World Toilet Day: November 19

 1. दरवर्षी 19 नोव्हेंबर या दिवशी जागतिक शौचालय संघटनेच्या (World Toilet Organization-WTO) नेतृत्वात जगभरात ‘जागतिक शौचालय दिन’ पाळला जातो.
 2. यावर्षी हा दिन ‘व्हेन नेचर कॉल्स’ या संकल्पनेखाली पाळला गेला.
 3. दिनांक 19 नोव्हेंबर 2001 रोजी स्थापना करण्यात आलेल्या जागतिक शौचालय संघटनेचा स्थापना दिन ‘जागतिक शौचालय दिन’ म्हणून पाळण्याचा निर्णय घेण्यात आला.
 4. 145 देशांमध्ये केल्या गेलेल्या अभ्यासात असे आढळून आले आहे की, 58% अतिसार अस्वच्छतेमुळे होते.
 5. अतिसार या आजारामुळे 2015 साली पाच वर्षाखालील कमी वयाच्या 5,26,000+ बालकांचा मृत्यू झाला.
 6. यावर उपाय म्हणून शौचालयाला प्रोत्साहन दिले जात आहे.
 7. संघटनेने शौचालयांची असुविधा, त्यापासुन होणारे आजार आणि मानवी जीवनाचा अविभाज्य भाग असणार्‍या शौचालयाची समस्या संयुक्त राष्ट्रसंघापुढे मांडली.
 8. संयुक्त राष्ट्रसंघाने निश्चित केलेल्या 2030 शाश्वत विकास लक्ष्य 6 (SDG-6) अंतर्गत, 2013 साली शौचालयाला मानवाची महत्त्वाची गरज म्हणून तांत्रिक आणि कायदेशीर मान्यता दिली.
 9. जागतिक शौचालय संघटना (World Toilet Organization-WTO) ही एक आंतरराष्ट्रीय ना-नफा संस्था आहे.
 10. ही जगभरात स्वच्छता आणि शौचालय संदर्भात परिस्थितीत सुधारणेसाठी जबाबदार आहे.
 11. जॅक सिम यांनी WTO ची स्थापना दिनांक 19 नोव्हेंबर 2001 रोजी 15 सदस्य देशांसमवेत केली, जी आता 151 पर्यंत पोहचलेली आहे.
 12. संघटना जागतिक शौचालय परिषदेची आयोजक आहे.
 13. 2014 साली 18-20 नोव्हेंबर या काळात जगातला पहिला आंतरराष्ट्रीय शौचालय महोत्सव दिल्लीत आयोजित केला गेला होता.


National Integration Week: November 19 to November 25

 1. जातीय सलोखा, राष्ट्रीय एकात्मता आणि मिश्र संस्कृती आणि राष्ट्रीय सद्भावना बाळगण्यास प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने, देशात 19 नोव्हेंबर ते 25 नोव्हेंबर 2018 या काळात ‘कौमी एकता आठवडा’ (राष्ट्रीय एकता आठवडा) पाळला जात आहे.
 2. या काळात आयोजित केली जाणारी कार्यक्रमे -
  1. 19 नोव्हेंबर 2018 - राष्ट्रीय एकता दिन
  2. 20 नोव्हेंबर 2018 - अल्पसंख्यक कल्याण दिन
  3. 21 नोव्हेंबर 2018 - भाषिक सलोखा दिन
  4. 22 नोव्हेंबर 2018 - कमकुवत वर्ग दिन
  5. 23 नोव्हेंबर 2018 - सांस्कृतिक एकता दिन
  6. 24 नोव्हेंबर 2018 - महिला दिन
  7. 25 नोव्हेंबर 2018 - संवर्धन दिन
 3. केंद्रीय गृह मंत्रालयाच्या नॅशनल फाऊंडेशन फॉर कम्युनल हॉरमोनी (NFCH) या स्वायत्त संस्थेकडून ‘कौमी एकता आठवडा’चे आयोजन केले जाते.
 4. या काळात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते आणि 25 नोव्हेंबरला ‘जातीय सलोखा ध्वज दिन’ पाळला जातो.


Justice Amareshwar Pratap Sahi: New Chief Justice of Patna High Court

 1. न्यायमूर्ती अमरेश्वर प्रताप साही यांनी पटना उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश पदाची शपथ घेतली आहे.
 2. बिहारचे राज्यपाल लालजी टंडन यांनी न्या. साही यांना शपथ दिली. या नियुक्तीपूर्वी न्या. साही इलाहाबाद उच्च न्यायालयात न्यायाधीश होते.
 3. भारताच्या राज्यघटनेत नमूद कलम क्र. 214 अन्वये प्रत्येक घटकराज्याला एक उच्च न्यायालय असेल किंवा एक किंवा दोन राज्यांसाठी मिळून एक उच्च न्यायालय असेल अशी तरतूद करण्यात आलेली आहे.
 4. सध्या देशात 24 उच्च न्यायालये कार्यरत आहेत.
 5. याशिवाय प्रत्येक राज्यामध्ये विभागीय पातळीवर खंडपीठे निर्माण करण्यात आली आहेत.
 6. महाराष्ट्रचे उच्च न्यायालय मुंबई येथे असून त्याची महाराष्ट्रात पणजी (गोवा), नागपूर, औरंगाबाद अश्या तीन ठिकाणी तीन खंडपीठे आहेत.
 7. उच्च न्यायालयात एक मुख्य न्यायाधीश आणि राष्ट्रपतीच्या आदेशानुसार ठरविण्यात आलेले संख्येनुसार इतर न्यायाधिश असतात.
 8. उच्च न्यायालयातल्या सर्वोच्च न्यायाधिशांची नेमणूक करण्याचा अधिकार भारताच्या राष्ट्रपतीला आहे.


Brigadier Kuldip Singh Chandpuri, hero of Battle of Longewala during the 1971 Indo-Pak war dies at 78

 1. 1971 साली झालेल्या भारत-पाकिस्तान युद्धात विजय मिळवून देण्यात मोलाचा वाटा असलेल्या ब्रिगेडियर (निवृत्त) कुलदीप सिंग चंदपुरी यांचे मोहालीत निधन झाले.
 2. ते 78 वर्षांचे होते.
 3. राजस्थान येथील लोगेंवाला सीमेवर पाकिस्तानकडून दिनांक 5 आणि 6 डिसेंबर 1971 रोजी मध्यरात्री हल्ला करण्यात आला होता.
 4. यावेळी पंजाब तुकडीचे नेतृत्व कुलदीप सिंग चंदपुरी यांनी केले होते.
 5. या युद्धात त्यांनी भारताला विजय मिळवून दिला होता.
 6. कुलदीप सिंग यांना त्यांच्या या शौर्यासाठी महावीरचक्राने सन्मानित करण्यात आले.


Top

Whoops, looks like something went wrong.