प्रश्नवेध यूपीएससी : प्राचीन व मध्ययुगीन भारत

ancient-and-medieval-india-1887516/

1599   05-May-2019, Sun

मागील लेखात आपण ‘आधुनिक भारत’ या विषयावर चर्चा केली. आजच्या भागात  प्राचीन व मध्ययुगीन भारत या घटकासंबंधीचे प्रश्न पाहू या. हा यूपीएससी पूर्वपरीक्षेतील महत्त्वाचा भाग आहे.

प्र. १) ह्युएन त्संगसंदर्भात खालील विधानांचा विचार करा.

१)   नरसिंहवर्मन पहिला याच्या कारकीर्दीत त्याने पल्लवांची राजधानी कांचीपुरमला भेट दिली.

२)   कांचीमध्ये १०० बौद्धविहार असून त्यात १० हजार भिक्खू राहतात असे तो वर्णन करतो.

यापैकी कुठले/कुठली विधान/ विधाने योग्य आहे/आहेत?

पर्याय :

अ) फक्त १    ब) फक्त २

क) १ व २ दोन्हीही

ड) १ व २ दोन्हीही नाही.

उत्तर : क) १ व २ दोन्हीही.

स्पष्टीकरण : ह्युएन त्संग हा भारताला भेट देणारा चिनी प्रवासी होता. भारतातील १७ वर्षांच्या प्रवासामुळे तो प्रसिद्ध आहे. त्याचे लिखाण तत्कालीन भारतातील राजकीय, सामाजिक, आíथक आणि धार्मिक परिस्थितीवर चांगल्या पद्धतीने प्रकाश टाकते. नरसिंहवर्मन पहिला याच्या कारकीर्दीत त्याने पल्लवांची राजधानी कांचीपुरमलाही भेट दिली. भव्य, सुंदर तसेच चांगले शिक्षण केंद्र असे तो या शहराचे कौतुक करतो.

प्र. २) खालीलपैकी कुठला ग्रंथ कालिदासाने लिहिलेला नाही?

पर्याय :

अ) मालविकाग्नीमित्र

ब) विक्रमोर्वासीय

क) दारिद्रय़-चारुदत्त

ड) कुमारसंभव

उत्तर : क) दारिद्रय़-चारुदत्त

स्पष्टीकरण : चंद्रगुप्त दुसरा याच्या दरबारातील नवरत्नांमध्ये कालिदास ही सर्वाधिक महत्त्वाची व्यक्ती होती. ‘रघुवंश’, ‘कुमारसंभव’, ‘ऋतुसंहार’ आणि ‘मेघदूत’ यासारखी महाकाव्ये त्याने लिहिली. दारिद्रय़-चारुदत्त हे नाटक कालिदास याने लिहिलेले नसून भास याने लिहिले आहे.

*    प्र. ३) मौर्य व गुप्त राज्यव्यवस्थांमधील फरकांबाबत खालीलपैकी कुठले विधान योग्य नाही?

अ) मौर्यानी आपल्याकरिता महाराजाधिराज हे नामाभिधान घेतले.

ब) मौर्य व्यवस्थेमध्ये नोकरशाही व्यवस्था मोठय़ा प्रमाणात होती. तर गुप्त राज्यव्यवस्थेत नोकरशाहीमध्ये घट झाली होती.

क) मौर्य काळात एखादी व्यक्ती जिवंत असेपर्यंतच संबंधित अधिकाऱ्यांची नियुक्ती अबाधित असे. तर गुप्त काळात अधिकाऱ्यांची वारसाहक्काप्रमाणे नेमणूक होई.

ड) मौर्य राज्यकर्त्यांनी अर्निबध सत्ता उपभोगली. तर सामंतव्यवस्थेमुळे गुप्तांची सत्ता मर्यादित राहिली.

उत्तर : अ) फक्त पहिले विधान चुकीचे आहे. मौर्यानी नव्हे तर गुप्तांनी महाराजाधिराज, परमेश्वर, परमभट्टारक यासारखी बिरुदे आपल्यासाठी घेतली.

प्र. ४) गुप्त काळातील प्रशासकीय विभाजनाबाबत खालीलपैकी कुठला क्रम योग्य आहे ?

पर्याय :

अ) विषय-भुक्ती-विथी-ग्राम

ब) विथी-भुक्ती-विषय-ग्राम

क) भुक्ती-विषय-विथी-ग्राम

ड) भुक्ती-विथी-विषय-ग्राम

उत्तर : क) भुक्ती-विषय-विथी-ग्राम

स्पष्टीकरण : गुप्त साम्राज्य भुक्तींमध्ये विभागलेले होते. प्रत्येक भुक्ती उपरिकाच्या नियंत्रणाखाली होती. भुक्तींचे विभाजन विषयांमध्ये करण्यात आले होते. विषयांचे विभाजन विथींमध्ये करण्यात आले होते. विथी गावांमध्ये विभागलेल्या होत्या.

प्र. ५) कांस्यपाषाण संस्कृतीसंदर्भात खालीलपैकी कुठली विधाने योग्य आहेत?

१)   कांस्यपाषाण संस्कृती वायव्य भारत आणि गंगेच्या खोऱ्यापुरतीच मर्यादित होती.

२)   दगड आणि तांब्याच्या हत्यारांनी ओळखला जाणारा हा ग्रामसमाज होता.

३)   त्यांची अर्थव्यवस्था पूर्णत: शेतीवर आधारलेली होती.

४)   ते भाजलेल्या विटांच्या घरात राहात.

पर्याय :

१) १,२,३      ब) ३,४

क) २,३         ड) यापैकी नाही.

उत्तर : ड) वरीलपैकी नाही.

स्पष्टीकरण : कांस्यपाषाण संस्कृतीसंदर्भात केलेली सर्व विधाने चुकीची आहेत. देशाच्या उत्तर, पश्चिम, मध्य, पूर्व आणि दक्षिण भागात या संस्कृतीचे पुरावे आढळले आहेत. लोह आणि तांब्याच्या हत्यारांनी ओळखला जाणारा हा ग्रामसमाज हडप्पा संस्कृतीशी साधर्म्य नसणारा समाज होता. त्यांची अर्थव्यवस्था हडप्पा संस्कृतीप्रमाणे पूर्णत: शेतीवर आधारलेली नव्हती. तर निर्वाहापुरत्या शेतीवर होती. त्यांची घरे आयताकृती आणि गोलाकार असून ती मातीच्या भिंती व गवताच्या छपरांनी बनलेली होती.

प्र. ६) सातवाहन राजवटीबाबत खालीलपैकी कुठली विधाने योग्य आहेत?

१)   सातवाहन राजवट मातृप्रधान सामाजिक व्यवस्थेकडे निर्देश करते.

२) पगाराच्या बदल्यात सातवाहनांनी आपल्या अधिकाऱ्यांना मोठय़ा प्रमाणावर जमिनी दिल्या.

३) अजिंठा व वेरुळच्या लेण्यांना सातवाहनांनी आश्रय दिला.

४)   सातवाहनांचे सर्व शिलालेख प्राकृत भाषा व ब्राह्मी लिपीत आहेत.

५)   सातवाहन राजा हल याने गाथासप्तशती/गाथासत्तासाई हा प्राकृत भाषेतील ग्रंथ लिहिल्याचे मानले जाते.

पर्याय :

अ) १,३,४,५       ब) १,४,५

क) १,२,५          ड) सर्व योग्य आहेत.

उत्तर : ब) १,४,५

स्पष्टीकरण : दुसरे विधान चुकीचे आहे. ब्राह्मण व बौद्ध भिक्खूंना करमुक्त जमिनी देण्याची प्रथा सातवाहनांनी सुरू केली. परंतु अधिकाऱ्यांना पगाराच्या बदल्यात जमिनी देण्याची प्रथा गुप्तकाळात सुरू झाली. गुप्त काळानंतर या प्रथेचा विस्तार झाला. तिसरे विधानही चुकीचे आहे. सातवाहनांनी कार्ला, भाजे, अमरावती, नागार्जुनकोंडा इथल्या लेण्यांना आश्रय दिला. अजिंठा व वेरुळनंतरच्या काळातील आहेत.

प्र. ७) मंदिर वास्तुकलेतील पंचायतन शैली सगळ्यात अगोदरचे उदाहरण खालीलपैकी कोणते?

पर्याय :

अ) दशावतार मंदिर

ब) कांडरीय महादेव मंदिर

क) लिंगराज मंदिर

ड) महाबोधी मंदिर

उत्तर : अ) दशावतार मंदिर

स्पष्टीकरण : पंचायतन शैलीच्या मंदिरात मुख्य गाभारा चार उपगाभाऱ्यांनी वेढलेला असतो. दिलेले सगळे पर्याय हे दशावतार शैलीची उदाहरणे आहेत. परंतु देवगढचे दशावतार मंदिर हे या शैलीचे सगळ्यात सुरुवातीचे उदाहरण आहे.

