
1087 01-Jun-2017, Thu
- महापालिकेच्या जमिनीवर वसलेल्या अनधिकृत झोपडपट्ट्यांमधील पात्र झोपडीधारकांना त्यांच्या धारणक्षेत्रानुसार आता वैयक्तिक स्वरूपात जमिनीचे पट्टेवाटप करता येणार आहे. त्यासाठी महाराष्ट्र महापालिका अधिनियमात सुधारणा करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.
- महाराष्ट्र महापालिका अधिनियमाच्या कलम 79 (ग) नुसार यापूर्वी केवळ झोपडीधारक सदस्य असणाऱ्या सहकारी संस्थांनाच जमिनी देता येत होत्या. मात्र, यामुळे त्यांचे पुनर्वसन करताना अनेक अडचणी येऊन प्रकल्प वेळेत पूर्ण होत नव्हते.
- मंत्रिमंडळाच्या निर्णयानुसार होणाऱ्या सुधारणेनंतर महाराष्ट्र झोपडपट्टी (सुधारणा, निर्मूलन आणि पुनर्विकास) अधिनियम 1971 मधील तरतुदीनुसार पात्र ठरणाऱ्या झोपडीधारकांना याचा लाभ होणार आहे.
- महाराष्ट्र महापालिका अधिनियमामधील कलम 79 (ग) मध्ये अंतर्भूत करण्यात आलेल्या दुसऱ्या परंतुकानुसार पात्र झोपडीधारकांना पट्टेवाटप करताना लागू करावयाच्या अटी व शर्ती त्याचप्रमाणे आकारावयाच्या अधिमूल्याची रक्कम शासन निश्चित करणार आहे. त्यानुसारच पात्र झोपडीधारकांना जमिनीचे पट्टे दिले जाणार आहेत.