राज्यसेवा मुख्य परीक्षा: इतिहास

/history-preparation-mpsc-abn-97-1924965/

6029   12-Jul-2019, Fri

राज्यसेवा मुख्य परीक्षा पेपर एकमधील इतिहास घटक हा आधुनिक भारताचा इतिहास आहे. या घटकाची तयारी कशा प्रकारे करावी, याबाबत या लेखामध्ये चर्चा करण्यात येत आहे.

रेल्वे, टपाल, उद्योगधंदे इ. बाबींचा विकासाचे टप्पे, प्रत्येक टप्प्याची पार्श्वभूमी, संबंधित राज्यकत्रे या मुद्दय़ांच्या आधारे अभ्यास करणे आवश्यक आहे.

भारतीय उद्योगपती व भारतीय उद्योगांची सुरुवात याबाबत बारकाईने माहिती करून घ्यावी.

आधुनिक शिक्षणाचा अभ्यास करताना याबाबतीत नेमलेल्या समित्या व त्यांच्या शिफारसी यांचा आढावा महत्त्वाचा ठरेल. शिक्षणासाठी विविध समाजसुधारकांचे शिक्षणविषयक कार्य समजून घ्यावे.

वृत्तपत्रे, भाषा, त्यांचे संस्थापक, त्यांचे ब्रीदवाक्य असल्यास ते, सर्वात पहिले, सर्वात जुने वृत्तपत्र, नियतकालिक अशा पद्धतीने मुद्रित माध्यमांचा अभ्यास करावा. यामध्ये काही संघटनांची मुखपत्रेसुद्धा महत्त्वाची आहेत.

सामाजिक-सांस्कृतिक बदल व भारत आणि महाराष्ट्रातील समाजसुधारकांचे कार्य या बाबी एकत्रितपणे अभ्यासायच्या आहेत. समाजसुधारक, त्यांच्या संस्था, वृत्तपत्र, साहित्य,  महत्त्वाच्या घटना (कालानुक्रमे), काय्रे, असल्यास लोकापवाद, इतर माहिती या मुद्दय़ांच्या आधारे सारणी पद्धतीत मांडणी करून अभ्यासाची टिपणे काढता येतील.

यामधील संस्थांच्या स्तंभात संस्थेची स्थापना, कार्यपद्धती, महत्त्वाचे योगदान, ब्रीद, असल्यास मुखपत्र व संबंधित महत्त्वाची व्यक्तिमत्त्वे यांचा समावेश असावा. विशेषत: अभ्यासक्रमात नमूद संस्था, समाजसुधारक, स्वातंत्र्यलढय़ावर प्रत्यक्ष परिणाम करणाऱ्या दलित व मुस्लीम सुधारणा चळवळींचा अभ्यास पार्श्वभूमी, कारणे, स्वरूप, परिणाम, प्रतिक्रिया व व्यक्तिमत्त्वे या मुद्दय़ांच्या आधारे करावा.

ब्रिटिशांची आर्थिक नीती, जमीन सुधारणा, जंगल कायदे इ. चा भारतीय अर्थव्यवस्थेवरील परिणाम व संबंधित भारतीय नेत्यांची प्रतिक्रिया या गोष्टी समजून घ्याव्यात.

शेतकरी व आदिवासींचे बंड, १८५७ चा उठाव अशा संघर्षांचा अभ्यास पुढील मुद्दय़ांच्या आधारे करता येईल. कारणे / पार्श्वभूमी, स्वरूप / विस्तार / वैशिष्टय़े, प्रमुख नेते व त्यांच्या बाबतीत ठळक घडामोडी, यशापयशाची कारणे, परिणाम, उपलब्ध असल्यास इतिहासकारांच्या / समकालीनांच्या प्रतिक्रिया. गांधीयुगातील शेतकरी, आदिवासी, कामगार, संस्थानी जनता इ. च्या चळवळी / बंड यांचाही अभ्यास याच मुद्दय़ांच्या आधाराने करावा.

भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या दोन (मवाळ व जहाल) कालखंडांचा अभ्यास पुढील मुद्दय़ांच्या आधारे करावा. स्थापनेची सामाजिक, राजकीय, आर्थिक पार्श्वभूमी व त्याबाबतचे सिद्धांत, दोन्ही कालखंडातील मागण्या (तौलानिक पद्धतीने), दोन्ही कालखंडातील महत्त्वाचे नेते व त्यांचे वैशिष्टय़पूर्ण कार्य, दोन्ही कालखंडातील यशापयश, ब्रिटिशांची प्रतिक्रिया, सुरत विभाजन, होमरूल आंदोलन, लखनौ करार, सांप्रदायिकतेचा उदय

गांधीयुगातील विविध चळवळी (असहकार, सविनय कायदेभंग, चलेजाव इ.) अभ्यासताना त्यातील संघर्षांचे स्वरूप व त्यामागील विचारसरणी समजून घेऊन मग महत्त्वाच्या घडामोडींचा अभ्यास करावा. या प्रत्येक आंदोलनानंतर ब्रिटिशांच्या प्रतिक्रिया, भारतीयांना देऊ करण्यात आलेल्या बाबी, समकालीन भारतीय नेत्यांच्या महत्त्वाच्या प्रतिक्रिया व यशापयश या गोष्टी अभ्यासणे आवश्यक आहे. याच काळात वाढलेली संप्रदायिकता, त्याची कारणे, स्वरूप, परिणाम आणि इतर राजकीय पक्षांची वाटचाल अभ्यासणे आवश्यक आहे. काँग्रेसची महत्त्वाची अधिवेशने, ठराव, साल, ठिकाण व अध्यक्ष अशा मुद्दय़ांच्या आधारे टेबलमध्ये अभ्यासता येतील.

अभ्यासक्रमात वेगळा उल्लेख नसला तरी बिटिशांच्या कायद्यांचा व स्वातंत्र्याच्या योजनांचा कालानुक्रमे अभ्यास पार्श्वभूमी, तरतुदी, परिणाम, भारतीयांच्या प्रतिक्रिया, संबंधित व्हाईसरॉय, भारतमंत्री या मुद्दय़ांच्या आधारे करावा.

स्वातंत्र्योत्तर इतिहासात फाळणीचे स्वरूप, परिणाम व उपाय आणि संस्थानांचे विलीनीकरण विशेषत: जुनागढ, हैदराबाद व काश्मीरबाबतीत परिपूर्णपणे अभ्यासायला हवे.

भारताचे परराष्ट्र धोरण, आण्विक धोरण या बाबी नेहरू व इंदिरा गांधींच्या कालखंडापर्यंत बारकाईने अभ्यासणे आवश्यक आहे. विचारात घ्यायचे मुद्दे पुढीलप्रमाणे -आंतरराष्ट्रीय पार्श्वभूमी, राष्ट्रीय गरज, कारणे, स्वरूप, तत्त्वे, कालपरत्वे त्यामध्ये झालेले बदल व त्यांची कारणे, अंमलबजावणी करताना घडलेल्या ठळक आंतरराष्ट्रीय घडामोडी, परिणाम व आंतरराष्ट्रीय प्रतिक्रिया, मूल्यमापन-भाषावार प्रांतरचनेची मागणी, त्यासाठीचे आयोग व शिफारसी विशेषत: संयुक्त महाराष्ट्रात समाविष्ट करायच्या प्रदेशाबाबतीतील शिफारसी हा भाग काळजीपूर्वक अभ्यासावा. संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा अभ्यास महत्त्वाचे नेते, विविध विचारप्रवाह, राजकीय पक्ष व त्यांच्या भूमिका, महत्त्वाच्या घडामोडी अशा मुद्दय़ांच्या आधारे करावा.

पहिल्या सहा पंचवार्षकि योजनांचा अभ्यास नक्षलवाद, माओवाद, विकासाचा असमतोल इ. बाबी समजून घेण्यासाठी उपयोगी ठरतो.

सांस्कृतिक वारशामध्ये दृश्य कलांचा अभ्यास प्राचीन ते आधुनिक अशा क्रमाने करणे सोपे होईल. प्राचीन कला आढळणारी स्थाने, त्यांचा काळ व स्वरूप (आकृत्या, रंग, तंत्रज्ञान इ.) आश्रयदाते राज्यकत्रे अशा मुद्दय़ांच्या आधारे टेबलमध्ये करावा. मध्ययुगीन दृश्यकलांचाही अशाच प्रकारे अभ्यास करावा. मात्र येथे समकालीन इतर स्थापत्य व चित्रकलांचा आढावा घेणे श्रेयस्कर.

वाङ्मय प्रकारातील ज्यांचा उल्लेख अभ्यासक्रमात आहे त्यांची वैशिष्टय़े, महत्त्वाचे साहित्यकार, त्यांच्या प्रसिद्ध रचना, त्यांचे महत्त्व अशा प्रकारे अभ्यास आवश्यक आहे.

प्रायोगिक कलांपकी लोककलांचे स्वरूप, त्यांचे सांस्कृतिक-धार्मिक पलू व त्यांचे विशिष्ट प्रदेश व असल्यास संबंधित महत्त्वाचे कलाकार, त्यांच्या संवर्धनाचे प्रयत्न असे मुद्दे अभ्यासावेत. इतर प्रायोगिक कलांमधील विकासाचे प्रमुख टप्पे, प्रसिद्ध/पुरस्कारप्राप्त कलाकार इ. बाबी महत्त्वाच्या आहेत.