प्रश्नवेध यूपीएससी : आधुनिक भारताचा इतिहास

article-on-modern-indias-history-1879058/

550   20-Apr-2019, Sat

नमस्कार विद्यार्थी मित्र-मैत्रिणींनो, प्रश्नवेध मालिकेत आपण यापूर्वी यूपीएससीच्या मुख्य परीक्षेतील सामान्य अध्ययन पेपर एक मधील घटकांची चर्चा केली. यूपीएससी पूर्वपरीक्षा २ जून रोजी आहे. त्यामुळे आजपासून आपण या सदरात पूर्वपरीक्षेतील सामान्य अध्ययन पेपर १ मधील उपघटकांची परीक्षेच्या अनुषंगाने म्हणजे प्रश्नोत्तराच्या स्वरूपात चर्चा करणार आहोत.

प्र. १) खालील विधानांचा विचार करा.

१)   स्वदेश सेवक होम गदर चळवळीच्या स्थापनेशी संबंधित होते.

२)   भारताच्या स्वातंत्र्यलढय़ासाठी मदत करावी, यासाठी जर्मन सरकारची मनधरणी करण्याकरिता बर्लिन समितीची स्थापना करण्यात आली होती.

यापकी कोणते/कोणती विधान/विधाने बरोबर आहे/आहेत ?

पर्याय –  अ) फक्त १

ब) फक्त २   क) १ व २ दोन्हीही

ड) १ व २ दोन्हीही नाही

उत्तर : अ) फक्त १

स्पष्टीकरण : झिमरमन योजनेअंतर्गत जर्मनीच्या परराष्ट्र विभागाच्या मदतीने वीरेंद्रनाथ चट्टोपाध्याय, भूपेंद्रनाथ दत्त यांनी १९१५मध्ये बर्लिन समितीची स्थापना केली होती. परदेशात वास्तव्यास असलेल्या भारतीयांना संघटित करून भारतात स्वयंसेवक व शस्त्रास्त्रे पाठवून तेथील भारतीय सनिकांमध्ये बंड घडवून आणणे व देश स्वतंत्र करण्यासाठी लष्करी हल्ल्याची तयारी करणे, हे त्यांचे उद्दिष्ट होते.

प्र. २) भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या नागपूर अधिवेशनाबाबत खालील विधानांचा विचार करा.

१) असहकार चळवळीच्या कार्यक्रमाला या अधिवेशनात मान्यता देण्यात आली.

२) काँग्रेसने आपला कृतीकार्यक्रम वैधानिक लढय़ापासून अतिरिक्त वैधानिक लोकलढय़ात

बदलला.

३) भाषिक आधारावर काँग्रेस प्रांतिक समित्या संघटित करण्यात आल्या.

यापकी कोणते/कोणती विधान/विधाने योग्य आहे/आहेत?

पर्याय – अ) फक्त १ व ३

ब) फक्त २ व ३  क) फक्त ३

ड) वरीलपकी सर्व

उत्तर : ड) वरीलपकी सर्व

स्पष्टीकरण : १९२०चे नागपूर अधिवेशन प्रसिद्ध आहे. कारण, यात असहकार चळवळीच्या कार्यक्रमाला मान्यता देण्यात आली. गांधींनी घोषित केले की, असहकार चळवळीचा कार्यक्रम जर संपूर्णरीत्या राबविण्यात आला, तर एक वर्षांच्या आत स्वराज्य मिळेल.

प्र. ३) यापकी कुणी असहकार चळवळीत सहभाग घेतला नाही ?

१) लाला लजपत राय

२) मोहंमद अली जीना

३) सफुद्दीन किशलू

४) अ‍ॅनी बेझंट

५) जवाहरलाल नेहरू

पर्याय : अ) २,३,५    ब) १,२,४   क) १,३,५   ड) २,४,५

उत्तर : क) १,३,५

स्पष्टीकरण : संवैधानिक लढय़ावर विश्वास असल्यामुळे १९२०च्या नागपूर अधिवेशनानंतर मोहम्मद अली जीना, अ‍ॅनी बेझंट व बी. सी. पाल यांनी काँग्रेस सोडली. तर, सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांच्यासारख्या मंडळींनी ‘द इंडियन नॅशनल लिबरल फेडरशन’ ची स्थापना केली.

प्र. ४) राणी व्हिक्टोरियाच्या जाहीरनाम्याच्या (१८५७) अनुषंगाने पुढील कुठली विधाने बरोबर आहेत?

१)   राणी व्हिक्टोरियाला ब्रिटिश भारताची सम्राज्ञी घोषित करण्यात आले.

२)   धार्मिक बाबतीत ढवळाढवळ न करण्याचे आश्वासन देण्यात आले.

३)   ईस्ट इंडिया कंपनीचा भारतातील व्यापार नियंत्रित करण्यात आला.

४)   उर्वरित भारतीय राज्यांचे विलीनीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला.

पर्याय : अ) फक्त १ व २

ब) फक्त १  क) फक्त १, २ व ४

ड) वरीलपकी सर्व

उत्तर : अ) फक्त १ व २

स्पष्टीकरण : जाहीरनाम्याने ईस्ट इंडिया कंपनीचा कारभार संपुष्टात आणला आणि सम्राज्ञीला भारताची सर्वोच्च शासक म्हणून घोषित करण्यात आले. त्यामुळे तिसरे विधान चुकीचे आहे. या जाहीरनाम्याने संस्थानांचे अधिकार आणि प्रतिष्ठा यांचा आदर करण्याचे वचन देण्यात आले. त्यामुळे चौथे विधानही चुकीचे ठरते. त्याने धार्मिक उदारता अवलंबण्याचे वचन देत पूर्वापार चालत आलेल्या प्रथा-परंपरांनुसार राज्यकारभार करण्याचे आश्वासन दिले.

प्र. ५) १८५९ च्या नीळ उत्पादकांच्या बंडाबाबत खालीलपकी कुठली विधाने योग्य आहेत?

१)   नीळ उत्पादकांचा संताप प्रामुख्याने परकीय मळेवाल्यांविरोधात होता.

२) सिदो आणि कान्हू हे प्रमुख बंडखोर नेते होते.

३) बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी लिहिलेले ‘नीलदर्पण’ हे नाटक शेतकऱ्यांचे शोषण दाखवते.\

४) ‘हिंदू पॅट्रियट’ नामक साप्ताहिकाने शेतकऱ्यांच्या प्रश्नाला वाचा फोडली.

पर्याय : अ) फक्त १ व ३

ब) फक्त १ व ४  क) फक्त १, २ व ४  ड) वरीलपकी सर्व

उत्तर : ब) फक्त १ व ४

स्पष्टीकरण : दुसरे विधान चुकीचे आहे. कारण, बंडाचे नेतृत्व दिगंबर बिस्वास व बिष्णू बिस्वास यांनी केले. तिसरेही विधान चुकीचे आहे. कारण, ‘नीलदर्पण’ दीनबंधू मित्र यांनी लिहिले.

प्र. ६) आर्य समाजाबाबत पुढीलपकी कोणती विधाने चुकीची आहेत?

१) मूर्तिपूजा आणि बहुधर्मवादावर टीका केली.

२) विधवा पुनर्वविाहाचा कठोर विरोध केला.

३) शुद्धीची संकल्पना विकसित केली.

४) गोरक्षेचा मुद्दा हाती घेतला.

पर्याय : अ) फक्त २    ब) फक्त १ व २   क) फक्त १,२ व ३     ड) फक्त ४

उत्तर : अ) फक्त२

स्पष्टीकरण : दयानंद सरस्वती यांनी १८७५ मध्ये आर्य समाजाची स्थापना केली. मूर्तिपूजा, बहुधर्मवाद, बालविवाह, विधवा, ब्रम्हचर्य, ब्राम्हणांचे वर्चस्व आणि जातव्यवस्था या प्रचलित हिंदू रीतींवर आर्य समाजाने कठोर टीका केली. वेदांवर आधारित प्राचीन भारतीय धर्माचा त्यांनी पुरस्कार केला.

