यूपीएससीची तयारी : प्राकृतिक भूगोल

physical,geography, Upsc Exam 2019 Preparation Of Upsc Zws 70

503   06-Aug-2019, Tue

आपण भूगोल या विषयातील प्राकृतिक भूगोल या घटकाची परीक्षेच्या दृष्टीने तयारी कशी करावी, याबाबत माहिती घेणार आहोत. प्राकृतिक भूगोल या घटकावर २०१३ मध्ये ४; २०१४ मध्ये ५; २०१५ मध्ये ६; २०१६ मध्ये ५; २०१७ मध्ये ४; आणि २०१८ मध्ये ३ प्रश्न विचारण्यात आले होते. अभ्यासक्रमामध्ये भारत व जगाचा भूगोल असे नमूद केलेले आहे म्हणून प्राकृतिक भूगोलाची तयारी करताना जगाचा प्राकृतिक भूगोल आणि भारताचा प्राकृतिक भूगोल अशी सर्वसाधारण विभागणी करावी लागते. या विषयाचे परीक्षेच्या दृष्टीने अभ्यासाचे नियोजन करताना सर्वप्रथम या विषयातील घटकाची माहिती असणे आवश्यक आहे. प्राकृतिक भूगोलामध्ये मुखत्वे भूरूपशास्त्र, हवामानशास्त्र, सागरशास्त्र, जैविक भूगोल आणि पर्यावरणीय भूगोल यांसारख्या घटकांचा समावेश होतो. या सर्व घटकांचे मूलभूत अर्थात पारंपरिक ज्ञान सर्वप्रथम अभ्यासावे लागते. वर नमूद केलेल्या घटकासंबंधी अभ्यासाव्या लागणाऱ्या संकल्पना, त्यांची वैशिष्टय़े याची माहिती सर्वप्रथम असणे आवश्यक ठरते.

पुढे आपण २०१३ ते २०१८ दरम्यान घेण्यात आलेल्या मुख्य परीक्षांमध्ये या घटकावर विचारण्यात आलेल्या काही प्रश्नांची थोडक्यात चर्चा करणार आहोत.

* ‘भूखंड अपवहन सिद्धांताद्वारे तुम्हाला नेमके काय समजते? याच्या समर्थनार्थ प्रमुख पुराव्यानिशी चर्चा करा.’ (२०१३)

या प्रश्नाचा मुख्य रोख हा भूखंड अपवहन सिद्धांतावर आहे आणि हा प्रश्न योग्य पद्धतीने समजून घेण्यासाठी हा सिद्धांत नेमका काय आहे, या सिद्धांताची मांडणी कोणी केली आणि यामध्ये नेमक्या कोणत्या प्राकृतिक घडामोडींची चर्चा करण्यात आलेली आहे अशा विविधांगी पलूंचा विचार करून या प्रश्नाचे उत्तर लिहिणे अपेक्षित आहे.

* ‘‘हिमालयातील हिमनद्यांमध्ये होणारी घट आणि भारतीय उपखंडामध्ये जागतिक तापमानवाढीच्या लक्षणांचा संबंध उघड करा.’’ (२०१४)

या प्रश्नाचे आकलन होण्यासाठी हिमनदी म्हणजे काय, तिची निर्मिती कशी होते, या प्रकारच्या नद्या हिमालय पर्वत रांगांमध्येच का आहेत याची माहिती सर्वप्रथम असणे गरजेचे आहे. या प्रश्नाचा मुख्य कल हा एका विशिष्ट प्रक्रियेशी म्हणजे जागतिक तापमानवाढीशी जोडण्यात आलेला आहे आणि जागतिक तापमानवाढीमुळे या हिमनद्यांमध्ये कशी घट होत आहे याची पुराव्यानिशी चर्चा करून या प्रश्नाचे उत्तर आपणाला लिहावे लागते.

* ‘‘आर्क्टिक समुद्रामध्ये शोधण्यात आलेल्या खनिज तेलाचे आर्थिक महत्त्व काय आहे आणि याचे संभाव्य पर्यावरणीय परिणाम काय असू शकतात.’’ (२०१५)

आर्क्टिक समुद्राचे भौगोलिक स्थान काय आहे आणि याचा पृथ्वीच्या वातावरणावर नेमका काय परिणाम होतो याची सर्वप्रथम माहिती असणे गरजेचे आहे. त्यानंतर आर्क्टिक समुद्रातील खनिज तेलाचे आर्थिक महत्त्व लक्षात घ्यायला हवे. सद्य:स्थितीमध्ये जगातील विविध देशांची ऊर्जेची गरज भागवण्यासाठी या खनिज तेलाचा उपयोग होऊ शकतो.  आर्क्टिक समुद्रावर अधिपत्य असणाऱ्या देशांना याचा होणारा आर्थिक लाभ, या खनिज तेलाचे उत्पादन करताना आक्र्टिक समुद्रामध्ये केले जाणारे उत्खनन आणि यामुळे येथील प्रदेशाच्या भौगोलिक रचनेत होणारा बदल आणि या बदलांचा येथील पर्यावरणावर होणारा परिणाम अशा विविधांगी बाबींचा एकत्रित विचार करणे गरजेचे आहे. तो केल्याशिवाय या प्रश्नाचे योग्य उत्तर लिहिता येणार नाही.

* २०१६ मध्ये या घटकातील हिमालय पर्वतातील दरडी कोसळण्याचे प्रमाण अधिक आहे, परिणामकारकरीत्या केलेले जमीन आणि पाणी व्यवस्थापन हे मानवी विपत्ती कमी करू शकते, दक्षिण चिनी समुद्राचे भूराजकीय महत्त्व, भारतातील प्रमुख शहरांमधील पुरांची समस्या, भारतातील अंतर्गत जल वाहतूक व समस्या इत्यादीवर प्रश्न विचारण्यात आलेले होते.

* २०१७ मध्ये आशिया मान्सून आणि लोकसंख्या संबंध, महासागरीय क्षारतेतील फरकाची कारणे सांगा आणि याच्या बहुआयामी परिणामांची चर्चा करा, कोळसा खाणीच्या विकासासाठी असणारी अपरिहार्यता आणि याचे प्रतिकूल पर्यावरणीय परिणाम असे प्रश्न विचारण्यात आलेले होते. हे प्रश्न प्राकृतिक भूगोलाची पारंपरिक माहिती आणि चालू घडामोडीचा संबंध जोडून विचारण्यात आलेले होते.

* २०१८ मध्ये समुद्री पारिस्थितीकीवर आणि मृत क्षेत्रे, तसेच आच्छादन (mantle plume) याची व्याख्या आणि आच्छादन याची प्लेट टेक्टोनिकमध्ये असणारी भूमिका स्पष्ट करा, अशा स्वरूपाचे प्रश्न विचारण्यात आलेले होते.

उपरोक्त प्रश्नांचे विश्लेषण केल्यास असे दिसून येते की पर्यावरण आणि हवामान संबंधित घटकांवर अधिक प्रश्न विचारले गेले आहेत. त्याचबरोबर प्रश्न विचारताना या विषयाचे पारंपरिक ज्ञान, यातील महत्त्वाच्या संकल्पना तसेच यासंबंधी घडणाऱ्या चालू घडामोडींचा एकत्रित वापर केलेला दिसून येतो. यातील बहुतांश प्रश्न भारत व जगाच्या प्राकृतिक घडामोडीच्या पाश्र्वभूमीचा एकत्रित विचार करून विचारण्यात आलेले आहेत. म्हणून प्राकृतिक भूगोलाची संपूर्ण तयारी करण्याबरोबरच चालू घडामोडीचा अभ्यास करावा लागतो. थोडक्यात अभ्यासक्रमामध्ये नमूद घटकाच्या आधारे या प्रश्नांची विभागणी करावी आणि अभ्यासाची दिशा निर्धारित करावी. त्याचबरोबर महत्त्वाची बाब म्हणजे प्रश्न विचारण्याचा कल हा केव्हाही बदलला जाऊ शकतो, त्यामुळे हा घटक सर्वंकष आणि सखोल पद्धतीने अभ्यासणे अपरिहार्य ठरते.

या घटकाची मूलभूत माहिती सर्वप्रथम अभ्यासावी. यासाठी आपणाला एनसीईआरटीच्या  Fundamentals of Physical Geography (XI), Indian Physical Environment(XI), या क्रमिक पुस्तकांचा आधार घेता येतो. ज्यामुळे या विषयाचे सरळ व सोप्या भाषेत आकलन करता येऊ शकेल आणि या माहितीला विस्तारित करण्यासाठी ‘Certificate Physical and Human Geography (by Goe Cheng Leong), Fundamentals of Physical Geography (by Majid Husain), India A Comprehensive Geography ( by D.R. Khullar), World Geograhy (by Majid Husain) या संदर्भ ग्रंथांचा आधार घेता येतो.

