Singer Nahid Afrin: UNICEF's first 'Youth Advocate' for the North-East

 1. बाल अधिकारांसाठी लढण्यासाठी आसामचे लोकप्रिय 17 वर्षीय गायक नाहिद आफ्रिन यांना UNICEF इंडियाने ईशान्य क्षेत्रासाठीचे 'यूथ अॅडव्होकेट' म्हणून नियुक्त केले आहे. 
 2. संयुक्त राष्ट्रसंघ बाल कोष (United Nations Children's Fund -UNICEF) याचे मुख्यालय न्यूयॉर्क शहर (न्यूयॉर्क, अमेरिका) येथे आहे.
 3. UNICEF आधी दिनांक 11 डिसेंबर 1946 रोजी ‘युनायटेड नेशन्स इंटरनॅशनल चिल्ड्रन्स इमर्जन्सी फंड’ या नावाने तयार करण्यात आले होते.
 4. ज्यामधून द्वितीय विश्वयुद्धाच्या धर्तीवर प्रभावित झालेल्या बालकांना आपत्कालीन अन्न आणि आरोग्य सेवा प्रदान करण्यासाठी याची स्थापना केली गेली होती.
 5. पोलंडचे डॉक्टर लुडविक राज्चमॅन हे UNICEFचे संस्थापक म्हणून ओळखले जातात आणि ते या संघटनेचे पहिले अध्यक्ष होते.
 6. पुढे 1950 साली सर्वत्र विकसनशील देशांमधील बालकांच्या आणि महिलांच्या दीर्घ-काळाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी संघटनेचा विस्तार करण्यात आला.
 7. 1953 साली तो संयुक्त राष्ट्रसंघाचा भाग बनला आणि नावामधील ‘इंटरनॅशनल’ व ‘इमर्जन्सी’ शब्द वगळण्यात आले, मात्र मूळ संक्षिप्त नाव काम ठेवण्यात आले.
 8. UNICEFचे कार्यक्षेत्र 190 देश आणि प्रांतांमध्ये पसरलेले आहे.


Australia's 'Vision 2035 for India' document

 1. दि. 23 नोव्हेंबर 2018 रोजी ऑस्ट्रेलियाच्या सरकारने ‘व्हिजन 2035 फॉर इंडिया’ शीर्षकाखाली तयार केलेल्या दस्तऐवजात नमूद कृतींची अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली आहे.
 2. भारताचे राष्ट्रपती राम नाथ कोविंद ऑस्ट्रेलियाच्या दौर्‍यावर आहेत. या दरम्यान यासंबंधी घोषणा केली गेली.
 3. भारताशी द्वैपक्षीय संबंध सुधारण्यासाठी ऑस्ट्रेलियाने आपला दृष्टीकोन जाहीर केला आहे.
 4. "इंडिया इकनॉमिक सर्व्हे" याच्या अंमलबजावणीची घोषणा देखील करण्यात आली आहे.
 5. भारत-ऑस्ट्रेलिया अन्न भागीदारी, खनिकर्म व्यवसायाचा विस्तार आणि हवाई संपर्क वाढविण्यासाठी पुढील बारा महिन्यांत सर्वेक्षणासंबंधी काही महत्त्वाच्या शिफारशी लागू करण्यास ऑस्ट्रेलिया सहमत आहे.
 6. शिवाय, खनिकर्म, विज्ञान व तंत्रज्ञान, कृषी संशोधन आणि शिक्षण अश्या क्षेत्रांमध्ये सहकार्यासाठी पाच करारांवर स्वाक्षर्‍या करण्यात आल्या आहेत.
 7. ऑस्ट्रेलिया हा ऑस्ट्रेलियाच्या राष्ट्रकुल दक्षिण गोलार्धाच्या खंडाच्या अंतर्गत असलेला एक देश आहे.
 8. जो जगातला सर्वात छोटा खंड आहे आणि जगातला सर्वात मोठा बेट देखील आहे.
 9. जो हिंद व प्रशांत महासागरात पसरलेला आहे. 
 10. ऑस्ट्रेलिया हा एकमेव असा प्रदेश आहे, जो एक खंड, एक राष्ट्र आणि एक बेट आहे.
 11. कॅनबेरा हे राजधानी शहर तर ऑस्ट्रेलियन डॉलर हे राष्ट्रीय चलन आहे.