यूपीएससी पूर्वपरीक्षा : इतिहास-II

upsc-pre-examination-history-ii

378   15-Apr-2019, Mon

यूपीएससी पूर्वपरीक्षा २०१९ चा विचार करता 'इतिहास' या विषयाचे प्रश्न कशा प्रकारे व कोणत्या घटकांवर विचारले जाऊ शकतात, हे आपण गेल्या वर्षीच्या प्रश्नपत्रिकेच्या आधारे पाहत आहोत. प्रश्न समजून घेणे ही फार महत्त्वाची बाब आहे. एकदा का आपण प्रश्न समजून घेतलेत की आपण स्वत: प्रश्न बनवू शकतो. स्वत: प्रश्न बनवणे हे कधीही परीक्षेच्या दृष्टीने फायद्याचे ठरते. प्रश्न ब‌नविण्यासाठी त्या प्रश्नांचे विश्लेषण खूप महत्त्वाचे असते. २०१८मध्ये विचारलेल्या 'इतिहास' या विषयाच्या प्रश्नांना विश्लेषणात्मक पद्धतीने आपण समजून घेणार आहोत.

२०१८च्या यूपीएससी पूर्वपरीक्षेत 'आधुनिक भारत' या विषयावर विचारलेले प्रश्न पाहूया.

प्र. In 1920, which of the following changes its name to 'Swarajya Sabha'?

a) All India Home Rule League

b) Hindy Mahasabha

c) South Indian Liberal Federation

d) The Servants of India Society

Ans : a

आधुनिक भारताच्या इतिहासातील 'गांधी युगाच्या' सुरुवातीची ही घटना अतिशय महत्त्वाची आहे. 'स्वराज्य सभा' सुरुवातीची ही घटना अतिशय महत्त्वाची आहे. 'स्वराज्य सभा' यावर दोन वर्षांपूर्वीही प्रश्न विचारलेला आहे. त्या प्रश्नांचा आशय असा होता की, होमरुलमध्ये सहभागी झालेल्या तरुणांना गांधीजींनी सत्याग्रह सभेत सहभागी करून घेतले, या विधानाची शहानिशा करण्यासंबंधीचा होता. यावरून 'होमरुल चळवळ' आणि 'गांधीजी' यांच्या संबंधावर विचारला जाणारा हा दुसरा प्रश्न आहे.

तसे 'आधुनिक भारत' हे NCERT (old) वाचले असेल तर बहुतांशी इतिहासाचे सर्व प्रश्न सुटतात. हा प्रश्न तर महत्त्वाच्या घटनेशी म्हणजेच गांधीजींचा भारतीय स्वातंत्र्यलढ्यात होणारा उदय व इतर महत्त्वाच्या नेत्यांचा अस्त याच्याशी जोडला गेलेला आहे. 'होमरुल चळवळी'ला म्हणावे तितकेसे यश मिळाले नाही. अॅनी बेझंट आणि लोकमान्य टिळक यांच्या नंतर 'होमरुल चळवळीतील तरुण व त्याचे महत्त्व हेरून गांधीजींनी या चळवळीला नवी दिशा दिली. त्यातूनच पुढे राष्ट्रीयत्वाची भावना व स्वातंत्र्यलढ्यातील महत्त्वाच्या घटनांना चालना मिळाली.

असे सरळ सरळ प्रश्न विचारण्याची पद्धत इतिहासात आपण वारंवार पाहतो जसे 'सत्यशोधक समाज' कुठल्या राज्याशी संबंधित आहे. कशाचा विचार त्यात आढळतो, असे प्रश्न आपण पाहू शकतो. त्यामुळे इतिहास विषयाच्या बाबतीत किमान NCERTचे वाचन असणे अधिक महत्त्वाचे ठरते.

प्र. Which among the following events happened earliest?

a) Swami Dayanand established Arya Samaj

b) Dinbandhu Mitra wrote Neeldarpan

c) Bankim chadra chattopadhyay wrote Anandmath

d) Satyendranath Tagore bacame the first Indian to succeed in the Indian civil services Examination.

Ans : b

इतिहासातील कालानुक्रम हा महत्त्वाचा घटक मानला जातो. कालानुक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे भविष्यातील व भूतकाळातील घडलेल्या घटनांशी संबंध नसतो. त्यामुळे एखादी घटना का घडली याची कारणे आपण भूतकाळात शोधू शकतो. त्यामुळे घटना व त्यांचा कालावधी माहीत असणे हे इतिहासात अपेक्षित आहे. अशा आशयाचे प्रश्न मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकांमध्येही आपण पाहू शकतो. परंतु इथे एक बाब लक्षात घेण्यासारखी आहे ती म्हणजे मागील वर्षातील कालानुक्रमाच्या प्रश्नात तुम्हाला खूप महत्त्वाच्या घटनांवर प्रश्न विचारलेला आढळतो जसे की, असहकार चळवळ (१९२०-२२) सविनय ‌कायदेभंग (१९३०) भारत छोडो चळवळ (१९४२) याचबरोबर गोलमेज परिषद, पुणे करार (१९३२), ऑगस्ट प्रस्ताव (१९४०), क्रिप्स मिशन (१९४२), राजगोपालचारी योजना (१९४४), देसाई-लियाकत प्रस्ताव (१९४५), वेव्हेल योजना (१९४५), कॅबिनेट मिशन योजना (१९४६), माउंटबेटन योजना (१९४५) इ. भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील महत्त्वाच्या घटनांचा विचार करणे इथे क्रमप्राप्त होते. कालानुक्रमात विविध आयोग, समित्या, योजना, महत्त्वाच्या घटना इ. चा विचार अंतर्भूत आहे. परंतु हा प्रश्न व्यक्तिगत घटनांवर आधारित आहे. तेव्हा व्यक्तिगत स्तरावर 'महत्त्वाच्या व्यक्ती' व त्यांच्याद्वारे केलेले कार्य यांचाही विचार काळाच्या चौकटीत करणे आगामी काळासाठी उपयोगी ठरेल.

प्र. After the Santhal uprising subsided what was/were the measure/measures taken by the colonial government?

1) The territories called 'Santhal Paragaras' were created

2) It became illegal for a santhal to transfer land to a non-santhal

select the correct answer using the code given below:

a) l only

b) 2 only

c) Both land 2

d) Neither 1 nor 2

Ans : C

१८५७ चा उठाव सोडला तर इतरही असंख्य उठाव आपण भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात बघतो जसे की 'संथाल उठाव' होय. २०१९मध्ये 'बिरसा मुंडाचे' नेतृत्व असलेला 'मुंडाचा उठाव' विचारला जाऊ शकतो. दिल्लीत गेलेल्या शेतकरी मोर्चाला 'उलगुलान' असे नामकरण केले होते जे 'मुंडा उठावातील' क्रांतीचे आहे. आदिवासी, शेतकरी उठावांचा अभ्यास करताना उठाव, नेतृत्व, उठावाचे कारण व उठावाचे स्थान या बाबी समजून घेणे गरजेचे असते. वरील प्रश्नात उठावाचे कारण विचारलेले आहे. गेल्या वर्षीच्या प्रश्नपत्रिका चाळून स्वत: प्रश्नांचे विश्लेषण करण्याचा प्रयत्न करा. प्रश्नांमध्येच आगामी काळात विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची गुपिते दडलेली असतात हे लक्षात असू द्या.

आधुनिक भारताचा इतिहास 

modern history of india

26376   26-Jul-2018, Thu

सर्वसाधारणपणे आधुनिक भारताच्या इतिहासाची सुरुवात १८व्या शतकाच्या सुरुवातीपासून होते, असे मानले जाते. प्रस्तुत लेखामध्ये १८व्या आणि १९व्या शतकाच्या मध्यापर्यंत म्हणजेच १८५७पर्यंतच्या इतिहासाची थोडक्यात उकल करून घेऊन यावर मागील परीक्षेत विचारण्यात आलेल्या प्रश्नांचे स्वरूप कसे होते आणि यासाठी लागणारा आकलनात्मक दृष्टिकोन याचा आढावा घेणार आहोत.

या १८व्या शतकाची काही महत्त्वाची वैशिष्टे सर्वप्रथम अभ्यासणे गरजेचे आहे. या शतकामध्ये मुघल साम्राज्याच्या  ऱ्हासाला खऱ्या अर्थाने सुरुवात झालेली होती. त्यामुळे मुघल साम्राज्याचा सर्वात शक्तिशाली साम्राज्य हा नावलौकिक राहिलेला नव्हता. या शतकामध्ये भारताच्या विविध प्रदेशामध्ये प्रादेशिक देशी सत्तांचा उदय झालेला होता, यातील काही सत्तांची स्थापना मुघल साम्राज्यात कार्यरत असणाऱ्या प्रांतीय सुभेदारांनी केलेली होती (उदा-बंगाल, अवध आणि हैदराबाद) तसेच काही सत्तांचा उदय हा मुघल साम्राज्याच्या विरोधात उठाव करून झालेला होता (उदा- मराठे, अफगाण, जाट आणि शीख) व काही सत्ता या स्वतंत्ररीत्या उदयाला आलेल्या होत्या (उदा- राजपूत, म्हैसूर, त्रावणकोर) तसेच १५व्या शतकापासून सागरी मार्गाचा वापर करून युरोपमधून आलेला व्यापारी वर्ग (पोर्तुगीज, डच, इंग्रज, डॅनिश आणि फ्रेंच) व भारतासोबत होणाऱ्या व्यापारावर स्वत:ची मक्तेदारी प्रस्थापित करण्यासाठी लागलेली स्पर्धा आणि यामध्ये अंतिमत: इंग्रजांचा झालेला विजय या महत्त्वाच्या घटनांचा सर्वप्रथम अभ्यास करावा लागतो.