या विषयाच्या स्वत:च्या नोट्स तयार कराव्यात. स्वत:च्या अभ्यासाची तयारी कितपत झालेली आहे, हे कळण्यासाठी उत्तर लेखनाचा सराव करावा व मूल्यमापन करून घ्यावे. त्यामुळे आपल्या अभ्यासातील उणिवा दूर करून अधिक नेमकेपणाने उत्तर लिहिण्याचा सराव करता येतो आणि चांगले गुण प्राप्त करता येऊ शकतात. तसेच महत्त्वाची बाब म्हणजे हा घटक आपणाला सामान्य अध्ययनासाठी तयार करायचा आहे याचे भान ठेवणे आवश्यक आहे. त्यामुळे नोट्स तयार करताना त्यातील समर्पकता आणि महत्त्वाच्या मुद्दय़ांचाच अंतर्भाव करणे अधिक श्रेयस्कर ठरते.

Paris Agreement

Paris Agreement 2015

20   17-Aug-2019, Sat

Mostly because of human actions, the concentration of gases like Carbon-di-oxide, Methane etc has increased in earth’s atmosphere and has resulted in phenomena called Green House Effect.

Because of Green House Effect, the average global temperature has increased, which is known as Global Warming.

The 2016 average temperatures were about 1.3 °C (2.3 degrees Fahrenheit) above the average in 1880 when global record-keeping began.

It is estimated that the difference between today’s temperature and the last ice age is about 5°C.

Global Warming is dangerous all life on earth.

The only way to deal with the change in climate is to reduce the emission of Green House Gases (GHGs) like Carbon Di Oxide and Methane.

From 30 November to 11 December 2015, the governments of 195 nations gathered in Paris, France, and discussed a possible new global agreement on climate change, aimed at reducing global greenhouse gas emissions and thus reduce the threat of dangerous climate change.

The 32-page Paris agreement with 29 articles is widely recognized as a historic deal to stop global warming.

Aims of Paris Agreement

As countries around the world recognized that climate change is a reality, they came together to sign a historic deal to combat climate change – Paris Agreement. The aims of Paris Agreement is as below:

Keep the global temperature rise this century well below 2 degrees Celsiusabove the pre-industrial level.

Pursue efforts to limit the temperature increase even further to 1.5 degrees Celsius.

Strengthen the ability of countries to deal with the impacts of climate change.

यूपीएससीची तयारी : मानवी भूगोल

UPSC-Human Geography Upsc Abn 97

96   08-Aug-2019, Thu

 यूपीएससी मुख्य परीक्षेतील सामान्य अध्ययन पेपर पहिलामधील मानवी भूगोल या विषयाची माहिती घेणार आहोत. या विषयातील लोकसंख्या भूगोल, वसाहत भूगोल आणि आर्थिक भूगोल या घटकाची परीक्षेच्या दृष्टीने उपयुक्त तयारी कशी करावी, याबाबत माहिती घेणार आहोत.

मानवी भूगोल या घटकावर २०१३ मध्ये ३; २०१४ मध्ये ५; २०१५ मध्ये ६; २०१६ मध्ये ५; २०१७ मध्ये ५; आणि २०१८ मध्ये ५ प्रश्न विचारण्यात आले होते. पहिल्या लेखामध्ये आपण मानवी भूगोलामध्ये समाविष्ट असणाऱ्या घटकांचा तसेच या घटकामध्ये कोणकोणत्या बाबींचा समावेश होतो याची माहिती घेतलेली आहे. मागील प्रश्नांच्या विश्लेषणावरून आपणाला सर्वाधिक प्रश्न कोणत्या घटकावर विचारण्यात आलेले आहेत याची माहिती मिळते.

*     २०१३मध्ये, भारतातील सुती उद्योग अत्यंत विकेंद्रित आहे, यासाठी कारणीभूत असलेल्या घटकांचे विश्लेषण करा, असा प्रश्न विचारण्यात आलेला होता. या प्रश्नांची योग्य उकल होण्यासाठी आपल्याला भारतातील सुती उद्योग, त्याचे विकेंद्रीकरण, भारताची प्राकृतिक रचना आणि उद्योगासाठी वेगवेगळ्या प्रदेशांतील पोषक वातावरण, कच्च्या मालाची उपलब्धता इत्यादीविषयी मूलभूत माहिती असणे गरजेचे आहे. या घटकामुळे भारतातील सुती उद्योग कशा पद्धतीने विकेंद्रित झालेला आहे याचे उदाहरणासह विश्लेषण अपेक्षित आहे.

*     २०१४ मध्ये, नैसर्गिक संसाधनाने समृद्ध म्हणून नावारूपाला येणाऱ्या आफ्रिकेतील आर्थिक क्षेत्रामध्ये भारत स्वत:चे स्थान कशा प्रकारे पाहतो? हा प्रश्न विचारण्यात आला होता. या प्रश्नाचा कल हा भारताच्या आफ्रिकेविषयी एकत्रित आखल्या गेलेल्या धोरणाचा भाग आहे. येथे काही महत्त्वाच्या पैलूंचा एकत्रित विचार करणे आवश्यक आहे. उदा. भारताने आफ्रिका खंडातील विविध देशांसोबत स्थापन केलेले संबंध, यातून भारताला होणारा फायदा, नैसर्गिक संसाधनाने समृद्ध असलेला अफ्रिका खंड. इ. या सगळ्याचा विचार करून भारत आफ्रिकेमधील आर्थिक क्षेत्रामध्ये आपले स्थान कशा प्रकारे पाहतो याची उत्तरामध्ये चर्चा करणे महत्त्वाचे आहे.

*     २०१५ मध्ये, ‘भारतातील स्मार्ट शहरे, स्मार्ट खेडय़ाशिवाय शाश्वत होऊ शकत नाहीत’ या विधानाची ग्रामीण व नागरी एकत्रीकरणाच्या पार्श्वभूमीवर चर्चा करा.

हा प्रश्न विचारण्यात आला होता. हा प्रश्न भारत सरकारने आखलेल्या स्मार्ट शहरे धोरणाशी संबंधित आहे. हा प्रश्न भारतातील नागरीकरण आणि ग्रामीण विकास या प्रक्रियेला आधारभूत मानून विचारण्यात आलेला होता. या प्रश्नाची योग्य उकल होण्यासाठी पुढील गोष्टी लक्षात घेणे आवश्यक आहे. उदा. स्मार्ट शहरे ही संकल्पना नेमकी काय आहे? स्मार्ट शहरे ही नेमकी कशी असणार आहेत? आणि याचा संबंध ग्रामीण भारतातील खेडय़ासोबत कशा प्रकारे येणार आहे? जर स्मार्ट शहरे ही शाश्वत करावयाची असतील तर यासाठी स्मार्ट खेडय़ाची आवश्यकता का आहे? तसेच भारतातील खेडे स्मार्ट बनविण्यासाठी नेमक्या कोणत्या उपाययोजना केल्या जात आहेत आणि यामुळे ग्रामीण व नागरी एकत्रीकरणाची प्रक्रिया कशी सुरू झालेली आहे, हा या प्रश्नाचा मुख्य रोख होता. त्याआधारे उत्तर लिहिणे अपेक्षित आहे.

*     २०१६ मध्ये, ‘सिंधू नदी पाणी करार (Indus Water Treaty) याची माहिती द्या आणि बदलत्या द्विपक्षीय संबंधाच्या पार्श्वभूमीवर याचे पर्यावरणीय, आर्थिक आणि राजकीय परिणामाचे परीक्षण करा.’ हा प्रश्न विचारण्यात आला होता.

या प्रश्नाचे सरळ दोन भाग पडतात. यातील पहिला भाग सिंधू नदी पाणी करार व यातील तरतुदी याची माहिती आणि दुसरा भाग सद्य:स्थितीतील भारत-पाकिस्तान यांच्यातील द्विपक्षीय संबंधांबाबत आहे. हा प्रश्न चालू घडामोडींशी संबंधित आहे. येथे प्रामुख्याने सिंधू नदीशी संबंधित प्राकृतिक माहिती आणि या दोन देशांमधील संबंध या दोन्हीची सांगड घालणे गरजेचे आहे. जर हा करार मोडीत निघाला अथवा यामध्ये काही एकतर्फी बदल केले गेले तर याचे नेमके परिणाम काय होऊ शकतात? हा प्रश्न भूगोलाशी संबंधित असल्यामुळे येथे पर्यावरणीय परिणामाची चर्चा करणे अधिक गरजेचे आहे. अशा पद्धतीने या प्रश्नाचे आकलन करून उत्तर लिहिणे क्रमप्राप्त ठरते.

*     २०१७ मध्ये, भारतात येणारे पूर जलसिंचनासाठी शाश्वत स्रोत आणि सर्व प्रकारच्या हवामानामध्ये अंतर्देशीय जलवाहतुकीसाठी कशा प्रकारे रूपांतरित करता येऊ शकतील? असा प्रश्न विचारला होता. या प्रश्नाचे योग्य आकलन होण्यासाठी पूर का येतात याची माहिती जी विषयाच्या पारंपरिक अनुषंगाने माहीत असणे गरजेचे आहे, तसेच याचा विकासासाठी कसा वापर करता येऊ शकतो हे सहउदाहरण स्पष्ट करावे लागते.

