US Rosemary DeKarlo - First woman UN political head

 1. अमेरिकेची राजदूत रोझमेरी डीकार्लो यांची संयुक्त राष्ट्रसंघांच्या राजकीय व्यवहार विभागाचे प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
 2. यासोबतच, रोझमेरी डीकार्लो या संयुक्त राष्ट्रसंघांच्या राजकीय व्यवहारांचे प्रमुख झालेली जगातली पहिली स्त्री ठरली आहे. त्या जेफरी फेल्टमॅन यांच्याकडून पदभार स्वीकारतील. त्यांना लोक सेवा आणि शिक्षण क्षेत्रात 35 वर्षांचा अनुभव आहे.
 3. 1992 साली स्थापित संयुक्त राष्ट्रसंघाचे राजकीय व्यवहार विभाग (UN Department of Political Affairs -DPA) हा संयुक्त राष्ट्रसंघ सचिवालयाचा एक विभाग आहे, जो जागतिक राजकारणाच्या विकासावर देखरेख ठेवण्यास आणि मूल्यांकन करण्यास जबाबदार आहे. तसेच UN चे सरचिटणीसांना आणि त्यांच्या दूतांना जगात शांती राखण्यास आणि संघर्ष टाळण्यास सल्ला पुरवते.
 4. 1945 साली UN सनद (UN Charter) (UNO च्या स्थापनेचे दस्तऐवज) प्रभावी होऊन 24 ऑक्टोबर 1945 रोजी संयुक्त राष्ट्रसंघ अस्तित्वात आले. याला सुरक्षा परिषदेचे 5 कायमस्वरूपी सदस्य - चीन, फ्रांस, रशिया, ब्रिटन आणि अमेरिका - आणि इतर सदस्यांनी मान्यता दिली. याची 193 सदस्य राष्ट्रे आहेत.
 5. संयुक्त राष्ट्रसंघ (UN) ही आंतरराष्ट्रीय सहकार्याला प्रोत्साहन देणारी एक आंतरशासकीय संस्था आहे. संयुक्त राष्ट्रसंघाचे मुख्यालय मॅनहॅटन (न्यूयॉर्क शहर, अमेरिका) येथे आहे.
 6. संयुक्त राष्ट्रसंघाचे सर्वात प्रमुख अधिकारी पद ‘सरचिटणीस (Secretary General)’ हे असून वर्तमानात हे पद पोर्तुगीज अँटोनियो गुटेरस यांच्याकडे आहे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या 5 अधिकृत भाषा आहेत, त्या म्हणजे - अरबी, चीनी, इंग्रजी, फ्रेंच, रशियन, स्पॅनिश.


Vineet Joshi - First Director General of National Examination Organization (NTA)

 1. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE) चे माजी अध्यक्ष विनीत जोशी यांची राष्ट्रीय परीक्षा संस्था (National Testing Agency -NTA) चे पहिले महासंचालक म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.
 2. उच्‍च शिक्षण संस्थांच्या प्रवेश परीक्षा आयोजित करण्यासाठी संस्था अधिनियम, 1860 अंतर्गत संस्थेच्या रूपात एक स्‍वायत्‍त आणि आत्‍मनिर्भर शीर्ष परीक्षा संघटना म्हणून ‘राष्‍ट्रीय परीक्षा संस्था (National Testing Agency -NTA)’ स्थापन केली जात आहे.
 3. NTA संरचनेत एक अध्‍यक्ष (मनुष्यबळ विकास मंत्रालयातर्फे नियुक्ती), CEO, महानिदेशक पद आहे (भारत सरकार तर्फे नियुक्ती).
 4. राष्ट्रीय परीक्षा संस्था (NTA) CBSE, AICTE आणि अन्य संस्थांद्वारे उच्च शिक्षण संस्थांमध्ये प्रवेश घेण्याकरिता प्रवेश परीक्षा आयोजित करणार. यामध्ये NET, CTET, NEET या परीक्षांचाही समावेश आहे.
 5. ही संस्था 2019 सालापासून आपल्या कामकाजास सुरुवात करणार आहे.


Gondi will soon get the first dictionary

जवळपास दोन दशलक्ष गोंड लोकांद्वारा बहुसंख्य राज्यांमध्ये गोंडी भाषा बोलली जाते. ही भाषा मध्यप्रदेश, गुजरात, तेलंगाणा, महाराष्ट्र, छत्तीसगड आणि आंध्रप्रदेश या सहा राज्यांत मुख्यत: बोलली जाते.

CGNET प्रकल्प

 1. ‘CGNET स्वरा’ संस्थेचे संस्थापक शुभ्रंशू चौधरी या प्रकल्पाचे नेतृत्व करीत आहेत. CGNET प्रकल्पामधून तयार करण्यात आलेला शब्दकोष सध्या 3000 शब्दांचा आहे आणि त्यावर काम चालू आहे.
 2. प्रकल्पामार्फत आवाजावर आधारित एक ऑनलाइन व्यासपीठ तयार केले जात आहे. हा प्रकल्प केंद्रीय गोंडवाना परिसरातील नागरिकांना फोन कॉल करून स्थानिक बातम्या नोंदविण्याची परवानगी देतो.

 

गोंडी भाषेसंबंधी

 1. गोंडी भाषा एक श्रीमंत लोक परंपरा आहे. गोंडी भाषेमध्ये सहा वेगवेगळ्या बोलीभाषा आहेत, परंतु केवळ 100 लोकांनाच लिहिता येते.
 2. UNESCO कडून तयार करण्यात आलेल्या जगात बोलल्या जाणार्याध भाषांच्या यादीत धोक्यात असलेल्या वर्गामध्ये गोंडी भाषेचा समावेश करण्यात आला आहे. म्हणूनच, काही उद्योजक देशाचा पहिला गोंडी भाषेचा शब्दकोष तयार करण्यासाठी पुढे येत आहेत.

 


Top