भारतात ब्रिटिश सत्तेच्या स्थापनेचा इतिहास अभ्यासताना आपणाला नेमकी कोणत्या गोष्टीमुळे ब्रिटिशांना भारतात सत्ता स्थापन करता आली याची योग्य आणि मुद्देसूद माहिती असावी लागते. तसेच बिटिश सत्तेचा भारतावर झालेला परिणाम याअंतर्गत आपणाला राजकीय, आíथक, सामाजिक व सांस्कृतिक परिणामांची माहिती असावी लागते. गव्हर्नर जनरल व त्यांचे कार्य, या कालखंडातील ब्रिटिशांनी भारतात स्थापन केलेली प्रशासन व्यवस्था, ब्रिटिश संसदेने पारित केलेले कायदे व त्यांचा झालेला परिणाम अभ्यासावा लागतो.

मागील परीक्षेतील प्रश्न आणि या प्रश्नांसाठी आवश्यक असा आकलनात्मक दृष्टिकोन

स्पष्ट करा की अठराव्या शतकाच्या मध्यातील भारतातील राजकीय व्यवस्था विखंडीत छायेने कशा प्रकारे घेरलेली होती. (२०१७)

मुघल साम्राज्याचा १८व्या शतकाच्या सुरुवातीस सुरू झालेला ऱ्हास व प्रादेशिक सत्तांचा झालेला उदय; बिटिश ईस्ट इंडिया कंपनीचा राजकीय स्पर्धक म्हणून झालेला उदय या दोन्हीचा आधार घेऊन भारतातील राजकीय व्यवस्था विखंडीत छायेने कशा प्रकारे घेरलेली होती हे सह उदाहरण स्पष्ट करावे लागते.

‘स्पष्ट करा की १८५७चा उठाव हा वसाहतिक भारतातील बिटिश धोरणाच्या विकासातील महत्त्वाची घटना होती’ (२०६)

या प्रश्नाचे योग्य आकलन होण्यासाठी कंपनी काळातील बिटिश धोरणांची मूलभूत माहिती असणे गरजेचे आहे. कारण १८५७ च्या उठावानंतर जे काही बदल करण्यात आले होते याला कंपनी काळात राबविण्यात आलेली बिटिश धोरणे कारणीभूत होती आणि उत्तर लिहिताना या धोरणाचा उत्तरामध्ये दाखला देऊनच उत्तर लिहावे लागते व १८५७च्या उठावाचे महत्त्व नमूद करावे लागते.

‘१७६१मध्ये पानिपतची तिसरी लढाई झाली. पानिपत येथेच अनेक साम्राज्यांना धक्का देणाऱ्या लढाया का झाल्या?’(२०१४)

हा प्रश्न एका विशिष्ट ठिकाणाचा संदर्भ देऊन विचारण्यात आलेला आहे आणि याचे आकलन करताना आपल्याला १५२६ मध्ये झालेल्या पानिपतच्या पहिल्या लढाईचा संदर्भ लक्षात घेऊन हे स्थान व्यूहात्मकदृष्टय़ा कसे महत्त्वाचे होते या अनुषंगाने उत्तर लिहावे लागते.

उपरोक्त प्रश्नांच्या विश्लेषणावरून आपणाला या घटकाची तयारी कशी करावी याची एक सुस्पष्ट दिशा मिळते. या घटकाचा मूलभूत अभ्यास करण्यासाठी आपणाला बिपिनचंद्र लिखित ‘आधुनिक भारत’ हे जुने एनसीईआरटीचे पुस्तक सर्वप्रथम अभ्यासणे गरजेचे आहे. त्यानंतर या घटकाचा सखोल अभ्यास करण्यासाठी बी.एल. ग्रोवर लिखित ‘आधुनिक भारताचा इतिहास’ आणि शेखर बंडोपाध्याय लिखित ‘प्लासी टू पार्टशिन’ या संदर्भग्रंथांचा उपयोग होतो.

भारतीय स्थापत्यकला आणि शिल्पकला

architecture and sculpture

5150   18-Jul-2018, Wed

भारतीय स्थापत्यकला आणि शिल्पकला – उदय आणि विकास

भारतातील स्थापत्यकला आणि शिल्पकला यांच्या इतिहासाची सुरुवात प्रागतिहासिक कालखंडापासून सुरू होते, ज्यामुळे या कलांची सुरुवात नेमकी कशी व कोठून झालेली आहे याची माहिती आपणाला मिळते. पण या घटकावर साधारणत: सिंधू संस्कृतीपासून प्रश्न विचारले जातात त्यामुळे या विषयाची परीक्षाभिमुख तयारी करताना आपणाला सिंधू संस्कृतीपासून सुरुवात करावी लागते. तसेच सिंधू संस्कृतीनंतर भारतात वैदिक संस्कृती अस्तित्वात आलेली होती; पण या संकृतीमधील स्थापत्यकला आणि शिल्पकला यांचे अवशेष प्राप्त झालेले नाहीत. इ. स. पूर्व ६व्या शतकापासून या कलांचा इतिहास अखंडितपणे पाहावयास मिळतो. याची माहिती आपणाला तत्कालीन अवशेष आणि साहित्याद्वारे प्राप्त होते. प्राचीन भारतातील मौर्य साम्राज्यापासून या कलांमध्ये मोठय़ा प्रमाणात विकास व्हायला सुरुवात झालेली होती.

प्राचीन आणि मध्ययुगीन भारतातील स्थापत्यकला आणि शिल्पकला यावर धर्माचा खूप मोठा प्रभाव होता. प्राचीन भारतात बौद्ध, जैन आणि हिंदू धर्माच्या प्रभावातून स्थापत्यकला आणि शिल्पकला याची निर्मिती झालेली होती. प्राचीन भारतातील स्थापत्यकला आणि शिल्पकला यावर बौद्ध धर्माचा खूप मोठा प्रभाव दिसून येतो. कारण मौर्य कालखंडापासून बौद्ध धर्माला राजाश्रय मिळालेला होता पण त्याचबरोबर जैन आणि हिंदू धर्माशी संबंधित स्थापत्यकला आणि शिल्पकला याचीही निर्मिती करण्यात आलेली होती. हिंदू धर्माशी संबंधित मंदिरशैलीचे नागर आणि द्राविड असे दोन प्रकार असून ते प्राचीन कालखंडापासून अस्तिवात आहेत. यातील नागर शैली ही प्रामुख्याने उत्तर भारतात आणि द्राविड शैली दक्षिण भारतात आढळते. या दोन शैलीमधील काही वैशिष्टय़े घेऊन वेसर शैली तयार झालेली आहे, जी प्रामुख्याने मध्य भारतात वापरली जाते.

साधारणत: गुप्त कालखंडापासून हिंदू धर्माशी संबंधित मंदिरशैलीच्या इतिहासाची सुरुवात झालेली दिसून येते आणि त्यापुढील काळामध्ये यात झालेला विकास याची आपणाला कालखंडनिहाय माहिती प्राप्त करावी लागते. उदा – गुप्त कालखंड, गुप्तोत्तर कालखंड, सुरुवातीचा मध्ययुगीन कालखंड. यामध्ये उत्तर आणि दक्षिण भारतातील राजकीय सत्तांच्या कालखंडातील विकास ज्यामध्ये प्रामुख्याने चालुक्य घराणे, चोल, राजपूत राज्ये इत्यादींच्या काळातील स्थापत्यकला आणि शिल्पकला तसेच यांची वैशिष्टय़े याचे तुलनात्मक पद्धतीने माहितीचे संकलन करणे महत्त्वाचे ठरते. याचबरोबर मध्ययुगीन कालखंडात भारतात इन्डो-इस्लामिक स्थापत्यकलेची सुरुवात झालेली होती. ती दिल्ली सल्तनत, मुघल साम्राज्य या कालखंडात विकसित झाली. याचबरोबर विजयनगर साम्राज्य, तेराव्या आणि चौदाव्या शतकातील उत्तर भारतातील प्रादेशिक सत्ता, अठराव्या शतकातील प्रादेशिक सत्ता आणि वसाहतकालीन स्थापत्यकला व शिल्पकला याचीदेखील माहिती असणे गरजेचे आहे. थोडक्यात, या मुद्दय़ांची परीक्षेच्या दृष्टीने तयारी करताना कालखंडनिहाय योगदान आणि यामध्ये घडून आलेला विकास आणि बदल व त्याची वैशिष्टय़े यांसारख्या बाबींचा एकत्रित विचार करावा लागणार आहे, याची जाणीव असणे गरजेचे आहे. प्रत्येक वर्षी कमीत कमी एक तरी प्रश्न या घटकावर विचारला जातो.

