An 8-member research committee is set up for Lokpal

 1. २७ सप्टेंबर २०१८ रोजी केंद्र सरकारने भ्रष्टाचारविरोधी संस्था लोकपालचे अध्यक्ष आणि सदस्यांच्या नावाची शिफारस करण्यासाठी ८ सदस्यीय शोध समिती स्थापन केली.
 2. ही समिती लोकपालच्या उमेदवारांचा शोध घेईल आणि नंतर सरकारकडे त्यांच्या नावाची शिफारस करेल.
 3. या समितीच्या अध्यक्षपदी सर्वोच्च न्यायालयाच्या माजी न्यायाधीश न्यायमूर्ती रंजना प्रकाश देसाई यांची निवड करण्यात आली आहे.
 4. लोकपाल (लोकायुक्त) कायदा २०१३मध्ये पारित केल्यानंतर ४ वर्षांनी लोकपाल शोध समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
 5. लोकपाल निवड समितीचे अध्यक्ष हे पंतप्रधान आहेत.
 6. याशिवाय लोकसभा अध्यक्ष, लोकसभेटील विरोधी पक्षनेते, देशाचे सरन्यायाधीश किंवा त्यांनी शिफारस केलेला सर्वोच्च न्यायालयातील एक न्यायाधीश आणि राष्ट्रपतींद्वारे नामनिर्देशित एक नामवंत कायदेपंडित यांचा या समितीमध्ये समावेश आहे.
 7.   लोकपाल शोध समितीचे सदस्य:
  1. अध्यक्ष: सर्वोच्च न्यायालयाच्या माजी न्यायाधीश रंजना प्रकाश देसाई.
  2. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (एसबीआय) माजी अध्यक्षा अरुंधती भट्टाचार्य.
  3. प्रसार भारतीचे प्रमुख ए सूर्यप्रकाश.
  4. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे (इस्त्रो) माजी चेअरमन किरण कुमार.
  5. अलाहाबाद उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश न्या. सखाराम सिंह यादव.
  6. गुजरात पोलिसांचे माजी प्रमुख शबीर हुसेन एस. खांडवाला.
  7. राजस्थान कॅडरचे सेवानिवृत्त आयएएस अधिकारी ललित पवार.
  8. माजी सॉलिसिटर जनरल रंजीत कुमार.
 8. लोकपालचे फायदेः
  1. लोकपालकडे सैन्याला वगळता पंतप्रधानापासून शिपायापर्यंतच्या (सरकारी अधिकारी, मंत्री, पंचायत सदस्य ई.) कोणत्याही लोकसेवकाच्या विरुद्ध भ्रष्टाचाराच्या तक्रारीसाठी खटला चालविण्याचा अधिकार असेल.
  2. विशेष परिस्थितीत, लोकपालाकडे एखाद्या व्यक्तीविरूद्ध न्यायालयीन खटला चालवण्याचा आणि त्याला २ लाखांचा दंड ठोठावण्याचा अधिकार असेल.


Two agreements between India and Morocco

 1. संरक्षण क्षेत्रामध्ये द्विपक्षीय सहकार्याला प्रात्साहन देण्यास भारत आणि मोरोक्को यांच्यामध्ये सहमती झाली.
 2. मोरोक्कोचे संरक्षण मंत्री अब्देलिट लुदेडी आणि भारतीय संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांच्यातील नवी दिल्ली येथे पार पडलेल्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला.
 3. मोरक्कोच्या संरक्षण मंत्र्यांचा हा पहिलाच भारत दौरा आहे.
 4. या बैठकीत हायड्रोग्राफी, शांतता मिशन, टेलिमेडिसिन, माहिती व तंत्रज्ञान, दहशतवादविरोधी कारवाया या विषयांवरही द्विपक्षीय सहकार्यासंबंधी चर्चा करण्यात आली आहे.
 5. त्याचबरोबर जहाज बांधकाम क्षेत्रामध्ये संरक्षण सहकार्याबद्दलही चर्चा झाली. दोन्ही देशांनी यावेळी खालील दोन द्विपक्षीय करारांवर स्वाक्षरी केली
 6. सायबर सिक्युरिटी क्षेत्रात इंडियन कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम (CERT-IN) आणि मोरक्कन कॉम्प्यूटर रिस्पॉन्स टीम (MA-CERT) यांच्यातील सहकार्यासाठी करार.
 7. बाह्य अंतराळ क्षेत्राचा शांततापूर्ण कार्यासाठी वापर करण्यासाठी इस्रो आणि मोरक्कन रिमोट सेंसिंग सेंटर यांच्यातील सहकार्य करार.


The largest cyclotron facility in India is implemented

 1. कोलकाता येथील व्हेरिएबल एनर्जी सायक्लोट्रॉन केंद्रात भारतातील सर्वात मोठी सायक्लोन-३० ही मेडिकल सायक्लोट्रॉन सुविधा कार्यान्वित करण्यात आली आहे.
 2. हे केंद्र अणुऊर्जा विभागाच्या अंतर्गत कार्य करते.
 3. ही सुविधा संपूर्ण देशासाठी विशेषत: पूर्व भारतासाठी किफायतशीर रेडिओ आयसोटोप्स आणि रेडिओ फार्मासिटीकल्स उपलब्ध करेल.
 4. सायक्लोट्रॉनचा वापर कर्करोग निदान आणि उपचारांसाठी रेडिओ आयसोटोप (समस्थानिके) तयार करण्यासाठी केला जातो. या रेडिओ आयसोटोपद्वारे कर्करोगाच्या पेशी विकिरणाने नष्ट करता येतात.
 5. देशातील अशी एकमेव सुविधा आहे, जिथे जर्मेनियम ६८च्या रेडिओ आयसोटोपचे उत्पादन केले जाईल. याचा वापर स्तनांच्या कर्करोग निदानासाठी केला जातो.
 6. या सायक्लोट्रॉनमध्ये पॅलेडियम १०३च्या रेडिओ आयोटोपचेही उत्पादन केले जाईल. प्रोस्टेट कर्करोगाच्या उपचारात याचा वापर होतो.
 7.  आयोडीन १२३ आयोटोपचेदेखील भविष्यात या सुविधेत तयार होईल, ज्याद्वारे थायरॉईड कर्करोगाचे निदान केले जाऊ शकते.
 8. या सायक्लोट्रॉनच्या मदतीने रेडिओ आयसोटोप स्वस्त दरात उपलब्ध होतील आणि त्यामुळे त्यांची आयातदेखील कमी होईल. भविष्यात भारता हे रेडिओ आयसोटोपनिर्यातही करू शकतो.
 9. भारत जर्मेनियम ६८ आणि गॅलियम ६८ची निर्मितीदेखील करू शकेल. भौतिक विज्ञान आणि आण्विक भौतिकी संशोधनासाठी यांचा वापर होतो.
 10. पार्श्वभूमी:–
  1. लँसेट ग्लोबल हेल्थच्या अभ्यासानुसार, २०१६मध्ये भारतात ८.३ लाख मृत्यू कर्करोगाने झाले होते.
  2. सध्याकर्करोगाच्या उपचारांसाठी रेडिओ आयसोटोप आयात करावे लागतात. तर काही आयसोटोप अप्सरा अॅटोमिक रिसर्च सेंटरमध्ये निर्माण केले जातात.
  3. देशातील बहुतेक सायक्लोट्रॉन सुविधा खासगी रुग्णालयात आहेत, त्यामुळे कर्करोगाचा उपचा र खूप महाग होतो.


Top