर्षी बद्रायन व्यास सन्मान' देऊन गौरव करण्यात आला आहे.
 2. दिल्लीत दिनांक 4 मार्च 2019 रोजी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या उच्च शिक्षण विभागाने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात या पुरस्कारांचे वाटप करण्यात आले.
 3. त्यात प्रा. मौलाना सैयद असद रझा हुसैनी ह्यांना अरबी भाषेच्या प्रचारासाठी आणि उच्च शिक्षणाच्या प्रचाराच्या प्रयत्नांसाठी हा पुरस्कार दिला गेला.
 4. पुरस्काराबद्दल:-
  1. ‘महर्षी बद्रायन व्यास सन्मान’ हा दरवर्षी दिला जाणारा पुरस्कार आहे, जो संस्कृत, फारसी, अरबी, पाली, प्राकृत, शास्त्रीय उडिया, शास्त्रीय कन्नड, शास्त्रीय तेलुगू आणि शास्त्रीय मल्याळम या भाषांच्या क्षेत्रात लोकांच्या महत्त्वपूर्ण योगदानाचा गौरव करण्याकरिता दिला जातो.
  2. भारत सरकारच्या केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाद्वारे हा पुरस्कार दिला जातो.
  3. सन 2002 मध्ये हा पुरस्कार सादर केला गेला. या पुरस्कारासाठी 30 ते 45 वर्षे वयोगटातल्या तरुण विद्वानांची निवड केली जाते.
  4. राष्ट्रपती कडून दिल्या जाणार्‍या या पुरस्काराचे स्वरूप प्रमाणपत्र, स्मृतिचिन्ह आणि 1 लक्ष रुपये रोख असे आहे.


19% of Bangladeshi children are threatened by climate change: UNICEF

 1. संयुक्त राष्ट्रसंघ बाल कोष (UNICEF) कडून “ए गॅदरिंग स्टॉर्म: क्लायमेट चेंज क्लाउड्स द फ्यूचर ऑफ चिल्ड्रेन इन बांग्लादेश” या शीर्षकाखाली एक अहवाल प्रकाशित केला आहे.
 2. अहवालात असे दिसून आले आहे की बांग्लादेशाची सपाट भूमी, घनदाट लोकसंख्या आणि कमकुवत पायाभूत संरचना यांमुळे हवामानातल्या बदलांमुळे उद्भवलेल्या धोक्याच्या परिस्थितीत अधिकच भर पडत आहे.
 3. देशाच्या उत्तरकडील भागात पूर आणि दुष्काळ अश्या परिस्थितींचा तर बंगालच्या खाडीलगतच्या प्रदेशात वादळी परिस्थितीला धोका जाणवला आहे.
 4. हवामानातल्या बदलांशी निगडित पूरपरिस्थिती, चक्रीवादळ आणि इतर नैसर्गिक संकटांमुळे बांग्लादेशात राहणार्‍या 19 दशलक्षांहून अधिक लहान मुलामुलींचे जीवन आणि भविष्य धोक्यात आले आहे.
 5. समुद्राची वाढती पातळी आणि खारट पाण्याच्या घुसखोरीमुळे, प्रदेशातल्या कुटुंबांना वेळोवेळी स्थलांतरण करावे लागत आहे. त्यामुळे त्यांच्या मुलांच्या शिक्षणात आणि आरोग्य सेवा मिळविण्यात खंड येत आहे.
 6. UNICEF:-
  1. संयुक्त राष्ट्रसंघ बाल कोष (United Nations Children's Fund -UNICEF) याचे मुख्यालय न्यूयॉर्क शहर (न्यूयॉर्क, अमेरिका) येथे आहे.
  2. UNICEF आधी दिनांक 11 डिसेंबर 1946 रोजी ‘युनायटेड नेशन्स इंटरनॅशनल चिल्ड्रन्स इमर्जन्सी फंड’ या नावाने तयार करण्यात आले होते, ज्यामधून द्वितीय विश्वयुद्धाच्या धर्तीवर प्रभावित झालेल्या बालकांना आपत्कालीन अन्न व आरोग्य सेवा प्रदान करण्यासाठी याची स्थापना केली गेली होती.
  3. पोलंडचे डॉक्टर लुडविक राज्चमॅन हे UNICEFचे संस्थापक म्हणून ओळखले जातात आणि ते या संघटनेचे पहिले अध्यक्ष होते.
  4. पुढे 1950 साली सर्वत्र विकसनशील देशांमधील बालकांच्या आणि महिलांच्या दीर्घकाळाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी संघटनेचा विस्तार करण्यात आला.
  5. 1953 साली तो संयुक्त राष्ट्रसंघाचा भाग बनला आणि नावामधील ‘इंटरनॅशनल’ व ‘इमर्जन्सी’ शब्द वगळण्यात आले, मात्र मूळ संक्षिप्त नाव काम ठेवण्यात आले.
  6. UNICEFचे कार्यक्षेत्र 190 देश आणि प्रांतांमध्ये पसरलेले आहे.