२०१३ ते २०१७ दरम्यान या विषयावर विचारण्यात आलेले प्रश्न.

मंदिर स्थापत्यकलेमध्ये चोल स्थापत्यकला उच्च विकास दर्शविते, चर्चा करा.

सिंधू संस्कृतीमधील नगर नियोजन आणि संस्कृतीने वर्तमान स्थितीमधील नागरीकरणामध्ये किती योगदान (कल्लस्र्४३) दिलेले आहे, चर्चा करा.

गांधार शिल्पकला जशी ग्रीकांची ऋणी लागते तसेच रोमन यांचीही लागते, स्पष्ट करा.

सुरुवातीची बौद्ध स्तूपकला लोकांची तत्त्व आणि कथानकाबरोबरच बौद्ध आदर्शाची यशस्वीरीत्या व्याख्या करते. स्पष्टीकरण द्या.

उपरोक्त प्रश्नांची उकल करताना दोन महत्त्वपूर्ण पलूंचा विचार करणे गरजेचे आहे. यातील पहिला पलू हा भारतातील स्थापत्यकला आणि शिल्पकला यांच्या इतिहासाची सुरुवात आणि दुसरा पलू म्हणजे प्राचीन व मध्ययुगीन कालखंडामध्ये या कलांच्या विकासामध्ये झालेली प्रगती; याबाबत व्यापक समज असणे गरजेचे आहे. उपरोक्त विचारण्यात आलेले प्रश्न हे विशिष्ट कालखंडातील कलांचा आधार घेऊन विचारण्यात आले आहेत. म्हणून कालखंडनिहाय या कलांचा विकास, वैशिष्टय़े याची माहिती असणे गरजेचे आहे. प्रश्न हे कधी कधी संपूर्ण कालखंड गृहीत धरून विचारले जाऊ शकतात. त्यामुळे या घटकाची तयारी सर्वागीण आणि सखोल पद्धतीने करणे अपरिहार्य आहे. कधी कधी या मुद्दय़ांशी संबंधित प्रश्न सद्य:स्थिती लक्षात घेऊन विचारले जातात उदा. सरकारने स्थापत्यकला आणि शिल्पकला याचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी कार्यान्वित केलेल्या योजना, कायदे आणि यांची उपयुक्तता इत्यादी बाबींवर प्रश्न विचारले जाऊ शकतात.

या घटकाची मूलभूत माहिती अभ्यासण्यासाठी सर्वप्रथम एनसीईआरटीच्या शालेय पुस्तकांचा आधार घ्यावा लागतो. इयत्ता अकरावीचे An Introduction to Indian Art Part – क हे पुस्तक सर्वप्रथम अभ्यासणे गरजेचे आहे. तसेच याच्या जोडीला बारावीचे Themes in Indian History part – I क  आणि II व जुन्या एनसीईआरटीचे प्राचीन आणि मध्ययुगीन भारत या पुस्तकातील भारतीय वारसा आणि संस्कृती संबंधित कालखंडनिहाय अभ्यास करावा. त्याचबरोबर या विषयावर बाजारामध्ये अनेक गाइडस स्वरूपात लिहिलेली पुस्तके उपलब्ध आहेत, ज्याद्वारे या मुद्दय़ाचा अधिक सखोल आणि सर्वागीण पद्धतीने अभ्यास करता येऊ शकतो.

प्रश्नवेध यूपीएससी : आधुनिक जगाचा इतिहास

article-on-history-of-modern-world-1870824/

130   06-Apr-2019, Sat

आजच्या लेखामध्ये आपण आधुनिक जगाचा इतिहास या घटकावर २०१३ ते २०१८ मध्ये विचारण्यात आलेल्या प्रश्नांचा आढावा घेणार आहोत.

“Latecomer” Industrial revolution in Japan involved certain factors that were markedly different from what west had experience.’’

‘‘उशिराने सुरू झालेल्या जपानमधील औद्योगिक क्रांतीमध्ये निश्चित काही असे घटक होते जे पश्चिमेतील देशांच्या अनुभवापेक्षा खूपच भिन्न होते.’’ विश्लेषण करा. (२०१३, १० गुण आणि २०० शब्द मर्यादा.)

“africa was chopped into states artificially created by accident of European competition. Analyse.’’

‘‘युरोपिय प्रतिस्पर्धीयांच्या आघातामुळे आफ्रिकेचे छोटय़ा छोटय़ा कृत्रिमरीत्या निर्मित राज्यामध्ये तुकडे करण्यात आले.’’ विश्लेषण करा. (२०१३, १० गुण आणि २०० शब्द मर्यादा.)

American Revolution was an economic revolt against mercantilism. Substantiate.

‘‘अमेरिकन क्रांती वाणिज्यवादाच्या विरोधातील आर्थिक उठाव होता.’’ सिद्ध करा. (२०१३, १० गुण आणि २०० शब्द मर्यादा.)

What policy instruments were deployed to contain the great economic depression?

आर्थिक महामंदीशी सामना करण्यासाठी कोणत्या धोरणात्मक साधनांचा वापर करण्यात आलेला होता? (२०१३, १० गुण आणि २०० शब्द मर्यादा.)

What were the events that led to the Suez Crisis in 1956? How did it deal a final blow to Britain’s self-image as a world power?

कोणत्या घटनांमुळे १९५६ मधील सुवेझ संकट (Suez Crisis) निर्माण झालेले होते? त्याने कशा प्रकारे ब्रिटनच्या स्वयंकित जागतिक सत्तेच्या प्रतिमेवर शेवटचा प्रहर केला? (२०१४, १० गुण आणि १५० शब्द मर्यादा.)

Why did the industrial revolution first occur in England? Discuss the quality of life of the people there during the industrialization. How does it compare with that in India at present times?

सर्वप्रथम औद्योगिक क्रांती इंग्लंडमध्येच का झाली? औद्योगिकीकरणाच्या काळामधील तेथील लोकांच्या जीवनाच्या गुणवत्तेची चर्चा करा. भारताच्या सद्यस्थितीमधील जीवन गुणवत्तेशी ती कशी तुलनात्मक आहे? (२०१५, १२.५ गुण आणि २०० शब्द मर्यादा.)

To what extend can Germany be held responsible for causing the two World Wars? Discuss critically.

कोणत्या मर्यादेपर्यंत जर्मनीला दोन जागतिक महायुद्धासाठी जबाबदार धरले जाऊ शकते? समीक्षात्मक चर्चा करा. (२०१५, १२.५ गुण आणि २०० शब्द मर्यादा.)

The anti-colonial struggles in West Africa were led by the new elite of Western -educated Africans. Examine.

पश्चिमी आफ्रिकेतील वसाहतविरोधी संघर्षचे नेतृत्व पाश्चिमात्य शिक्षण घेतलेल्या नव अभिजन वर्गाने केलेले होते. परीक्षण करा. (२०१५, १२.५ गुण आणि २०० शब्द मर्यादा.)

  What problems are germane to the decolonization process in the Malay Peninsula?मलाय द्वीपकल्प (Malay Peninsula)

निर्वसाहतीकरण प्रक्रियेसाठी कोणकोणत्या समस्या सुसंगत होत्या? (२०१७, १० गुण आणि १५० शब्द मर्यादा.)

२०१८ मध्ये या घटकावर थेट प्रश्न विचारण्यात आलेला नाही.

प्रश्नांचे आकलन

औद्योगिक क्रांती, साम्राज्यवाद आणि वसाहतवाद यावरील प्रश्नांचे योग्य आकलन होण्यासाठी साम्राज्यवाद आणि वसाहतवाद हे नेमके काय होते? याची सुरुवात कशी झाली? यासाठी नेमके कोणते घटक कारणीभूत होते? आणि औद्योगिक क्रांतीला वसाहतवाद आणि साम्राज्यवाद यामुळे कसा फायदा झाला? याविषयी सर्वप्रथम माहिती असणे गरजेचे आहे. युरोपातील प्रबोधन युग, त्याची पाश्र्वभूमी आणि त्याचे समाजाच्या सर्व जीवनावर झालेले परिणाम या घटकांचा सर्वप्रथम अभ्यास करावा लागतो. त्या देशांनी सुरू केलेली वसाहतवाद आणि साम्राज्यवादाची प्रक्रिया, त्याअंतर्गत त्यांनी आशिया, अमेरिका आणि आफ्रिका खंडात वसाहती स्थापन करून साम्राज्यवाद कशा प्रकारे निर्माण केला याचे योग्य आकलन करता येत नाही.

