1. चंबळच्या खोर्‍यात डाकूंची (दरोडेखोरांची) दाणादाण उडवून देणारे विजयेंद्र बिद्री यांनी केंद्रीय गुन्हे अन्वेषण (सीबीआय) च्या नागपूर युनिटचे अधीक्षक म्हणून पदभार सांभाळला आहे. 
 2. बिद्री हे  तामिळनाडू कॅडरचे आयपीएस अधिकारी असून प्रतिनियुक्तीवर त्यांना नागपुरात नियुक्त करण्यात आले आहे. 2005 च्या तुकडीतील आयपीएस अधिकारी असलेले विजयेंद्र बिद्री यांची राजस्थान कॅडर साठी निवड झाली होती. मात्र, लग्नानंतर त्यांनी केलेल्या विनंतीला मंजुरी देत त्यांना तामिळनाडू कॅडरमध्ये स्थानांतरित करण्यात आले, हे विशेष! 
 3. सर्वप्रथम त्यांना राजस्थानातील  दऊसा येथे  अतिरिक्त पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्त करण्यात आले होते. त्यावेळी राजस्थानमध्ये गुजर आंदोलनाने तीव्र रूप घेतले होते. बिद्री यांनी प्रसंगावधान राखत येथील परिस्थिती हाताळली. त्यानंतर  स्पेशल ऑपरेशन ग्रुपचे अधीक्षक म्हणून नियुक्त करण्यात आले. त्यांनी या पदावर असताना अमली पदार्थाचा देशातील सर्वात मोठा साठा जप्त करण्यात यश मिळवले. 
 4. तसेच त्यांची कार्यशैली बघून त्यांना  चंबळच्या खोर्‍यात नियुक्त करण्यात आले. त्यांनी अनेक कुख्यात डाकूंचे एन्काऊंटर करून चंबळमध्ये डाकूंची दाणादाण उडवून दिली होती.


 1. मनुष्यबळ विकास मंत्रालयातर्फे वर्ष २0१६-१७ साठी देशभरातील सर्व सरकारी शाळांसाठी स्वच्छता विद्यालयाची राष्ट्रीय स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. स्वच्छतेच्या आदर्श मानदंडांची कसोशीने अमलबजावणी करणा-या देशातल्या १७२ शाळांचा या स्पर्धेत पुरस्कार व प्रशस्तीपत्राने सन्मान करण्यात आला. पुरस्कारप्राप्त शाळांमधे महाराष्ट्रातल्या १५ शाळांचा समावेश आहे.
 2. मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते विजेत्या शाळांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. देशभरातल्या  २ लाख ६८ हजार शाळांनी या स्पर्धेत भाग घेतला होता. विजेत्या शाळांना मिळालेल्या पुरस्काराचे ५0 हजार रुपये व प्रशस्तीपत्र असे स्वरूप आहे. देशातील  ३ राज्ये,  ११ जिल्हे व १७२ शाळांना स्वच्छतेबाबत विशेष परिश्रम घेतल्याबद्दल या सोहळयात गौरवण्यात आले. पुरस्कार वितरण सोहळ्यास मनुष्यबळ विकास राज्यमंत्री उपेंद्र कुशवाह, सचिव आनंद स्वरूप, अपर सचिव अनिता करवल उपस्थित होते.
 3. स्वच्छता विद्यालय पुरस्कार स्पर्धेच्या निकषांमधे, शाळेत पाण्याची व शौचालयांची उपलब्धता, हात धुण्याची व्यवस्था, देखभाल व्यवस्था, स्वच्छतेबाबत विद्यार्थ्यांच्या वर्तणुकीत घडवलेला बदल, क्षमता विकास इत्यादी मुद्यांचा समावेश होता. स्पर्धेसाठी तालुका, जिल्हा, राज्य व राष्ट्रीय पातळ्यांवरील समित्यांनी गुणांकन करून देशातल्या १७२ शाळांची निवड केली. त्यात  महाराष्ट्रातल्या १५ शाळांचा समावेश आहे.
 4. स्वच्छता विद्यालय राष्ट्रीय पुरस्कार स्पर्धेत विजेत्या ठरलेल्या महाराष्ट्रातल्या ज्या १५ शाळांचा समावेश आहे, त्यांची नावे पुढीलप्रमाणे आहेत.

१) शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक मुलींची शाळा, कोठाली (नंदू रबार)

२) शासकीय माध्यमिक आश्रम शाळा, किनवट(नां देड)

३) कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय धानोरा (गडचि रोली),

४) एनएनएमसी माध्यमिक शाळा, आंबेडकर नगर (ठा णे),

५) मुलांची शासकीय निवासी शाळा, शिरूर (बी ),

६) जिल्हा परिषद शाळा उंडेमळा,(अहम दनगर),

७) जिल्हा परिषद पब्लिक स्कुल नेप्ती (अहमद नगर),

८) जिल्हा परिषद केंद्रीय मराठी प्राथमिक शाळा, धरणगाव (बुल ढाणा),

९) जिल्हा परिषद उर्दू शाळा, यशवंत नगर टोणगाव (जळ  गाव),

१0) जिल्हा परिषद विद्या निकेतन देवळा, (ना शि ),

११) जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शेंडेवाडी (साता रा)

१२) जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, शिवनगर,(पु णे )

१३) जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, बाहुली,(पु णे ),

१४) जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, कोलवाडी,(  रभणी)

१५) जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, कुरताडे (रत्नागिरी )


 1. केंद्र सरकारने प्रशासनात मोठे फेरबदल केले असून माजी गृह सचिव राजीव महर्षी यांची भारताचे नियंत्रक-महालेखापरीक्षकपदी (कॅग) नियुक्ती केली आहे. तर  सुनील अरोरा यांची  मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.
 2. गृह सचिव पदाचा 31 ऑगस्ट रोजी राजीनामा देणारे राजीव महर्षी आता कॅगचे प्रमुख राहतील. ते  शशिकांत शर्मा यांची जागा घेतील. ते 1978च्या राजस्थान केडरचे आयएएस अधिकारी आहेत. त्याचबरोबर डेप्यूटी कॅगपदी रंजनकुमार घोष यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
 3. तसेच आयएएस अधिकारी सुनील अरोरा यांची मुख्य निवडणूक आयुक्तीपदी नेमण्यात आले आहे. तर  अनिता करवाल यांना केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई)  अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
 4.  राजीवकुमार यांना अर्थ सेवा विभागाचे सचिव तर आशा राम सिहाग यांना अवजड उद्योग विभागाचे सचिव म्हणून नेमले आहे.


 1. संयुक्त राष्ट्र संघ, माझे सरकार व नीति आयोग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित वूमन ट्रान्सफॉर्मिंग इंडिया कार्यक्रमात, महाराष्ट्रातल्या कमल कुंभार (उस्मानाबाद),  हर्षिनी कन्हेकर (नागपूर) व  संगीता कांबळे (सातारा) या तीन महिलांना ट्रान्सफॉर्मिंग वूमन ऑफ इंडिया या राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आले.
 2. केंद्रीय वस्त्रोद्योग व माहिती प्रसारणमंत्री स्मृती इराणी यांच्या उपस्थितीत, विविध क्षेत्रांमध्ये अतुलनीय कामगिरी बाजवणार्‍या  12 महिलांना पदक व प्रमाणपत्रासह पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
 3. उस्मानाबाद जिल्ह्याच्या हिंगलजवाडी येथील ग्रामीण महिला उद्योजक कमल कुंभार यांनी स्वयम् शिक्षण प्रयोग या स्वयंसेवी संस्थेमार्फत उद्योगविषयक प्रशिक्षण घेतल्यावर अवघ्या दोन हजार रुपयांच्या गुंतवणुकीतून बांगड्यांचा व्यवसाय सुरू केला. आपल्या प्रशिक्षणाचा लाभ त्यांनी आसपासच्या  4 हजार ग्रामीण महिलांना दिला आणि त्यांनाही उद्योजक बनवले. ऊर्जा सखी म्हणूनही त्या कार्यरत आहेत. ग्रामीण भारतातील विशेष कार्याबद्दल त्यांना पुरस्कार देण्यात आला.
 4. नागपूरच्या हर्षिनी कन्हेकर या देशातील पहिल्या महिला फायर फायटर आहेत. नागपूर येथील राष्ट्रीय फायर सर्व्हिस महाविद्यालयाच्या 46 वर्षांच्या इतिहासात त्या  पहिल्या महिला विद्यार्थिनी आहेत. आयुष्यात करिअरसाठी वेगळे क्षेत्र निवडून अन्य महिलांसमोर त्यांनी आदर्श वस्तुपाठ निर्माण केला आहे. श्रीमती कन्हेकर फायर फायटिंग क्षेत्रात अत्यंत उत्साहाने काम करीत असल्याने त्यांची पुरस्कारासाठी निवड झाली.
 5. सातारा जिल्ह्यातील संगीता कांबळे या देशातल्या  शेळ्यांच्या पहिल्या डॉक्टर आहेत. माणदेशी फाउंडेशनतर्फे प्रशिक्षण घेतल्यानंतर जिल्ह्यात त्यांनी शेळीसमूहाची सुरुवात केली. त्यांच्या प्रेरणेमुळे आज शेळी डॉक्टर म्हणून अनेक महिला काम करीत आहेत. या वेगळ्या प्रयोगाबद्दल त्यांना सन्मानित करण्यात आले.


Top