*     २०१८ मध्ये, मत्स्यपालन व याच्याशी सबंधित समस्या, औद्योगिक कॉरिडॉर आणि त्याची वैशिष्टय़े शहरी भाग व पावसाच्या पाण्याची साठवण प्रणाली, भारतीय प्रादेशिक नेव्हिगेशन उपग्रह प्रणाली (कफठरर) इत्यादीवर प्रश्न विचारण्यात आलेले होते.

या घटकाशी संबंधित बहुतांश प्रश्न हे भारताच्या आíथक भूगोलशी संबंधित आहेत, तसेच यातील काही प्रश्न भारत व जगाचा मानवी भूगोल यांचा एकत्रित विचार करून विचारण्यात आलेले आहेत. उपरोक्त प्रश्नांवरून आपणाला या विषयाचे पारंपरिक ज्ञान,  महत्त्वाच्या संकल्पना तसेच यासंबंधी घडणाऱ्या चालू घडामोडी इत्यादीची योग्य माहिती असणे गरजेचे आहे, हे लक्षात येते. या विषयाच्या सर्व घटकांची मूलभूत माहिती सर्वप्रथम अभ्यासावी. त्याकरिता आपणाला एनसीईआरटीच्या Fundamentals of Human Geography (XII), Indian People and Economy. (XII) या क्रमिक पुस्तकाचा आधार घेता येतो. परिणामी या विषयाचे सरळ व सोप्या भाषेत आकलन  करता येऊ शकते. या विषयाची र्सवकष तयारी करण्यासाठी Certificate Physical and Human Geography (by Goe Cheng Leong),  India A Comprehensive Geography  (by D.R. Khullar), World Geograhy  (by Majid Husain) यासारख्या संदर्भग्रंथांचा आधार घेता येऊ शकेल.

यूपीएससीची तयारी : जगाचा आणि भारताचा भूगोल (विषय ओळख)

UPSC-Geography Of The World And India Upsc Abn 97

698   25-Jul-2019, Thu

आजच्या लेखामध्ये आपण मुख्य परीक्षेच्या पेपर एकमधील जगाचा आणि भारताचा भूगोल या विषयाचे स्वरूप आणि व्याप्ती याची चर्चा करणार आहोत. या विषयाच्या अभ्यासक्रमामध्ये जगाच्या प्राकृतिक भूगोलाचे प्रमुख वैशिष्टय़, जगभरातील महत्त्वाच्या नैसर्गिक साधनसंपत्तीचे वितरण (दक्षिण आशिया आणि भारतीय उपखंड यासह), जगाच्या विविध (भारतासह) प्रदेशांतील प्राथमिक, द्वितीय आणि तृतीय क्षेत्रातील उद्योगाच्या स्थाननिश्चितीसाठी जबाबदार असणारे घटक आणि त्यांचे स्थान, निर्णायक भौगोलिक वैशिष्टय़ांमधील बदल (जलाशये आणि हिमाच्छादने) आणि महत्त्वाच्या भूप्राकृतिक घटना / घडामोडी उदा. भूकंप, सुनामी, ज्वालामुखी सक्रियता, चक्रीवादळे इत्यादी; भौगोलिक वैशिष्टय़े, वनस्पती आणि त्यांच्या प्रजाती, या बदलाचे परिणाम इत्यादी घटक नमूद करण्यात आले आहेत. थोडक्यात याचे वर्गीकरण प्राकृतिक भूगोल आणि मानवी भूगोल (सामाजिक आणि आर्थिक) अशा पद्धतीने करावे लागणार आहे व याचा अभ्यास जगाचा आणि भारताचा भूगोल अशा दोन भागांमध्ये विभागून करावा लागणार आहे.

प्राकृतिक भूगोल हा भूगोल या विषयाचा गाभा मानला जातो. कारण याअंतर्गत पृथ्वीचा  सर्वागीण अभ्यास केला जातो. यामध्ये शिलावरण, वातावरण, जलावरण, जीवावरण आणि पर्यावरण इत्यादीशी संबंधित माहितीचा अभ्यास करावा लागतो. प्राकृतिक भूगोल हा भूगोल या विषयातील सर्वाधिक कठीण घटक आहे. कारण हा संकल्पनात्मक बाबीशी अधिक जवळीक साधणारा आहे म्हणून या घटकाचे योग्य आकलन होण्यासाठी या घटकाशी संबंधित संकल्पनांचे योग्य आकलन असणे गरजेचे आहे. शिलावरण यामध्ये खडक, पृथ्वीचे कवच, अंतरंग, अंतरंगातील प्रक्रिया, भू-अंतर्गत व भू-बाह्य बले यांचा अभ्यास करावा लागतो. शिलावारणाचा अभ्यास करणाऱ्या विषयाला भूरूपशास्त्र म्हणतात. या विषयामध्ये भूकंप, ज्वालामुखी उद्रेक, विविध कारकांद्वारे निर्मित भूरूपे या घटकांवर निश्चितपणे प्रश्न विचारले जातात. सद्य:स्थितीतील चालू घडामोडीचे महत्त्व पाहता उपयोजित भूरूपशास्त्रासारख्या चालू घडामोडीशी संबंधित घटकांवर प्रश्न विचारला जाण्याची शक्यता आहे. वातावरणाचा अभ्यास हवामानशास्त्र या विषयामध्ये केला जातो. या घटकामध्ये वातावरणाचे घटक, रचना, हवेचे तापमान व दाब, वारे, मान्सून, जेट प्रवाह, वायुराशी, आवर्त, वृष्टी आणि भारताचे हवामान यांचा अभ्यास करावा लागतो. या विषयामध्ये चालू घडामोडीच्या दृष्टिकोनातून जागतिक तापमानवाढ, हवामान बदल, अनपेक्षित हवामानशास्त्रीय घटनांचा अभ्यास करावा लागतो. जलावरणाचा अभ्यास सागरशास्त्र या विषयामध्ये केला जातो. या घटकामध्ये सागरतळ रचना, सागरी साधनसंपत्ती, सागरजल तापमान, क्षारता, सागरजलाच्या हालचाली यांचा अभ्यास करावा लागतो. या घटकासंदर्भात चालू घडामोडीमधील सागरमाला प्रकल्प, मोत्यांची माळ रणनीती, सागरी हद्दीवरून शेजारील राष्ट्राबरोबर उद्भवणारे वाद या घटकांचा अभ्यास अत्यावशक आहे. जीवावरण घटकाचा अभ्यास जैवभूगोल या घटकामध्ये केला जातो. या घटकावर येणाऱ्या प्रश्नांची संख्या कमी आहे. या घटकामध्ये सजीवांचे वितरण, त्यांच्या हालचाली, त्यांच्यावर होणारा मानवी

हस्तक्षेपाचा परिणाम इत्यादी घटकांचा अभ्यास करावा लागतो. पर्यावरण घटकाचा अभ्यास पर्यावरण भूगोलमध्ये केला जातो. पर्यावरणाच्या नैसर्गिक स्थितीच्या अभ्यासामध्ये पर्यावरण परिस्थितिकी, परिसंस्था या संकल्पनांचा अभ्यास करावा. या घटकामध्ये सर्वात महत्त्वाचा मुद्दा मानवी हस्तक्षेपामुळे होणारा पर्यावरणाचा ऱ्हास हा आहे. यामध्ये सर्वात गंभीर समस्या म्हणजे हरितगृह परिणाम व जागतिक तापमानवाढ होय. त्याचप्रमाणे जैवविविधतेतील घट, विविध प्रकारचे प्रदूषण, आम्लवर्षां, वाळवंटीकरण, पाणथळ भूमीचा ऱ्हास, निर्वनीकरण या घटना सविस्तर अभ्यासाव्यात. या समस्यांवर उपाय काढण्यासाठी राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रयत्न झाले आहेत. भारतामध्ये केंद्र सरकारने आखलेल्या योजना, कायदे यांची माहिती घ्यावी. आंतरराष्ट्रीय पातळीवरील प्रयत्न उदा. क्योटो करार, पॅरिस परिषद, मॉन्ट्रियल करार, रामसार करार यांचा चालू घडामोडीच्या अनुषंगाने अभ्यास आवश्यक आहे.

मानवी भूगोल याअंतर्गत सामाजिक (लोकसंख्या भूगोल व वसाहत भूगोल) आणि आर्थिक भूगोल इत्यादीशी संबंधित माहिती अभ्यासावी लागते. या विषयाची उपरोक्त वर्गीकरणानुसार थोडक्यात उकल करून घेऊ या. मानवी भूगोलामध्ये मानवाच्या लोकसंख्येचा अभ्यास केला जातो.