अमेरिकन क्रांतीसंबंधीचा प्रश्न समजून घेण्यासाठी आधी काही गोष्टींची माहिती घेणे आवश्यक आहे. सर्वप्रथम वाणिज्यवाद म्हणजे काय होते आणि इंग्लंड या देशांनी वाणिज्यवादाद्वारे अमेरिकन वसाहतीची आर्थिक नाकेबंदी कशी केलेली होती इत्यादीची माहिती घेणे गरजेचे आहे. या माहितीचा वापर करून अमेरिकन क्रांती ही वाणिज्यवादाच्या विरोधातील आर्थिक उठाव कसा होता हे आपणाला सोदाहरण सिद्ध करता येते.

आर्थिक महामंदीशी संबंधित प्रश्न सोडविताना आपणाला आर्थिक धोरणांचा मुख्यत्वे विचार करावा लागतो. ही धोरणे नेमकी कोणती होती व या धोरणांच्या परिणाम स्वरूप नेमके काय साध्य झालेले होते, अशी माहिती असावी लागते. तसेच या प्रश्नांचे स्वरूप संकीर्ण प्रकारात अधिक मोडणारे आहे म्हणून येथे फक्त धोरणाची माहिती नमूद करून उत्तर लिहिणे अपेक्षित आहे.

पश्चिमी आफ्रिकेतील वसाहतविरोधी संघर्षांचे नेतृत्व पाश्चिमात्य शिक्षण घेतलेल्या नव- अभिजन वर्गाने केलेले होते, परीक्षण करा.

हा प्रश्न व्यक्तिविशेष प्रकारात मोडणारा आहे आणि या देशातील ज्या महत्त्वाच्या व्यक्ती, त्यांची नावे, कार्य विचारसरणी याची माहिती देणे अपेक्षित आहे. शिवाय त्यांनी कशा पद्धतीने यांनी नेतृत्व केलेले होते आदी सर्व पलूंचा आधार घेऊन या प्रश्नाचे उत्तर लिहिले पाहिजे. उपरोक्त प्रश्न हे संकीर्ण आणि विश्लेषणात्मक या दोन्ही माहितीचा एकत्रित आधार घेऊन विचारण्यात आलेले आहेत.

यूपीएससीची तयारी : आधुनिक भारत

upsc-exam-2019-upsc-preparation-tips-ias-2019-exam-1864069/

176   27-Mar-2019, Wed

आजच्या लेखात आपण १८व्या शतकाची सुरुवात ते १८५७ पर्यंतचा कालखंड याविषयाची यूपीएससी पूर्वपरीक्षेसाठी तयारी कशी करावी याची चर्चा करणार आहोत. या विषयावर २०११ ते २०१८ दरम्यान, एकूण ८ प्रश्न विचारण्यात आले आहेत. पूर्वपरीक्षेमध्ये १८व्या शतकाची सुरुवात ते १८५७पर्यंतचा कालखंड यावर साधारणपणे कमी प्रश्न विचारले जातात. प्रश्नांचा कल हा संकीर्ण माहितीच्या अनुषंगाने अधिक असतो.

या घटकाचे स्वरूप व अभ्यासाचे नियोजन

या कालखंडाअंतर्गत आपणाला युरोपियनांचे आगमन आणि ब्रिटिशसत्तेची भारतात स्थापना, ब्रिटिशसत्तेचा भारतावरील परिणाम, ब्रिटिशांची प्रशासकीय रचना आणि धोरणे, ब्रिटिशसत्तेच्या विरोधातील बंड आणि उठाव, १९व्या शतकातील सामाजिक आणि धार्मिक सुधारणा चळवळी, शिक्षण आणि वृतपत्रे व ब्रिटिशकालीन संविधानात्मक विकास इत्यादी महत्त्वपूर्ण घडामोडींची माहिती अभ्यासावी लागणार आहे. या कालखंडाची तीन महत्त्वाची वैशिष्टय़े आहेत. यातील पहिले वैशिष्टय़ म्हणजे १८व्या शतकाच्या सुरुवातीपासून मुघल सत्तेच्या ऱ्हासाला सुरुवात झाली होती.

दुसरे वैशिष्टय़ म्हणजे भारताच्या विविध भागांत प्रादेशिक देशी सत्ता उदयाला आल्या होत्या. (या सत्तांचे वर्गीकरण साधारणत: तीन प्रकारात केले जाते – मुघल साम्राज्यात कार्यरत असणाऱ्या प्रांतीय सुभेदारांनी स्थापन केलेल्या सत्ता उदा. बंगाल, अवध, हैदराबाद; मुघल साम्राज्याच्या विरोधात उठाव करून स्थापन झालेल्या सत्ता उदा. मराठे, शीख, जाठ व अफगाण आणि स्वतंत्ररीत्या स्थापन झालेल्या सत्ता उदा. म्हैसूर, राजपूत आणि केरळ; आणि तिसरे वैशिष्टय़ म्हणजे भारतात व्यापार करण्यासाठी आलेल्या ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने भारतातील विविध प्रांतात अस्तित्वात असणाऱ्या प्रादेशिक सत्तांमध्ये तसेच एकमेकांमध्ये असणाऱ्या संघर्षांचा फायदा घेऊन स्वत:ला एक राजकीय प्रतिस्पर्धेच्या भूमिकेत स्थापन केले होते. तसेच सर्व प्रादेशिक देशी सत्तांचा निर्णायक पराभव करून ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने आपले अधिराज्य त्यांना मान्य करण्यास भाग पाडले व सबंध भारतभर आपला राजकीय अंमल प्रस्थापित केला.

१७५७ च्या प्लासीच्या लढाईपासून आपणाला ब्रिटिश गव्हर्नर आणि गव्हर्नर जनरल यांच्याविषयीची माहिती, त्यांनी केलेली युद्धे, त्यांच्याद्वारे राबविण्यात आलेली सामाजिक आणि आर्थिक तसेच प्रशासकीय धोरणे आणि या धोरणांचा भारतीयांवर झालेला परिणाम, याला भारतीयांनी दिलेला प्रतिसाद ज्यात ब्रिटिशसत्तेच्या विरोधातील बंड आणि उठाव, प्रबोधनपर्वाला झालेली सुरुवात आणि परिणामस्वरूप सुरू झालेल्या सामाजिक आणि धार्मिक चळवळी व या चळवळींचा भारतीयांवर झालेला परिणाम तसेच शिक्षण आणि वर्तमानपत्रे यांची जनजागृती करणामध्ये असलेली निर्णायक भूमिका इत्यादी घडामोडींची माहिती घ्यावी लागेल.

तसेच १७७२च्या रेग्युलेटिंग कायद्यापासून ब्रिटिश संसदेने पारित केलेले कायदे व त्यातील तरतुदी, ज्याला आपण ब्रिटिशकालीन संविधानाचा विकास म्हणून पाहतो इत्यादीशी संबंधित मूलभूत माहिती सर्वप्रथम अभ्यासावी लागणार आहे. त्यामुळे या विषयाचे व्यापक आणि परीक्षाभिमुख आकलन करणे अधिक सुलभ होऊ शकेल.

मागील परीक्षेत विचारण्यात आलेले प्रश्न व स्वरूप

२०१२मध्ये रयतवारी पद्धती संदर्भात प्रश्न विचारण्यात आलेला होता.

ज्यामध्ये

१)शेतकऱ्यामार्फत थेट शेतसारा सरकारला दिला जात असे. २)रयतेला सरकारने पट्टा दिलेला होता. ३)महसूल लावण्याअगोदर जमिनीचे सर्वेक्षण आणि मोजमाप केले जात असे. अशा प्रकारची तीन विधाने दिलेली होती आणि यातील योग्य विधाने निवडायची होती.

तसेच २०१२ मध्ये ब्राह्मो समाजावर आणि २०१६ मध्ये सत्यशोधक समाजावर प्रश्न विचारण्यात आलेला होता.

२०१४ मध्ये १८५८च्या राणीचा जाहीरनाम्याचा उद्देश काय होता, असा प्रश्न विचारण्यात आलेला होता.

