Red Fort Contract on Dalmiya Bharat Group under 'Adopt A Heritage' scheme

 1. पुढील पाच वर्षांकरिता 25 कोटी रुपयांच्या कराराअंतर्गत दालमिया भारत ग्रुप या उद्योग समुहाची दिल्लीच्या लाल किल्ल्याची जबाबदारी घेण्यासाठी निवड करण्यात आली आहे.
 2. ही निवड 'अडॉप्ट ए हेरिटेज' योजनेंतर्गत करण्यात आली आहे.
 3. यासोबतच दालमिया भारत ग्रुप हा या योजनेंतर्गत निवड झालेला भारताच्या इतिहासात पहिला कॉर्पोरेट समूह बनला.
 4. करारामध्ये समाविष्ट बाबी:-
  1. पर्यटनाच्या दृष्टीने लाल किल्ल्याच्या परिसरात एक वर्षांच्या निश्चित कालावधीत बदल घडविणार्‍या सोयी-सुविधा आणाव्या लागणार आहे.
  2. त्या ठिकाणी सहा महिन्यांच्या आत काही पायाभूत सुविधा प्रदान कराव्या लागणार आहे.
  3. त्यामध्ये पिण्याचे पाणी, फर्नीचर आणि सूचना फलक यांचा समावेश आहे.
  4. एक वर्षांमध्ये टॅक्टिल नकाशा लावणे, शौचालयांना अद्ययावत करणे, रस्ते व बांधकाम, नूतनीकरण आणि लँडस्केप अश्या ठिकाणी दिवे बसविणे, 1000 चौ. फूट क्षेत्रफळात पर्यटकांसाठी सुविधा केंद्राचे बांधकाम करणे, लाल किल्ल्याचा आंतरिक व बाह्य नकाशा तयार करणे, बॅटरीचे त्रिमितीय प्रोजेक्शन मॅपिंग, बॅटरीवर चालणारी वाहने आणि त्यासाठी चार्जिंग स्टेशन आणि एक कॅफेटेरिया उभारणे.

'अडॉप्ट ए हेरिटेज' योजना

 1. राष्‍ट्रपती राम नाथ कोविंद यांनी 2017 साली 'अडॉप्ट ए हेरिटेज: अपनी धरोहर, अपनी पहचान' योजना सुरू केली.
 2. पर्यटन मंत्रालय, संस्कृती मंत्रालय व भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (ASI) आणि राज्य/केंद्रशासित प्रदेश राज्य शासन यांचा हा एक सहयोगी प्रयत्न आहे.
 3. "जबाबदार पर्यटनाला" प्रभावीपणे प्रोत्साहन देण्यासाठी सर्व भागीदारांमध्ये समन्वय विकसित करणे हा या प्रकल्पाचा उद्देश आहे.
 4. या प्रकल्पाअंतर्गत आतापर्यंत एकूण 31 संस्थांना (ज्यास मोन्युमेंट मित्र असे म्हटले जाईल) मान्यता देण्यात आली आहे.
 5. ते भारतातील एकूण 95 स्मारके /पर्यटन स्थळांची जबाबदारी स्विकारतील.
 6. सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्या, खासगी क्षेत्रातील कंपन्या आणि कार्पोरेट नागरिक / व्यक्ती यांना देशातील वारसा जपण्यासाठी आणि पर्यटनाला अधिक टिकाऊ बनविण्यासाठी तसेच जागतिक दर्जाच्या पर्यटनासंबंधी पायाभूत सुविधा आणि तयार करण्यासाठी सहभागी करून घेणे हा याचा हेतू आहे.
 7. अश्या भागीदारांना 'मोन्युमेंट मित्र' म्हणून संबोधले जाईल.


Scientists have researched numerous recyclable 'plastic'

 1. अमेरिकेच्या कोलोराडो विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी कोणत्याही विषाणू रसायनांचा वापर न करता असा प्लास्टिक शोधला आहे, जो असंख्यवेळा पुनर्वापरयोग्य तयार केला जाऊ शकतो.
 2. भूतलावर प्लास्टिकमुळे पर्यावरणाला पोहचणारी हानी टाळण्यामध्ये या शोधाची मदत होणार आहे.
 3. हे प्लास्टिक पर्यावरणाच्या दृष्टीने सुरक्षित आहे.
 4. वैशिष्ठ्ये:-
  1. प्लास्टिक प्रमाणेच हलके, भक्कम, टिकाऊ आणि विशेष म्हणजे तापमानाला सहन करू शकणारे पॉलीमर आहे.
  2. या प्लास्टिकला कितीही वेळा त्याच्या वास्तविक अणू अवस्थेत बदलून पुन्हा वापरण्याजोगे केले जाऊ शकते.
  3. या प्लास्टीकला खोलीच्या तापमानावर आणि थोड्या प्रमाणात कॅटेलिस्ट (उत्प्रेरक) पदार्थाचा वापर करून बनविले जाऊ शकते.
  4. पेट्रोलियमपासून तयार करण्यात येणारे सध्या वापरात असलेले प्लास्टिक मऊ असते आणि ते तापमानास प्रतिसाद देणारे आहे व पुनर्वापरयोग्य नाही.
  5. मात्र या शोधामुळे हरित प्लास्टिक तयार करण्यास मार्ग मिळाला आहे.
  6. शिवाय कचरा बनलेल्या प्लास्टिकला अगदी सहजतेने डी-पॉलीमराइज करून पुनर्वापरयोग्य केले जाऊ शकणार आहे.


