Rohan More - The first Asian to complete the 'Ocean Seven Challenge'

 1. पुणे (महाराष्ट्र) येथील जलतरणपटू रोहन मोरे याने ‘ओशन सेव्हन चॅलेंज’ पूर्ण केले आहे.
 2. या यशासोबतच, रोहन मोरे हा ‘ओशन सेव्हन चॅलेंज’ पूर्ण करणारा पहिला भारतीय, पहिला आशियाई आणि जगातला नववा व्यक्ती तसेच सर्वात तरूण (32 वर्षाचा) जलतरणपटू ठरला आहे.
 3. ‘ओशन सेव्हन चॅलेंज’ यामध्ये खुल्या पाण्यात जगातील दीर्घ-पल्ल्याच्या सात समुद्री खाडी पोहून पार करण्याचा कारनामा करावा लागतो.
 4. सात समुद्री खाडी पुढीलप्रमाणे:-
  1. नॉर्थ चॅनल (34 किमी),
  2. द मोलोकई चॅनल (44 किमी),
  3. द इंग्लिश चॅनल (34 किमी),
  4. द कॅटालिन चॅनल (34 किमी),
  5. द सुगारू स्ट्रेट (20 किमी),
  6. स्ट्रेट ऑफ जिब्राल्टर (14 किमी)
  7. न्यूझीलंडमधील कुक स्ट्रेट (22 किमी) यांना पार करावे लागते.


Mumbai - 12th richest city globally

 1. ‘न्यू वर्ल्ड वेल्थ’ या संस्थेच्या अहवालानुसार, जगातील शीर्ष 15 श्रीमंत शहरांमध्ये भारताची आर्थिक राजधानी ‘मुंबई’ चा समावेश झाला आहे.
 2. मुंबईची एकूण संपत्ती $950 अब्ज (सुमारे 61 लाख कोटी रुपये) पर्यंत पोहोचली असून या यादीत त्याचा 12 वा क्रमांक आहे.
 3. या अहवालात जगातील श्रीमंत शहरे आणि अब्जाधीशांची यादी जाहीर करण्यात आली आहे. या अहवालात शहरांच्या एकूण संपत्तीत नागरिकांची खाजगी संपत्ती (मालमत्ता, रोख, समभाग, उद्योगांमधील भागीदारी) ग्राह्य धरण्यात आली आहे. यामध्ये प्रशासनाच्या निधीचा समावेश नाही.
 4. मागील अहवालानुसार, जगातील श्रीमंत देशांच्या यादीत भारत सहाव्या क्रमांकावर आहे. भारताची एकूण संपत्ती $8230 अब्ज (सुमारे 528 लाख कोटी रुपये) आहे.
‘न्यू वर्ल्ड वेल्थ’ अहवाल
 1. ठळक नोंदी:-
 2. अमेरिकेतील न्यूयॉर्क हे सुमारे $3 लाख कोटींसह जगातले सर्वाधिक श्रीमंत शहर ठरले आहे.
 3. शीर्ष 11 शहरांमध्ये न्यूयॉर्कनंतर अनुक्रमे ब्रिटनचे लंडन ($2.7 लाख कोटी), जपानचे टोकियो ($2.5 लाख कोटी), अमेरिकेचे सॅन फ्रान्सिस्को ($2.3 लाख कोटी) आणि चीनचे बिजिंग ($2.2 लाख कोटी) , शांघाय ($2 लाख कोटी), लॉस एंजेलिस ($1.4 लाख कोटी), हाँगकाँग ($1.3 लाख कोटी), सिडनी ($1 लाख कोटी), सिंगापूर ($1 लाख कोटी) आणि शिकागो ($988 अब्ज) यांचा समावेश आहे.
 4. मुंबई ही भारताची आर्थिक राजधानी असून तेथे बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आहे. जगातील 12 सर्वात मोठ्या स्टॉक एक्सचेंजमध्ये याचा समावेश होतो. वित्तीय सेवा, रियल इस्टेट आणि प्रसारमाध्यम हे शहरातील आघाडीचे उद्योग आहेत.
 5. जगातील अब्जाधिशांच्या यादीनुसार, गेल्या 10 वर्षांमध्ये मुंबई, सिडनी, शांघाय या शहरांमधील संपत्तीमध्ये झपाट्याने वाढ झालेली आहे. मुंबईत एकूण 28 अब्जाधीश राहतात.
 6. शीर्ष 15 श्रीमंत शहरांमध्ये ह्यूस्टन, जिनेव्हा, ओसाका, सिओल, शेनझेन, मेलबर्न, ज्युरिक आणि डलास अश्या नामांकित शहरांचा समावेश नाही.