Actor Shahrukh Khan honors doctorate from London's Ritual University

 1. बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान ह्यांना ब्रिटनच्या लंडन या शहरातल्या विधी विद्यापीठाकडून मानद डॉक्टरेट प्राप्त झाली आहे.
 2. समाजाप्रती असलेले उत्तरदायित्व राखत शाहरुखने केलेल्या कार्यांसाठी हा सन्मान दिला गेला.
 3. त्यांनी देशातल्या विविध सरकारी मोहिमांमध्ये उत्स्फूर्तपणे भाग घेत देशकार्यात योगदान दिलेले आहे.
 4. त्यांची मीर फाउंडेशन ही ना-नफा संस्था अॅसिड हल्ल्यात बचावलेल्या लोकांसाठी कार्य करते.


Niraj and Sindhu became the best players of the year: ESPN India Multi-Sport Award 2018

 1. बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू आणि भालाफेकपटू निरज चोपडा ह्यांचा 2018 साली ‘ESPN इंडिया मल्टी-स्पोर्ट पुरस्कार’ याचा वर्षातला/ली सर्वोत्तम क्रिडापटू (महिला व पुरुष) हा सन्मान देऊन गौरव करण्यात आला आहे.
 2. हे पुरस्कार 11 श्रेणींमध्ये दिले गेलेत.
 3. इतर पुरस्कारांचे विजेते -
  1. कमबॅक ऑफ द इयर - सायना नेहवाल (बॅडमिंटन)
  2. कोच ऑफ द इयर - जसपाल राणा (नेमबाजी)
  3. वर्षातला उदयोन्मुख क्रिडापटू - सौरभ चौधरी (नेमबाजी)
  4. वर्षातला सर्वोत्तम संघ - महिला संघ (टेबल टेनिस)
  5. वर्षातला सर्वोत्तम सामना – अमित पांघल व हसनबॉय दस्मतोव्ह (मुष्टियुद्ध)
  6. वर्षातला सर्वोत्तम अपंग क्रिडापटू – एकता भ्यान (पॅरा-अॅथलेटिक्स)
  7. वर्षातला सर्वोत्तम क्षण - महिलांची 4x400 मीटर शर्यत
  8. जीवनगौरव पुरस्कार – प्रदीप कुमार बनर्जी (फुटबॉल)


INDIAN ARMY

 1. भारतीय लष्कराने लडाख येथील लेहजवळ सिंधू नदीवर सर्वात लांब झुलता पूल बांधला आहे.

 2. लडाखमधील दूर्गम भागातील गावांना जोडणारा हा पूल २६० फूट लांबीचा आहे. या पूलाचे नाव ‘मैत्री पूल’ असे ठेवण्यात आले आहे. या पुलामुळे चोगलामसर, स्टोक आणि चुचोट गावे लडाखच्या मुख्य भागांना जोडली गेली आहेत.

 3. या पूलाचे उद्घाटन १ एप्रिल रोजी झाले. हा पूल लष्करातील लडाऊ अभियंत्रिक दलाच्या ‘साहस और योग्यता’ रेजिमेंटने बांधला आहे. हा पूल अवघ्या ४० दिवसांमध्ये बांधण्यात आला असून इतक्या कमी वेळात एवढ्या लांबीचा झुलता पूल बांधणे हा एक विक्रमच आहे.


WRITER KALYANI KISHOR PASSED AWAY

 1. संगीत, साहित्य आणि अध्यात्म अशा विविध क्षेत्रांतील अभ्यासू व्यक्तिमत्त्व असलेल्या प्रा. कल्याणी किशोर यांचे शुक्रवारी पहाटे झोपेतच निधन झाले. त्या ७७ वर्षांच्या होत्या.

 2. कल्याणी किशोर यांनी कथा, कादंबरी, कविता, समीक्षण, चरित्र आदी स्वरूपाचे लेखन केले आहे. त्यांचे सूर्यगंध, कवितेचा दिवस हे काव्यसंग्रह आणि राजनंदिनी ही कादंबरी प्रसिद्ध आहे. जगप्रसिध्द तत्त्वज्ञ जे. कृष्णमूर्ती यांच्या चरित्राचा व अन्य ग्रंथांचा त्यांनी मराठीत अनुवाद केला होता. श्री दत्ता बाळ, संत आनंदमयी माँ यांचे चरित्रलेखन कल्याणी किशोर यांनी केले होते. गानतपस्विनी मोगुबाई कुर्डीकर यांचे त्यांनी लिहिलेले चरित्र संगीत क्षेत्रात खूपच गाजले. त्या उत्तम खेळाडू, उत्कृष्ट चित्रकार म्हणूनही प्रसिद्ध होत्या.


Top