Pramod Kumar Satapathy was given the Ashok Chakra

 1. ओडिशा पोलीस विभागाच्या विशेष मोहीम गटाचे (SOG) सहाय्यक कमांडंट प्रमोद कुमार सतपथी यांना मरणोपरांत अशोक चक्राने सन्मानित करण्यात आले आहे.
 2. 16 फेब्रुवारी 2008 रोजी गंजम जिल्ह्यात नक्षलवाद्यांशी झालेल्या चकमकीत सतपथी यांना वीरगती मिळाली.
 3. अशोक चक्र हा शांततेच्या वेळी शौर्याचे प्रदर्शन दाखविणार्या सैनिकाला दिला जाणारा देशातला सर्वोच्च शौर्य पुरस्कार आहे.
 4. हा सन्मान 1952 सालापासून दिला जात आहे.


Under the 'Nutrition Month' campaign, Maharashtra has awarded 14 awards

 1. गरोदर माता, स्तनदा माता यांना सकस आहार घेण्याबाबत तसेच राज्यातील बालकांमधील कुपोषणाबाबत जागरूकता, मुलींचे पोषण व त्यांच्या आरोग्याविषयी जागरूकता करण्याबाबत ‘पोषण माह’ कार्यक्रमामध्ये केलेल्या उत्कृष्ट कार्यासाठी आज महाराष्ट्राला एकूण १४ राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आले.
 2. केंद्रीय महिला व बाल विकास मंत्रालयाच्या वतीने येथील हॉटेल अशोक मध्ये आयोजित कार्यक्रमात या मंत्रालयाचे सचिव राकेश श्रीवास्तव आणि नीती आयोगाचे सदस्य डॉ.विनोद कुमार पॉल यांच्या हस्ते पोषण माह पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.
 3. यावेळी महाराष्ट्रातील क्षेत्रीय स्तरावरील कार्यासाठी १२ वैयक्तिक व सांघिक कामासाठी २ जिल्हास्तरीय असे एकूण १४ पुरस्कार प्रदान करण्यात आले. पदक आणि प्रशस्तिपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
 4. ‘पोषण माह’ अंतर्गत महाराष्ट्रात राबविण्यात आलेले कार्यक्रम:-
  1. ‘गोदभरायी’ या उपक्रमातून गरोदर मातेची सातव्या महिन्यात ओटी भरणे व या महिलांना आहार विषयक मार्गदर्शन करण्यात आले.
  2. ‘अन्नप्राशन’ उपक्रमाद्वारे सहा महिन्याच्या बालकांपासून बालकांचा आहार कसा असावा याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. महिलांची थायरॉईड व हिमोग्लोबिनची चाचणी घेण्यात आली.
  3. मुलींना स्वच्छता व आरोग्याची काळजी घेण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. प्रत्येक अंगणवाडी केंद्रात ‘अक्षयपात्र’ हा उपक्रम राबविण्यात आला.
  4. या अंतर्गत महिलांचे प्रबोधन करून अंगणवाडी केंद्रातील मुलांच्या आहारात विविधता येण्यासाठी कांदे, बटाटे, कडीपत्ता, शेवग्याचा पाला आदी त्यांना अंगणवाडी केंद्रात आणण्यास सांगण्यात आले व या केंद्रातील आहारात त्याचा अंतर्भाव करण्यात आला.
  5. पोषण आहाराबाबत जागरूकता करण्यासाठी मुलांची प्रभात फेरी काढण्यात आली, फॅन्सी ड्रेस स्पर्धा रांगोळी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले.
 5. राज्यात कोल्हापूर जिल्ह्याने पटकावले सर्वाधिक पुरस्कार:-
  1. राष्ट्रीय पोषण माह अभियानात उत्कृष्ट कार्यासाठी सर्वाधिक पाच वैयक्तिक पुरस्कार एकट्या कोल्हापूर जिल्ह्याला प्रदान करण्यात आले.
  2. पन्हाळा तालुक्यातील माले येथील अंगणवाडी सेविका अनिता साळसकर, कागल तालुक्यातील चिखली येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आरोग्य सहाय्यिका संध्या चांदणे, पन्हाळा तालुक्यातील केखले येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या पर्यवेक्षिका स्मिता चोपडे, तसेच पन्हाळा तालुक्यातील माले उपकेंद्रात कार्यरत आरोग्य सेविका वैशाली शितोळे याच उपकेंद्रात कार्यरत आशा वर्कर शोभा लोहार यांना आज पुरस्कार प्रदान करण्यात आला.
  3. भंडारा जिल्ह्यातील शिंदी उपकेंद्रातील खुमारी प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत एएनएम कार्यकर्त्या चंदा झालके, अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील घारगाव प्रकल्पाच्या पर्यवेक्षिका कल्पना अंदुरे व संगमनेर प्रकल्पाच्या पर्यवेक्षिका संगीता पवार, चंद्रपूर जिल्ह्यातील स्वस्थ भारत प्रेरक पूजा वेरुळकर, नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील मु. टोटमाळ पोस्ट. गांडोळे येथील अंगणवाडी सेविका मंदा शिंदे, आशा कार्यकर्त्या पुष्पा शिंदे आणि एएनएम कार्यकर्त्या लक्ष्मी गायकवाड यांना यावेळी पुरस्कार प्रदान करण्यात आला.
 6. चंद्रपूर व नाशिक जिल्ह्यांचा सन्मान:-
  1. राज्यात जिल्हा स्तरावर उत्तम सांघिक कार्यासाठी चंद्रपूर व नाशिक जिल्ह्यांना यावेळी सन्मानित करण्यात आले.
  2. चंद्रपूरचे बाल विकास प्रकल्प अधिकारी किरण सूर्यवंशी आणि नाशिकचे बाल विकास प्रकल्प अधिकारी सुनिल दुसाणे यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
  3. केंद्रीय महिला व बाल विकास मंत्रालयाच्या पोषण अभियान विभागाच्या वतीने देशभरातील ३६ जिल्हे व केंद्रशासित प्रदेशांमध्ये ‘सप्टेंबर २०१८’ हा पोषण महिना म्हणून साजरा करण्यात आला.
  4. यात अगदी गाव पातळीपासून गरोदर माता, स्तनदा माता यांना सकस आहार, लहान मुलांमधील कुपोषणाबाबत जागरूकता, मुलींचे पोषण व त्यांच्या आरोग्याविषयी जागरूकता आदी विषयांवर पोषण अभियानाबाबत जागरूकता कार्यक्रम राबविण्यात आले.
  5. या कार्यक्रमांची नोंद पोषण अभियानाच्या संकेतस्थळावर करण्यात आली. या कार्यक्रमाच्या अंमलबजावणीत उत्कृष्ट कार्यासाठी देशभरातील विविध राज्यांना क्षेत्रीय स्तरावर वैयक्तिक आणि जिल्हा स्तरावर सांघिक असे पुरस्कार प्रदान करण्यात आले. महाराष्ट्राचाही यावेळी सन्मान करण्यात आला.