यामध्ये लोकसंख्याशास्त्रीय घटक उदा. लोकसंख्यावृद्धी, जन्मदर वितरण, मृत्युदर, लिंग गुणोत्तर, कार्यकारी वयोगटातील लोकसंख्या, लोकसंख्या

लाभांश या घटकांचा २०११च्या जणगणनेच्या आकडेवारीनुसार अभ्यास करणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे स्थलांतर, त्यांची कारणे, प्रकार, परिणाम हा घटक चालू घडामोडीच्या अनुषंगाने अभ्यासणे आवश्यक आहे. या घटकांत लोकसंख्याविषयक समस्या, भारताचे लोकसंख्या धोरण, चीनचे जुने लोकसंख्या धोरण व त्याचे सक्तीने अवलंबन केल्याने उद्भवलेले दुष्परिणाम अभ्यासणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे लोकसंख्याविषयक महत्त्वाच्या संकल्पना उदा. वंश, जमात, जात, धर्म, सांस्कृतिक प्रदेश, भाषा इत्यादी. वसाहत भूगोलामध्ये मानवाच्या ग्रामीण व नागरी वसाहतीचा अभ्यास केला जातो. जागतिकीकरणाची अंमलबजावणी केल्यानंतर भारतातील नागरीकरणाचा वेग वाढला आहे. परिणामी स्थलांतर मोठय़ा प्रमाणात वाढून ग्रामीण व नागरी प्रदेशामध्ये समस्या निर्माण झाल्या आहेत. त्या सोडविण्यासाठी एू किंवा रें१३ ज्या योजना राबविल्या जात आहेत त्याचा सखोल अभ्यास करणे आवश्यक आहे. वसाहतीचा अभ्यास करताना वसाहतीचे प्रकार, प्रारूप, स्वरूप या घटकांवरदेखील भर देणे आवश्यक आहे.

आर्थिक भूगोलामध्ये मानवी आर्थिक प्रक्रिया व नैसर्गिक साधनसंपत्तीचा अभ्यास केला जातो. मानवाच्या आर्थिक प्रक्रियांचा अर्थ, त्यांचे प्रकार, उदाहरणे; त्यांची विकसनशील राष्ट्रांमधील स्थिती अभ्यासली जाते. राष्ट्रातील आर्थिक प्रक्रियांचा अभ्यास करताना कृषी, उद्योग, सेवाक्षेत्रे यांमधील सद्य:स्थिती, त्याबाबतचे सरकारी धोरण, योजना यांचा चालू घडामोडीच्या दृष्टिकोनातून अभ्यास आवश्यक आहे. उदा. भारतातील प्रस्थावित दुसरी हरितक्रांती, मेक इन इंडिया योजना इत्यादी.

उपरोक्त नमूद घटकांच्या आधारे आपणाला एखाद्या प्रदेशाचा अभ्यास करावा लागतो तेव्हा त्यास प्रादेशिक भूगोल असे संबोधले जाते. वढरउ च्या अभ्यासक्रमामध्ये जगाचा आणि भारताचा भूगोल समविष्ट आहे; वरील सर्व अभ्यासक्रमांव्यतिरिक्त भूगोल विषयामध्ये नकाशावर आधारित प्रश्न विचारले जातात. उदा. सद्य:स्थितीत घडलेली एखादी घटना, घटनेचे स्थान नकाशावर शोधावे लागते. या घटना भौगोलिक किंवा इतर विषयांशी संबंधित असतात. नकाशावर आधारित इतर प्रश्नांमध्ये पूर्णत: भौगोलिक स्वरूपाचे परंपरागत ज्ञानावर आधारित विचारले जातात.

यूपीएससी पूर्वपरीक्षा : भूगोल II

upsc-preliminary-examination-geography-ii/articleshow/68604811.cms

4192   14-Apr-2019, Sun

सुशील तुकाराम बारी 

यूपीएससी पूर्वपरीक्षा २०१८ मध्ये भूगोल या विषयाचे प्रश्न व त्यांचे विश्लेषण आपण बघत आहोत. कृषी घटकांवरील उर्वरीत प्रश्न व इतर प्रश्न आपण या लेखात पाहणार आहोत. 

२०१८ मध्ये कृषी या घटकावर आधारित प्रश्न पाहा. 

Q. Cosider the following 

1. Birds, 2. Dust blowing, 3. Rain, 4. Wind blowing 

Which of the above spread plant diseses? 

a) 1 and 3 only 

b) 3 and 4 only 

c) 1, 2 and 4 only 

d) 1, 2, 3 and 4 

Ans - d 

अशा प्रकारचे प्रश्न नियमितपणे आयोगाद्वारे विचारले जातात. एखाद्या बाबींसाठी जबाबदार असलेले घटक विचारण्याची आयोगाची वृत्ती आणि 

नियमितपणे पाहू शकतो. वृक्ष/ पिके यात आजार पसरविण्यासाठी वरील सर्व घटक जबाबदार असतात. ते Disease (assing organism) ला एका ठिकाणाहून दुसरीकडे घेऊन जातात. त्यामुळे असे आजार पसरतात. हा प्रश्न Knowlege based पेक्षा sense of humour ने आपण सोडवू शकतो. प्रश्न नीट वाचून विचारांची योग्य दिशा आपणास उत्तरापर्यंत घेऊन जातो. 

२०१६ मध्ये आयोगाद्वारे अशा आशयाचा प्रश्न विचारलेला आहे 

Q. Which of the following statements is/are correct? 

Virues can infect 

1. Bacteria, 2. fungi, 3. plants, 

select the correct answer using the code given below. 

a) 1 and 2 only 

b) 3 only 

c) 1 and 3 only 

d) 1, 2 and 3 

Ans - d 

कृषी संबंधी प्रकाशित होणारे अहवाल जसे "NSSO 70th Round" यावरही प्रश्न २०१८ मध्ये आयोगाने विचारलेला आहे. 

Q. As per the NSSO 70th Round Sitantion Assessment survery of Agricultural households Consider the following statements. 

1. Rajasthan has the highest percentagae share of agricultural households among its rural households. 

2. Out of the total agricultural households in the country, a little over 60 percent belong to OBCS. 

3. In kerala, a litte over 60 percent of agricultural households reported to have received maximum income from sources other than agriculturall activities. 

Which of the statements given above is/are correct? 

a) 2 and 3 only 

b) 2 only 

c) 1 and 3 only 

d) 1, 2 and 3 

Ans - c 

असा प्रश्न सोडविण्यासाठी अहवालांचे स्पर्धापरीक्षा तेही 
UPSC ला समोर ठेवून गतवर्षीच्या प्रश्नांच्या आधारे वाचन असायला हवे. जर आपण अहवाल वाचला असेल तरीही भूगोल विषयातील 'कृषी घटक' NCERT वा संदर्भपुस्तकातून नीट वाचला असेल तर पहिले विधान योग्य आहे हे स्पष्ट होते. तेच विधान क्र. ३ लागू होते. परंतु एकंदर OBC चा विचार करता दुसरे विधान योग्य असण्याची शक्यता फार धूसर आहे तेव्हा ते विधान बाहेर काढावे. २०१८मध्ये काही प्रश्न खूप तथ्यात्मक (facts) आहेत. 

२०१८मधील तथ्यात्मक (fact based) प्रश्न पाहूया. 

Q. Consider the following statements. 

1. The Earths magnetic field has reversed every few hundred thousand years. 

2. When the Earth was created more than 4000 million years ago, there was 54% oxygen and no carbon dioxide 

3. When living organisms originated, they modified the early atmosphere of the Earth. 

Which of the statements given above is/are corect? 

a) 1 only 

b) 2 and 3 only 

c) 1 and 3 only 

d) 1, 2 and 3 

Ans - a 

पृथ्वीच्या उत्पत्तीसंबंधी तथ्यांवर आधारित असलेला हा प्रश्न आहे. २०१७ व २०१८ मधील प्रश्नांनी आपण फक्त मूलभूत संकल्पनांवर (Basic Cmcept) विसंबून न राहता मूलभूत संकल्पनांबरोबरच तथ्यांचाही अभ्यास करणे गरजेचे आहे. हे स्पष्ट केले आहे. त्यामुळे भूगोल विषयातील व इतर विषयातील तथ्यांवर विशेष लक्ष्य देणे गरजेचे आहे, हे विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यावे. 

प्राकृतिक भूगोल (मुलभूत अभ्यास)

geography field of study

17219   06-Jun-2018, Wed

मुख्य परीक्षा पेपर एकमधील भूगोल घटकाच्या तयारीबाबत या व पुढील लेखामध्ये चर्चा करण्यात येत आहे.

या विषयाच्या तयारीमध्ये भौगोलिक संज्ञा, संकल्पना पक्क्या करून घेणे खूप महत्त्वाचे आहे. भूगोल विषयाचे प्राकृतिक, आर्थिकव सामाजिक असे ठळक तीन उपविभाग करून त्यांचा त्याच क्रमाने अभ्यास केल्यास समजून घेणे आणि लक्षात ठेवणे सोपे होईल. विज्ञानाच्या अभ्यासाप्रमाणे भूगोलाचा अभ्यासही व्याख्या (definition) व प्रक्रियांचा संकल्पनांवर आधारित अभ्यास कमी वेळेत चांगले आकलन होण्यास मदतगार ठरतो.

