Jain muni Tarun Sagar dies after prolonged illness

 1. जैन मुनी तरुण सागर यांचं निधन झालं आहे. ते 51 वर्षांचे होते. पूर्व दिल्लीतील राधापुरी जैन मंदिरात 3 वाजता तरुण सागर यांनी अखेरचा श्वास घेतला.
 2. 26 जून 1967 रोजी मध्यप्रदेशच्या दहोह जिल्ह्यात त्यांचा जन्म झाला. तरुण सागरचे मूळ नाव पवन कुमार जैन हे होते.
 3. 20 दिवसांपूर्वी त्यांना काविळ झाली होती. त्यामुळे त्यांना नवी दिल्लीतील मॅक्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांच्या प्रकृतीत काहीच सुधारणाच होत नसल्यानं त्यांनी उपचार थांबवून चातुर्मास स्थळी जाण्याचा निर्णय घेतला होता.
 4. काही दिवसांपासून तरुण सागर हे पुष्पदंत सागर महाराजांच्या परवानगीने संथारा घेत आहेत.
 5. संथारा म्हणजे जैन धर्मानुसार मृत्यू समीप पाहून अन्न-पाण्याचा त्याग करणं.
 6. जैन मुनी तरुण सागर हे आपल्या कडव्या प्रवचनांसाठी प्रसिद्ध आहेत. त्यामुळेच त्यांना क्रांतिकारी संत असंही संबोधलं जातं.

 7. कडवे प्रवचन नावाची त्यांची पुस्तिकाही प्रसिद्ध आहे.

  तरुण सागर यांनी समाजातील विविध घटकांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला. इतकंच नाही तर त्यांनी मध्य प्रदेश आणि हरियाणा विधानसभेतही प्रवचन दिलं होतं.

 8. हरियाणा विधानसभेतील प्रवचनावरुन मोठा वाद निर्माण झाला होता.

 9. मध्य प्रदेश सरकारने 6 फेब्रुवारी 2002 रोजी त्यांना राजकीय अतिथीचा दर्जा दिला होता. 


Uda Samant, CIDCO Prashant Thakur, MHADA president

 1. महाराष्ट्र म्हाडाच्या अध्यक्षपदी शिवसेना आमदार उदय सामंत यांची नियुक्ती करण्यात आली आहे, तर सिडकोच्या अध्यक्षपदी पनवेलचे भाजप आमदार प्रशांत ठाकूर यांची निवड झाली आहे.
 2.  राज्य शासनाने विविध विकास महामंडळं, मंडळं आणि प्राधिकरणांच्या रिक्त असलेल्या अध्यक्ष, उपाध्यक्ष, सभापती पदांवर 21 नियुक्त्या जाहीर केल्या आहेत.
 3. जाहीर केलेल्या नियुक्त्यांमध्ये 10 महामंडळे, 6 मंडळे, 2 प्राधिकरण आणि एका आयोगातील पदाचा समावेश आहे.
 4. महाराष्ट्र म्हाडाच्या अध्यक्षपदी शिवसेना आमदार उदय सामंत यांची नियुक्ती करण्यात आली आहे, तर सिडकोच्या अध्यक्षपदी पनवेलचे भाजप आमदार प्रशांत ठाकूर यांची निवड झाली आहे.
 5. शिवसेनेच्या नितीन बानगुडे पाटील यांना महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या उपाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
 6. मधु चव्हाण यांना मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ (म्हाडा)चं अध्यक्षपद देण्यात आलं आहे. 


Fastest 6000 runs in Test cricket, Virat second Indian

 1. कसोटी क्रिकेटमध्ये सहा हजार धावा करणारा विराट हा भारताचा दहावा फलंदाज ठरला आहे.
 2. टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमध्ये सहा हजार धावांचा टप्पा पार केला.
 3. विराटने इंग्लंडविरुद्ध सुरु असलेल्या साऊदम्प्टन कसोटीत अँडरसनच्या गोलंदाजीवर चौकार ठोकत सहा हजार कसोटी धावा पूर्ण केल्या.
 4. या कामगिरीसह विराट कसोटी क्रिकेटमध्ये सहा हजार धावा करणारा भारताचा दहावा फलंदाज ठरला आहे.
 5. तर सर्वात जलद सहा हजार धावा करणारा सुनील गावस्कर यांच्यानंतरचा दुसरा भारतीय ठरला.
 6. गावस्कर यांनी 117 डावांत सहा हजार धावांचा टप्पा ओलांडला होता. विराटने 70 कसोटी सामन्यांतल्या 119 डावांत ही कामगिरी करुन दाखवली.


First Kashmiri Muslim women pilot will become Eram Habib

 1. काश्मीरमधल्या अत्यंत धार्मिक मुस्लीम वातावरणात तरूणीनं वैमानिक होणं ही अत्यंत दुर्मिळ बाब असून त्यामुळे इरमची ही निवड कौतुकाचा विषय झाली आहे.
 2. तीस वर्षीय इरम हबीब ही वैमानिक बनणारी काश्मीरमधली पहिली मुस्लीम महिला ठरणार आहे.
 3. पुढील महिन्यात इरम खासगी विमान कंपनीत पायलट म्हणून रूजू होत आहे.
 4. काश्मीरमधल्या अत्यंत धार्मिक मुस्लीम वातावरणात तरूणीनं वैमानिक होणं ही अत्यंत दुर्मिळ बाब असून त्यामुळे इरमची कामगिरी कौतुकाचा विषय झाली आहे.
 5. काश्मीरमधल्या विविध प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार बालपणापासूनच इरमनं वैमानिक होण्याचं स्वप्न बघितलं होतं, त्यासाठी तिनं फॉरेस्ट्री या विषयात डॉक्टरेट करण्याची आकांक्षा बाजुला ठेवली व पायलट होणं निवडलं.
 6. दोन वर्षांपूर्वी तन्वी रैना या काश्मिरी पंडित कुटुंबातील मुलीनं वैमानिक होत काश्मीरमधली पहिली महिला वैमानिक होण्याचा मान मिळवला होता.
 7. तर गेल्या वर्षी आयेषा अझीज या एकवीस वर्षीय तरूणीनं भारतातली सगळ्यात तरूण विद्यार्थी वैमानिक ठरण्याचा मान मिळवला होता.


Top