भारतीय इतिहास आणि स्वातंत्र्य चळवळ

tips-for-upsc-exam-preparation-5

1353   14-Mar-2019, Thu

यूपीएससीने २०११पासून पूर्वपरीक्षेच्या अभ्यासक्रमामध्ये बदल केलेला आहे. पूर्वपरीक्षेसाठी एकूण दोन पेपर आहेत आणि प्रत्येक पेपर हा २०० गुणांसाठी असून यातील पहिल्या पेपरमध्ये १०० प्रश्न आहेत. प्रत्येक प्रश्नाला २ गुण असून चुकीचा पर्याय निवडल्यास पेनल्टी मार्क्स असतात. उदाहरणार्थ एका प्रश्नासाठी ०.३३अशा पद्धतीने एकूण मिळविलेल्या गुणांमधून पेनल्टी गुण वजा केले जातात. याचबरोबर २०१५पासून यूपीएससीने पूर्व परीक्षा उतीर्ण होण्यासाठी आणखी एक महत्त्वपूर्ण बदल केला आहे. पूर्वपरीक्षेतील पेपर दोन म्हणजे नागरी सेवा कल चाचणी (C-SAT) हा पात्रता (क्वालिफाइंग) पेपर केला आहे (एकूण ८० प्रश्न आणि प्रत्येक प्रश्न २.५ गुणांसाठी असतो) यामध्ये उतीर्ण होण्यासाठी कमीत कमी एकूण गुणांपैकी ३३% गुण प्राप्त करणे अनिवार्य आहे. या पेपरमध्येही चुकीचा पर्याय निवडल्यास एका प्रश्नासाठी ०.३३ अशा पद्धतीने एकूण मिळविलेल्या गुणांमधून पेनल्टी गुण वजा केले जातात. तसेच या पेपरचे गुण अंतिम मेरीट ठरविण्यात ग्राह्य धरले जात नाहीत. पहिल्या पेपरमध्ये प्राप्त केलेल्या गुणांवरून अंतिम मेरीट ठरविले जाते.

भारतीय इतिहास आणि स्वातंत्र्य चळवळ

प्रस्तुत लेखामध्ये आपण पूर्वपरीक्षा पेपर पहिला यामधील भारतीय इतिहास आणि स्वातंत्र्य चळवळ या घटकाची तयारी कशी करावी याची चर्चा करणार आहोत. तसेच २०११ ते २०१८ पर्यंत या घटकावर किती प्रश्न विचारण्यात आलेले आहेत याचादेखील आपण आढावा घेणार आहोत. या घटकामध्ये प्राचीन भारत, मध्ययुगीन भारत आणि आधुनिक भारत तसेच भारतीय कला आणि संस्कृती या अन्य घटकांचाही समावेश होतो. सर्वप्रथम आपण या घटकावर वर्षनिहाय विचारण्यात आलेल्या प्रश्नांची संख्या पाहू : २०११ (१३ प्रश्न), २०१२ (१८ प्रश्न), २०१३ (१५ प्रश्न), २०१४ (२० प्रश्न), २०१५ (१८ प्रश्न), २०१६ (१६ प्रश्न), २०१७ (१४ प्रश्न), २०१८ (२१ प्रश्न). या प्रश्नांच्या संख्येवरून आपणाला या घटकाचा अभ्यास पूर्वपरीक्षेत यशस्वी होण्यासाठी किती महत्त्वाचा आहे हे लक्षात येते. हा घटक अभ्यासाच्या दृष्टीने पुढीलप्रमाणे विभागता येऊ शकतो ज्यामुळे आपणाला या विषयाचा परीक्षाभिमुख आवाका लक्षात येईल आणि त्यानुसार अभ्यासाचे योग्य नियोजन करता येऊ शकेल.

अ) प्राचीन भारत – प्राचीन भारताच्या इतिहासाचे महत्त्व आणि अभ्यासाची साधने, प्रागतिहासिक भारत, ताम्रापाषण कृषी संस्कृती, सिंधू संस्कृती, वैदिक संस्कृती, बौद्धयुग अथवा महाजनपदाचा कालखंड, मौर्य कालखंड, मौर्योत्तर कालखंड, गुप्त कालखंड आणि गुप्तोत्तर कालखंड इत्यादी.

ब) मध्ययुगीन भारत – प्रारंभिक मध्ययुगीन कालखंड (इ.स. ७५०-१२००), दिल्ली सल्तनत, उत्तर भारतातील प्रादेशिक देशी सत्ता, विजयनगर साम्राज्य, बहामनी राजघराणे, मुघल साम्राज्य, मराठा कालखंड आणि मध्ययुगीन भारतातील धार्मिक चळवळी इत्यादी.

क) आधुनिक भारत – युरोपियनांचे आगमन आणि ब्रिटिशसत्तेची भारतात स्थापना, ब्रिटिशसत्तेचा भारतावरील परिणाम, ब्रिटिशसत्तेच्या विरोधातील उठाव, १९व्या शतकातील सामाजिक आणि धार्मिक सुधारणा चळवळी, शिक्षण आणि वृतपत्रे यांची वाढ आणि विकास, भारतीय राष्ट्रवादाचा उदय आणि भारतीय राष्ट्रीय चळवळ, क्रांतिकारी चळवळी, कामगार चळवळ, भारतातील सांप्रदायिकतेची वाढ, गव्हर्नर जनरल आणि व्हाइसरॉय, भारतातील घटनात्मक विकास, महत्त्वपूर्ण व्यक्ती इत्यादी.

ड) भारतीय कला आणि संस्कृती – भारतीय स्थापत्यकला आणि शिल्पकला, भारतीय चित्रकला, भारतीय संगीत, नृत्य आणि नाटय़, भारतीय साहित्य, भारतीय हस्तकला इत्यादी.

अभ्यासाचे नियोजन आणि संदर्भ साहित्य

यातील नेमका कोणता भाग परीक्षेच्या दृष्टीने अधिक महत्त्वाचा आहे, याचे आकलन आपणाला मागील परीक्षांमध्ये या घटकावर विचारण्यात आलेल्या प्रश्नांवरून लक्षात येते. या घटकाची व्याप्ती खूप मोठी आहे तसेच याचे स्वरूप पारंपरिक पद्धतीचे आहे. त्यामुळे हा घटक सर्वप्रथम सखोल पद्धतीने अभ्यासणे गरजेचे आहे. त्यानंतर या घटकावर स्वत:च्या उजळणी स्वरूपातील टिप्पणे तयार करावीत. जेणेकरून हा घटक कमीत कमी वेळेमध्ये परीक्षेच्या दृष्टीने अभ्यासता येऊ शकतो. सर्वसाधारणपणे या घटकामध्ये प्राचीन भारत, आधुनिक भारत, भारतीय कला आणि संस्कृती यावर सर्वाधिक प्रश्न विचारले जातात. तसेच मागील परीक्षांमधील प्रश्नाचे विश्लेषण केल्यास असे दिसून येते की, भारतीय कला आणि संस्कृती यावर अधिक प्रश्न विचारण्यात येऊ लागलेले आहेत. हा घटक अभ्यासताना वस्तुनिष्ठ माहितीचा अभ्यास करणे गरजेचे आहे.

या घटकाच्या तयारीसाठी एन.सी.ई.आर.टी बोर्डाची शालेय पुस्तके सर्वप्रथम वाचावीत. बाजारात या घटकासाठी अनेक गाइडस स्वरूपात पुस्तके उपलब्ध आहेत. यातील नेमकी कोणती पुस्तके या घटकाची परीक्षाभिमुख तयारी करण्यासाठी महत्त्वाची आहेत याची माहिती असणे गरजेचे आहे.

सुराज्याच्या दिशेने वाटचाल

Moving towards Surajya

5985   04-Jun-2018, Mon

स्वातंत्र्यपूर्व काळात स्वराज्य की सुराज्य असा वाद गाजला होता. आता स्वराज्य तर आले आहे, पण सुराज्य अजून दूरच आहे. स्वातंत्र्य टिकवून ठेवायचे असेल तर हा मुद्दा समजून घ्यायला हवा.

राजकीय सुधारणा आधी करायच्या की, सामाजिक सुधारणा याबाबतचा वाद गाजला होता. तो आजही पाहणे उदबोधक ठरेल. जेव्हा आधुनिकता दृगोचर होऊ लागली, तेव्हा तिला दोनप्रकारे प्रतिसाद दिला गेला. एक असा की ब्रिटिश सत्तेमुळे देशाचे वाटोळे झाले आहे. त्यांना आधी बाहेर काढले पाहिजे (टिळकपक्ष), तर आपल्याच समाजातील दुर्गुणांमुळे देशाला ही स्थिती प्राप्त झाली आहे. तेव्हा आधी ब्रिटिशांच्या मदतीने त्या दुर्गुणांवर मात करून एकसंध समाज निर्माण करणे आवश्यक आहे. (आगरकर पक्ष) हा दुसरा. हा वाद चांगलाच रंगला.


लोकानुनयाच्या मर्यादा

टिळकांचे म्हणणे पडले की, समाजात काही दुर्गुण असले तरी त्यांना एकदम फैलावर घेतले तर त्यांचा तेजोभंग होईल. असा तेजोभंग झालेला, आत्मविश्वास गमावलेला समाज मोठे असे काही साध्य करू शकणार नाही. तेव्हा लोकांच्या कलाकलाने घेतले पाहिजे. आगरकर उत्तरले की, लोकांच्या कलाकलाने घेताघेता कलंडलो तर? औषध कडूच असते. म्हणून घ्यायचे नाही की काय? टिळकांचे म्हणणे पडले की, अशाने आपण अलोकप्रिय होऊ. मग तर काहीच करता येणार नाही. आगरकर म्हणाले की, इमारतीच्या पायात दगड असतात. ते दिसत नाहीत, पण त्यांनीच इमारत तोलून धरली असते. तसे कोणीतरी तर अलोकप्रिय झाले पाहिजे. लोकानुनय करणे चांगले नव्हे. तेव्हा 'ईष्ट असेल ते बोलणार व साध्य असेल ते करणार.'

