
2726 06-Dec-2017, Wed
6 नोव्हेंबर 2017 रोजी 15 व्या देशाच्या रूपाने गिनियाकडून मंजुरी घेऊन, आंतरराष्ट्रीय सौर संघ (International Solar Alliance -ISA) संधि आधारित एक आंतरराष्ट्रीय आंतरसरकारी संघटना म्हणून उदयास येत आहे. म्हणजेच ही संघटना एक वैधानिक उपक्रम बनणार.
ISA संधिवर स्वाक्षरी केलेल्या 46 देशांची नावे - ऑस्ट्रेलिया, बांग्लादेश, बेनिन, ब्राझील, बुर्किना फसो, कंबोडिया, चिली, कोस्टा रिका, काँगो प्रजासत्ताक, कोमोरोस, कोटे डी'आयव्होर, जिबूती, क्यूबा, डॉमिनिक प्रजासत्ताक, इथिओपिया, इक्वेटोरियल गयाना, फिजी, फ्रान्स, गबॉन प्रजासत्ताक, घाना, गिनीया, गिनीया बिसाऊ, भारत, किरिबाती, लायबेरिया, मादागास्कर, मलावी, माली, मॉरिशस, नाउरु, नायजर, नायजेरिया, पेरू, रवांडा, सेनेगल, सेशेल्स, सोमालिया, दक्षिण सुदान, सुदान, टांझानिया, टोंगा, टोगोलीझ प्रजासत्ताक, तुवालु, UAE, वानुआटु आणि व्हेनेझुएला.
ISA संधिला मंजूरी दिलेल्या 19 देशांची नावे - भारत, फ्रान्स, ऑस्ट्रेलिया, बांग्लादेश, कोमोरोस, क्यूबा, फिजी, गिनीया, घाना, मलावी, माली, मॉरिशस, नाउरु, नायजर, पेरू, सेशेल्स, सोमालिया, दक्षिण सुदान आणि तुवालु.
उद्देश्य:-
जागतिक स्तरावर सौर ऊर्जासंबंधी विकास आणि वापराला प्रोत्साहन देणे हा आहे.
कार्ये:-
- ‘स्केलिंग सोलर अॅप्लिकेशन फॉर अॅग्रिकल्चरल यूज, स्केलिंग सोलर मिनी-ग्रिड आणि अफोर्डेबल फायनॅन्स अॅट स्केल हे तीन उपक्रम सुरू केले आहेत.
- विद्यमान 3 उपक्रमांव्यतिरिक्त, ISA ने अजून दोन कार्यक्रम सुरू करण्याची योजना आखली आहे, ते आहेत - स्केलिंग सोलर रूफटॉप्स आणि स्केलिंग सोलर ई-मोबिलिटी अँड स्टोरेज.
- ISA सदस्य देशांमधील सौर-प्रकल्पांचा आर्थिक खर्च कमी करण्यासाठी आणि जोखीम कमी करण्यासाठी ‘कॉमन रिस्क मिटीगेटींग मेकॅनिजम (CRMM)’ विकसित करीत आहे. हे साधन समन्वयित सार्वजनिक संसाधनांवरील विविधता आणि जोखीम करण्यास मदत करणार आणि लक्षणीय गुंतवणूकीला सुलभता प्रदान करणार.
- ‘डिजिटल इन्फॉपीडिया’ हा एक प्रमुख पुढाकार स्थापित करण्यात आला आहे, ज्याद्वारे ISA देशांचे धोरण निर्माते, मंत्री आणि व्यावसायिक नेत्यांना एकमेकांशी संवाद, संपर्क व सहयोग साधण्यास एक व्यासपीठ उपलब्ध झाले. हे व्यासपीठ 18 मे 2017 ला कार्यान्वित करण्यात आले.
आंतरराष्ट्रीय सौर संघ (ISA):-
- फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये हवामान बदलावरील संयुक्त राष्ट्रसंघाची परिषद (UNFCCC) COP21 (कांफ्रेन्स ऑफ पार्टीज-21) दरम्यान भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष फ्रांस्वा ओलोंद यांनी 30 नोव्हेंबर 2015 ला संयुक्त रूपाने आंतरराष्ट्रीय सौर संघ (ISA) ला सुरुवात केली होती.
- ISA उष्णकटिबंधीय प्रदेशातील संपूर्णता वा आंशिक रूपाने 121 संभावित सौर-संपन्न सदस्य राष्ट्रांची संधि-आधारित युती आहे.
- आतापर्यंत 45 देशांनी ISA संधिवर स्वाक्षरी केलेली आहे. आणखी 15 देशांनी यास 30 नोव्हेंबर 2017 पर्यंत मंजूरी दिलेली आहे.
- ISA याचे मुख्यालय भारतात असून नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सोलर एनर्जी, ग्वाल्पाहारी (गुडगाव, हरियाणा) संस्थेच्या परिसरांत स्थित त्याचे सचिवालय आहे.
- ISA अंतरिम सचिवालय 25 जानेवारी 2016 पासून संघटना म्हणून कार्यरत आहे.
- भारताने ISA कोषसाठी आणि प्रथम पाच वर्षात ISA सचिवालयाच्या खर्चासाठी 175 कोटी रुपयांचे योगदान दिले आहे.