1. महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने गोवा हे देशातील सर्वात सुरक्षित राज्य आहे. तर गोव्याखालोखाल केरळ, मिझोरम, सिक्कीम, मणीपूर या राज्यांचा क्रमांक लागतो.
  2. महाराष्ट्र या यादीत नवव्या स्थानावर आहे. 'प्लान इंडिया'द्वारे तयार करण्यात आलेल्या अहवालातून ही बाब समोर आली आहे.
  3. महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने बिहार सर्वाधिक असुरक्षित आहे. बिहारसोबतच झारखंड, उत्तरप्रदेश आणि दिल्लीदेखील महिलांसाठी असुरक्षित असल्याचे आकडेवारी सांगते.
  4. प्लान इंडियाकडून तयार करण्यात आलेला अहवाल महिला आणि बाल कल्याण मंत्रालयाकडून प्रसिद्ध करण्यात आला. या अहवालात महिला सुरक्षेसह शिक्षण, आरोग्य, गरिबी हे मुद्दे विचारात घेण्यात आले आहे.


  1. दरवर्षी ३१ ऑक्टोबरला देशभरात 'राष्ट्रीय एकता दिवस' साजरा केला जातो.
  2. सरदार वल्लभभाई झवेरभाई पटेल ('लोहपुरुष') यांच्या १३९ व्या जयंती निमित्त ३१ ऑक्टोबर २०१४ रोजी देशात पहिल्यांदा राष्ट्रीय एकता दिवस साजरा करण्यात आला होता.


  1. भारतीय नेमबाजपटूंनी ऑस्ट्रेलियात सुरु असलेल्या राष्ट्रकुल नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी आपले वर्चस्व कायम राखले आहे.
  2. 10 मी. एअर पिस्तुल प्रकारात भारताच्या शाहजार रिझवी, ओंकार सिंह आणि जितू राय यांनी अनुक्रमे सुवर्ण, रौप्य आणि कांस्य पदकाची कमाई केली.
  3. महिलांच्या 10 मी. एअर रायफल प्रकारात पुण्याच्या पुजा घाटकरने सुवर्णपदकाची कमाई केली. तर भारताच्याच अंजुम मुदगलने रौप्यपदक मिळवले. सिंगापूरच्या मार्टीना वेलेसुने कांस्यपदक मिळवले.
  4. तसेच या स्पर्धेचा दुसरा दिवस भारतासाठी अतिशय चांगला ठरला. भारतीय नेमबाजपटूंनी दोन सुवर्ण, दोन रौप्य आणि एक कांस्य पदकासह 5 पदकांची कमाई केली.
  5. याआधी भारताच्या हिना सिद्धूने 10 मी. एअर पिस्तुल प्रकारात सुवर्णपदक पटकावले होते. हिनाव्यतिरीक्त भारताच्या दिपक कुमारने 10 मी एअर रायफल प्रकारात कांस्यपदकाची कमाई केली.


Top