स्वराज्याची व्याख्या

टिळकांनी स्वराज्याची कास धरली. परकीयांना देशातून बाहेर काढणे कर्तव्य मानले. आगरकर म्हणाले की, मलाही स्वराज्यच हवे आहे. पण माझी स्वराज्याची व्याख्या व्यापक आहे. टिळकांचे स्वराज्य वरून चालू होते (परकीय सत्ता) माझी स्वराज्याची व्याख्या माझ्या घरापासून सुरू होते. घरामध्ये स्त्रियांवर पुरुषांचे राज्य आहे. समाजात कनिष्ठ जातींवर उच्च जातींचे राज्य आहे. जोवर आपण आपल्या गुलामीत आहेत त्यांना स्वातंत्र्य देत नाही, तोवर ते ब्रिटिशांकडे मागण्याचा कोणताही हक्क आपल्याला नाही. ज्या समाजात ब्राह्मण व महार एकमेकांच्या मांडीला मांडी लावून जेवत नाहीत, त्या समाजाला स्वराज्य कशासाठी हवे आहे? तेव्हा आधी घर दुरुस्त करा.

वादळाचा काळ

टिळक म्हणाले की, मलाही घर दुरुस्त करण्यात रस आहे, पण ते घर माझ्या ताब्यात तर येऊ दे. सध्या ते परकीयांच्या ताब्यात आहे. आणि असे म्हणतात की 'वादळाच्या काळात कोणी आपले घर दुरुस्त करीत बसत नाही', ब्रिटिश काळ हा असा संकटाचा काळ आहे. तेव्हा आधी स्वराज्यप्राप्ती. स्वराज्य मिळवल्यावर आपण स्वतःहून सुधारणा घडवून आणू. शिवाय आत्ता सुधारणा हाती घेतल्या तर परकीयांची मदत घ्यावी लागेल. आगरकर म्हणाले की, समाज सुधारणा ही जादूची कांडी नाही की फिरवली तर सुधारणा होतील.

निदान आता स्वराज्यासाठी सुधारणांची गरज तरी भासते आहे. स्वराज्यप्राप्तीनंतर तुम्ही म्हणाल की, आता सुधारणांची गरजच काय?

विचार कलहाला घाबरू नका.टिळक म्हणाले की, टीका केल्याने समाज दुभंगेल, दुर्बल होईल. आगरकरांच्या मते टीका केल्याने हिणकस निघून जाते व त्यामुळे समाज बळकट होईल. टिळक म्हणाले की, चांगला सेनापती दोन आघाड्यांवर लढत नाही. जर आपण राजकीय आघाडी उघडली आहे तर सामाजिक आघाडी बंद ठेवली पाहिजे. आगरकर म्हणाले, मग सामाजिक सुधारणांचीच आघाडी चालवा. कारण सुराज्य ही स्वराज्याची पूर्वअट आहे.

आज स्वराज्याचे प्रशासन चालवताना सुराज्याची निकड समजून घेऊन जर आपण चाललो तर त्या वाटचालीस अर्थ प्राप्त होईल. आगरकरांनी ‘स्वराज्याच्या दिशेने वाटचाल’ अशी पुस्तिका लिहिली होती. आज सुराज्याच्या दिशेने आपली पावले पडली तर संपूर्ण देशाचे स्वातंत्र्य जसे एकेकाळी मिळवले, तसे प्रत्येक व्यक्तीचे स्वातंत्र्य मिळेल व हा लढा सफळ संपूर्ण होईल.

ऑपरेशन विजय

operation vijay

7388   04-Jun-2018, Mon

नव्याने सुरुवात 

दादरा व नगर हवेली मुक्त केल्यावर संघर्षाला नव्याने सुरुवात झाली. १५ ऑगस्ट १९५५ रोजी गोवे विमोचन समितीने सामुदायिक सत्याग्रह केला. या नि:शस्त्र सत्याग्रहींवर पोर्तुगीजानी गोळीबार केला. निषेध म्हणून भारताने आपले गोव्यातले कार्यालय बंद केले. यानंतर भारत सरकारने सशस्त्र उठाव करणाऱ्यांना छुपा पाठिंबा देण्यास सुरुवात केली.

दरवर्षी १५ ऑगस्टला सत्याग्रह होत गेले व पोर्तुगीजांचा आडमुठेपणा जगापुढे उघड होत गेला. काळ व वेळ आली यापूर्वीच्या प्रयत्नांमध्ये काळ आला होता, पण वेळ आली नव्हती. १९६१ सालापर्यंत पोर्तुगीजांच्या पापाचा घडा भरला. निर्वसाहतीकरणाचे युग आता शिखरावर होते. आता नाही तर कधीच नाही हे भारताने ओळखले. आता काळही आला होता आणि वेळही अचूक होती. भारत सरकारने गोवा, दीव, दमण व अंजदीव (कर्नाटकच्या किनाऱ्यावरील) यांच्या मुक्ततेसाठी ‘ऑपरेशन विजय’ सुरू केले. 
 

भारतीय सैन्याची व्यूहरचना

आकाश, समुद्र व जमीन या तिन्ही ठिकाणांहून भारतीय सैन्याने कूच केले. मेजर जनरल के. पी. कॅण्डेथ यांच्या हाती हल्ल्याची जबाबदारी सोपवण्यात आली. दमणवर मराठा पलटण, तर दीववर राजपूत व मद्रास पलटण संयुक्तरीत्या हल्ला चढवतील असे ठरले. एअर व्हॉइस मार्शल इर्लिक पिंटो यांच्याकडे हवाई हल्ला करण्याची कामगिरी सोपवण्यात आली.

गोव्यातील एकमेव हवाईतळ डाबोलिम ताब्यात घेणे हे लक्ष्य होते. भारताने कॅथलिक ख्रिश्चन अधिकारी पुढे ठेवले, कारण पोर्तुगाल कॅथलिक जगाला अन्याय झाल्याचा कांगावा करून साद घालण्याची शक्यता होती. नौदलाची जबाबदारी देशाचे नौदलप्रमुख भास्कर सोमण यांच्याकडे होती. विमानवाहू नौका विक्रांत हिलाही तयार ठेवण्यात आले. 


पोर्तुगीज सैन्याची व्यूहरचना 

हुकूमशहा सालाझारचा सैनिकांना संदेश होता की, विजयी व्हा किंवा मरा, पण शरण जाऊ नका. भारताच्या आर्थिक बहिष्कारानंतर सावध होऊन पोर्तुगीजानी पोर्तुगाल, अंगोला व मोझंबिक येथून फौजफाटा गोव्यात आणून ठेवला. 
 

सेंटिनेल योजना : गोव्याची चार संरक्षण विभागांत विभागणी (उत्तर, मध्य, दक्षिण व मार्मागोवा) बॅरेज योजना : आक्रमण लांबवण्यासाठी सर्व पूल उडवायचे, महत्त्वाचे रस्ते व चौपाट्या यांच्यावर भूसुरुंग पेरून ठेवायचे. गोव्याला युद्धनौका पाठवायचा पोर्तुगालचा बेत इजिप्तचे अध्यक्ष नासेर यांनी सुवेझ कालव्यातून जाण्याची परवानगी नाकारून हाणून पाडला. पोर्तुगालने विमानमार्गे शस्त्रास्त्रे पाठवण्याचा प्रयत्न करून पहिला, पण मधल्या सर्व देशांनी (पाकिस्तानसकट) त्यांना थांबा नाकारला. 


युद्धापूर्वीची पळापळ 

युद्धाकडे होणारी वाटचाल बघून गोव्यातील युरोपीय घाबरले व लवकरात लवकर कसे निसटता येईल यांची संधी शोधू लागले. तिमोर (दक्षिण पूर्व आशिया) येथून लिस्बन येथे जाणारे ‘इंडिया’ हे पोर्तुगीज जहाज मार्मागोवा बंदरात आले तेव्हा त्या ३८० उतारू क्षमतेच्या जहाजात ७०० पोर्तुगीज नागरिक दाटीवाटीने चढून बसले. काहींनी तर शौचालयात ठाण मांडले. बिघडती परिस्थिती बघून पोर्तुगालने काही महिला पॅराट्रुपर्स नागरिकांना वाचवून आणण्यासाठी गोव्याला रवाना केल्या. 
 

युद्धाला तोंड फुटले 

अखेर १७ डिसेंबर १९६१ला सकाळी युद्धाला तोंड फुटले. उत्तरेकडून भारतीय सैन्याने आक्रमणाला सुरुवात केली. मराठा, पंजाब व शीख पलटणींनी गोवा तीन बाजूने घेरले. पोर्तुगीजांनी माघार घेत पूल उदध्वस्त केले. तरीही भारतीय सैन्याने आघाडी घेत आग्वाद किल्ला जिंकला. तेथील राजकीय कैद्यांची मुक्तता केली.