अभ्यासामध्ये काही ठळक बाबींचा क्रम लावून घ्यायला हवा. सगळ्यात आधी महत्त्वाच्या संज्ञा व संकल्पना समजावून घ्यायला हव्यात. यानंतर निरनिराळ्या भौगोलिक प्रक्रिया (उदा. भूरूप निर्मिती, भूकंप/ वादळ इत्यादींची निर्मिती) समजून घेणे आवश्यक आहे. त्यानंतर तथ्यात्मक बाबी व विश्लेषणात्मक व उपयोजित मुद्दे अभ्यासावेत.

प्राकृतिक भूगोल –

भूगोलाच्या शाखा, पृथ्वीची उत्पत्ती, रचना, पृथ्वीचे कलणे, वातावरण, अक्षांश, रेखांश, हवामानाचे घटक, प्रमाण वेळ इ. पायाभूत संकल्पना व्यवस्थित समजून घ्याव्यात.

भारतातील हिमालयीन व द्विकल्पीय नदी प्रणालींचा तुलनात्मक अभ्यास आवश्यक आहे. नदी प्रणालींच्या अभ्यासातच कृषी घटकातील जलव्यवस्थापनातील (पाण्याची गुणवत्ता, भूजल व्यवस्थापन, नदीजोड प्रकल्प, rainwater harvesting महत्त्वाच्या संकल्पना अभ्यासायला हव्यात. यामुळे पाणी या नसíगक संसाधनाचा मूलभूत अभ्यास पूर्ण होईल. कृषी व इतर कारणांसाठी वापर, व्यवस्थापन इ. मुद्दे कृषीविषयक घटकाच्या तयारीमध्ये समाविष्ट करता येतील.

भौगोलिक घटना/ प्रक्रिया

 • मान्सूनची निर्मिती, वितरण, भारताच्या/ महाराष्ट्राच्या दृष्टीने महत्त्व, ऋतूंची निर्मिती, मृदा निर्मिती, समुद्री प्रवाह, भूकंप, ज्वालामुखी इ. प्रक्रिया पूर्व, मुख्य परीक्षेतील इतर घटक विषयांच्या तयारीसाठीसुद्धा महत्त्वाच्या आहेत.
 • कोणत्याही भौगोलिक घटना/ प्रक्रियेच्या अभ्यासामध्ये पुढील मुद्दे समजून घ्यायला हवेत 2 भौगोलिक व वातावरणीय पाश्र्वभूमी; घटना घडू शकते/ घडलेली भौगोलिक ठिकाणे; प्रत्यक्ष घटना/ प्रक्रियेचे स्वरूप; घटनेचे/ प्रक्रियेचे परिणाम; पर्यावरणीय बदलांमुळे घटनेवर/ प्रक्रियेवर होणारे परिणाम; असल्यास आर्थिकमहत्त्व; भारतातील, महाराष्ट्रातील उदाहरणे; नुकत्याच घडलेल्या महत्त्वाच्या घटना/ प्रक्रिया (current events)

भूरूप निर्मिती

 • भूरूप निर्मिती हा घटक पर्यावरणीय दृष्टिकोनातूनही महत्त्वाचा आहे. भूरूप निर्मितीचा वारा, नदी, हिमनदी व समुद्र या चार कारकांच्या शीर्षकाखाली मुद्दय़ांच्या वा टेबलच्या स्वरूपात नोट्स काढता येतील. प्रत्येक कारकाकडून होणाऱ्या अपक्षयामुळे होणारी भूरूपे व संचयामुळे होणारी भूरूपे असे विभाजन करता येईल. भूरूपांमधील साम्यभेदांचीही नोंद घ्यावी लागेल.
 • प्रत्येक भूरूपासाठी उपलब्ध असल्यास जागतिक पातळीवरील प्रसिद्ध उदाहरण, भारतातील व असल्यास महाराष्ट्रातील उदाहरण नमूद करावे.
 • भूरूपांपकी केवळ प्रसिद्ध नद्या, पर्वत, सरोवरे इ.चाच अभ्यास केल्यास ताण थोडा कमी होईल.
 • भारतातील व महाराष्ट्रातील खडकांचे प्रकार आíथकदृष्टय़ा महत्त्वाचे असल्याने या भागाचा परिपूर्ण अभ्यास करायला हवा.

भौतिक भूगोल

 • भौतिक भूगोलामध्ये नकाशावर आधारित किंवा बहुविधानी किंवा जोडय़ा लावणे अशा प्रकारचे संकल्पनात्मक प्रश्न विचारले जातात. यासाठी भूगोलाचा अभ्यास नकाशा समोर ठेवून करायला हवा. नदी प्रणाली, पर्वत प्रणाली, प्राकृतिक विभाग, मान्सूनचे वितरण इ.बाबत भौतिक भूगोलातून प्रश्न विचारले जाऊ शकतात.
 • जागतिक भूगोलात फक्त प्रसिद्ध नद्या, पर्वत, प्राकृतिक विभाग इ.चा टेबल फॉरमॉटमध्ये तथ्यात्मक अभ्यास पुरेसा आहे.
 • भारतातील पर्वत प्रणालीचा नकाशावरील अभ्यास करतानाच त्यांचे आर्थिकमहत्त्व, पर्जन्यनिर्मिती व हवामान इत्यादीमधील महत्त्व या बाबींचाही अभ्यास आवश्यक आहे.

या सर्व भौगोलिक संकल्पना समजून घेतल्यावर पर्यावरणीय भूगोलाच्या संकल्पनांचा अभ्यास करणे संयुक्तिक ठरते. त्यानंतर भौगोलिक चालू घडामोडी समजून घेणे सोपे होते.

पर्यावरणीय घटक

 • पर्यावरणीय भूगोलातील पर्यावरणाचा ऱ्हास, जागतिक तापमानवाढ, हरितगृह, परिणाम, जैवविविधतेचा व वनांचा ऱ्हास, कार्बन क्रेडिट या संकल्पना अत्यंत बारकाईने अभ्यासणे आवश्यक आहे. मूलद्रव्यांचे चक्र, अन्नसाखळी व अन्न जाळे या बाबी समजून घ्याव्यात. हा सगळा संकल्पनात्मक अभ्यास ठउएफळ च्या पुस्तकातून करणे आवश्यक आहे.
 • पश्चिम घाटाची रचना, भौगोलिक वैशिष्टय़े, जैवविविधता, संवर्धनाबाबत समस्या, कारणे, उपाय, संबंधित राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय चालू घडामोडी असा परिपूर्ण अभ्यास महत्त्वाचा आहे.
 • पर्यावरणविषयक कायदे घटकाची पेपर २ च्या विधीविषयक घटकातूनच तयारी करावी.

दूरसंवेदन

 • दूरसंवेदनासाठी कार्यरत असलेले उपग्रह, त्यांची काय्रे, या क्षेत्रातील भारताची वाटचाल समजून घेणे आवश्यक आहे.
 • दूरसंवेदनामध्ये वापरले जाणारे तंत्रज्ञान व त्याचे उपयोजन, त्यातून मिळणाऱ्या नकाशांचे वाचन करण्याची पद्धत, मिळणाऱ्या माहितीचे स्वरूप समजून घेणे आवश्यक आहे. 

यूपीएससी पूर्वपरीक्षा - भूगोल ‘नकाशा’

upsc-preliminary-examination-geography-map/articleshow/68694534.cms

365   06-Apr-2019, Sat

यूपीएससी पूर्वपरीक्षेत 'जगाचा व भारताचा नकाशा' यावर नियमितपणे प्रश्न विचारले जातात. गतवर्षीच्या प्रश्नपत्रिकांवरून नेमके नकाशातील काय समजून घेतले पाहिजे ते स्पष्ट होते. २०१९ ची पूर्वपरीक्षा समोर ठेवून २०१८ मधील नकाशावरील प्रश्न आपण समजून घेऊ. हे प्रश्न समजून घेण्यासाठी प्रश्न बघताना तुमच्या हातात नकाशा असायला हवा हे लक्षात ठेवा. 

२०१८ मध्ये जगाच्या नकाशाशी संबंधित विचारलेला प्रश्न पाहूया. 

Q. Consider the following pairs 

Regions sometimes mentioned in news Country 

1. Catalonia Spain 

2. Crimea Hungary 

3. Mindanao Philippines 

4. Oromia Nigeria 

Which of the pairs given above are correctly matched? 

a) 1, 2 and 3 

b) 3 and 4 only 

c) 1 and 3 only 

d) 2 and 4 only 

Ans : c 

वरील प्रश्नात काही प्रदेशांची नावे दिली आहेत. ते प्रदेश कोणत्या देशाशी संबंधित आहेत हे आपल्याला ओळखावयाचे आहे. असे प्रश्न सोडविण्यासाठी वर्तमानपत्रांचे वाचन नियमितपणे करणे व त्यातील चर्चेतील ठिकाणे नकाशात पाहात राहणे ही प्रक्रिया उपयुक्त ठरते. 