 


Five Bilateral Agreements Between India-United Arab Emirates (UAE)

 1. भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संयुक्त अरब अमिराती (UAE) देशाच्या दौर्‍यादरम्यान राजकुमार मोहम्मद बिन जायद अल नाहयान यांच्यासोबत झालेल्या एका द्विपक्षीय बैठकीमध्ये दोन्ही देशांमधील संबंधांना चालना देण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली.
 2. पंतप्रधान नरेंद्र मोदी पश्चिम आशिया आणि आखाती प्रदेशातील पॅलेस्टाईन, UAE आणि ओमान या देशांच्या दौर्‍यावर आहेत.
 3. अबू धाबी झालेल्या बैठकीचे फलित म्हणून शेवटी ऊर्जा, रेल्वे, मनुष्यबळ आणि वित्तीय सेवा या क्षेत्रांमध्ये पाच सामंजस्य करारांवर स्वाक्षर्‍या करण्यात आल्या.
 4. भारत-UAE संबंध:-
  1. भारत आणि संयुक्त अरब अमिराती (UAE) यांच्यामधील संबंधामधून UAE मध्ये आज भारतीय मूळ असलेले सुमारे 2.5 दशलक्ष स्थलांतरित कामगार काम करीत आहेत.
  2. UAE देशातील एकूण रहिवाशांपैकी 27% लोक भारतीय आहेत. 
भारत-संयुक्त अरब अमिराती (UAE) यांच्यातील करार
 1. या करारांची यादी पुढीलप्रमाणे:-
 2. लोअर झाकुम कंसेशन मध्ये सुमारे 10% सहभाग व्याजांच्या संपादनासाठी इंडियन कंसोर्टियम (OVL, BPRL आणि IOCL) आणि अबूधाबी नॅशनल ऑइल कंपनी (ADNOC) यांच्यात सामंजस्य करार
 3. UAE मध्ये भारतीय कामगारांच्या कंत्राटी रोजगाराच्या सहयोगी प्रशासनाला संस्थात्मक स्वरूप देण्यासाठी सामंजस्य करार
 4. रेल्वे क्षेत्रातील तांत्रिक सहकार्यासाठी भारत सरकारचे रेल्वे मंत्रालय, आणि UAE चे फेडरल ट्रान्सपोर्ट अथॉरिटी-लँड अँड मेरीटाइम यांच्यात सामंजस्य करार
 5. दोन्ही देशांमधील वित्तीय सेवा उद्योगांमध्ये सहकार्य वाढविण्यासाठी बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) आणि अबु धाबी सिक्युरिटीज एक्सचेंज (ADX) यांच्यात सामंजस्य करार
 6. जम्मूमध्ये बहुउद्देशीय लॉजिस्टिक्स पार्क आणि केंद्र उभारण्यासाठी जम्मू-काश्मीर राज्य शासन आणि DP वर्ल्ड यांच्यात सामंजस्य करार


Transgender activist Vidya Kamble

 1. विद्या कांबळे या पहिल्या किन्नर न्यायाधीश आहेत, ज्यांची महाराष्ट्र लोक अदालत समितीत सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
 2. 29 वर्षी य विद्या कांबळे या किन्नर (LGBT) समाजाला मुख्य प्रवाहात आणण्याचे काम करणार्‍या ‘सारथी’ संघटनेच्या त्या अध्यक्षा देखील आहेत.
 3. नागपूर जिल्हा न्यायालयात भरलेल्या लोक अदालतच्या समितीत त्यांनी सदस्य म्हणून कारभार सांभाळला.
 4. लोक अदालत ला ‘कायदेशीर सेवा प्राधिकरण कायदा-1987 अन्वये वैधानिक दर्जा प्राप्त आहे.


Three new species of Il Masya in the Bay of Bengal

 1. उत्तर बंगालच्या उपसागरात संशोधकांना विद्युत झटका देणार्‍या ‘इल’ मास्याच्या तीन नवीन प्रजाती आढळून आल्या आहेत.
 2. या तीन प्रजाती:-
  1. जिमनोथोरॅक्स सुडोटाइल (पांढरे ठिपके असलेले गडद तपकिरी रंगाचे, 1-1.5 फूट),
  2. जिमनोथोरॅक्स विशाखान्सिस (एकसारखे तपकिरी रंगाचे, सुमारे 1 फूट)
  3. एंचेलायकोअर प्रोपिनकुआ (अनियमित पांढरा ठिपके असलेले लालसर तपकिरी रंगाचे, 1 फूटपेक्षा कमी).
 3. इल प्रामुख्याने नद्या आणि समुद्र तळाशी आढळतात. 
 4. आतापर्यंत जगभरात जवळपास 1000 प्रजातींची ओळख पटलेली आहे.
 5. त्यापैकी भारतात 125 प्रजाती आढळलेल्या आहेत.


Top