nalco-cmd-t-k-chand-conferred-with-prestigious-nipm-ratna-award

 1. नाल्को म्हणजेच नॅशनल ॲल्युमिनिअम कंपनी लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. तपन कुमार चांद यांना यंदाचा प्रतिष्ठित एनआयपीएम रत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला.
 2. एनआयपीएम म्हणजेच राष्ट्रीय कर्मचारी व्यवस्थापन संस्थेच्या पुणे येथे झालेल्या 37 व्या राष्ट्रीय परिषदेत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
 3. लोक व्यवस्थापन आणि नेतृत्व कौशल्य या क्षेत्रात त्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल त्यांना या पुरस्काराने गौरवण्यात आले. डॉ. चांद यांनी आपला पुरस्कार देशभरातील मनुष्यबळ क्षेत्रातल्या व्यावसायिकांना आणि नाल्कोच्या चमूला समर्पित केला.
 4. देशात सध्या चौथी औद्योगिक क्रांती येऊ घातली आहे. या क्रांतीत कृत्रिम बुद्धीमत्ता, इंटरनेट ऑफ थिंक्स, रोबोटिक्स, ऑग्युमेंटेड रिॲलिटी अशा क्षेत्रात आपल्याला शिरकाव करायचा आहे.
 5. या क्रांतीमुळे भांडवली गुंतवणुकीत लक्षणीय घट होणार असून जागतिक स्पर्धेत टिकून राहण्यासाठी भारतीय उद्योग क्षेत्राला या क्रांतीसाठी स्वत:ला सक्षम बनवावे लागेल.
 6. भारतासाठी मोठी लोकसंख्या असलेल्या देशात चौथ्या क्रांतीमुळे रोजगाराच्या संधी कमी होणे आव्हान असेल आणि त्याचा फटका मोठ्या आणि मध्यम उद्योग क्षेत्राला बसू शकतो.
 7. त्यामुळे मनुष्यबळ व्यवसायाने मध्यम, लघू आणि सूक्ष्म क्षेत्रातील संधींकडे लक्ष द्यावे आणि त्यासाठी रोजगार व्यवस्था निर्माण करावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.


