Rs. 3 thousand crores approved for the purchase of supersonic BrahMos

 1. लष्करी साहित्य खरेदीच्या 3 हजार कोटी रुपयांच्या महत्वाच्या व्यवहाराला संरक्षण मंत्रालयाने मंजुरी दिली.
 2. तर नौदलाच्या दोन स्टेल्थ फ्रिगेटसाठी सुपरसॉनिक ब्राह्मोस क्षेपणास्त्रे आणि लष्कराच्या अर्जुन रणगाडयासाठी एआरव्ही गाडया विकत घेण्यात येणार आहेत.
 3. संरक्षण साहित्य खरेदीसंबंधी निर्णय घेणारी मंत्रालयाची सर्वोच्च समिती संरक्षण खऱेदी परिषदेने मंजुरी दिल्याचे वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्याने सांगितले.
 4. तसेच भारत एक अब्ज डॉलर मोजून रशियाकडून दोन स्टेल्थ फ्रिगेट विकत घेणार आहे. या दोन्ही फ्रिगेटस ब्राह्मोस क्षेपणास्त्राने सज्ज असतील.
 5. तर ब्राह्मोस हे भारताचे सर्वात अत्याधुनिक क्षेपणास्त्र असून भारत आणि रशियाने संयुक्तपणे हे क्षेपणास्त्र विकसित केले आहे


272 satellites will give the world 'Free Wifi'

 1. चीनची कंपनी लिंकश्योर नेटवर्क लवकरच संपूर्ण जगाला मोफत वायफाय सेवा देण्याची शक्यता आहे. कंपनीच्या मते, त्यांचे पहिले उपग्रह पुढीलवर्षी चीनमधील गासू प्रांतातील जिऊकुआं उपग्रह  स्थानकावरुन ते लाँच केले जाईल आणि 2020 पर्यंत अंतराळात असे 10 उपग्रह पाठवण्याचे नियोजन केले आहे.
 2. 2026 पर्यंत अंतराळात लिंकश्योरचे असे 272 उपग्रह कार्यरत राहतील. त्याच्या माध्यमातून  संपूर्ण जगाला मोफत वायफाय नेटवर्क उपलब्ध होईल. 
 3. कंपनीचे सीईओ वाँग जिंगयिंग यांनी याबाबत माहिती दिली. ही योजना यशस्वी करण्यासाठी कंपनी 3 हजार कोटींची गुंतवणूक करणार आहे.
 4. ही योजना यशस्वी झाल्यानंतर भविष्यात यातून मोठी कमाई  होऊ शकेल.
 5. चीनमधील एका वृत्तपत्राच्या मते, अंतराळातून येणाऱ्या वायफाय नेटवर्कला लोकांना आपले स्मार्टफोन्स सहजपणे कनेक्ट करता येतील.
 6. इतकेच नव्हे जिथे टेलिकॉम नेटवर्कही पोहोचत नाही तिथेही याचे  नेटवर्क जाईल.
 7. एका अहवालानुसार, जगातील 300 कोटीहून अधिक लोक अजूनही इंटरनेटच्या सेवेपासून दूर आहेत. याचवर्षी स्पेसएक्सला अंतराळात 7 हजार स्टारलिंक उपग्रह पाठवण्यास परवानगी मिळाली आहे.
 8. येणाऱ्या  काळात स्पेसएक्स अंतराळातून पृथ्वीवर इंटरनेट सेवा पाठवणारे 1600 उपग्रह अंतराळात पाठवणार आहे.
 9. स्पेसएक्स शिवाय गुगल, वनवेब आणि टेलिसॅटसारख्या कंपन्याही अशाच पद्धतीची योजना अंमलात आणण्याच्या प्रयत्नात आहेत.
 10. या कंपन्यांचे उपग्रह आणि बलून्सही अंतराळातून संपूर्ण पृथ्वीवर हायस्पीड  वायफाय सेवा उपलब्ध करण्याचे काम करतील.


Neha Narkhede In America's top-tech women

 1. फोर्ब्सने नुकतीच 2018 या वर्षाची औद्योगिक क्षेत्रातील टॉप 50 महिलांची यादी जाहीर केली आहे.
 2. जगभरातील महिलांचा यामध्ये समावेश असला तरीही भारतीयांसाठी आणि मराठी लोकांसाठी ही यादी विशेष खास आहे. 
 3. कारण यामध्ये चार भारतीय वंशाच्या महिलांचा समावेश असून त्यातील एक महिला मराठमोळी आहे.
 4. त्यामुळे जागतिक स्तरावर तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात मराठी महिला आपले स्थान निर्माण करत असल्याचे  चित्र आहे.
 5. नेहा नारखेडे या मराठमोळ्या तरुणीने यामध्ये बाजी मारल्याने मराठी लोकांसाठी तर ही नक्कीच अभिमानास्पद बाब आहे.
 6. नारखेडे यांनी पुणे विद्यापीठातून शिक्षण घेतले असून त्या कोफ्लूएंट या कंपनीच्या  सहसंस्थापक आहेत.
 7. सुरुवातीला त्यांनी लिंक्डइन या कंपनीत सॉफ्टवेअर इंदिंनिअर म्हणून काम केले.
 8. अपाची काफका हे सॉफ्टवेअर विकसित करण्यामध्ये त्यांनी महत्त्वाचे योगदान दिले आहे.
 9. तर नेटफ्लिक्स, गोल्डमॅन सॅशे आणि उबर यांसारख्या कंपन्या नारखेडे यांच्या कंपनीच्या ग्राहक कंपन्या आहेत.
 10. नारखेडे यांचे वय अवघे 32 असून त्यांनी या यादीत 35व्या स्थान पटकावले आहे.


Top