पोर्तुगीजांच्या अल्फान्सो-डी-अल्बुकर्क या युद्धनौकेने चांगली लढत दिली. पण भारतीय नौसेनेच्या संख्याबळापुढे तिला माघार घ्यावी लागली. पोर्तुगीजांनी नौका सोडून पळ काढला व तिला पेटवून दिले. गुजरातच्या सौराष्ट्र किनाऱ्यावरील दीव या बेटावर पोर्तुगीजांची सर्वात जास्त तयारी होती. पण भारतीय हवाई दलाच्या माऱ्याने त्यांना शरण आणले. हा एका शेवटचा आरंभ होता. 

गोवा मुक्ती चळवळ

goa free battle

11869   04-Jun-2018, Mon

सुरक्षा परिषदेतील झटापटी

१८ डिसेंबरला पोर्तुगालने युनोच्या सुरक्षा परिषदेत गोव्याच्या संघर्षावर चर्चा करण्याची विनंती केली. त्या विनंतीला अमेरिका, ब्रिटन व फ्रान्सने होकार तर रशिया व सिलोन यांनी नकार दर्शवला. चर्चा झालीच. त्या चर्चेत अमेरिकेने भारताच्या लष्करी कारवाईवर सडकून टीका केली.

रशियाने भारताची बाजू घेत मांडले की हा प्रश्न भारताचा अंतर्गत प्रश्न असून सुरक्षा परिषदेत चर्चा करण्यास अयोग्य आहे. अमेरिकेने भारताने त्वरित लष्करी कारवाई स्थगित करावी, असा बहुमताने ठराव आणला. पण या काळातील भारताच्या रक्षणकर्त्या रशियाने भारताच्या बाजूने नकाराधिकार वापरत तो ठराव पारीत होऊ दिला नाही.

सरशी

शेवटी १९ डिसेंबरला सालाझारच्या आज्ञेच्या विरुद्ध जात गोव्याच्या पोर्तुगीज गव्हर्नरने शरणागती पत्करली. ४५१ वर्षांचा वनवास संपुष्टात आला. गोव्यातील नागरिकांचा त्याग व इच्छाशक्ती यांचा विजय झाला. आजही गोव्यात दरवर्षी १९ डिसेंबर हा मुक्तिदिन म्हणून साजरा केला जातो. त्यादिवशी सुट्टी दिली जाते. ऑपरेशन विजय ३६ तास चालले.

२२ भारतीय आणि ३० पोर्तुगीज लढाईत मारले गेले. सुमारे ४६०० पोर्तुगीज सैनिक, अधिकारी व समर्थक यांना भारताने अटक केली. जगातील काही देशांनी भारतावर स्तुतिसुमने वाहिली तर काहींनी कडाडून टीका केली. ऑपरेशन विजयवर आधारित ‘सात हिंदुस्थानी’ हा सिनेमादेखील आला होता.

पोर्तुगालचा रडीचा डाव

अपेक्षेप्रमाणे सालाझारने आदळाआपट केली. जे गोवेकर भारत सोडून पोर्तुगालला यायला तयार असतील त्यांना पोर्तुगालचे नागरिकत्व देऊ केले. (ही ऑफर आजही चालू आहे) भारतीय सेनापतींना पकडून आणणाऱ्यांसाठी बक्षीस जाहीर केले.

लिस्बन दुःखात बुडाले. ख्रिसमसचा आनंद झाकोळला. नाट्यगृह व सिनेमा थिएटर ओस पडले कारण हजारो नागरिकांनी लिस्बन शहराच्या मध्यभागापासून संत फ्रान्सिस झेवियर यांचे अवशेष ठेवलेल्या कॅथ्रेडलपर्यंत मोर्चा काढला. पोर्तुगीज रेडियोवरून गोवेकरांना भारतीय प्रशासनाविरुद्ध बंड करायचे आवाहन वारंवार केले गेले.

घातपात करून भारताचा विजय हाणून पाडायचे कारस्थान पोर्तुगालने रचले. (ग्राल्हा योजना) असे काही बॉम्बस्फोट झाल्यावर भारताने संशयितांना अटक करून फासावर चढवले.

पुढची सोय

पोर्तुगाल पुन्हा आक्रमण करण्याची शक्यता लक्षात घेऊन मेजर जनरल कॅडिथ यांना गोव्याचे लष्करी शासक म्हणून नेमण्यात आले. शेवटी सालाझारची हुकूमशाही लयाला गेल्यावर १९७४ मध्ये एका कराराने पोर्तुगालने भारताचे गोवा, दीव, दमण, दादरा व नगरहवेली यावरील सार्वभौमत्व मान्य केले. एक स्वातंत्र्यसैनिक असलेल्या दयानंद बांदोडकर यांनी स्वतंत्र गोव्यात महाराष्ट्रवादी गोमांतक पक्षाची स्थापना केली. (१९६३) गोवा महाराष्ट्रात विलीन व्हावा या मताचे ते कट्टर पुरस्कर्ते होते. त्याच वर्षी काँग्रेसचा पराभव करून स्वतंत्र गोव्याचे ते पहिले मुख्यमंत्री झाले. त्यांच्या दहा वर्षांच्या कारकीर्दीत गोव्यात अनेक सुधारणा त्यांनी केल्या.

स्वतंत्र राज्याकडे

१९६३ मध्ये १२वी घटनादुरुस्ती करून जिंकलेल्या भूभागाला भारतीय संघराज्यात सामावून घेण्यात आले. गोवा केंद्रशासित ठेवायचा की त्याचे महाराष्ट्रात विलीनीकरण करायचे की कर्नाटकात सामावून घ्यायचे यावर वाद होत रा हिले. १९६७ मध्ये झालेल्या सार्वमतात लोकांनी महाराष्ट्रात विलीन होणे नाकारले. शेवटी १९८७ मध्ये गोव्याला दमण व दीवपासून वेगळे करून पूर्ण राज्याचा दर्जा देण्यात आला. पुढे कोकणी ही भाषा राज्यभाषा म्हणून गोव्याने स्वीकारली.

सिमला करार

shimla agreement

2390   03-Jun-2018, Sun

भारताने मोठा लष्करी विजय मिळवूनही त्याचा डंका वाजवला नाही. जितक्या सहजतेने हा विजय भारताने साकारला, तितक्याच सहजतेने तो स्वीकारला. यावेळी कोणत्याही तिसऱ्या पक्षाची मध्यस्थी न घेता पाकिस्तानशी थेट बोलणी करणे ठरले.

जुलै १९७२

पाकिस्तानचे त्यावेळी नुकतेच सत्तेवर आलेले अध्यक्ष झुल्फीकार अली भुट्टो व भारताच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यात बोलणी झाली. भुट्टो आपली कॉलेजवयीन मुलगी बेनझीर हिलाही सोबत घेऊन आले होते. ही ऐतिहासिक संधी साधून जास्तीत जास्त समस्या सोडवून घेण्याचे आव्हान भारतापुढे होते. तर पाकिस्तानला कमीत कमी नुकसान सोसून सुटका करून घ्यायची होती. दोन्ही बाजूंना भूतकाळाचे ओझे व वर्तमानातील अपेक्षा यांचा मेळ घालून भविष्याकडे पाऊल टाकायचे होते.

वाटाघाटी

काश्मीर प्रश्न सोडवायचा दबाव अर्थातच पंतप्रधान गांधी यांच्यावर होता. भारताकडे पाकिस्तानचा ५००० चौरस किमीचा प्रदेश ताब्यात होता. तसेच ९०,००० युद्धकैद्यांचा हुकमी एक्का होता. एवढा दारूगोळा पाकिस्तानला नमावण्यासाठी पुरेसा ठरेल, असा कयास होता. मात्रतो चुकला.

झुल्फिकार अली भुट्टो

यांनी युद्धकैद्यांचे काय करायचे, ते भारतावर सोडले. प्रदेश मात्र परत करावा, असा आग्रह धरला. काश्मीर प्रश्नाला अनेक आयाम असल्याने त्याचा आग्रह धरू नये, असे त्यांचे म्हणणे होते. अशी कोणतीही तडजोड त्यांनी केली, तर त्यांना सत्ता त्याग करावा लागेल व पुन्हा एकदा लष्कर सत्तेवर येईल. मग तर कोणालाच शांतता मिळू शकणार नाही, अशी धमकीवजा मांडणी त्यांनी केली.

पेचप्रसंग

भुट्टो यांनी पेच निर्माण केला. बोलणी खुंटली आहेत, असे जाहीर करण्यात आले. पण त्यानंतर पंतप्रधान गांधी व भुट्टो यांचे व्यक्तिगत बोलणे झाले. त्यानंतर पुन्हा दोन्ही बाजू वाटाघाटीला बसल्या. रात्री उशिरापर्यंत त्या चालून मध्यरात्री मसुदा अंतिम झाला. सदिच्छेचा भाग म्हणून भारताने पश्चिम पाकिस्तानचा जिंकलेला प्रदेश परत केला. पाकिस्तानने बांगलादेशचे अस्तित्व मान्य केले. काही भाग तोंडी ठरला. त्यात काश्मीरच्या मुद्द्यावर पाकिस्तानात एकमत घडवून आणण्याचा प्रयत्न मी करतो, असे आश्वासन भुट्टो यांनी दिले.

करार

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव कमी करणे व दोन्ही देशात परस्परसहकार्य आणि मैत्रीसंबंध वृद्धिंगत करणे व भारतीय उपखंडात शांतता टिकवणे यासाठी प्रयत्न करण्याचे दोन्ही देशांनी मान्य केले. या करारातील सर्वात महत्त्वाचे कलम असे होते की, दोन्ही राष्ट्रे आपल्यातील वादग्रस्त प्रश्न, मतभेद किंवा इतर समस्या व्दिपक्षीय चर्चेद्वारेच सोडवतील. म्हणजेच काश्मीरच्या प्रश्नावर बळाचा वापर करणार नाही. अगदी तो संयुक्त राष्ट्रातही (UNO) मांडणार नाही, असे आश्वासन पाकिस्तानने दिले.

