
1757 29-Aug-2018, Wed
- पर्यटन मंत्रालयाकडून स्वदेश दर्शन योजनेच्या वारसा आणि ईशान्य परिक्रमा (Heritage and North East Circuits) अंतर्गत पंजाब आणि त्रिपुरा राज्यांमधील 164.95 कोटी रुपयांचे दोन नवीन प्रकल्प मंजूर करण्यात आले आहेत.
- वारसा परिक्रमा :– (पंजाबची ठिकाणे) आनंदपूर साहिब, फतेहगड साहिब, चमकौर साहिब, फिरोजपूर, अमृतसर, खटकर कलान, कालानौर, पटियाला
- ईशान्य परिक्रमा :– (त्रिपुराची ठिकाणे) सुरमा चेरा, उनाकोटी, जामपुई हिल्स, गुणाबाटी, भुनानेश्वरी, माताबरी, निरमहल, बोक्सानगर, छोटा खोला, पिलाक, अवांगचारा
- भारत सरकारच्या पर्यटन मंत्रालयाने देशातील पर्यटनाला चालना देण्यासाठी प्रसाद (Pilgrimage Rejuvenation and Spiritual Augmentation Drive -PRASAD) आणि स्वदेश दर्शन योजना सन 2014-15 मध्ये सुरू करण्यात आली.
- देशात विषय आधारित पर्यटन परिक्रमा प्रकल्प विकसित करण्याच्या उद्देशाने ‘स्वदेश दर्शन’ योजना सुरू केली गेली आहे.
- या योजनेंतर्गत विकासासाठी 13 पर्यटन परिक्रमांची ओळख करण्यात आलेली आहे.
ते आहेत -
- बुद्धीष्ट परिक्रमा
- ईशान्य भारत परिक्रमा,
- सागरकिनारा परिक्रमा,
- हिमालय परिक्रमा,
- कृष्ण परिक्रमा,
- वाळवंट परिक्रमा,
- पर्यावरणीय परिक्रमा,
- वन्यजीव परिक्रमा,
- आदिवासी परिक्रमा,
- ग्रामीण परिक्रमा,
- धार्मिक परिक्रमा,
- रामायण परिक्रमा
- वारसा परिक्रमा.