२०१७ मध्ये ब्रिटिश सत्तेच्या काळात भारतात रयतवारी पद्धतीची सुरुवात करण्याशी खालीलपैकी कोण संबंधित होते, हा प्रश्न विचारला होता. त्यासाठी लॉर्ड कॉर्नवॉलिस, अलेक्झांडर रीड, थॉमस मुनरो हे पर्याय देण्यात आलेले होते.

२०१८मध्ये खालीलपैकी कोणामुळे भारतात इंग्रजी शिक्षणाची सुरुवात झाली, हा प्रश्न विचारण्यात आला होता. यासाठी १८१३ चा सनदी कायदा, १८२३ची जनरल कमिटी ऑफ पब्लिक इन्स्ट्रक्शन, प्राच्य-अंग्लो वादविवाद. – हे पर्याय देण्यात आलेले होते.

तसेच याव्यतिरिक्त संस्कृत कॉलेज, कलकत्ता मदरसा, फोर्ट विलियम अर्थर कॉलेज याची स्थापना कोणी केली, यावर प्रश्न विचारण्यात आलेला होता.

वरील प्रश्नांवरून लक्षात येते की, या घटकाचा अभ्यास करताना संकीर्ण माहितीसह विश्लेषणात्मक पद्धतीचाही आधार घ्यावा लागतो. या घटकावर कमी प्रश्न विचारण्यात आलेले असले तरी हा घटक मुख्य परीक्षेलाही आहे. त्यामुळे या घटकाचे सखोल आकलन असणे अपरिहार्य आहे. या विषयावर बाजारामध्ये अनेक संदर्भ ग्रंथ उपलब्ध आहेत पण सर्वप्रथम या विषयाची मूलभूत माहिती अभ्यासण्यासाठी बिपिन चंद्र लिखित आधुनिक भारतावरील जुने एनसीईआरटीचे पुस्तक अभ्यासावे. त्यानंतर या विषयाचा अधिक सखोल अभ्यास करण्यासाठी बी. एल. ग्रोवर आणि एस. ग्रोवर लिखित ‘आधुनिक भारताचा इतिहास’ हे पुस्तक वाचावे.

यूपीएससी प्रश्नवेध : स्वातंत्र्योत्तर भारत

article-on-post-independence-india

258   23-Mar-2019, Sat

प्रस्तुत लेखामध्ये आपण स्वातंत्र्योत्तर भारत या घटकावर २०१३ ते २०१८ या दरम्यान यूपीएससी मुख्य परीक्षेत विचारण्यात आलेल्या काही प्रश्नांचा थोडक्यात आढावा घेणार आहोत.

Critically discuss the objectives of Bhoodan and Gramdan movements initiated by Acharya Vinoba Bhave and their success.

विनोबा भावे यांच्या भूदान व ग्रामदान आंदोलनाच्या उद्देशाची चिकित्सा करा आणि त्याच्या यशाची चर्चा करा. (२०१३, १० गुण आणि २०० शब्दमर्यादा)

Write a critical note on the evolution and significance of the slogan “Jai Jawan Jai Kisan”.

‘जय जवान जय किसान’ नाऱ्याचा (घोषवाक्य) उदय आणि महत्त्व यावर चिकित्सक पद्धतीने लेख लिहा. (२०१३, १० गुण आणि २० शब्दमर्यादा).

Analyse the circumstances that led to Tashkent Agreement in 1966. Discuss the highlights of the agreement.

कोणत्या परिस्थितीमुळे १९६६चा ताश्कंद करार करण्यात करण्यात आला, त्याचे विश्लेषण करा. करारातील प्रमुख वैशिष्टय़ांची चर्चा करा. (२०१३, १० गुण आणि २०० शब्दमर्यादा)

Critically examine the compulsions which prompted India to play decisive roles in the emergence of Bangladesh.

कोणत्या अटळ परिस्थितीमुळे भारताला तत्परतेने बांगलादेशाच्या उदयामध्ये निर्णायक भूमिका बजावावी लागली याचे चिकित्सक पद्धतीने परीक्षण करा. (२०१३, १० गुण आणि २०० शब्दमर्यादा)

The New Economic Policy – 1921 of Lenin had influenced the policies adopted by India soon after independence. Evaluate.

भारताने स्वातंत्र्यप्राप्तीनंतर लगोलग आखलेल्या धोरणांना लेनिनच्या १९२१ सालच्या नवीन आíथक धोरणाने प्रभावित केलेले होते. मूल्यांकन करा. (२०१४, १० गुण आणि १५० शब्दमर्यादा)

Has the formation of linguistic states strengthened the cause of Indian unity?

भाषावार राज्यनिर्मितीमुळे भारतीय एकतेच्या उद्देशाला मजबुती मिळालेली आहे का? (२०१६, १२.५ गुण आणि २०० शब्दमर्यादा).

What are the two major legal initiatives by the State since Independence addressing discrimination against Scheduled Tribes(STs)?

स्वातंत्र्यप्राप्तीनंतर अनुसूचित जमाती (STs) विरोधात होणारे भेदभाव दूर करण्यासाठी कोणते दोन मुख्य कायदेशीर पुढाकार राज्याद्वारे घेण्यात आले? (२०१७, १० गुण आणि १५० शब्दमर्यादा)

(२०१८मध्ये या घटकावर थेट प्रश्न विचारण्यात आलेला नाही).

प्रश्नाचे योग्य आकलन करण्यासाठी लागणारा दृष्टिकोन

     उपरोक्त प्रश्नांचे योग्य आकलन केल्यास आपणाला असे दिसून येते की, यातील जवळपास सर्व प्रश्न हे भारताच्या स्वातंत्र्यप्राप्तीनंतरच्या पुढील दोन दशकांतील महत्त्वाच्या घडामोडींशी संबंधित आहेत. म्हणून भारताच्या स्वातंत्र्यानंतरच्या पहिल्या दोन दशकांतील घडामोडींची योग्य माहिती असणे गरजेचे आहे.

     वरील प्रश्नामध्ये भूदान व ग्रामदान चळवळीवरील प्रश्न तसेच ‘जय जवान जय किसान’ नाऱ्याशी संबंधित प्रश्न आहेत. त्याचे विश्लेषणात्मक पद्धतीने आकलन करायला हवे. तसेच तत्कालीन सामाजिक आणि आíथक विकासामध्ये त्याची नेमकी काय उपयुक्तता होती आणि यामुळे काय साध्य झाले अशा महत्त्वाच्या पलूंचा विचार करून चिकित्सक पद्धतीने उत्तराची मांडणी करणे अपेक्षित आहे.

     भारताने स्वातंत्र्यप्राप्तीनंतर नियोजन पद्धतीने जो आíथक विकास घडवून आणण्यासाठी धोरण आखले होते त्यावर लेनिनच्या १९२१ सालच्या नवीन आíथक धोरणांचा प्रभाव कसा होता हे उदाहरणासह चर्चा करून याचे मूल्यांकन उत्तरामध्ये करणे अपेक्षित आहे.

     उपरोक्त प्रश्नामधील ‘भाषावार राज्यनिर्मितीमुळे भारतीय एकतेच्या उद्देशाला मजबुती मिळालेली आहे का?’ हा प्रश्न योग्य पद्धतीने समजून घ्यायला हवा. त्यासाठी भाषावार प्रांतरचना का करण्यात आली होती, तसेच याची नेमकी कोणती कारणे होती व नेमका इतिहास काय आहे आणि यासाठी सरकारमार्फत कोणत्या उपाययोजना आखण्यात आलेल्या होत्या हे समजून घेणे महत्त्वाचे राहील. तसेच १९६२ मध्ये स्थापन करण्यात आलेली राष्ट्रीय एकता परिषद व तिची उद्दिष्टे यासारख्या पलूंचा एकत्रित विचार करून उदाहरणासह उत्तर लिहिणे अपेक्षित आहे. शिवाय भाषावार राज्यनिर्मितीमुळे भारतीय एकतेच्या उद्देशाला मजबुती मिळालेली आहे का, याचे संतुलित पद्धतीने विश्लेषण उत्तरामध्ये असणे अपेक्षित आहे.

     वरील प्रश्नामधील दोन प्रश्न हे भारतासोबत पाकिस्तानने केलेल्या दोन युद्धांच्या पाश्र्वभूमीला ग्राह्य़ धरून विचारण्यात आलेले आहेत. या दोन्ही प्रश्नांचे योग्य आकलन होण्यासाठी आपणाला भारताची फाळणी, फाळणीचे परिणाम, संस्थानांचे विलीनीकरण याची योग्य माहिती असणे गरजेचे आहे. त्यानंतर घडलेल्या घडामोडींचीही माहिती असणे गरजेचे आहे. तत्कालिक कारणे नेमकी कोणती होती इत्यादीची सखोल माहिती असणे गरजेचे आहे. त्याशिवाय या प्रश्नाची मुद्देसूद उत्तरे लिहिता येत नाहीत. यासोबतच ताश्कंद कराराची वैशिष्टय़े नेमकी काय होती याची संकीर्ण माहिती असणेही गरजेचे आहे. थोडक्यात हे प्रश्न विषयाची सखोल माहिती आणि संकीर्ण माहिती या दोन्ही बाबींचा एकत्रित विचार करून विचारण्यात आलेले आहेत.

