The 'INS Khanderi' submarine in the scorpion category will join the Indian Navy

 1. ‘INS खांडेरी’ ही स्कॉर्पियन श्रेणीतली दुसरी पाणबुडी लवकरच राष्ट्राच्या सेवेसाठी भारतीय नौदलात समाविष्ट केली जाणार आहे.
 2. पाणबुडीने सर्व सागरी चाचण्या यशस्वीपणे पार पाडल्या आहेत.
 3. 1,564 टन वजनी ‘INS खांडेरी’ ही एक डीजल व वि‍जेवर चालणारी युद्ध-पाणबुडी आहे, ज्याची बांधणी भारतीय नौदलासाठी मझगाव डॉक शिपबिल्‍डर्स लिमिटेड या जहाजबांधणी कंपनीने केली आहे.
 4. भारतीय नौदलाचा 'प्रोजेक्ट-75’:-
  1. भारतीय नौदलासाठी स्कॉर्पियन श्रेणीच्या अंतर्गत 6 पाणबुड्या तयार केल्या जात आहे, ज्यांना भारतीय नौदलात सामील करण्यात येणार आहे.
  2. INS कलवरी, INS खांडेरी, INS करंज, INS वेला, INS वगीर आणि INS वागशीर या सहा पाणबुड्या भारतीय नौदलाच्या सेवेत असतील.
  3. INS वगीर आणि INS वागशीर वगळता इतर पाणबुड्या तयार झालेल्या आहेत आणि त्यांची चाचणी घेतली जात आहे.
  4. या पाणबुडीची संरचना फ्रान्सच्या ‘DCNS’ या नौदल संरक्षण व ऊर्जा कंपनीने तयार केली. त्याची बांधणी भारतीय नौदलाच्या 'प्रोजेक्ट-75’ अंतर्गत करण्यात येत आहे.
 5. वैशिष्ट्ये:-
  1. ही पाण्यामुळे पडणार्‍या उच्च तीव्रता हायड्रोस्टॅटिक दबावाखाली काम करण्यास सक्षम आहे आणि महासागरामध्ये खोलपर्यंत प्रवास करू शकते.
  2. डीजल आणि विद्युत अश्या दोन्ही इंधनावर ही पाणबुडी चालते.
  3. पाणबुडी 6 x 533 मि.मी. टॉर्पेडो ट्यूबने सज्ज आहे, ज्यामधून 18 व्हाइटहेड एलनिया सुस्तमी सुबॅक्की ब्लॅक शार्क हेवीवेट टॉर्पेडो किंवा SM-39 एक्सॉकेट अॅंटी-शिप क्षेपणास्त्र सोडले जाऊ शकते.
  4. पाणबुडीचा पाण्याखाली असताना कमाल वेग 20 नॉट (ताशी 37 किमी) तर पाण्याच्या पृष्ठभागावर 12 नॉट (ताशी 22 किमी) आहे.
  5. भारताला 7500 किलोमीटरहून अधिकचा सागरीकिनारा लाभलेला आहे. याशिवाय भारतीय परिसरात जवळजवळ 1300 छोटे-मोठे बेटे आणि सुमारे 25 लक्ष चौ. किलोमीटरचा विशिष्ट आर्थिक क्षेत्र आहे.
  6. या पाणबुड्यांच्या वापराने सुरक्षेच्या दृष्टीने भारतीय संरक्षण व्यवस्थेमध्ये बळकटी येणार.