'Oromia' हा इथोपिया या देशातील प्रदेश आहे. तर 'Crimea' युक्रेनशी संबंधित आहे. त्यामुळे वरील प्रश्नाचे उत्तर हे 'c' आहे. २०१८ मध्ये आयोगाने अशाच आशयाचा अजून एक प्रश्न विचारला होता. त्या प्रश्नात शहर व देश असा संबंध विचारलेला असून तो प्रश्न आपण पाहू. 

Consider the following pairs 

Towns sometimes mentioned in news Country 

1. Aleppo Syria 

2. Kirkuk Yemen 

3. Mosul Palestine 

4. Mazar i Sharif Afghanistan 

Which of the pairs given above are correctly matched? 

a) 1 and 2 

b) 1 and 4 

c) 2 and 3 

d) 3 and 4 

Ans : b 

२०१५ च्या यूपीएससी पूर्वपरीक्षेत अशाच आशयाचा प्रश्न विचारला आहे; परंतु तो एकाच प्रदेशाच्या बाबतीत आहे. तोही प्रश्न आपण पाहूयात... 

Q. The area known as 'Golan Heights' sometimes appears in the news in the context of the events related to... 

a) Central Asia 

b) Middle East 

c) South-East Asia 

d) Central Africa 

Ans : b 

यावरून हे स्पष्ट होते की गेल्या एक वर्षातील प्रदेश व शहरे जी जगभरात या ना त्या कारणाने चर्चेत आहेत त्यांचा अभ्यास व नकाशा समोर ठेवून करणे गरजेचे आहे. 

वरील सर्व प्रश्न हे चालू घडामोडींशी संबंधित आहेत. नकाशावरून मूलभूत संकल्पनांशी आधारित तथ्यावरही प्रश्न विचारले जातात. तशाच प्रकारचा एक प्रश्न २०१८ मध्येही विचारला गेला होता. तो प्रश्न पाहूयात... 

पान नं ३ 

Q. Among the following cities, which one lies on a longitude closest to that of Delhi? 

a)Bengaluru 

b)Hyderabad 

c)Nagpur 

d)Pune 

Ans - a 

या प्रश्नाला सामोरे जाण्यासाठी तुम्हाला 'Longitude' ही संकल्पना माहित असणे गरजेचे आहे. भारताचा राजकीय नकाशा समोर ठेवून पाहिल्यास दिल्ली - २८ ० ४०'N आणि ७७ ० २०' E च्या जवळ Longitude चा विचार केल्यास Bengaluru हे शहर - ७७ ० २८'E असल्यामुळे इतर शहरांपेक्षा जवळ आहे. या प्रश्नाला सामोरे जाण्यासाठी जशी 'Longitude' ही संकल्पना माहित असावी लागते तशीच वरील शहरे नेमकी भारतातील नकाशात कुठे आहेत हेही माहित असणे गरजेचे आहे. 

२०१९ पूर्व परीक्षेसाठी नकाशात खाली बाबी अभ्यासा : 

- चालू घडामोडीतील जगातील व भारतातील चर्चेतील शहरे 

- चालू घडामोडीतील जगातील व भारतातील प्रदेश 

-Water bodis (समुद्र, नदी, तलाव इ.) चा जग व भारताच्या अनुशंगाने अभ्यास करणे, ज्यात ते कुठे आहेत, त्यांच्या आजूबाजूला असणारे प्रदेश व देश, नद्यांचा उगम व त्यांचा मार्ग इ. 

उदा.: २०१७ च्या पूर्वपरीक्षेत Mediterranean समुद्राच्या किनाऱ्याला लागून असलेल्या देशांवर प्रश्न विचारला आहे. 

-विशिष्ट 'देश' वा 'प्रदेश' जे दोन किंवा त्यापेक्षा अधिक जलप्रदेशांशी संबंधीत आहेत. उदा. तुर्की (Turkey) 

-विशिष्ट भूभाग जसे की Horn of Africa 

-विविध बंदरे व समुद्र, नदी व देश उदा. माले (मालदिव) 

- 8 degree, 9 degree, 10 degree channel इ. 

वरील घटकांचा २०१९ च्या पूर्वपरीक्षेच्या दृष्टिकोनातून अभ्यास विद्यार्थ्यांनी करणे आवश्यक आहे. 

 

यूपीएससीची तयारी : सामाजिक, आर्थिक भूगोल

article-on-social-economic-geography-1869423/

373   05-Apr-2019, Fri

आर्थिक व सामाजिक भूगोलाचा अभ्यास भारत व जगाच्या अनुषंगाने करावा लागेल. या घटकांच्या अभ्यासाचे नियोजन करताना यामध्ये कोणकोणते उपघटक समाविष्ट आहेत याची माहिती असणे क्रमप्राप्त आहे. गतवर्षीच्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण केल्यास कोणत्या घटकावर अधिक प्रश्न विचारलेले आहेत याची माहिती मिळते.

आर्थिक भूगोलामध्ये प्रामुख्याने मानवी आर्थिक प्रक्रिया व नसíगक साधनसंपत्ती यांचा अभ्यास केला जातो. राष्ट्रातील आर्थिक प्रक्रियांचा अभ्यास करताना कृषी, उद्योग, सेवाक्षेत्र यामधील सद्य:स्थिती, त्याबाबतचे सरकारी धोरण, योजना यांचा चालू घडामोडींच्या दृष्टिकोनातून आढावा घ्यावा. उदा. भारतातील दुसरी हरितक्रांती, मेक इन इंडिया इत्यादी.

आर्थिक भूगोलावर पूर्वपरीक्षेमध्ये विचारलेला प्रश्न पाहू –

२०१८ – भारतीय कृषी क्षेत्राच्या संदर्भामध्ये ‘संवर्धन कृषी’ या संकल्पनेचे महत्त्व वाढत आहे. खालीलपकी कोणकोणत्या बाबी कृषी संवर्धनांतर्गत येतात? –

(१) एकपिक पद्धती टाळणे.

(२) न्यूनतम लागवडीखालील क्षेत्र

(३) प्लांटेशन क्रॉप्सची लागवड टाळणे.

(४) मृदेचा पृष्ठभाग आच्छादीत करण्यासाठी पिकांच्या अवशेषाचा वापर (५) स्थानिक व काल्पिक पीक आवर्तनाचा स्वीकार करणे.

२०१६ – खालीलपैकी कोणत्या प्रदेशात शेल गॅस संसाधने आढळतात?

(१) बेसीन (२) कावेरी बेसीन

(३) कृष्णा-गोदावरी बेसीन.

२०१५ – सस्टेनेबल शुगरकेन इनिशिएटीव्हचे महत्त्व काय आहे?

२०१४ – इंटिग्रेटेड वॉटरशेड डेव्हलपमेंट प्रोग्राम या अंमलबजावणीचे फायदे काय आहेत?

२०१३ – भारतातील खालीलपैकी कोणते उद्योग पाण्याचे अधिक उपभोक्ते आहेत?

(१) अभियांत्रिकी

(२) पेपर व पल्प

(३) टेक्सटाइल्स

(४) औष्णिक ऊर्जा.

२०१३ – यापैकी कोणती पिके खरीप आहेत?

(१) कापूस   (२) भुईमूग

(३) भात   (४) गहू

आर्थिक भूगोलाचा अभ्यास चालू घडामोडींच्या अनुषंगाने करणे हितावह ठरेल. उदा. गेल्या काही वर्षांमध्ये शेल गॅस या संसाधनाची चर्चा सुरू होती. त्या संदर्भामध्ये शेलगॅसवर आधारित प्रश्न २०१६ मध्ये विचारला होता.

सामाजिक भूगोलामध्ये लोकसंख्या भूगोल, वसाहत भूगोल यांचा अभ्यास करावा लागतो. लोकसंख्या भूगोलामध्ये विविध लोकसंख्या शास्त्रीय घटक उदा. लोकसंख्यावृद्धी, वितरण, जन्मदर, मृत्यूदर, लिंग गुणोत्तर, कार्यकारी वयोगटातील लोकसंख्या, लोकसंख्या लाभांश इ. घटकांची माहिती करून घ्यावी. यासोबतच स्थलांतराची कारणे, प्रकार, परिणाम, अभ्यासावे. भारताचे लोकसंख्या धोरण, लोकसंख्याविषयक महत्त्वाच्या संकल्पना, वंश, जमात, जात, धर्म, सांस्कृतिक प्रदेश, भाषा इ. बाबींचा आढावा घेणे महत्त्वाचे ठरते.

वसाहत भूगोलामध्ये मानवाच्या ग्रामीण व नागरी वसाहतींचा अभ्यास केला जातो. भारताचा औद्योगिक विकास झाल्यानंतर स्थलांतर मोठय़ा प्रमाणात वाढून ग्रामीण व नागरी क्षेत्रांमध्ये समस्या निर्माण झाल्या. तसेच या समस्यांवर सरकारकडून विविध धोरणे अवलंबिली जातात.

