senior philosopher fakruddin bennur passed away

 1. ज्येष्ठ विचारवंत, चिंतनशील लेखक प्रा. फकरूद्दिन तथा एफ.एच. बेन्नूर (वय 80 वर्षे) यांचे 17 ऑगस्ट रोजी निधनझाले.
 2. प्रा. बेन्नूर यांचा जन्म 25 नोव्हेंबर 1938 रोजी सातारा येथे झाला. 1966 ते 1998 पर्यंत त्यांनी संगमेश्वर महाविद्यालयात अध्यापनाचे कार्य केले.
 3. कर्नाटक विद्यापीठ, नागपूर विद्यापीठ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये त्यांनी हिंदू-मुस्लीम प्रश्न, मुस्लीम राजकारण, सामाजिक सौहार्द, महात्मा गांधी, कार्ल मार्क्स, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदी विषयांवर 150 हून अधिक शोधनिबंध सादर केले होते.
 4.  डॉ. आंबेडकर अकादमीची स्थापना केली होती.
 5. सन 2014 मध्ये त्यांनी इतिहास पुनर्लेखन समितीची स्थापना केली.
 6. गाजीउद्दीन रिसर्च सेंटरच्या वतीने 20 ऑगस्ट रोजी प्रा. बेन्नूर यांचा मानपत्र प्रदान करून सत्कार करण्यात येणार होता. यावेळी त्यांच्या ‘मुस्लीम राजकीय विचारवंत आणि राष्ट्रवाद‘, ‘भारतीय मुस्लीम विचारक‘ यासह तीन पुस्तकांच्या नवीन आवृत्तीचे प्रकाशन होणार होते; आता हा सोहळा होणार नसल्याने दुख: व्यक्त होत आहे.


swachh bharat initiative in all state school

 1. स्वच्छ भारत मोहिमेंतर्गत शालेय शिक्षण विभाग राज्यातील शाळांत ‘स्वच्छ भारत पंधरवडा‘ साजरा करणार आहे.
 2. स्वच्छता हे काम नसून ती एक चांगली सवय आहे. या भूमिकेतून 1 ते 15 सप्टेंबर या काळात स्वच्छ भारत पंधरवडा साजरा करण्याच्या सूचना केंद्रीय शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाने दिल्या आहेत. या पार्श्वभूमीवर राज्याच्या शालेय शिक्षण विभागानेही या संबंधित सूचना जारी केल्या आहेत.
 3. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2 ऑक्टोबर 2019 पर्यंत स्वच्छ भारत मोहिमेंतर्गत स्वच्छ भारताचे ध्येय साध्य करण्याचे उद्दिष्ट ठरविले आहे. त्याच अनुषंगाने सप्टेंबर महिन्यातील 1 ते 15 हे दिवस ‘स्वच्छ भारत’ पंधरवडा साजरा होणार आहे.
 4. स्वच्छ भारत मिशनचाच एक भाग म्हणून ‘स्वच्छ भारत, स्वच्छ विद्यालय‘ हेमिशन संपूर्ण देशभरात सुरू आहे.
 5. राष्ट्रीय अभियानाला प्रतिसाद म्हणूनच महाराष्ट्रातही ‘स्वच्छ विद्यालय, स्वच्छ महाराष्ट्र‘ हे अभियान सुरू करण्यात आले आहे.


