SUPREME COURT


 1. प्रशासकीय सेवांवर कोणाचे नियंत्रण असावे या वादग्रस्त प्रश्नाबाबत गुरुवारी सर्वोच्च न्यायालयाच्या दोन सदस्यीय पीठाने मतभिन्नता असलेला निर्णय दिला असला, तरी अंतिम शब्द मात्र केंद्र सरकारचाच असल्याचे मान्य केल्याचे

  सकृतदर्शनी निकालावरून दिसत आहे.

 2. निर्णयामध्ये मतभिन्नता असल्याच्या पाश्र्वभूमीवर न्या. ए. के. सिकरी आणि न्या. अशोक भूषण यांच्या पीठाने हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयाच्या अधिक व्यापक पीठाकडे सुपूर्द करण्याचे ठरविले.

 3. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे केंद्रातील सरकार आणि दिल्लीतील आप सरकार यांच्यात अधिकारांबाबत सुरू असलेल्या सहा प्रकरणांची दोन सदस्यीय पीठासमोर सुनावणी झाली.

 4. तर दोन न्यायाधीशांनी पाच प्रश्नांबाबत एकमताने निर्णय दिला. लाचलुचपत प्रतिबंधक विभागावर केंद्राने आधीच सांगितल्याप्रमाणे नायब राज्यपालांचेच नियंत्रण राहील, त्याचप्रमाणे चौकशी आयोग नियुक्त करण्याचा अधिकारही केंद्र सरकारचाच असेल हे दोन्ही न्यायाधीशांनी मान्य केले.

 5. तर दुसरीकडे, निवडून आलेल्या दिल्ली सरकारला सरकारी वकिलांच्या नियुक्त्या, जमीन महसूल प्रकरणे, वीज आयोग अथवा मंडळातील नियुक्त्या करण्याचे अधिकार असतील, असे पीठाने म्हटले आहे.

 6. तथापि, प्रशासकीय सेवांवर दिल्ली सरकारचे कोणतेही नियंत्रण नसल्याचा निर्वाळा न्या. भूषण यांनी दिला. या वादग्रस्त प्रश्नावर दोन न्यायाधीशांमध्ये मतभिन्नता आहे.


sushil chandra new election comissioner

 1. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाचे (सीबीडीटी) अध्यक्ष सुशील चंद्रा यांची निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

 2. तर कायदा मंत्रालयाने त्यांच्या नावाची घोषणा केली आणि या संदर्भातील अधिसूचना जारी केली आहे. ते 1980बॅचच्या भारतीय महसूल सेवेचे (आयआरएस) अधिकारी आहेत.

 3. माजी निवडणुक आयुक्त ओ. पी. रावत यांच्या निवृत्तीनंतर तत्कालीन निवडणुक आयुक्त सुनील अरोरा हे मुख्य निवडणुक आयुक्त बनले होते. त्यानंतर आयोगामध्ये निवडणुक आयुक्ताचे पद खाली होते.

 4. तसेच निवडणुक आयोगामध्ये मुख्य निवडणूक आयुक्ताव्यतिरिक्त आणखी दोन निवडणूक आयुक्त असतात. आता सुशील चंद्रा यांच्या व्यतिरिक्त अशोक लवासा हे एक निवडणूक आयुक्त आहेत.


NIA PULWAMA ATTACK INVESTIGATION

 1. जम्मू काश्मीरच्या पुलवामा या ठिकाणी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात चाळीस जवान शहीद झाले आहेत. या हल्ल्याची चौकशी राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून होणार आहे.

 2. तसेच या हल्ल्यानंतर केंद्र सरकारने यासंदर्भातल्या तपासाची जबाबदारी एनआयएकडे अर्थात राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे सोपवली आहे.

 3. तर यासंदर्भातल एका 12 सदस्यीय समितीची स्थापना कऱण्यात आली आहे. ज्यामध्ये फॉरेन्सिक तज्ज्ञांचाही समावेश आहे. तर इतर वरिष्ठ अधिकारीही सहभागी झाले आहेत.


 4. या टीममध्ये एका आयजी रँकच्या अधिकाऱ्यासह एकूण 12 जणांचा समावेश असणार आहे. ज्या ठिकाणी दहशतवादी हल्ला झाला तिथला तपास ही टीम करणार आहे. हल्ल्याशी संबंधित पुरावे गोळा करण्याचं काम एनआयएची टीम

  करणार आहे.


EXPORT DUTY

 1. पुलवामा येथील हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानवर दबाव टाकण्यास सुरुवात केली आहे. पाकिस्तानला निर्यात करणाऱ्या करण्यात येणाऱ्या वस्तूंवर 200 टक्के कस्टम ड्युटी आकारली आहे.

 2. तर पाकिस्तानला निर्यात करण्यात येणाऱ्या वस्तूंवरील कस्टम ड्युटीत वाढ केल्याने कांदा, साखर, मसाल्याचे पदार्थ भारताकडून घेण्यासाठी पाकिस्तानला जास्त किंमत चुकवावी लागणार आहे. तसेच या निर्णयाची अंमलबजावणी त्वरित करण्यात आली आहे.

 3. भारत पाकिस्तानला साखर, चहा, ऑइल केक, पेट्रोलियम ऑइल, कॉटन, टायर, रबरसह जवळपास 14 वस्तू निर्यात करतो.

 4. आता या वस्तूंवरची कस्टम ड्युटी वाढवल्यामुळे पाकिस्तानला भारताकडून घ्याव्या लागणाऱ्या या वस्तूंवर दुप्पट पैसे मोजावे लागणार आहेत.

 5. तसेच पाकिस्तानकडून आयात करण्यात आलेल्या सिमेंटवरही भारताला जास्त पैसे मोजावे लागण्याची शक्यता आहे


Top