weather station in tibet

 1. भारताला लागून असणाऱ्या सीमेवर तिबेटमध्ये चीनने आपल्या लष्कराच्या मदतीसाठी वातावरणाची माहिती देणारे मानवरहीत स्वयंचलित वेदर स्टेशन उभारले आहे.
 2. तिबेटमधील हुंझे काउंटीमधील युमाई शहरात हे वेदर स्टेशन असून संघर्ष, तणावाच्या परिस्थितीत चीनच्या लष्कराला या वेदर स्टेशनची मोठी मदत होणार आहे.
 3. हे वेदर स्टेशन हवेतील तापमान, हवेचा दाब, वाऱ्याच वेग, वाऱ्याची दिशा, हवेतील आद्रता याचा आढावा घेईल.
 4. भारताला लागून असणाऱ्या सीमांवर आणखी असे वेदर स्टेशन्स उभारण्याची चीनची योजना आहे.
 5. या वेदर स्टेशनकडून मिळणाऱ्या माहितीचा वाहतूक आणि दळणवळणासाठी उपयोगहोईल असे चीनकडून सांगण्यात येत आहे.
 6. वेदर स्टेशनकडून मिळणाऱ्या हवामान विषयक माहितीमुळे चीनची सुरक्षा अधिक बळकट व्हायला मदत होईल तसेच चीनला सीमेवरील हालचालींचे नियोजनही करता येईल.
 7. युद्धाच्या काळात मिसाइल डागणे तसेच विमानांचे टेकऑफ-लँडिंग यावर हवामानाचा प्रभाव पडू शकतो. त्यामुळे या वेदर स्टेशनमुळे चीनला काही प्रमाणात नक्कीच फायदा होईल.


indian womens won silver medals in Germany

 

 1. त्रिशा देब, ज्योती सुरेखा आणि मुस्कान किरार यांच्या महिला भारतीय तिरंदाजी संघाने जर्मनीच्या बर्लिन शहरात सुरु असलेल्या स्पर्धेत रौप्यपदकाची कमाई केली आहे.
 2. अंतिम फेरीत भारतीय महिलांना फ्रान्सच्या संघाकडून 229-228 असा एका गुणाच्या फरकामुळे पराभव स्विकारावा लागला.
 3. तर उपांत्या फेरीत भारतीय महिलांनी अव्वल मानांकित तुर्कीच्या संघावर 231-228 अशी मात केली होती.
 4. दरम्यान, मिश्र गटात अभिषेक वर्मा आणि ज्योती सुरेखा यांनी मिश्र गटात भारताला कांस्यपदक जिंकून दिले. त्यांनी टर्कीवर 156-153 असा विजय मिळवला होता.


i mandi app inaugurated for farmers in mumbai

 1. शेतकऱ्यांच्या मालाला ग्राहकांची तयार बाजारपेठ मिळवून देणारे ‘आय मंडी’ या मोबाईल ॲपचे मुंबईत उद्घाटन करण्यात आले.
 2. शेतकऱ्यांना कर्ज सुविधेसह त्यांच्या उत्पादनांची विक्री करण्यासाठी इफ्को कंपनीने आय मंडी ॲप तयार केले आहे.
 3. या ॲपमुळे देशभरातील ५.५ कोटी शेतकरी ग्राहकांशी संलग्न होणार असून त्यामध्ये ३० हजार गोदामांचाही समावेश आहे.
 4. इंडियन फार्मर्स फर्टिलायझर को-ऑप लिमिटेड (इफ्को) ही केंद्र सरकारच्या सहकार्याने सुरू असलेली देशातील पहिली खतनिर्मिती सहकारी संस्था आहे.
 5. या ॲपमध्ये शेती संबंधित उत्पादनांची माहिती असेल. तसेच ग्राहकांपयोगी वस्तूंची बाजारात विक्री करणे, पीक कर्जे, पीक विमा, गोदामे या सर्वांची माहितीही ॲपमध्ये असेल.


dr. kusala rajendra has won earth science misnistry awaee

 