18 th asian games starting from today

 1. इंडोनेशियातल्या 'जकार्ता' आणि 'पालेमबांग' शहरात आयोजित करण्यात आले आहे.
 2. भारताकडून 572 खेळाडूंचं पथक पाठविण्यात आले आहे.
 3. एशियाड म्हणजे आशियाई देशांसाठीचा सर्वोच्च क्रीडासमारोह आहे.
 4.  ऑलिम्पिकच्या धर्तीवर दर 4 वर्षांनी आशियाई देशांसाठी याचे आयोजन केले जाते.
 5.  आशिया खंडातल्या 45 देशांचा सहभाग असतो.
 6.  ऑलिम्पिकपाठोपाठ जगातली दुसऱ्या क्रमांकाची मोठी आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धा अशी एशियाडची ओळख आहे.
 7.  जकार्तात होणारं हे आजवरचं दुसरं एशियाड आहे. याआधी 1962 साली जकार्तामध्ये एशियाडचं आयोजन करण्यात आलं होतं.
 8.  अठराव्या एशियाडमध्ये 58 क्रीडाप्रकारांत मिळून एकूण 465 पदकं दिली जाणार आहेत.
 9.  भारतामध्ये दोनवेळा एशियाडचं आयोजन केलं आहे. [ 1951 साली - पंतप्रधान जवाहरलाल नेहरु - दिल्ली :; 1982 - पंतप्रधान इंदिरा गांधी - नवी दिल्ली ]
 10.  एशियाडच्या आजवरच्या इतिहासात भारतानं 616 पदकांची कमाई केली आहे. त्यात 139 सुवर्ण, 178 रौप्य आणि 299 कांस्यपदकांचा समावेश आहे.
 11. 2014 सालच्या इन्चिऑन एशियाडमध्ये भारताला 11 सुवर्ण, 9 रौप्य आणि ३७ कांस्यपदकांसह [एकूण -57] पदकतालिकेत आठवे स्थान मिळाले होते.


indias air quality need changes

 1. शिकागो विद्यापीठ व हार्वर्ड केनेडी स्कूलच्या संशोधकांनी केलेल्या अभ्यासानुसार भारतातील हवेचा दर्जा सुधारण्यासाठी प्रयत्नांची गरज आहे.
 2. जागतिक आरोग्य संघटनेची स्वच्छ हवा मानके पाळल्यास भारतीयांचे आयुष्य ४ वर्षांनी वाढू शकते, असे त्यांच्या अभ्यासात म्हटले आहे.
 3. या संशोधकांनी त्यांच्या अभ्यासातून ‘अ रोडमॅप टुवर्ड्स क्लीनिंग इंडियाज एअर’ नावाचा अहवाल सादर केला आहे.
 4. या अहवालानुसार हवा प्रदूषणामुळे भारताला दरवर्षी ५०० अब्ज डॉलर्सचा फटका बसत असून त्यामुळे लाखो लोकांचे आयुष्यमान कमी झाले आहे, आजारी पडून लोकांचे मृत्यू होत आहेत.
 5. या संशोधकांनी याबाबत काही उपायही सुचवले असून त्यात धोरणात्मक बदलांचा समावेश आहे.
 6. जागतिक आरोग्य संघटनेच्या निकषानुसार, पीएम २.५ कणांचे प्रतिघनमीटर प्रमाण वार्षिक सरासरीत १० मायक्रोग्रॅम तर २४ तासातील २५ मायक्रोग्रॅम असावे.
 7. तर पीएम १० कणांचे प्रमाण वार्षिक २० मायक्रोग्रॅम प्रतिघनमीटर तर २४ तासाला ५० मायक्रोग्रॅम प्रतिघनमीटर असावे.
 8. या निकषांनुसार हवेचा दर्जा साध्य करण्यात भारताला यश आले, तर भारतीयांचे आयुर्मान सरासरी ४ वर्षांनी वाढेल.
 9. शिवाय भारताचा पैसाही वाचेल. कारण प्रदूषणामुळे होणाऱ्या रोगांमुळे आर्थिक खर्च वाढत असतो. लोकांची उत्पादनक्षमता कमी होत असते.
 10. या अहवालानुसारभारतातील ६६० दशलक्ष लोक हे पीएम २.५ या कणांची धोकादायक पातळी असलेल्या भागात राहतात.

हवेचा दर्जा सुधारण्यासाठी या अहवालात केलेल्या शिफारशी:-

 • निरीक्षकांना प्रोत्साहन देऊन प्रदूषणावर देखरेखीच्या पद्धतीत सुधारणा करणे.
 • प्रदूषणकारक घटकांमधून होणाऱ्या उत्सर्जनाबद्दल सातत्याने नियंत्रकांना माहिती पुरवणे.
 • प्रदूषणाच्या मर्यादेचे उल्लंघन केल्यास आर्थिक दंड लावणे.
 • प्रदूषण करणाऱ्या घटकांची माहिती जाहीर करणे.


Top