पाठ फिरताच कोलांटउडी

मात्र पाकिस्तानात पाऊल ठेवताच भुट्टो यांनी काश्मीरबद्दल कुठलेही आश्वासन दिल्याचे नाकारले. भारत काही युद्धकैदी घेऊन बसणार नाही, याची मला खात्री आहे, असे ते म्हणाले आणि तसेच झाले. भारताने लवकरच युद्धकैद्यांची सुटका केली. भुत्तोंच्या गोड बोलण्यात व खोट्या वचनांच्या सापळ्यात पंतप्रधान गांधी अडकल्या, असे काही विश्लेषकांचे म्हणणे आहे. तर काहींनी या कराराने व्हर्सायच्या तहासारखे सूडचक्र निर्माण केले नाही, म्हणून यशस्वी करार म्हटले आहे.

दृष्टांत
 
भुट्टोना भेटण्यापूर्वी पंतप्रधान गांधी यांनी प्रसिद्ध गुप्तहेर प्रमुख आर. एन. काव यांना विचारले होते, मी भुत्तोंवर विश्वास ठेवायला हवा का? लोक असे म्हणतात की, भुट्टोशी हस्तांदोलन केले तर त्यानंतर हाताची सगळी बोटे जागच्या जागी आहेत याची खात्री करून घ्या.

स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर राजकीय इतिहास

history pre and  post independence

7137   30-May-2018, Wed

भारतीय इतिहासाच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि आर्थिक पलूंचा अभ्यास कशा प्रकारे करावा याबाबत मागील लेखामध्ये चर्चा करण्यात आली. या लेखामध्ये स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर राजकीय इतिहासाचा अभ्यास कसा करावा याबाबत चर्चा करण्यात येत आहे.

भारतीय राष्ट्रवादाचा उदय

* काँग्रेसच्या स्थापनेपूर्वीच्या राजकीय संस्था, ग्रामीण भारतातील उठाव यांचा आढावा टेबलमध्ये घेता येईल.

* भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या दोन (मवाळ व जहाल) कालखंडांतील स्वातंत्र्य चळवळीचा अभ्यास पुढील मुद्दय़ांच्या आधारे करता येईल.

* स्थापनेची सामाजिक, राजकीय, आर्थिक पाश्र्वभूमी व त्याबाबतचे सिद्धांत

* दोन्ही कालखंडांतील नेत्यांच्या मागण्या दोन कॉलममध्ये तौलनिक पद्धतीने

* दोन्ही कालखंडांतील महत्त्वाचे नेते व त्यांचे वैशिष्टय़पूर्ण कार्य

* दोन्ही कालखंडांतील यशापयश, ब्रिटिशांची प्रतिक्रिया

* सुरत विभाजन, होमरूल आंदोलन, लखनौ करार, सांप्रदायिकतेचा उदय

* क्रांतिकारी विचार आणि चळावळींचा उदय हा मुद्दा उदयाची पाश्र्वभूमी, स्वरूप, कार्ये, ठळक विचार, घडामोडी, महत्त्वाचे नेते व त्यांचे योगदान, भारताबाहेरील कार्ये आणि त्याचे सरूप, महिलांचा सहभाग, वृत्तपत्रे, साहित्य, खटले अशा मुद्दय़ांच्या आधारे करावा.

गांधीयुग

* गांधीयुगातील असहकार, सविनय कायदेभंग, चलेजाव इ. चळवळी अभ्यासताना त्यातील संघर्षांचे स्वरूप व त्यामागील विचारसरणी समजून घेऊन मग महत्त्वाच्या घडामोडींचा अभ्यास करणे उपयुक्त ठरेल. या प्रत्येक आंदोलनानंतर ब्रिटिशांच्या प्रतिक्रिया, भारतीयांना देऊ करण्यात आलेल्या बाबी, समकालीन भारतीय नेत्यांच्या महत्त्वाच्या प्रतिक्रिया व यशापयश या गोष्टी अभ्यासणे आवश्यक आहे. या चळवळींचा भाग म्हणून किंवा त्यांना समांतरपणे सुरू झालेले वैशिष्टय़पूर्ण संघर्ष (झेंडा सत्याग्रह, जातीय सरकार इ.) यांचा अभ्यास बारकाईने करावा.

गांधीजींच्या कालखंडातील महिलांचा स्वातंत्र्यसंग्रामातील सहभाग तसेच स्त्रीवादी चळवळी यांचा अभ्यास वस्तुनिष्ठ पद्धतीने टेबल फॉरमॉटमध्ये करता येईल. याच कालखंडातील शेतकरी, आदीवासी बंडे आणि कामगार चळवळी यांचा अभ्यास त्यांचे स्वरूप, पाश्र्वभूमी, कारणे, महत्त्वाचे नेते, परिणाम, यशापयशाची कारणे, फलनिष्पत्ती या मुद्यांच्या आधारे करावा.

* याच काळात वाढलेली सांप्रदायिकता, त्याची कारणे, स्वरूप, परिणाम आणि इतर राजकीय पक्षांची वाटचाल अभ्यासणे अत्यंत आवश्यक आहे. काँग्रेसची महत्त्वाची अधिवेशने, ठराव, साल, ठिकाण व अध्यक्ष अशा मुद्दय़ांच्या आधारे टेबलमध्ये अभ्यासता येतील.

* सामाजिक इतिहासामध्ये अभ्यासलेल्या दलित चळवळींमधील गांधीजींचे योगदान तसेच मुस्लीम सुधारणा चळवळींबाबत गांधीजींची भूमिका व विचार यांचा आढावा घेणे आवश्यक आहे.

* भारताच्या घटनात्मक विकासाचा अभ्यासक्रमात वेगळा उल्लेख नसला तरी बिटिशांच्या कायद्यांचा व स्वातंत्र्याच्या योजनांचा कालानुक्रमे अभ्यास महत्त्वाचा आहे. या कायद्यांची पाश्र्वभूमी, तरतुदी, परिणाम, भारतीयांच्या प्रतिक्रिया, संबंधित व्हाइसरॉय, भारतमंत्री इ. मुद्दे एकत्रित अभ्यासता येतील.

स्वातंत्र्योत्तर भारत

* स्वातंत्र्योत्तर भारताच्या इतिहासात फाळणीचे स्वरूप, परिणाम व उपाय आणि संस्थानांचे विलीनीकरण विशेषत जुनागढ, हैदराबाद व काश्मीरबाबतीत परिपूर्णपणे अभ्यासायला हवे. तसेच उशीरा विलीन झालेल्या संस्थानांबाबत महत्त्वाच्या घडामोडी लक्षात घ्यावात.

* भारताचे परराष्ट्र धोरण, आण्विक धोरण या बाबी नेहरू व इंदिरा गांधींच्या कालखंडापर्यंत बारकाईने अभ्यासणे आवश्यक आहे. धोरणाची आंतरराष्ट्रीय पाश्र्वभूमी, धोरणाची राष्ट्रीय गरज, कारणे, धोरणाचे नेमके स्वरूप, तत्त्वे, कालपरत्वे त्यामध्ये झालेले बदल व त्यांची कारणे, धोरणाची अंमलबजावणी करताना घडलेल्या ठळक आंतरराष्ट्रीय घडामोडी, धोरणाचे परिणाम व आंतरराष्ट्रीय प्रतिक्रिया आणि मूल्यमापन असे मुद्दे विचारात घ्यावेत.

* नेहरू व इंदिरा गांधी यांचे महत्त्वाचे निर्णय, कारणे, परिणाम इ. बाबी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील कामगिरी अभ्यासताना महत्त्वाच्या ठरणार आहेत.

* आणीबाणी कालखंडातील महत्त्वाच्या घडमोडी, नेते, त्यांचे कार्य, विचार यांचा आढावा घेणे आवश्यक आहे.

* इंदिरा गांधींच्या कालखंडापर्यंत अंतर्गत राजकीय घडामोडींचा अभ्यासही महत्त्वाचा आहे. यामध्ये राष्ट्रीय राजकारणावर प्रभाव टाकणाऱ्या प्रादेशिक राजकीय चळवळी उदा. जयप्रकाश नारायण यांचे विद्यार्थी आंदोलन, आनंदपूर साहिब प्रस्ताव, भाषावार प्रांत रचनेबाबतचे संघर्ष अशा मुद्यांचा अभ्यास आवश्यक आहे. या महत्त्वाच्या राजकीय घडामोडींमधील महत्त्वाचे नेते, त्यांचे महत्त्वाचे व प्रभावी समर्थक, पाश्र्वभूमी, स्वरूप, घोषणा, कारणे, परिणाम, यशापयशाची कारणे, इतिहासकारांची मते अशा मुद्दय़ाच्या आधारे त्यांचा बारकाईने अभ्यास करावा.

* भाषावार प्रांतरचनेची मागणी, त्यासाठीचे आयोग व शिफारसी, संघर्ष, विशेषत: संयुक्त महाराष्ट्राबाबतच्या शिफारसी हा भाग काळजीपूर्वक अभ्यासायला हवा. संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा अभ्यास महत्त्वाचे नेते, विविध विचार प्रवाह, राजकीय पक्ष व त्यांच्या भूमिका, महत्त्वाच्या घडामोडी अशा मुद्दय़ांच्या आधारे करता येईल.