 1. नामांकित भूभौतिकशास्त्रज्ञ (जिओफिजिसिस्ट) डॉ. कुसला राजेंद्रन यांना पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचा पहिला महिला वैज्ञानिक पुरस्कार मिळाला आहे.
 2. महासागर विज्ञान, वातावरण तंत्रज्ञानातील कामगिरीसाठी हा पुरस्कार दिला जातो.
 3. डॉ. कुसला राजेंद्रन बेंगळूरुच्या इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्सेस या संस्थेत प्राध्यापक आहेत.
 4. भूकंपशास्त्र या विज्ञानातील अगदीच वेगळ्या क्षेत्रात त्यांनी काम करण्याचे ठरवले. त्यांनी उपयोजित भूभौतिकशास्त्रात १९७९मध्ये रुरकी विद्यापीठातून एम-टेक केले आहे.
 5. १९८१मध्ये सेंटर फॉर अर्थ सायन्स स्टडीज या संस्थेत त्यांनी काम सुरू केले. नंतर अमेरिकेत जाऊन युनिव्हर्सिटी ऑफ साऊथ कॅरोलिना विद्यापीठातून पीएचडी केली.
 6. नंतर भारतात परतून येथील भूकंपाचा त्यांनी सखोल अभ्यास केला. किल्लारी (१९९३) व भूज (२००१) भूकंपांच्या अभ्यासाआधारे त्यांनी काही पुस्तकेही लिहिली.
 7. २००७मध्ये डॉ. राजेंद्रन इंडियन इन्स्टिट्युट ऑफ सायन्सेसमध्ये सुरू झालेल्या सेंटर फॉर अर्थ सायन्सेसमध्ये रुजू झाल्या.
 8. भूकंपाचा अभ्यास करण्यासाठी भूगर्भशास्त्राचा अभ्यास आवश्यक असतो. कुसला या त्यांचे पती सीपी राजेंद्रन (भूभौतिकशास्त्रज्ञ) यांच्यासमवेत याच क्षेत्रात काम करीत आहेत.


france won fifa world cup 2018

 1. फिफा विश्वचषक स्पर्धेमध्ये फ्रान्सने पहिल्यांदाच अंतिम फेरीत पोहोचलेल्या क्रोएशियावर ४-२ असा विजय मिळवून १९९८नंतर पुन्हा जगज्जेतेपदाचा बहुमानपटकावला.
 2. फ्रान्सने पूर्वार्धात २ आणि उत्तरार्धात २ असे एकूण ४ गोल केले. तर क्रोएशियाने पूर्वार्ध आणि उत्तरार्धात प्रत्येकी १-१ गोल केला.
 3. विशेष म्हणजे सामन्यात चेंडूचा ६१ टक्के ताबा क्रोएशियाकडे असूनही त्यांना हार पत्करावी लागली.
 4. एका गोलमध्ये सहाय्यकाची भूमिका बजावणारा आणि स्वतः एक गोल करणारा फ्रान्सचा अँटोइनी ग्रीझमन याला सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले.
 5. ग्रीझमन, पोग्बा, एमबाप्पे या स्टार खेळाडूंनी नोंदवलेल्या प्रत्येकी एका गोलच्या जोरावर फ्रान्सने दुसरे विश्वविजेतेपद पटकाले.
 6. आक्रमक फ्रान्सला क्रोएशियाच्या झुंजार खेळाचा सामना करावा लागला. क्रोएशियाकडून इवान पेरिसिक व मारिओ मँडझुकीच यांनी प्रत्येकी एक गोल केला.
 7. सामन्याच्या १८व्या मिनिटाला मारिओ मँडझुकीचने केलेल्या स्वयंगोलचा फटका क्रोएशियाला बसला.
 8. जागतिक क्रमवारीत फ्रान्स ७व्या, तर क्रोएशिया २०व्या क्रमांकावर आहे. यापूर्वी, हे संघ ५ वेळा आमनेसामने आले होते. त्यात ३ वेळा फ्रान्सने बाजी मारली, तर २ लढती ड्रॉ झाल्या होत्या.
 9. अवघी ४० लाख लोकसंख्या असलेल्या क्रोएशियाने या विश्वचषकात बहारदार खेळाचे प्रदर्शन करत, करोडो लोकांची मने जिंकली.
 10. ६८ वर्षांनंतर प्रथम एवढ्या छोट्या देशाने फिफाच्या अंतिम सामन्यापर्यंत धडक मारली. यापूर्वी १९५०मध्ये उरुग्वेला अशी संधी मिळाली होती.
 11. पुढील फुटबॉल विश्वचषक स्पर्धा कतारमध्ये होणार असून, पहिल्यांदाच यजमानपद भूषविण्यासाठी कतार सज्ज झाले आहे.
 12. रशिया २०१८ विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यापूर्वी रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांनी कतारचे अमीर शेख तमिम बिन हमद अल थानी यांच्याकडे विश्वचषक मशाल आणि प्रतिकात्मक चेंडू सोपविला.

 विश्वचषक स्पर्धा दोनवेळा जिंकणारा फ्रांस सहावा देश 

 • या विजेतेपदामुळे विश्वचषक स्पर्धा दोन किंवा त्यापेक्षा अधिक वेळा जिंकण्याच्या यादीत आता फ्रान्सचा समावेश झाला आहे.
 • आतापर्यंत पाच देशांनी दोन किंवा त्याहून अधिक वेळा विश्वचषक जिंकला आहे. आता फ्रान्स हा सहावा देश आहे.
 • फिफा विश्वचषक सर्वाधिक पाचवेळा जिंकण्याची किमया ब्राझीलने केली आहे. त्यांनी १९५८, १९६२, १९७०, १९९४, २००२ मध्ये चषक पटकाविले.
 • त्यानंतर जर्मनीने चार वेळा (१९५४, १९७४, १९९०, २०१४) आणि इटलीनेही चार वेळा (१९३४, १९३८, १९८२, २००६) ही स्पर्धा जिंकली आहे.
 • उरुग्वेने दोनवेळा (१९३०, १९५०) आणि अर्जेटिनानेही दोनवेळा (१९७८, १९८६) विश्वचषक पटकाविला आहे. इग्लंड (१९६६) आणि स्पेनने (२०१०) एकदा ही स्पर्धा जिंकलेली आहे.

