stan-lee-creator-of-spider-man-and-other-marvel-superheroes-dead-at-95

 1. जगप्रसिद्ध मार्वल कॉमिक्सचे जनक स्टेन ली यांचे 12 नोव्हेंबर रोजी निधन झाले. 
 2. वयाच्या 95 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
 3. स्पायडरमॅन, आयर्नमॅन, ब्लॅक पँथर, हल्क यांच्यासारख्या सुपरहिरोंच्या पात्रांची निर्मिती करणाऱ्या स्टेन ली यांच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. 
 4. अमेरिकेतील कॉमिक बुक संस्कृतीचा चेहरा अशी ली यांची ओळखहोती.
 5. स्टेन ली यांच्या मृत्यूची माहिती त्यांच्या मुलीने दिली. यानंतर अनेकांनी सोशल मीडियावर त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. 
 6. ली यांचा जन्म 28 डिसेंबर 1922 रोजी न्यूयॉर्कमध्ये झाला होता.
 7. सन 1961 मध्ये त्यांनी द फॅन्टास्टिक फोरसोबत मार्वल कॉमिक्स सुरु केले. त्यानंतर यामध्ये स्पायडरमॅन, एक्स मॅन, हल्क, आयर्न मॅन, ब्लॅक पँथर आणि कॅप्टन अमेरिका यांसारख्या सुरपहिरोंच्या पात्रांचा समावेश झाला.
 8. स्टेन ली काही हॉलीवूड चित्रपटांमध्येदेखील दिसले होते.


November 12: World Pneumonia Public awareness day

 1. वर्ष 2016 मध्ये जगभरात झालेल्या पाच वर्षांखालील बालकांच्या मृत्यूंपैकी 25 टक्के मृत्यू न्यूमोनिया आणि डायरियामुळे झाले होते. भारतात हे प्रमाण सर्वाधिक असल्याचे समोर आले आहे.
 2. न्यूमोनिया व डायरियामुळे सर्वाधिक बालमृत्यू होणाऱ्या 15 देशांचा अभ्यास अहवालात नुकताच प्रसिद्ध करण्यात आला. यातून ही बाब स्पष्ट झाली आहे.
 3. हे प्रमाण सर्वाधिक आढळणार्‍या देशांतील आरोग्यव्यवस्था असुरक्षित वर्गातील मुलांना उपचार पुरवण्यात असमर्थ असल्याचे या अहवालात म्हटले आहे.
 4. 12 नोव्हेंबर रोजी साजरा होणाऱ्या जागतिक न्यूमोनिया जनजागृती दिनाच्या पार्श्वभूमीवर 10वा न्यूमोनिया अ‍ॅण्ड डायरिया प्रोग्रेस रिपोर्ट जॉन्स हॉपकिन्स ब्लूमबर्ग स्कूल ऑफ पब्लिक हेल्थमधील इंटरनॅशनल व्हॅक्सिन अ‍ॅक्सेस सेंटरने नुकताच प्रसिद्ध केला.
 5. यात न्यूमोनिया व डायरिया आजारांनी सर्वाधिक बालमृत्यू होणाऱ्या 15 देशांतील न्युमोनिया आणि डायरिया प्रतिकारासंदर्भातील प्रगतीबाबत विवेचन करण्यात आले आहे.
 6. या आजारांमुळे होणारे मृत्यू टाळण्यासाठी उपायांमध्ये स्तनपान, लसीकरण, वैद्यकीय सेवेची उपलब्धता, प्रतिजैवकांचा वापर, ओरल रिहायड्रेशन सोल्युशन (ओआरएस) व झिंक पूरके देणे हे उपाय प्रभावी असल्याचे सिद्ध झाले आहे.
 7. लसीकरणाच्या व्याप्तीबाबत हे देश प्रगती करत असले, तरी लहान मुलांमधील आजारांवर उपचार करण्यात ते प्रचंड प्रमाणात कमी पडत आहेत, असे गेल्या दहा वर्षांपासून प्रसिद्ध होणाऱ्या अहवालात म्हटले आहे.
 8. विशेषत: दुर्गम भागात राहणार्‍या, गरीब आणि मागास समुदायांतील मुलांना होणारे आजार हाताळण्यात हे देश कमी पडत आहेत.


The Central Government told the Supreme Court that Rafael was worth the money

 1. फ्रान्सच्या दस्सॉल्ट कंपनीकडून घ्यायच्या 36 राफेल लढाऊ विमानांच्या किंमतीची माहिती देण्यास कुरकुर करणाऱ्या केंद्र सरकारने फक्त न्यायाधीशांना पाहण्यासाठी का होईना, पण ती सीलबंद लखोट्यात सर्वोच्च न्यायालयात सादर केली.
 2. या विमानखरेदीच्या निर्णय प्रक्रियेसह किंमतीची माहितीही द्यावी, असा आदेश न्यायालयाने 31 ऑक्टोबर रोजी दिला, तेव्हा अ‍ॅटर्नी जनरल के.के. वेणुगोपाळ यांनी किंमतीची माहिती गोपनीय असल्याने ती उघड करण्यास विरोध केला होता.
 3. परंतु सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी आदेशात बदल न करता त्यांना सांगितले की, तर तसे प्रतिज्ञापत्र करा. आम्ही त्याचा विचार करू. त्यानंतर न्यायालयाचा रोष टाळण्यासाठी केंद्राने ती सादर केली.
 4. राफेल विमाने खरेदीच्या निर्णय प्रक्रियेसंबंधी न्यायालयाने सांगितले होते की, त्यातील जो भाग उघड करणे योग्य आहे असे वाटते तेवढा सरकारने सादर करावा व त्याची एक प्रत याचिकाकर्त्यांनाही द्यावी.
 5. यानुसार या माहितीचा दुसरा लखोटाही न्यायालयात सादर करून ती माहिती याचिकाकर्त्यांना दिली.
 6. राफेल खरेदीसंबंधी एकूण तीन याचिका न्यायालयापुढे असून त्यावर पुढील सुनावणी बुधवारी 14 नोव्हेंबर रोजी होणार आहे.


Top

Whoops, looks like something went wrong.