* पहिल्या सहा पंचवार्षिक योजनांचा अभ्यास या पेपरमध्येही मदतगार ठरणार आहे. या आधारे नक्षलवाद, माओवाद, विकासाचा असमतोल इ. बाबींचा संकल्पनात्मक अभ्यास शक्य होईल. 

एमपीएससी मंत्र : इतिहास प्रश्नांचे स्वरूप आणि विश्लेषण

MPSC Mantra: The nature and analysis of history questions

2034   24-May-2018, Thu

इतिहासाच्या तयारीपूर्वी मागील काही वर्षांच्या परीक्षांमधील प्रश्न व त्यांचे विश्लेषण पाहिल्यास तयारीची दिशा ठरविण्यास मदत होते. सन २०१५ पासूनच्या परीक्षांमध्ये विचारलेले काही प्रश्न पाहू.

 प्रश्न – १९१९च्या मॉन्टेग्यू चेम्सफर्ड कायद्यात खालीलपैकी कोणत्या तरतुदी होत्या?

(a) भारतीय मंत्र्याचा पगार इंग्लंडच्या तिजोरीतून दिला जावा.

(b) भारतीय उच्चायुक्त हा भारताचा व्हॉइसरॉयचा इंग्लंडमधील प्रतिनिधी म्हणून काम पाहील.

(c) प्रांतांमध्ये द्विदल राज्यपद्धती निर्माण करावी.

(d) भारतीय मंत्र्याचा पगार भारताच्या तिजोरीतून दिला जावा.

पर्यायी उत्तरे

१) (a), (b) आणि (c)

२) (a), (c) आणि (d)

३) (b), (c) आणि (d)

४) (c) आणि (d)

 

प्रश्न: १८५७ च्या उठावात खालीलपैकी कोण सहभागी होते?

(a) सावंतवाडीचे रामजी शिरसाट

(b) झीनत महल बेगम

(c) खान बहादूर रोहिला

(d) नसरत शाह

पर्यायी उत्तरे

१) (a), (b) आणि (c)

२) (a), (a) आणि (d)

३) (a) आणि (c)

४) (c) आणि (d)

प्रश्न – पंडिता रमाबाईंना ‘कैसर इ हिंद’ किताब का देण्यात आला?

१) त्यांनी ख्रिस्ती धर्म स्वीकारला म्हणून

२) त्यांच्या स्त्री शिक्षणाच्या कार्याचा गौरव करण्यासाठी

३) दुष्काळग्रस्त स्त्रियांना आश्रय दिला म्हणून

४) रमाबाई असोसिएशन स्थापन केले म्हणून

प्रश्न – मुंबईच्या टेलिफोन खात्यात नवे मशीन आल्याने २२८ मुलींची नोकरी गेली. याची दखल घेत भांडवलशाही व्यवस्थेत भांडवलदार विज्ञानाचा व तंत्रज्ञानाचा वापर स्वत:च्या फायद्यासाठी करतात.. नवी मशीन ही कामगार चळवळीपुढील मोठी समस्या आहे, असे ‘सोशॉलिस्ट’मध्ये कोणी लिहिले?

१) ना. म. जोशी      २) जॉर्ज फर्नाडिस

३) कॉम्रेड रणदिव    ४) कॉम्रेड डांगे

प्रश्न —- मधून व्हिएतनामींना बाहेर काढण्यासाठी भारताने भूमिका बजावली.

१) लाओस

२) ख्रिसमस आयलंड्स

३) कंपुचिया

४) फिलिपिन्स

प्रश्न – पुढील वर्तमानपत्रे आणि त्यांचे संपादक यांच्या जोडय़ा लावा-

(a) वसुमती      (i) अ. ब. कोल्हटकर

(b) प्रबासी       (ii) बालमुकुंद गुप्ता आणिअंबिका प्रसाद बाजपेयी

(c) भारतमित्र   (iii) रामचंद्र चॅटर्जी

(d) संदेश        (iv) हेमचंद्र प्रसाद घोष

पर्यायी उत्तरे

(a) (b) (c) (d)

१)(ii) (i) (iv) (iii)

२) (i) (ii) (iii) (iv)

३)  (iv) (iii) (ii) (i)

४) (iii) (iv) (i) (ii)

बहिष्कार चळवळीला मुंबई इलाख्यात मिळालेले पुढारी — होते.

(a) बा. गं. टिळक      (b) शि. म. परांजपे

(c) सौ. केतकर     (d) सौ. अ. वि. जोशी

(e) विष्णू गोिबद बिजापूरकर

(f) महादेव राजाराम बोडस

पर्यायी उत्तरे

१) (a), (b), (e)

२) (a), (b), (c), (f)

३) (a), (b), (d), (e)

४) (a), (b), (c), (d), (e), (f)

 

प्रश्न —– यांनी १८६५ मध्ये विधवा विवाहोत्तेजक मंडळ स्थापन केले.

१) म. गो. रानडे आणि विष्णुशास्त्री पंडित

२) धों. के. कर्वे आणि विष्णुशास्त्री पंडित

३) गोपाळ गोखले आणि धों. के. कर्वे

४) धों. के. कर्वे आणि पंडिता रमाबाई

प्रश्न – ‘माझा प्रवास’ हे पुस्तक कोणी लिहिले?

१) गोिवद बल्लाळ देवल

२) बाबा पद्मनजी

३) गोडसे भटजी

४) विष्णुदास भावे

हे प्रश्न सामान्य अध्ययन पेपर एकमधील इतिहास घटकाचे प्रातिनिधिक प्रश्न आहेत. यांचे स्वरूप सर्वसाधारणपणे पुढीलप्रमाणे असल्याचे दिसते

  1. बहुपर्यायी प्रश्नातील मुद्दय़ाबाबत किमान एक मुद्दा तरी असा आहे जो बारकाईने अभ्यास केलेल्या उमेदवारालाच सहजपणे कळणे शक्य होईल.
  2. वर्तमानपत्रे आणि त्यांचे संस्थापक, सामाजिक संस्था आणि त्यांचे संस्थापक, पदाधिकारी आणि कार्य तसेच ब्रीदवाक्ये यांचा नेमका आणि वस्तुनिष्ठ अभ्यास आवश्यक आहे.
  3. महाराष्ट्राच्या कला व संस्कृतीबाबतच्या घटकाच्या तयारीसाठी कुठल्या तरी एकाच स्रोतावर अवलंबून राहण्यापेक्षा त्या स्रोताचा संदर्भ घेऊन अतिरिक्त माहिती मिळविण्याचा प्रयत्न करणे आवश्यक आहे.
  4. महाराष्ट्राच्या इतिहासाची तयारी जास्त सखोलपणे करणे आवश्यक आहे.
  5. स्वातंत्र्योत्तर भारताच्या इतिहासाची तयारी जास्त वस्तुनिष्ठपणे करायला हवी.
  6. अभ्यासक्रमातील समाजसुधारक व महत्त्वाच्या व्यक्तींबाबत सहसा प्रसिद्ध नसलेली माहिती मिळविणे आणि त्यांच्याबरोबर कार्य करणाऱ्या व महत्त्वाचे योगदान देणाऱ्या व्यक्तींबाबतही माहिती असणे आवश्यक आहे.

कायमधारा पद्धत

Permanent Settlement 1793

6335   13-Mar-2018, Tue

लॉर्ड कॉर्नवॉलिस हे पहिले राज्यपाल जनरल होते ज्यांनी महसूल सुधारांकडे लक्ष वेधले आणि अतुलनीय यश प्राप्त केले.

हे बंगाल, बिहार आणि ओरिसाचे कायमस्वरूपी जमीन सेटलमेंट होते. महसूल मंडळाच्या कामांवर देखरेख ठेवण्याची क्षमता असलेल्या महसुली मंडळाची त्यांनी पुनर्रचना केली.

मुंगल काळांनंतर कनुंगो आनुवंशिक महसूल अधिकारी होते.

मुघल सम्राट शाह आलम प्रथम यांनी १७६५ मध्ये बंगाल, बिहार आणि ओरिसातील देवासियांना मंजुरी दिली होती. जेव्हा कॉर्नवॉलिस भारतात आले तेव्हा जमीन महसूलाच्या रचनेची पद्धत अशी होती की शेतकरी जमिनदाराला कर भरला. जमादारांनी महसूल गोळा केला आणि 9/10 व्या क्रमांकाचे वेतन दिले.

वार्षिक कायमधाराची पद्धत प्रचलित होती. १७७९  मध्ये वॅरन हेस्टिंग्जने क्विन-क्वाइनियल सेटलमेंट किंवा पाच वर्षांचे सेटलमेंट लागू केले होते ज्यानुसार महसुलाचे संकलन करारनाम्याच्या आधारावर पाच वर्षांसाठी सर्वात जास्त बोलीदात्यास देण्यात आले होते.परंतु हे सेटलमेंट अयशस्वी झाले आणि वॉरेन हेस्टिंग्सने वार्षिक सेटलमेंट केले

शेतकर्यांची स्थिती शोचनीय होती. भारतात आगमन झाल्यानंतर कॉर्नवॉलिसला असे आढळले की, "कृषी आणि व्यापारातील कत्तल, जमीनदार आणि रयत गरीबीत बुडलेले आहेत आणि समाजातील पैसा उधार देणारे एकमात्र उत्कृष्ठ वर्ग आहे." १७८५ मध्ये न्यायालयाच्या संचालकांनी कॉर्नवॉलिसला जमीनदारांसोबत समझोत्यास अंमलबजावणी करण्याची परवानगी दिली. प्रथम दहा वर्षांसाठी आणि तो समाधानकारक सिद्ध झाल्यास कायम केले जाईल. परंतु इ.स. १७८७ मध्ये आणि १७९० मध्ये वार्षिक वसाहत करण्यात आली.