'Yono Cash' Point: SBI's card withdrawal service

 1. ATM मधून कार्डच्या वापराशिवाय ग्राहकांना ‘योनो’ मोबाईल अॅपद्वारे पैसे काढता यावे त्यासाठी भारतीय स्टेट बँकनी (SBI) ‘योनो कॅश पॉइंट’ सेवा सुरू केली आहे.
 2. SBIच्या तब्बल 16500 ATMमध्ये योनो कॅशसेवेव्दारे पैसे काढणे शक्य होणार आहे. ही सुविधा उपलब्ध करून देणारी SBI ही देशातली पहिली बँक ठरली आहे.
 3. 85 ई-वाणिज्य कंपन्यांकडून कस्टमाईज्ड उत्पादने व सेवा देणारी ही पहिलीच सर्वंकष डिजीटल बँकींग सुविधा आहे.
 4. ही UPI (युनिफाइड पेमेंट इंटरफेस) पेमेंट सेवेच्या माध्यमातून व QR कोडच्या (क्विक रीस्पॉन्स कोड) सहाय्याने ATM मधून पैसे काढण्याची सुविधा आहे.
  1. भारतीय स्टेट बँक (SBI):-
   1. ही भारतातली सर्वात मोठी बँकिंग आणि वित्तीय सेवा कंपनी आहे.
   2. SBIचे मूळ 1806 साली दिसून येते, जेव्हा बँक ऑफ बंगाल (तत्कालीन बँक ऑफ कलकत्ता) याची स्थापना करण्यात आली होती.
   3. बँक ऑफ मद्रास, बँक ऑफ बंगाल आणि बँक ऑफ बॉम्बे यांचे 1921 साली ‘इंपेरियल बँक ऑफ इंडिया’ तयार करण्यासाठी एकत्रीकरण झाले होते आणि दिनांक 1 जुलै 1955 रोजी त्या बँकेला SBI हे वर्तमान नाव प्राप्त झाले.
   4. त्यामुळे 1 जुलै हा 'SBI दिन' म्हणून पाळला जातो. SBIचे मुख्यालय मुंबई या शहरात आहे.


Finished fourth anniversary of the United Nations Environment (UNEP) program in Kenya

 1. 11 मार्च ते 15 मार्च 2019 या काळात नैरोबी (केनियाची राजधानी) येथे संयुक्त राष्ट्रसंघ पर्यावरण (UNEP) कार्यक्रमाची चौथी वार्षिक सभा संपन्न झाली.
 2. “इनोव्हेटिव्ह सोल्यूशन्स फॉर एन्विरोंमेंटल चॅलेंजेस अँड सस्टेनेबल कंझ्मप्शन अँड प्रॉडक्शन” या विषयाखाली सभेत विस्तृत चर्चा झाली. या कार्यक्रमात 193 राष्ट्रांच्या प्रतिनिधींनी भाग घेतला होता.
 3. सभेविषयी:-
  1.  सभेत प्लास्टिकच्या प्रदूषणापासून सागरी जीवन संरक्षित करणे, अन्नाची नासाडी कमी करणे.
  2. हवामानातल्या बदलांशी लढा देणारे प्रगत तांत्रिक नव संशोधन चालविणे आणि स्त्रोतांचा वापर आणि जैव-विविधतेची हानी कमी करणे अश्या मुद्द्यांवर चर्चा झाली.
  3.  न 1995 ते सन 2011 या काळात पर्यावरणविषयक सेवांमध्ये झालेल्या आर्थिक नुकसानीचे प्रमाण 4 ट्रिलियन (लक्ष कोटी) डॉलर्सवरून 20 ट्रिलियन डॉलर्सपर्यंत पोहोचले आणि हे प्रमाण दरवर्षी सरासरी 3 ट्रिलियन डॉलर्स एवढे होते. तसेच प्रदूषणासंबंधित नुकसान दरवर्षी सरासरी 4.6 ट्रिलियन डॉलर्स एवढे होते.
  4. या सभेच्या बरोबरीनेच, जागतिक बँकेच्या सहकार्याने फ्रान्स आणि केनिया या देशांच्या सरकारांनी ‘वन प्लॅनेट शिखर परिषद’ देखील आयोजित केली होती.
  5. प्र  मु ख पर्यावरणविषयक समस्यांचे निराकरण करण्यासाठी बिग डेटा, मशीन लर्निंग आणि ग्रीन टेक्नॉलॉजी स्टार्टअप याचा वापर करण्यासाठी ‘UN सायन्स-पॉलिसी-बिझनेस फोरम’ या नव्या उपक्रमांचा शुभारंभ केला गेला.
 4. संयुक्त राष्ट्रसंघ पर्यावरण (UNEP):- 
  1. हा दिनां क 5 जून 1972 रोजी स्थापना करण्यात आलेला संयुक्त राष्ट्रसंघाचा एक विभाग आहे.
  2. जे जागतिक पर्यावरणविषयक मुद्द्यांच्या संदर्भात धोरणे आणि पद्धती यांच्या वैश्विक अंमलबजावणीमध्ये मदत करते.
  3. त्याचे मु ख्यालय नैरोबी (केनियाची राजधानी) येथे आहे.