For the first time in the Indian Navy, the DSRV is included

 1. भारतीय नौदलामध्ये प्रथमच बचावकार्यात वापरण्यात येणारे डीएसआरव्ही (DSRV: Deep Submergence Rescue Vessel) वाहन समाविष्ट करण्यात आले.
 2. यामुळे भारतीय नौदलाच्या पाणबुडी बचाव क्षमतेमध्ये वाढ झाली असून, हे आधुनिक वेसल असणाऱ्या निवडक देशांच्या पंक्तीत भारताला स्थान मिळाले आहे.
 3. सध्या अमेरिका, चीन, रशिया, जपान, दक्षिण कोरिया, इंग्लंड, स्वीडन आणि ऑस्ट्रेलियाकडे डीएसआरव्ही आहेत.
 4. भारताचे हे पहिले डीएसआरव्ही मुंबईच्या नौदलाच्या तळावर ठेवण्यात आले आहे.
 5. या वाहनाला संकटकाळात कोणत्याही ठिकाणी हवा, पाणी किंवा जमिनीवरील मार्गाने नेले जाऊ शकते.
 6. अशाच प्रकारचे दुसरे डीएसआरव्ही २०१९मध्ये विशाखापट्टणममध्ये समाविष्ट करण्यात येणार आहे.
 7. डीएसआरव्हीचा उपयोग आपत्कालीन स्थितीत बुडालेल्या अथवा दुर्घटनाग्रस्त पाणबुड्यांमधून सैनिकांना वाचविण्यासाठी केला जातो.
 8. याशिवाय समुद्राच्या किनारपट्टीवर केबल पसरविण्यासाठी यासारख्या इतर अनेक कार्यांसाठी देखील याचा वापर केला जातो.


N. D. Tiwari passes away

 1. उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री एन. डी. तिवारी यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. ते ९३ वर्षांचे होते.
 2. दिल्लीतील साकेत येथील मॅक्स रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सप्टेंबर महिन्यात पक्षाघाताचा झटका आल्याने तिवारी यांना मॅक्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
 3. तिवारी यांचा जन्म नैनितालमधील बलौटी गावात ऑक्टोबर १९२५ साली झाला होता. अलाहाबाद विद्यापीठातून त्यांनी शिक्षण घेतले.
 4. राज्यशास्त्रात त्यांनी एमए केले होते. यानंतर त्यांनी एलएलबीदेखील केले. महाविद्यालयात शिक्षण घेत असतानाच ते काँग्रेसशी संबंधित विद्यार्थी संघटनेत सामील झाले.
 5. शिक्षण पूर्ण झाल्यावर ते राजकारणात उतरले. उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड या दोन्ही राज्यांचे मुख्यमंत्रीपद भूषवण्याचे दुर्मिळ योगायोगही त्यांच्या नशिबी आला.
 6. गांधी घराण्याचे निकटवर्तीय असल्याने १९७६ मध्ये त्यांना पहिल्यांदा उत्तर प्रदेशमधील मुख्यमंत्रीपदावर संधी मिळाली.
 7. १९८४ मध्ये ते पुन्हा एकदा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री झाले. त्यांच्या नेतृत्वाखाली उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसला घवघवीत यश मिळाले. मात्र, विजयाच्या दोन महिन्यांनंतरच एन. डी. तिवारी यांची उचलबांगडी करण्यात आली.
 8. तिवारी १९८८ मध्ये तिसऱ्यांदा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री झाले. मात्र, १९८९ मधील निवडणुकीत काँग्रेसचा उत्तर प्रदेशमध्ये दारुण पराभव झाला.
 9. तिवारी यांनी तीन वेळा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्रीपद भूषवले. मात्र, तिन्ही वेळा त्यांना वर्षभरापेक्षा जास्त काळ मुख्यमंत्रीपदावर राहता आले नाही. ते राज्यसभा आणि लोकसभा अशा दोन्ही सभागृहांमध्ये खासदारही होते.
 10. २००२ साली ते उत्तराखंडचे मुख्यमंत्री झाले. तिवारी यांनी २००७ ते २००९ या काळात आंध्र प्रदेशचे राज्यपालपद सांभाळले होते. त्या वेळी सेक्स स्कँडलमध्ये अडकल्याने त्यांनी राजीनामा दिला.
 11. एन. डी. तिवारी आणि वाद:-
  1. रोहित शेखर या तरुणाने २००७मध्ये दिल्ली उच्च न्यायालयात याचिका करून एन. डी. तिवारी हे आपले जैविक पिता असल्याचे जाहीर करावे, अशी मागणी केली होती.
  2. न्यायालयाने तिवारी हे रोहितचे पिता असल्याचे जाहीर केल्यानंतर तिवारी यांनीही हे मान्य केले.
  3. त्यानंतर उज्ज्वला शर्मा यांनी तिवारी यांच्या घरासमोर निदर्शने केली होती. शेवटी तिवारी यांनी आपल्या आयुष्यात तिला प्रवेश दिला.


Top

Whoops, looks like something went wrong.