१७९७ मध्ये कॉर्नवेलीसने दहावार्षिक समझोत्याकरिता नियम तयार केले. महसूल सेटलमेंट बाबत रिझर्व्ह बोर्ड ऑफ रेव्हेन्यूचे सर जॉन्स शोर आणि रेकॉईड किपर श्री जेम्स ग्रँट यांनी दोन वेगवेगळ्या सिद्धांत मांडले. जॉन शोरने असे म्हटले होते की जमीनदार हे तेथील जमिनीचे मालक होते आणि त्यांना तेथील रहिवाशांनकडून एक परंपरागत महसूल आकारण्याचा अधिकार होता.दुसऱ्या बाजूला जेम्स ग्रँटने असे मत मांडले की, राज्य सर्व जमिनीचा मालक होता आणि राज्याला जमिनदार किंवा शेतकर्याबरोबर समझोता करण्याचा अधिकार होता.

शेवटी, कॉर्नवेलिस्टने जॉन शोरचे मत स्वीकारले. १७९० मध्ये जमींदारांना १० वर्षे मुदतीसाठी जमीनदार म्हणून ओळखले गेले. न्यायालयाच्या संचालकांच्या मान्यतेनंतर, २ मार्च १७९३  रोजी दहा वर्षांची समझोत्यास स्थायी घोषित करण्यात आले.

आधुनिक जगाचा इतिहास महत्त्वाच्या घडामोडी

world history imp movemennts

4955   07-Aug-2018, Tue

विसाव्या शतकातील आधुनिक जगाच्या इतिहासातील महत्त्वाच्या घडामोडींची विस्तृत चर्चा करून गतवर्षीच्या परीक्षांमध्ये विचारण्यात आलेल्या प्रश्नांसह या घटकाची तयारी करण्यासाठी कोणते संदर्भ साहित्य वापरावे याचाही आढावा घेणार आहोत.

२०१३ ते २०१७ मध्ये घेण्यात आलेल्या मुख्य परीक्षांमध्ये या विषयाशी संबंधित विचारण्यात आलेले प्रश्न खालीलप्रमाणे होते.

*      आर्थिक महामंदीशी सामना करण्यासाठी कोणत्या धोरणात्मक साधनांचा वापर करण्यात आलेला होता?

*      कोणत्या घटनांमुळे १९५६मधील सुवेझ संकट निर्माण झालेले होते? याने कशा प्रकारे ब्रिटनच्या स्वयंकित जागतिक सत्तेच्या प्रतिमेवर शेवटचा प्रहार केला?

*      कोणत्या मर्यादेपर्यंत जर्मनीला दोन जागतिक महायुद्धांसाठी जबाबदार धरले जाऊ शकते? समीक्षात्मक चर्चा करा.

*      पश्चिमी आफ्रिकेतील वसाहतविरोधी संघर्षांचे नेतृत्व पाश्चिमात्य शिक्षण घेतलेल्या नवअभिजन वर्गाने केले होते. परीक्षण करा.

*      मलाया द्वीपकल्प निर्वसाहतीकरण प्रक्रियेसाठी कोण कोणत्या समस्या सुसंगत होत्या?

प्रश्न समजून घेण्यासाठी लागणारी आकलनक्षमता –

उपरोक्त प्रश्न हे संकीर्ण आणि विश्लेषणात्मक या दोन्ही माहितीचा एकत्रित आधार घेऊन विचारण्यात आलेले आहेत. यातील आर्थिक महामंदीशी संबंधित प्रश्न सोडविताना आपणाला आर्थिक धोरणांचा मुखत्वे विचार करावा लागतो. ही धोरणे नेमकी कोणती होती व या धोरणांच्या परिणामस्वरूप नेमके काय साध्य झालेले होते अशा पद्धतीने माहिती असावी लागते. तसेच या प्रश्नाचे स्वरूप संकीर्ण प्रकारात अधिक मोडणारे आहे म्हणून येथे फक्त धोरणाची माहिती नमूद करून उत्तर लिहिणे अपेक्षित आहे. यातील पश्चिमी आफ्रिकेतील वसाहतविरोधी संघर्षांचे नेतृत्व पाश्चिमात्य शिक्षण घेतलेल्या नवअभिजन वर्गाने केलेले होते. परीक्षण करा हा प्रश्न व्यक्तिविशेष प्रकारात मोडणारा आहे आणि या देशातील महत्त्वाच्या व्यक्ती व त्यांची नावे व कार्य आणि विचारसरणी व कशा पद्धतीने यांनी नेतृत्व केलेले होते या सर्व पलूंचा आधार घेऊन या प्रश्नाचे उत्तर लिहिणे अपेक्षित होते. अनेक महत्त्वाच्या मुद्दय़ांवर प्रश्न विचारण्यात आलेले नाहीत. म्हणून या विषयाचा सर्वागीण आणि सखोल अभ्यास करून परीक्षेच्या दृष्टीने उपयुक्त ठरणारी तयारी करणे गरजेचे आहे. यासाठी उपरोक्त चच्रेचा फायदा होऊ शकतो.

अभ्यासाच्या दृष्टीने नियोजन – या कालखंडात ज्या महत्त्वाच्या घटना घडलेल्या होत्या त्याला तत्कालीन कारणाबरोबरच मागील दोन शतकांतील म्हणजेच १८व्या आणि १९व्या शतकात घडलेल्या काही महत्त्वपूर्ण घटनांची पाश्र्वभूमी होती. विशेषकरून युरोपमध्ये घडणाऱ्या घटनांचा प्रभाव हा संपूर्ण जागतिक व्यवस्थेवर होत असे. कारण २०व्या शतकातील साम्राज्यवादी सत्ता या युरोपमधील होत्या आणि त्यांच्या वसाहती आफ्रिका आणि आशिया खंडात होत्या. तसेच १९व्या शतकात झालेल्या युरोपातील काही महत्त्वाच्या घडमोडी उदा. इटलीचे एकीकरण, जर्मनीचे एकीकरण, राष्ट्रवादाचा उदय, पूर्वेकडील प्रश्न, बíलन परिषद आणि आफ्रिका खंडाची साम्राज्यवादी सत्ता यामध्ये झालेली विभागणी, आणि युरोपातील विविध राष्ट्रांमध्ये स्थापन झालेल्या मत्रीपूर्ण युती अथवा करार (अ’’्रंल्लूी२) आणि याद्वारे केले जाणारे राजकारण, त्याचबरोबर अमेरिका, जपान या राष्ट्रांची ध्येयधोरणे इत्यादीची माहिती असल्याखेरीज २०व्या शतकातील अर्थात सुरुवातीपासून या शतकाच्या मध्यापर्यंतच्या महत्त्वाच्या घडामोडी योग्य पद्धतीने समजून घेता येणार नाहीत. मत्रीपूर्ण युती अथवा करार, राष्ट्रवादी विचारसरणीचा वाढता प्रभाव, आक्रमक लष्करवाद, साम्राज्यवादी प्रतिस्पर्धा, बाल्कन युद्धे तसेच तत्कालीन कारणे या काही महत्त्वाच्या कारणांमुळे पहिल्या जागतिक महायुद्धाची १९१४ साली सुरुवात झाली व हे युद्ध १९१८ मध्ये समाप्त झाले. यानंतर पॅरिस शांतता परिषेदतील विविध करारांनुसार पराभूत राष्ट्रांवर अनेक अटी लादण्यात आल्या आणि यामध्ये जर्मनी हे महत्त्वाचे पराभूत राष्ट्र होते व जर्मनीला या युद्धासाठी बाबदार धरण्यात आले. तसेच या परिषदेमध्ये राष्ट्रसंघाची (छींॠ४ी ऋ ठं३्रल्ल२) स्थापना करण्यात आली होती. तिचा मुख्य उद्देश आंतरराष्ट्रीय स्तरावरील विवाद सोडविणे हा होता, याच दरम्यान रशियन क्रांती होऊन सोव्हिएत युनियनची स्थापना झालेली होती आणि या क्रांतीवर साम्यवादी विचारसरणीचा प्रभाव होता. या विचारसरणीचा वाढता प्रभाव, दोन जागतिक महायुद्धांमधील जग, इटलीमधील फॅसिझम आणि जर्मनीमधील नाझीझम, राष्ट्रसंघ आणि राष्ट्रसंघाचे कार्य आणि राष्ट्रसंघाचे अपयश, जागतिक आर्थिक महामंदी, अरब राष्ट्रवाद, युरोपमधील हुकूमशाहीचा उदय आणि अंत, ब्रिटिशांचे तुष्टीकरण धोरण व याचे परिणाम, दुसऱ्या जागतिक महायुद्धाची महत्त्वाची कारणे व याचा परिणाम, या महायुद्धानंतरचे जग, यामध्ये आशिया आणि आफ्रिकेमधील निर्वसाहतीकरण व यामधून उदयाला आलेली नवीन राष्ट्रे व अलिप्ततावादी चळवळ, चीनची क्रांती, भांडवलशाही व समाजवादी विचारसरणीचा प्रभाव व अमेरिका आणि सोव्हिएत युनियन या दोन महासत्तांचा उदय व या दोन महासत्तांमध्ये जगाची विभागणी, शीतयुद्धाची सरुवात आणि या काळातील महत्त्वाच्या घटना, १९८९मधील सोव्हिएत युनियनचे विघटन व याची कारणे, पश्चिम व पूर्व जर्मनीचे १९९१ मध्ये झालेले एकत्रीकरण व अमेरिकेचा एकमेव जागतिक महासत्ता म्हणून झालेला उदय इत्यादी महत्त्वाच्या घडामोडींची योग्य माहिती असणे गरजेचे आहे. अशा प्रकारे या घटकांची सर्वप्रथम मूलभूत माहिती करून घ्यावी लागते, ज्यामुळे या विषयाची समज व्यापक होण्यास मदत होते.