उदा. स्मार्ट सिटी. याचा सखोल अभ्यास करणे आवश्यक आहे.

२०१४ मध्ये चांगपा (Changpa) या जमातीविषयी प्रश्न विचारण्यात आला होता.

२०१३ मध्ये जमातींची नावे व त्यांचे राज्य यांच्या योग्य जोडय़ा लावण्याचा प्रश्न आला होता. असे काही प्रश्न सामाजिक भूगोलाच्या पार्श्वभूमीवर अभ्यासता येतील.

भूगोलामध्ये पर्यावरण भूगोल हा घटक देखील महत्त्वाचा आहे. पूर्वपरीक्षेच्या अभ्यासक्रमामध्ये भूपर्यावरण हा स्वतंत्र घटक आपल्याला अभ्यासावा लागतो. यामध्ये प्रामुख्याने मानवी हस्तक्षेपामुळे होणारा पर्यावरणाचा ऱ्हास अभ्यासणे आवश्यक आहे. सध्याची सर्वात गंभीर समस्या म्हणजे हरितगृह परिणाम व जागतिक तापमान वाढ होय. यासोबतच जैवविविधतेतील घट, विविध प्रकारचे प्रदूषण, आम्लवर्षां, वाळवंटीकरण, पाणथळ भूमींचा ऱ्हास, निर्वनीकरण या घटनांचा सखोलपणे अभ्यास करणे आवश्यक आहे. या समस्यांवर उपाय काढण्यासाठी राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवरील प्रयत्नांची नोंद घ्यावी.

प्रदूषणासंदर्भात २०१८ मध्ये पुढील प्रश्न विचारला होता –

नदीतळातून मोठय़ा प्रमाणात वाळू उपसा केल्याने खालीलपैकी कोणते गंभीर परिणाम संभवतात?

(१) नदीच्या क्षारतेमध्ये घट  (२)भूजलाचे प्रदूषण

(३)भूजल पातळी खालावणे.

यूपीएससी पूर्वपरीक्षा : भूगोलाची तयारी

upsc-exam-2019-useful-tips-for-upsc-exam-preparation-1868282/

464   02-Apr-2019, Tue

प्रस्तुत लेखामध्ये यूपीएससी पूर्वपरीक्षेकरिता भूगोल अभ्यासघटकाविषयी माहिती घेणार आहोत. भूगोलाची व्याप्ती व परीक्षेतील वेटेज लक्षात घेता परीक्षार्थीना निश्चितच योग्य रणनीतीचा अवलंब करणे क्रमप्राप्त आहे. संकल्पना स्पष्ट करून घेतल्यास हा विषय अत्यंत सुलभ बनवता येतो. दरवर्षी भूगोल या विषयावर किमान १५ ते २० प्रश्न विचारले जातात. २०१८ सालच्या पूर्वपरीक्षेत १० प्रश्न विचारण्यात आले होते.

सर्वप्रथम आपण प्राकृतिक भूगोल या अभ्यासघटकांची तयारी कशी करावी याची माहिती घेऊ.

प्राकृतिक भूगोलामध्ये पृथ्वीचा सर्वागीण अभ्यास केला जात असल्याने त्यास भूगोल विषयाचा गाभा मानला जातो. यामध्ये शिलावरण, वातावरण, जलावरण, जीवावरण आणि पर्यावरण इत्यादी घटक अभ्यासावे लागतात. प्राकृतिक भूगोल हा घटक संकल्पनात्मक बाबींशी अधिक जवळीक साधणारा आहे. परिणामी या सर्व घटकांचे पारंपरिक ज्ञान सर्वप्रथम अभ्यासावे लागते.

भूरूपशास्त्रामध्ये खडक, पृथ्वीचे कवच, अंतरंग, अंतरंगातील प्रक्रिया अभ्यासाव्या लागतात. यात जगातील ज्वालामुखी व भूकंपप्रवण क्षेत्रे, मुख्य नद्यांची खोरी, इ. महत्त्वपूर्ण घटक आहेत.

सागरशास्त्र (Oceanography) मध्ये सागरतळ रचना, सागरी साधनसंपत्ती, सागरजल तापमान, सागराची क्षारता, सागरी प्रवाह, प्रवाळभित्तिका (Coral Reefs), सागरी प्रदूषण इ.सोबत सागरमाला प्रकल्प, सागरी हद्दीवरून राष्ट्राराष्ट्रांमध्ये होणारे वाद String of pearls इ. बाबी लक्षात घ्याव्यात.

वातावरणाचे घटक, रचना, हवेचे तापमान व दाब, वारे, मान्सून, जेटप्रवाह, सायक्लोन्स, एल निनो, ला निना. इ. हवामानशास्त्राशी संबंधित मुद्दे महत्त्वाचे आहेत. जागतिक तापमान वाढ, हवामान बदल, अनपेक्षित हवामानशास्त्रीय घटना या चालू घडामोडींशी संबंधित घटना अभ्यासणे आवश्यक आहे.

यूपीएससी पूर्वपरीक्षेच्या दृष्टीने भूगोल विषयातील प्राकृतिक भूगोल अभ्यासघटकाची उकल केली. यानंतर या अभ्यासघटकावर आर्जपत विचारण्यात आलेल्या प्रश्नांचा आढावा घेऊ.

२०१८ मध्ये खाली दिलेली विधाने लक्षात घ्या, असा प्रश्न विचारला होता. त्यासाठी पुढील विधाने दिली होती.

१. बॅरन आयलँड ज्वालामुखी हा जिवंत ज्वालामुखी असून भारतीय क्षेत्रामध्ये स्थित आहे. २. बॅरन आयलँड ग्रेट निकोबार बेटाच्या १४० किमी. पूर्वेस आहे. ३. मागील वेळेस १९९१मध्ये या ज्वालामुखीचा उद्रेक झाला होता त्या वेळेपासून हा निष्क्रिय आहे.

या प्रकारचे प्रश्न सोडविण्यासाठी भारतातील नदीप्रणालीचा अभ्यास आवश्यक आहे. यामध्ये भारतातील प्रमुख नद्या, त्यांची उगमस्थाने, त्यांच्या उपनद्या आदी बाबींची माहिती असावी. प्राकृतिक भूगोल हा भूगोलाचा गाभा असल्याने या विषयातील संकल्पना स्पष्ट असतील तर त्याचा भूगोलातील इतर घटकांचे आकलन करून घेण्यास फायदा होतो. प्राकृतिक भूगोल या विषयावर पकड मिळवण्यासाठी या विषयाच्या स्वत:च्या नोट्स तयार करा. तसे केल्यास कमीतकमी वेळामध्ये हा घटक अभ्यासता येऊ शकतो.

प्राकृतिक भूगोलाचे मूलभूत आकलन एनसीईआरटीच्या क्रमिक पुस्तकांमधून करावे, ज्यामुळे या विषयाला सुलभपणे समजून घेता येते. पुढील वाचनाकरिता Certificate physical and human Geography by Goe Cheng Leang  हे पुस्तक वापरावे. नोट्स काढण्यापूर्वी उपरोक्त संदर्भग्रंथ वाचून त्यानंतर या घटकावर विचारण्यात आलेल्या प्रश्नांचे आकलन करून घ्यावे.

भूगोलाच्या अध्ययनामध्ये पूर्वपरीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाची बाब म्हणजे नकाशावर आधारित प्रश्न विचारले जातात, उदा. सद्य:स्थितीत घडलेली एखादी घटना, सदर घटना भौगोलिक किंवा इतर विषयांशी संबंधित असू शकतात. नकाशामध्ये प्रामुख्याने पर्वत, पर्वतरांगांचे दक्षिण उत्तर किंवा पूर्वपश्चिम क्रम, विषुववृत्त ज्या प्रदेशामधून जाते त्यांची नावे, नद्या, शहरे, देशांच्या सीमा, समुद्र, इ. बाबी ध्यानात घ्याव्या लागतात.

२०१८मध्ये पुढील प्रश्न विचारला होता –

बातम्यांमध्ये उल्लेख असणारे काही प्रदेश   देश पुढीलप्रमाणे

१. कॅटॅलोनिया   स्पेन

२. क्रिमीया      हंगेरी

३. मिंडानाओ   फिलिपिन्स

४. ओरोमिया    नायजेरिया

वरीलपैकी कोणती जोडी बरोबर आहे?

यासारखे चालू घडामोडींवर आधारित मात्र भूगोलाचा संदर्भ असणारे प्रश्न विचारले जातात.

२०१७ साली पुढील प्रश्न विचारला होता –

खालीलपैकी कोणता देश भौगोलिकदृष्टय़ा ग्रेट निकोबार बेटाच्या अधिक जवळ आहे?

१. सुमात्रा २. बोर्नियो ३. जावा ४. श्रीलंका.