 AOC honors Peter Norman with 'Order of Merit'

 1. ऑस्ट्रेलियाचा दिवंगत धावपटू पीटर नॉर्मन याला ऑस्ट्रेलियन ऑलंपिक समितीकडून (AOC) तब्बल 50 वर्षांनंतर मरणोत्तर ऑस्ट्रेलियाच्या ‘ऑर्डर ऑफ मेरिट’ या सर्वोच्च ऑलंपिक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
 2. 1968 मेक्सिको सिटी ऑलंपिकमध्ये पीटर नॉर्मनने रौप्यपदक जिंकले होते आणि राष्ट्रीय विक्रम केला होता.
 3. अमेरिकेच्या टॉमी स्मिथ (सुवर्ण) आणि जॉन कार्लोस (कांस्य) यांच्यासमवेत त्यांनी पोडियमवर जागा मिळवली होती.
 4. नॉर्मन यांचा 2006 साली मृत्यू झाला.
 5. नॉर्मन, स्मिथ आणि कार्लोस या तिघांनीही मानवाधिकारांचे समर्थन करत त्यांच्या कृतीतून देशातील परिस्थितीचा निषेध व्यक्त केला होता.
 6. नॉर्मन ऑस्ट्रेलियातील एक गौर वर्णी शारिरीक शिक्षक होते.
 7. त्यांनी स्मिथ आणि कार्लोस यांच्या समर्थनाने शर्टावर मानवाधिकारचा बॅज लावला होता.
 8. तर स्मिथ आणि कार्लोस यांनी श्वेत वंशाची देशातली गरीबी दर्शविण्यासाठी प्रत्येकी एक हातमोजा अशी एकच जोडी वापरली होती.
 9. त्यानंतर स्मिथ आणि कार्लोस यांना ऑलंपिकमधून काढून टाकण्यात आले आणि नॉर्मनची कधीही निवड केली गेली नाही.


 The Derby missile was successfully released by Tejas aircraft

 1. भारतीय हवाई दलाने ‘तेजस’ या देशी बनावटीच्या हलक्या वजनाच्या लढाऊ विमानाद्वारे इस्राएल निर्मित हवेतून हवेत मारा करणार्‍या व दृष्टीक्षेपापलीकडील (BVR) लक्ष्य भेदणार्‍या ‘डर्बी’ क्षेपणास्त्राची दुसरी चाचणी यशस्वीरित्या पार पाडली आहे.
 2. डर्बी (अल्टो) क्षेपणास्त्र हे हवेतून हवेत मारा करणारे व दृष्टीक्षेपापलीकडील (BVR) लक्ष्य भेदणारे, मध्यम पल्ल्याचे (जास्तीतजास्त 50 कि.मी.) अॅक्टिव रडार होमिंग क्षेपणास्त्र आहे.
 3. हे 118 किलो वजनी क्षेपणास्त्र आहे.
 4. तेजस विमान भारताच्या संरक्षण संशोधन व विकास संस्था (DRDO) याच्या एरोनॉटिकल डेव्हलपमेंट एजन्सी या स्वायत्त संस्थेद्वारा देशातच विकसित केले गेले आहे.
 5. हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) कडून याचे उत्पादन केले गेले.
 6. हे वजनानी हलके व बहू-भूमिका बजावणारे चौथ्या पिढीचे एक इंजिन असलेले लढाऊ विमान आहे.
 7. तेजस विमानाचा IAF 45 स्क्वाड्रनमध्ये समावेश करण्यात आला आहे. 


India, China will jointly implement economic projects in Afghanistan

 1. भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांनी चीनमध्ये वुहान शहरात पार पडलेल्या पहिल्या अनौपचारिक शिखर परिषदेत अफगाणिस्तानमध्ये एक संयुक्त भारत-चीन आर्थिक प्रकल्प राबविण्यास सहमती दर्शविली आहे.
 2. 27-28 एप्रिल 20118 रोजी संपन्न झालेल्या परिषदेत दोन्ही देशांनी प्रकल्पाची ओळख पट‍वून त्याबाबत रूपरेषा तयार करण्याचे मान्य केले.
 3. भारत आणि चीन यांचा युद्ध-ग्रस्त देशामधला तो पहिलाच प्रकल्प असेल.
 4. अफगाणिस्तान हा आशियाच्या मध्यभागी असलेला एक भूपरिवेष्टित देश आहे.
 5. याची राजधानी ‎काबुल हे शहर आहे.
 6. या देशात ‎दारी, पश्तू या अधिकृत भाषा बोलल्या जातात.
 7. अफगाणिस्तानी अफगाणी हे राष्ट्रीय चलन आहे.


pankaj roy and all three c k. nayudu lifetime achievement award of bcci

 1. पंकज रॉय (2016-17), अंशुमन गायकवाड (2017-18), डायना एदूलजी (2016-17) आणि सुधा शाह (2017-18) यांना सी. के. नायडू जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे.
 2. नरेन ताम्हने आणि अब्बास अली बेग (2016-17) आणि बुधी कुंदरण (2017-18) यांना विशेष पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.
 3. त्यांना प्रत्येकी 15 लक्ष रुपये रोख पारितोषिक दिले जाईल.
 4. भारतीय क्रिकेट नियंत्रण मंडळ (BCCI) ची तामिळनाडू सोसायटी नोंदणी कायद्याच्या अंतर्गत डिसेंबर 1928 मध्ये स्थापना करण्यात आली.
 5. BCCIचे मुख्यालय महाराष्ट्राच्या मुंबईमध्ये आहे.
 6. BCCI तर्फे सी. के. नायडू जीवनगौरव पुरस्कार दिला जातो.
 7. पुरस्कार विजेत्याला 25 लक्ष रुपयांचे रोख पारितोषिक दिले जाते.
 8. हा पुरस्कार पहिल्यांदा 2006-07 साली दिला गेला होता.


Top