संदर्भ साहित्य – एनसीईआरटीची इयत्ता नववी ते बारावीच्या शालेय पुस्तकांचा आधार घेता येतो. तसेच या घटकाचा अधिक सखोल पद्धतीने अभ्यास करण्यासाठी राजन चक्रवर्ती लिखित ‘अ हिस्ट्री ऑफ दी मॉडर्न वर्ल्ड’, अर्जुन देव लिखित ‘हिस्ट्री ऑफ दी मॉडर्न वर्ल्ड’ आणि नॉर्मन लोवे लिखित ‘मास्टरिरग मॉडर्न वर्ल्ड हिस्ट्री’ या महत्त्वाच्या संदर्भ साहित्याचा वापर करावा.

स्वातंत्र्योत्तर भारत

india independent

4296   31-Jul-2018, Tue

आजच्या लेखामध्ये आपण स्वातंत्र्योत्तर भारत या विषयावर चर्चा करणार आहोत. या घटकावर २०१३ ते २०१७ मध्ये एकूण सात प्रश्न विचारण्यात आले आहेत. ते खालीलप्रमाणे –

’ विनोबा भावे यांच्या भूदान व ग्रामदान आंदोलनाच्या उद्देशाची चिकित्सा करा आणि त्याच्या यशाची चर्चा करा.

’ ‘जय जवान-जय किसान’ नाऱ्याचा (घोषवाक्य) उदय आणि महत्त्व यावर चिकित्सक पद्धतीने लेख लिहा.

’ कोणत्या परिस्थितीमुळे १९६६चा ताश्कंद करार करण्यात आला, त्याचे विश्लेषण करा. करारातील प्रमुख वैशिष्टय़ांची चर्चा करा.

’ कोणत्या अटळ परिस्थितीमुळे भारताला तत्परतेने बांगलादेशाच्या उदयामध्ये निर्णायक भूमिका बजावावी लागली, याचे चिकित्सक पद्धतीने परीक्षण करा.

’ लेनिन याच्या १९२१ च्या नवीन आर्थिक धोरणाने, भारताने स्वातंत्र्यप्राप्तीनंतर लगोलग आखलेल्या धोरणांना प्रभावित केलेले होते, मूल्यांकन करा.

’ भाषावार राज्यनिर्मितीमुळे भारतीय एकतेच्या उद्देशाला मजबुती मिळालेली आहे का?

’ स्वातंत्र्यप्राप्तीनंतर अनुसूचित जमाती (रळ२) विरोधात होणारे भेदभाव दूर करण्यासाठी, कोणते दोन मुख्य कायदेशीर पुढाकार राज्याद्वारे घेण्यात आले?

प्रश्नाचे योग्य आकलन करण्यासाठी लागणारा दृष्टिकोन

उपरोक्त प्रश्नांचे योग्य आकलन केल्यास आपणाला असे दिसून येते की, यातील जवळपास सर्व प्रश्न हे भारताच्या स्वातंत्र्यप्राप्तीनंतरच्या पुढील दोन दशकांतील महत्त्वाच्या घडामोडींशी संबंधित आहेत. म्हणून भारताच्या स्वातंत्र्यानंतरच्या पहिल्या दोन दशकांतील घडामोडींची योग्य माहिती असणे गरजेचे आहे. उपरोक्त प्रश्नामधील ‘भाषावार राज्यनिर्मितीमुळे भारतीय एकतेच्या उद्देशाला मजबुती मिळालेली आहे का?’ हा प्रश्न योग्य पद्धतीने समजून घेण्यासाठी भाषावार प्रांतरचना का करण्यात आलेली होती, त्याची कोणती कारणे होती व याचा नेमका इतिहास काय आहे आणि यासाठी सरकारमार्फत कोणत्या उपाययोजना आखण्यात आलेल्या होत्या, तसेच १९६२ मध्ये स्थापन करण्यात आलेली राष्ट्रीय एकता परिषद व याची उद्दिष्टे यांसारख्या पलूंचा एकत्रित विचार करून उदहरणासह उत्तर लिहिणे अपेक्षित आहे. भाषावार राज्यनिर्मितीमुळे भारतीय एकतेच्या उद्देशाला मजबुती मिळालेली आहे का, याचे संतुलित पद्धतीने विश्लेषण उत्तरामध्ये असणे अपेक्षित आहे.

उपरोक्त प्रश्नामधील दोन प्रश्न हे भारतासोबत पाकिस्तानने केलेल्या दोन युद्धांच्या पाश्र्वभूमीला ग्राह्य धरून विचारण्यात आलेले आहेत आणि या दोन्ही प्रश्नांचे योग्य आकलन होण्यासाठी आपल्याला भारताची फाळणी व फाळणीचे परिणाम, संस्थानांचे विलीनीकरण आणि त्यानंतर घडलेल्या घडामोडी, तात्कालिक कारणे, ताश्कंद कराराची वैशिष्टय़े काय होती याबाबत सखोल माहिती असणे गरजेचे आहे. त्याशिवाय या प्रश्नाची मुद्देसूद उत्तरे लिहिता येत नाहीत. थोडक्यात हे प्रश्न विषयाची सखोल माहिती आणि संकीर्ण माहिती या दोन्ही बाबींचा एकत्रित विचार करून विचारण्यात आलेले आहेत.

वरील प्रश्नांमध्ये भूदान व ग्रामदान चळवळींवरील प्रश्न तसेच ‘जय जवान-जय किसान’ नाऱ्याशी संबंधित प्रश्न हे विश्लेषणात्मक पद्धतीने आकलन करून नेमकी यांची तत्कालीन सामाजिक आणि आर्थिक विकासामध्ये उपयुक्तता काय होती आणि यामुळे काय साध्य झाले, या पलूंचा विचार करून चिकित्सक पद्धतीने उत्तराची मांडणी करणे अपेक्षित आहे. याचबरोबर भारताने स्वातंत्र्यप्राप्तीनंतर नियोजन पद्धतीने आर्थिक विकास घडवून आणण्यासाठी जे धोरण आखलेले होते. त्यावर लेनिनच्या १९२१च्या नवीन आर्थिक धोरणाचा प्रभाव कसा होता, हे उदाहरणासह चर्चा करून याचे मूल्यांकन उत्तरामध्ये करणे अपेक्षित होते. या सर्व प्रश्नांच्या चच्रेमुळे या विषयावर विचारण्यात येणाऱ्या प्रश्नांचे स्वरूप आणि याची उत्तरे नेमकी कशी लिहावीत याची दिशा मिळते.

या विषयाचे अभ्यासाच्या दृष्टीने नियोजन

या विषयाची तयारी करताना भारताची फाळणी व फाळणीचे परिणाम, संस्थानांचे विलीनीकरण, भाषावार प्रांतरचना, विकासासाठी आखली गेलेली धोरणे व नियोजन, नेहरूंचे परराष्ट्र धोरण व भारताची आंतरराष्ट्रीय भूमिका, कृषी, विज्ञान आणि तंत्रज्ञान यांमधील भारताची प्रगती, चीन आणि पाकिस्तान या देशांनी भारतासोबत केलेली युद्धे व याच्याशी निगडित करार व त्याचे परिणाम, इंदिरा गांधी यांचा कालखंड-बांगलादेश मुक्ती, आणीबाणी व जयप्रकाश नारायण यांचे आंदोलन, जमीन सुधारणा धोरण व जमीन सुधारणा, नक्षलवाद व माओवाद, नवीन सामाजिक चळवळी-वांशिक चळवळी, पर्यावरण चळवळ व महिला चळवळ इत्यादी, पंजाब व आसाममधील दहशतवाद व पूर्वोत्तर राज्यातील घुसखोरी, राजकीय क्षेत्रातील बदल व प्रादेशिक वादाचे राजकारण, तसेच या सर्व घटकांशी संबंधित घटना, व्यक्ती आणि मुद्दे या अनुषंगाने याची तयारी करावी लागते. या घटकातील अनेक महत्त्वाच्या मुद्दय़ांवर प्रश्न विचारण्यात आलेले नाहीत म्हणजे येथून पुढे होणाऱ्या मुख्य परीक्षेत या घटकावर प्रश्न विचारले जाऊ शकतात. म्हणून या घटकाची सर्वप्रथम मूलभूत माहिती अभ्यासणे गरजेचे.

संदर्भ साहित्य

सर्वप्रथम एनसीईआरटीच्या शालेय पुस्तकांचा आधार घ्यावा लागतो. इयत्ता बारावीचे राज्यशास्त्राचे  ‘पॉलिटिक्स इन इंडिया सिन्स इंडिपेंडन्स’ हे पुस्तक सर्वप्रथम अभ्यासणे गरजेचे आहे. तसेच या घटकाची सखोल आणि सर्वागीण तयारी करण्यासाठी बिपिन चंद्र लिखित ‘इंडिया आफ्टर इंडिपेंडन्स’ आणि रामचंद्र गुहा यांचे ‘इंडिया आफ्टर गांधी’ हे संदर्भग्रंथ उपयुक्त ठरतात.


Top