वरील प्रश्नांवरून नकाशाधारित प्रश्न व नकाशा वाचनाचे महत्व अधोरेखित होते. नकाशा वाचनाकरिता Oxford किंवा ttk ‘चा अ‍ॅटलास घ्यावा. भूगोलाचा अभ्यास करताना व वर्तमानपत्र वाचत असताना अ‍ॅटलास नेहमी जवळ ठेवला पाहिजे.

जैवविविधता आणि पर्यावरण

-biodiversity-and-environment

2268   04-Dec-2018, Tue

संपन्न जैवविविधता असलेल्या जगातल्या मोजक्या प्रदेशांपकी भारत देश एक आहे. सध्या भारतीय अर्थव्यवस्था जगात सर्वाधिक वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहे. याचाच परिणाम म्हणून भारतातील उपलब्ध नसíगक साधन संपत्तीचा वापर मोठय़ा प्रमाणात होत आहे. त्याचा देशातील पर्यावरण आणि जैवविविधतेवर नकारात्मक परिणाम होत आहे. याचबरोबर आधुनिकीकरणाच्या युगात नसíगक साधनसंपत्तीवर मोठय़ा प्रमाणावर संकट येत आहेत. त्यात शहरीकरण, वाढत जाणारी लोकसंख्या, जंगलाची होत असलेली तोड, नष्ट होत चाललेले वन्यजीवांचे अधिवास, जैविक संपत्तीचा अमर्याद वापर यामुळे प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे जैविक उत्पादने व साधनसंपत्तीवर अवलंबून असलेल्या लोकसंख्या तसेच एकूण जैवविविधतेच्या संपत्तीवर विपरीत परिणाम होत आहे. शाश्वत विकासाकडे वाटचाल करताना जैवविविधतेचे संरक्षण व संवर्धन वेळीच करणे गरजेचे आहे, अन्यथा भविष्यात खूप मोठय़ा पर्यावरणीय समस्यांना सामोरे जावे लागेल. याचे गंभीर परिणाम जैवविविधता आणि पर्यावरणावर होऊ शकतात. या सर्व पलूंचे एकत्रित आकलन करून हा घटक अभ्यासावा लागणार आहे.

सर्वप्रथम आपण या घटकामध्ये नमूद असलेल्या मुद्दय़ांचा आढावा घेऊ. यात जैवविविधता आणि पर्यावरण याचे संरक्षण, पर्यावरणीय प्रदूषण आणि होणारा ऱ्हास, पर्यावरणीय आघाताचे मूल्यमापन इत्यादी मुद्दे आपणाला अभ्यासावे लागणार आहेत. पर्यावरण आणि जैवविविधतेचा होणारा ऱ्हास त्यासाठी जबाबदार असणारे घटक, जैवविविधतेला निर्माण झालेला धोका, पर्यावरणीय प्रदूषण, नदी प्रदूषण, हवा प्रदूषण, ध्वनी प्रदूषण व यामुळे उत्पन्न झालेल्या समस्या, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर जैवविविधता आणि पर्यावरण संरक्षणासाठी केल्या जाणाऱ्या विविध उपाययोजना, भारत सरकारमार्फत जैवविविधता आणि पर्यावरण संरक्षित करण्यासाठी पास करण्यात आलेले विविध कायदे व त्यांची उपयुक्तता तसेच पर्यावरणसंबंधी करायचे पर्यावरणीय आघाताचे मूल्यमापन आणि हे का अनिवार्य करण्यात आलेले आहे, याची नेमकी उपयुक्तता काय आहे? यासारख्या एकत्रित बाबींचा विचार करून या घटकाचे परीक्षेच्या दृष्टीने उपयुक्त ठरणारे नियोजन करावे लागणार आहे.

२०१३ ते २०१८ मध्ये प्रश्न विचारण्यात आलेले काही प्रश्न खालीलप्रमाणे होते.

 1. अवैध खाणकामामुळे काय परिणाम होतात? कोळसा खाण क्षेत्रासाठी पर्यावरण आणि वन मंत्रालयाच्या ‘जा किंवा जाऊ नका’
 2. (GO AND NO GO) या संकल्पनेची चर्चा करा. (२०१३)
 3. जरी कार्बन क्रेडिट आणि स्वच्छ विकास प्रणाली यू.एन.फ.सी.सी.सी.च्या अंतर्गत स्थापन करण्यात आलेल्या असल्या तरी यातील कार्बन क्रेडिटच्या मूल्यामध्ये मोठय़ा प्रमाणात घसरण झालेली आहे अशा स्थितीतही हे चालू ठेवावे का? आíथक वृद्धीसाठी भारताला आवश्यक असणाऱ्या ऊर्जेची गरज या संदर्भात चर्चा करा. (२०१४)
 4. नमामी गंगे आणि स्वच्छ गंगासाठीचे राष्ट्रीय मिशन (NMCG) कार्यक्रम आणि यापूर्वीच्या योजनांपासून मिळालेल्या संमिश्र परिणामाच्या कारणावर चर्चा करा. गंगा नदीच्या संवर्धनासाठी कोणती मोठी झेप ही वाढीव योगदानाच्या अपेक्षेपेक्षा अधिक साह्यकारी होऊ शकते? (२०१५)
 5. मोठय़ा प्रकल्पांचे नियोजन करताना मानवी वस्त्यांचे पुनर्वसन हा एक महत्त्वाचा पर्यावरणीय परिणाम आहे, ज्यावर नेहमीच वादविवाद होतो. विकासाचे मोठे प्रकल्प प्रस्तावित करताना हे परिणाम सुसह्य करण्यासाठी सुचविलेल्या उपायांवर चर्चा करा. (२०१६)
 6. हवामान बदल ही एक जागतिक समस्या आहे. भारत हवामान बदलामुळे कसा प्रभावित होईल? हवामान बदलामुळे भारतातील हिमालयीन आणि समुद्रकिनारपट्टी असणारी राज्ये कशी प्रभावित होतील? (२०१७)
 7. भारतात जैवविविधता कशा प्रकारे वेगवेगळी आढळून येते? वनस्पती आणि प्रजाती यांच्या संवर्धनासाठी जैविक विविधता कायदा २००२ कशा प्रकारे साह्यकारी आहे? (२०१८)

उपरोक्त स्वरूपाचे प्रश्न या घटकावर विचारण्यात आलेले आहेत. संपूर्ण पेपर तीनचा विचार केल्यास या घटकावर अधिक प्रमाणात प्रश्न विचारले गेलेले नाहीत. तसेच हे प्रश्न विषयाच्या पारंपरिक ज्ञानापेक्षा या घटकाशी संबंधित चालू घडामोडीचा विचार करून विचारण्यात आलेले आहेत.

या घटकाची सखोल माहिती असल्याखेरीज हा घटक परीक्षेच्या दृष्टीने तयार करणे अवघड जाते. तसे या घटकाच्या पारंपरिक ज्ञानाची व्याप्ती अधिक विस्तृत आहे पण उपरोक्त प्रश्नाचे विश्लेषण केल्यास आपणाला या घटकाचा अभ्यास नेमक्या कोणत्या पद्धतीने करावा याची दिशा मिळते.

वरील प्रश्नामध्ये संकल्पना, तसेच संबंधित कार्यक्रम आणि त्यापासून झालेला फायदा आणि त्यांची जैवविविधता आणि पर्यावरण याचे संवर्धन करण्यासाठीची उपयुक्तता यासारख्या पलूंचा मुखत्वे विचार केलेला दिसून येतो. तसे या घटकाचे स्वरूप सायंटिफिक पद्धतीचे आहे आणि यात अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या संकल्पनाची मूलभूत माहिती असणे गरजेचे आहे.

या घटकासाठी नेमके कोणते संदर्भ वापरावेत याची आपण थोडक्यात माहिती घेऊ. या घटकासाठी एन.सी.ई.आर.टी.ची पर्यावरणासंबंधित पुस्तके वाचावीत. बाजारात या घटकासाठी अनेक गाइड्स स्वरूपात पुस्तके उपलब्ध आहेत.

त्यातील कोणतेही पुस्तक जे सोप्या पद्धतीने या घटकाची माहिती देईल ते वाचावे. उदा. ळटऌ चे डी.आर. खुल्लर लिखित पर्यावरणाचे पुस्तक. तसेच इंडिया इअर बुकमधील पर्यावरणाचे प्रकरण याचाही अभ्यास करावा.

या घटकाचा चालू घडामोडींचा अभ्यास करण्यासाठी द हिंदू आणि इंडियन एक्स्प्रेस ही इंग्रजी दैनिके, योजना, कुरुक्षेत्र आणि डाऊन टू अर्थ ही मासिके, तसेच पर्यावरण आणि वन मंत्रालय, जैवविविधता प्राधिकरण यांच्या संकेतस्थळांचा वापर करावा आणि याच्या जोडीला भारत सरकारच्या आíथक पाहणी अहवालातील जागतिक तापमानवाढ आणि शाश्वत विकास हे प्रकरण अभ्यासावे.


Top