स्पर्धेतील पुरस्कार -

या विश्वचषक स्पर्धेत एकूण ४०० मिलियन डॉलर्सचे (सुमारे २७०० कोटी रुपये) रोख पुरस्कार देण्यात आले. त्यापैकी विजेत्या फ्रान्सला ३८ मिलियन डॉलर्स (सुमारे २६० कोटी रुपये) मिळाले.

उपविजेत्या क्रोएशियाला २८ मिलियन डॉलर्सचे बक्षीस मिळाले. तर तिसऱ्या (बेल्जियम) आणि चौथ्या (इंग्लंड) क्रमांकाच्या संघांना अनुक्रमे २४ व २२ मिलियन डॉलर्सचे बक्षीस मिळाले.

५ ते ८ स्थानावरील संघांना प्रत्येकी १६ मिलियन डॉलर्स, तर ९ ते १६व्या स्थानावरील संघांना प्रत्येकी १२ मिलियन डॉलर्स एवढी रक्कम देण्यात आली.

गोल्डन बॉल : यंदाच्या विश्वचषकात जबरदस्त खेळाने प्रभावित करणाऱ्याक्रोएशियाचा कर्णधार लुका मॉडरिच हा गोल्डन बॉलचा मानकरी ठरला. विश्वचषकाच्या इतिहासात सलग सहाव्यांदा उपविजेत्या संघाच्या खेळाडूस सर्वोत्कृष्ट खेळाडूचा मान मिळाला आहे. झिदान याच्यानंतर पहिल्यांदाच एखाद्या युरोपियन संघाच्या खेळाडूला हा गोल्डन बॉलचा मान मिळाला आहे.

सिल्व्हर बॉल : हा पुरस्कार बेल्जियमच्या एडीन हॅजार्ड याला देण्यात आला. सर्वोकृष्ट खेळाडूंच्या यादीतील दुसऱ्या क्रमांकाच्या खेळाडूला हा पुरस्कार मिळतो.

ब्राँझ बॉल : हा पुरस्कार अंतिम सामन्यात सामनावीर ठरलेल्या फ्रान्सच्या अँटोइन ग्रीझमन याला मिळाला. सर्वोकृष्ट खेळाडूंच्या यादीतील तिसऱ्या क्रमांकाच्या खेळाडूला हा पुरस्कार मिळतो.

गोल्डन बूट : हा पुरस्कार इंग्लंडचा कर्णधार हॅरी केन याला देण्यात आला. स्पर्धेत सर्वाधिक वैयक्तिक गोल करणाऱ्या खेळाडूला हा पुरस्कार देण्यात येतो. हॅरी केन याने एकूण ६ सामन्यात सर्वाधिक ६ गोल केले.

सिल्व्हर बूट : हा पुरस्कार फ्रान्सच्या अँटोइन ग्रीझमन याला देण्यात आला. स्पर्धेत दुसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक वैयक्तिक गोल करणाऱ्या खेळाडूला हा पुरस्कार देण्यात येतो. अँटोइन ग्रीझमन याने स्पर्धेत एकूण ४ गोल केले.

ब्राँझ बूट : बेल्जियमच्या रोमेलू लुकाकू याला हा पुरस्कार देण्यात आला. स्पर्धेत तिसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक वैयक्तिक गोल करणाऱ्या खेळाडूला हा पुरस्कार देण्यात येतो. रोमेलू लुकाकू याने स्पर्धेत एकूण ४ गोल केले.

गोल्डन ग्लोव्हज : हा पुरस्कार थिबॉट कोटरेइस या बेल्जियमच्या गोलकिपरलादेण्यात आला. हा पुरस्कार सर्वोकृष्ट गोलकिपरला देण्यात येतो.

सर्वोत्तम युवा खेळाडू : हा पुरस्कार फ्रान्सच्या कालियान एमबाप्पे याला देण्यात आला. फ्रान्सकडून महत्वाच्या सामन्यांमध्ये त्याने गोल केले. अंतिम सामन्यातील त्याचा गोल हा प्रसिद्ध खेळाडू पेले यांच्या विक्रमाची बरोबरी करणारा ठरला.

शिस्तबद्ध कामगिरी : स्पेन या फुटबॉल संघाला हा मानाचा पुरस्कार देण्यात आला. स्पर्धेतील सर्व सामन्यांत शिस्त आणि खिलाडूवृत्तीने खेळणाऱ्या संघाला हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो.


Top

Whoops, looks like something went wrong.