     या सर्व प्रश्नांच्या चर्चेमुळे या विषयावर विचारण्यात येणाऱ्या प्रश्नांचे स्वरूप लक्षात येते. आणि त्याची उत्तरे कशी लिहावी याची एक योग्य दिशा मिळते. याचबरोबर या विषयाची तयारी कशी करावी याची एक स्पष्ट आखणी करता येते.

यूपीएससीची तयारी : भारतीय कला आणि संस्कृती

indian-art-and-culture reliable academy

211   22-Mar-2019, Fri

आजच्या लेखामध्ये आपण भारतीय कला आणि संस्कृती या घटकाची पूर्वपरीक्षेच्या दृष्टीने तयारी कशी करावी याची चर्चा करणार आहोत. या घटकावर २०११ ते २०१८ मध्ये एकूण ४२ प्रश्न विचारण्यात आले आहेत. परीक्षेचा विचार करता हा घटक अधिकच महत्त्वपूर्ण बनत आहे; कारण या विषयाची तयारी फक्त पूर्वपरीक्षेसाठी मर्यादित नसून मुख्य परीक्षेसाठीसुद्धा करावी लागते.

घटकाचे स्वरूप व अभ्यासाचे नियोजन

या घटकाची तयारी करताना प्राचीन भारतातील कला आणि संस्कृती यापासून सुरुवात करावी लागते. ज्यामुळे भारतात अस्तित्वात असणाऱ्या विविध कला आणि संस्कृतींचा उगम कसा झालेला आहे याची ऐतिहासिक पाश्र्वभूमी आपल्याला लक्षात घेता येते. स्थापत्यकला व शिल्पकला, भारतीय संगीत, नाटय़ व नृत्य, चित्रकला, साहित्य आणि भारतीय तत्त्वज्ञान या घटकाविषयी अधिक सखोल आणि सर्वागीण माहिती अभ्यासणे गरजेचे आहे.

विद्यार्थ्यांनी प्राचीन भारतातील सिंधू संस्कृती, बौद्धयुग अथवा महाजनपदाचा कालखंड, मौर्य कालखंड, मौर्योत्तर कालखंड, गुप्त कालखंड आणि गुप्तोत्तर कालखंड अशा प्रकारे कालखंडनिहाय वर्गीकरण करून घ्यावे. संबंधित कालखंडातील स्थापत्यकला, शिल्पकला, चित्रकला, साहित्य आणि तत्त्वज्ञान याच्याशी संबंधित विविध संकल्पना, कलेचे प्रकार आणि वैशिष्टय़े तसेच याच्याशी निगडित ऐतिहासिक स्थळे तसेच ही स्थळे कोणत्या कालखंडात निर्माण करण्यात आलेली होती, ही स्थळे कोणत्या धर्माची होती आणि कोणत्या व्यक्तीने अथवा राजाने ती निर्माण केली होती; इत्यादी पलूंविषयी सर्वप्रथम अभ्यास करावा लागतो. यामुळे या विषयाची परीक्षेच्या दृष्टीने योग्य तयारी आपल्याला करता येईल.

मध्ययुगीन भारतातील कला व संस्कृतीचा अभ्यास करताना उपरोक्त पद्धतीनेच करावा कारण प्राचीन भारतातील विविध कलांचे परिपक्व स्वरूप आपणाला या कालखंडात पाहावयास मिळते. उदाहरणार्थ स्थापत्यकला, चित्रकला आणि साहित्य याचबरोबर आपणाला या कालखंडात बौद्ध, जैन आणि हिंदू धर्माव्यतिरिक्त इस्लाम धर्माशी संबंधित इंडो-इस्लामिक स्थापत्यकलेचा उदय झालेला पाहावयास मिळतो. तसेच चित्रकलेमध्ये भित्ती चित्रकला सोबतच लघू चित्रकलेचा उदय झालेला दिसून येतो. याच्या जोडीला आपणाला धर्मनिरपेक्ष साहित्य, स्थापत्यकला आणि प्राचीन व मध्ययुगीन कालखंडातील विज्ञान आणि तंत्रज्ञान याविषयी माहिती असणे गरजेचे आहे.

गतवर्षीय परीक्षेत विचारण्यात आलेले प्रश्न व त्यांचे स्वरूप

२०११मध्ये प्रश्न होता..

जैन तत्त्वज्ञानानुसार जगाची निर्मिती व संचालन कशामार्फत होते?

पर्याय होते –

१)वैश्विक कायदा, २)वैश्विक सत्य, ३)वैश्विक श्रद्धा आणि ४)वैश्विक आत्मा

२०१२ च्या परीक्षेत प्रश्न होता..

भूमिस्पर्श मुद्रा या हस्तमुद्रेतील भगवान बुद्धाची प्रतिमा काय दर्शविते?

२०१३ मध्ये प्रश्न होता..

बौद्ध धर्माशी संबंधित शिल्प लेणी, स्तूप आणि इतर विहारे असे संबोधले जाते, या दोन्हीमध्ये काय फरक आहे?

२०१४ मध्ये प्रश्न होते..

भारताच्या सांस्कृतिक इतिहासासंदर्भात पंचयतन संज्ञा कशाशी संबंधित आहे?    आणि

भारताच्या संस्कृती आणि परंपरासंदर्भात कालरीपयत्तू (ङं’ं१्रस्र्ं८ं३३४) काय आहे?

२०१५ मध्ये दोन प्रश्न होते..

१)कलमकारी चित्रकला काय निर्देशित करते? आणि

२)अलीकडेच खालीलपकी कोणत्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा बहाल करण्यात आलेला आहे? हा प्रश्न विचारण्यात आलेला होता.

२०१६ मध्ये बौद्ध धर्मातील बोधिसत्त्व या संकल्पनेशी संबंधित प्रश्न विचारण्यात आलेला होता.

२०१७ मध्ये जैन धर्म, चित्रकला, भारतातील विविध जमातीद्वारे साजरे केले जाणारे उत्सव, सण, तसेच सूर्यमंदिरे यासाठी प्रसिद्ध असणारी ठिकाणे यावर प्रश्न विचारण्यात आलेले होते.

२०१८ मध्ये मुघल स्थापत्यकला, ईशान्य भारतातील नृत्य, भारतीय हस्तकला, राजस्थानी चित्रकला, त्यागराज (व्यक्तिविशेष)  इत्यादींवर प्रश्न विचारण्यात आलेले होते.

या व्यतिरिक्त भारतीय षड्द्दर्शने, त्रिभंगा आणि सत्तारीया नृत्य, मूर्तिशिल्प, मंदिर शैली, अभिजात भाषा, यावरदेखील प्रश्न विचारण्यात आलेले होते.

या विषयावर आलेल्या प्रश्नाचे योग्य आकलन केल्यास असे दिसून येते की प्रश्नांचे स्वरूप हे वस्तुनिष्ठ आणि विश्लेषणात्मक या दोन्ही प्रकारांत मोडणारे आहे. त्यामुळे या विषयाचा अभ्यास या घटकाच्या मूलभूत माहितीसह विश्लेषणात्मक बाजू विचारात घेऊन करावा लागतो. बहुतांश प्रश्न हे संकल्पनांवर आधारित विचारण्यात आलेले असल्यामुळे या घटकाशी संबंधित संकल्पना, त्यांचा अर्थ, उगम व वैशिष्टय़े इत्यादींची माहिती असणे गरजेचे आहे.

 संदर्भ साहित्य

या घटकाची मूलभूत माहिती अभ्यासण्यासाठी सर्वप्रथम एनसीईआरटीच्या शालेय पुस्तकांचा आधार घ्यावा लागतो. इयत्ता ११वीचे An Introduction to Indian Art Part -I हे पुस्तक सर्वप्रथम अभ्यासणे गरजेचे आहे.

तसेच १२वीचे Themes in Indian History part- I  आणि II  व प्राचीन आणि मध्ययुगीन भारतावरील जुन्या एनसीईआरटी पुस्तकातील भारतीय कला आणि संस्कृती संबंधित कालखंडनिहाय अभ्यास करावा.

विद्यार्थ्यांनी आपली आपण टिप्पणे काढणे गरजेचे आहे. त्यामुळे कमीतकमी वेळात या विषयाची तयारी करता येऊ शकेल.


Top