Nandita Das: Winner of the FIAPF Award

 1. भारतीय चित्रपट निर्माता नंदिता दास यांना यावर्षीचा ‘इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ फिल्म प्रोड्यूसर्स असोसिएशन्स (FIAPF) पुरस्कार’ जाहीर झाला आहे. 
 2. दि. 29 नोव्हेंबर 2018 रोजी ब्रिस्बेनमध्ये होणार्‍या 12वे ‘एशिया पॅसिफिक स्क्रीन अवार्ड्स’ (APSA) या पुरस्कार वितरण सोहळ्यात या पुरस्काराचे वाटप करण्यात येणार आहे.
 3. इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ फिल्म प्रोड्यूसर्स असोसिएशन्स (FIAPF) ही एक अग्रणी संस्था आहे.
 4. ज्याचे प्रमुख 30 देशांमधील चित्रपट निर्मात्यांच्या 36 सदस्य संघटना सदस्य आहेत.
 5. संघटनेची 1933 साली स्थापना करण्यात आली.
 6. याचे मुख्यालय फ्रान्सच्या पॅरिस शहरात आहे.
 7. हे जगभरात काही महत्त्वाच्या कार्यक्रमांसह आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांचे नियमन करण्यासाठी जबाबदार आहे.


IMD has developed a technology to monitor the flood situation

 1. भारत हवामानशास्त्र विभागाने (IMD) पावसाळ्यात जलाशयातली पाण्याची पातळी तपासण्यासाठी आणि पूरपरिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी 'इंपॅक्ट बेस्ड फोरकास्टिंग अॅप्रोच' नावाचे तंत्रज्ञान विकसित केले आहे.
 2. पावसामुळे नद्या आणि जलाशयातील पाण्याची पातळी वाढते.
 3. हवामानातल्या बदलांमुळे केरळमध्ये अलीकडेच आलेल्या पूरानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीला पाहता, भविष्यात अश्या परिस्थितीचे मूल्यांकन करण्यासाठी नवीन तंत्रज्ञान विकसित करण्यात आले आहे.
 4. उद्भवणार्‍या परिस्थितीला सांभाळण्यासाठी याची राज्य सरकारांना मदत होणार आहे.
 5. भारत हवामानशास्त्र विभाग (IMD) हा भारत सरकारच्या भूशास्त्र मंत्रालयाची एक संस्था आहे.
 6. याची स्थापना सन 1875 मध्ये हेन्री फ्रान्सिस ब्लॅनफोर्ड यांनी केली होती.
 7. याचे मुख्यालय नवी दिल्लीत आहे.


Mary Kom's sixth-world world title win

 1. सुपरस्टार एम. सी. मेरी कोम हीने आपल्या सहाव्यांदा जगज्जेतेपदाला गवसणी घातली आहे.
 2. 48 किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत खेळत असताना मेरी कोमने युक्रेनच्या एच.ओखोटोचा पराभव करत विजेतेपदावर आपलं नाव कोरलं
 3. विश्व अजिंक्यपद बॉक्सिंग स्पर्धेच्या अंतिम फेरीत मेरीने युक्रेनच्या हॅना ओखोटाला 5-0 असे पराभूत करत जेतेपदाला गवसणी घातली आणि इतिहास रचला.
 4. मेरीने तब्बल 16 वर्षांपूर्वी या स्पर्धेत पहिले जेतेपद पटकावले होते.
 5. तसेच मेरी आता 35 वर्षांची आहे आणि तिचे हे सहावे जेतेपद ठरले आहे.
 6. मेरीने 2001, 2002, 2005, 2006, 2008, 2010 या वर्षांमध्ये यापूर्वी जेतेपद पटकावले होते.


Top

Whoops, looks like something went wrong.