India hosts the FIFA Under-17 Women's Football World Cup 2020 competition

 1. भारताला ‘FIFA अंडर-17 महिला फुटबॉल विश्वचषक 2020’ स्पर्धेचे यजमानपद देण्यात आले आहे.
 2. मियामीमध्ये झालेल्या FIFAच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
 3. आंतरराष्ट्रीय फुटबॉल महासंघ (International Federation of Football Association -FIFA) हा एक खासगी महासंघ आहे, जो स्वतःस असोसिएशन फुटबॉल, फुटसल आणि बीच सॉकर या क्रिडाप्रकारांची एक आंतरराष्ट्रीय प्रशासकीय संस्था म्हणून संबोधतो. 
 4. FIFA फुटबॉल या क्रिडाप्रकाराच्या प्रमुख आंतरराष्ट्रीय स्पर्धांच्या, विशेषत: पुरुष विश्वचषक (1930 सालापासून) आणि महिला विश्वचषक (1991 सालापासून), आयोजनासाठी जबाबदार आहे.
 5. 1904 साली FIFAची स्थापना करण्यात आली आणि त्याचे मुख्यालय झुरिच (स्वित्झर्लंड) येथे आहे.
  1. त्याच्या सदस्यत्वामध्ये सध्या 211 राष्ट्रीय संघांचा समावेश आहे.


Pinaki Chandra Ghosh: India's first Lokpal

 1. सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्या. पिनाकी चंद्र घोष यांची भारताचे प्रथम लोकपाल म्हणून निवड करण्यात आली आहे.
 2. आता औपचारिकता पूर्ण करून राष्ट्रपती राम नाथ कोविंद न्या. घोष यांची अधिकृत नेमणूक करतील.
 3. न्या. घोष यांच्या नेमणुकीने लोकपाल कायदा संमत झाल्यानंतर पाच वर्षांनी भारताला पहिला लोकपाल मिळणार आहे.
 4. न्या. घोष 66 वर्षांचे असल्याने वयाची 70 वर्षे पूर्ण होईपर्यंत म्हणजे सुमारे चार वर्षे ते लोकपाल संस्थेचे अध्यक्ष राहतील. त्यांना पगार व दर्जा सरन्यायाधीशासमान असेल.
 5. न्या. घोष सध्या राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य आहेत. सर्वोच्च न्यायालयातून सन 2017 मध्ये निवृत्त झाल्यावर त्यांची आयोगात नेमणूक झाली होती.
 6. लोकपाल म्हणजे काय?
  1. लोकपाल (Ombudsman) म्हणजे अशी अधिकृत व्यक्ती/मंडळ, जे वैयक्तिक तक्रारीची दखल घेत कुठल्याही कंपनी आणि संस्थेची (विशेषत: सार्वजनिक) चौकशी करू शकते.
  2. सन 2014 मध्ये ‘लोकपाल आणि लोकायुक्त अधिनियम-2013’ या कायद्याला संसदेने मंजुरी दिली होती.
  3. लोकपाल संस्था कोणत्याही संविधानाच्या आधाराशिवाय चालणारी एक वैधानिक संस्था आहे, जी पंतप्रधान सहित सर्व लोकांच्या भ्रष्टाचाराबाबत तपास करू शकण्यास सक्षम असणार.
  4. लोकपाल कायद्यानुसार लोकपाल संस्थेवर अध्यक्षांखेरीज किमान आठ सदस्यही नेमण्यात येणार आहेत. यापैकी चार सदस्य न्यायिक व चार सदस्य गैरन्यायिक असतील.
  5. दोन्ही प्रकारच्या सदस्यांपैकी किमान 50% सदस्य अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, ओबीसी, अल्पसंख्य व महिला यांच्यातून नेमण्यात येतील.


Top

Whoops, looks like something went wrong.