
982 24-Dec-2018, Mon
- देशभरातील पहिल्या दहा पोलीस स्थानकांची नावे जाहीर करण्यात आली आहे.
- आश्चर्य म्हणजे यामध्ये महाराष्ट्रातील एकाही पोलिस स्थानकाला अव्वल दहामध्ये स्थान मिळवता आलेले नाही.
- 2018 या वर्षभरात सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या पोलीस स्थानकांमध्ये राजस्थानमधील कालू बिकानेर पोलिस स्टेशनने अव्वल स्थान पटकावले आहे.
- गृह मंत्रालयाकडून ही यादी जाहीर करण्यात आली आहे.
- चांगली कामगिरी करणाऱ्या या देशभरातील दहा पोलीस स्थानकांचा गौरव करण्यात आला.
- स्थानिक पोलिस ठाण्याला इमारतीचे सौंदर्य पाहून नव्हे, तर प्रशासकीय सुसज्ज यंत्रणा, सोयी, सुविधा, नागरीकांना मिळणारी पोलिसी वागणुकीची दखल घेत ही मानंकने निवडण्यात आली आहे.
- पोलीस स्टेशनची यादी पुढीलप्रमाणे :
1. कालू (बिकानेर, राजस्थान) | 2. कॅम्पबेल बे (अंदमान-निकोबार) |
3. फरक्का (मुर्शिदाबाद, पश्चिम बंगाल) | 4. नेत्तापक्कम (पुदुच्चेरी) |
5. गुदेरी (कर्नाटक) | 6. चोपाल (हिमाचल प्रदेश) |
7. लाखेरी (राजस्थान) | 8. पेरियाकुलम (तामिळनाडू) |
9. मुन्स्यारी (उत्तराखंड) | 10. कुडचरे (गोवा) |