Central General Budget 2018-19

 1. केंद्रीय वित्त मंत्री अरुण जेटली यांनी संसदेपुढे चर्चेसाठी देशाचा सर्वसाधारण अर्थसंकल्प 2018-19 प्रस्तुत केला.
 2. या अर्थसंकल्पात कृषी, ग्रामीण विकास, आरोग्य, शिक्षण, रोजगार, MSME आणि पायाभूत सुविधा क्षेत्रांना भक्कम करण्याच्या अभियानावर लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे.
केंद्रीय सर्वसाधारण अर्थसंकल्प 2018-19
 1. ठळक वैशिष्ट्ये
 2. उत्पादन, सेवा आणि निर्यात क्षेत्रात होणाऱ्या निरंतर वाढीमुळे देशाने 8% विकास दर साध्य केला आहे.
 3. बहुतांश रब्बी पिकांप्रमाणेच सर्व अघोषित खरीप पिकांसाठी किमान आधारभूत किंमत ही त्यांच्या उत्पादन मूल्याच्या दिडपट असेल. वर्ष 2018-19 मध्ये संस्थात्मक कृषी कर्जात वाढ करुन 11 लाख कोटी करण्यात आले आहे, जे वर्ष 2014-15 मध्ये 8.5 लाख कोटी होते.
 4. 86% छोट्या आणि सीमांत शेतकऱ्यांच्या हिताचे संरक्षण करण्यासाठी ग्रामीण कृषी बाजारपेठेत 22000 ग्रामीण हाटचा विकास आणि सुधारणा करण्यात येणार आहेत.
 5. बटाटे, टोमॅटो आणि कांद्याच्या अस्थिर किंमतींचा प्रश्न सोडवण्यासाठी तसेच शेतकरी आणि ग्राहकांच्या फायद्यासाठी ‘ऑपरेशन ग्रीन्स’ सुरु करण्यात आले आहे.
 6. मत्सपालन आणि पशुपालन क्षेत्रासाठी 10,000 कोटी रुपयांच्या दोन नवीन कोषांची घोषणा करण्यात आली. पुनर्संरचित राष्ट्रीय बांबू अभियानासाठी 1290 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
 7. महिला बचत गटांच्या गेल्या वर्षीच्या 42,500 कोटी रुपयांच्या कर्ज मर्यादेत वाढ करुन ती वर्ष 2019 मध्ये 75000 कोटी रुपये एवढी करण्यात आली.
 8. निम्न आणि मध्यम उत्पन्न श्रेणीतील कुटुंबांना मोफत LPG जोडणी, विज आणि शौचालय सुविधा पुरविण्याकरीता उज्वला, सौभाग्य आणि स्वच्छ अभियानावर अधिक लक्ष केंद्रित करण्यात आले.
 9. आरोग्य, शिक्षण आणि सामाजिक सुरक्षेवरील एकूण खर्चास 1.38 लाख कोटी रुपये असतील. वर्ष 2022 पर्यंत आदिवासी विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक आदिवासी विभागात एकलव्य निवासी शाळा असेल. अनुसूचित जातींसाठीच्या कल्याणकारी निधीत वाढ केली जाणार.
 10. 10 कोटी गरीब आणि असुरक्षित कुटुंबांना प्रत्येक कुटुंबाला 5 लाख रुपयांच्या मर्यादेसह दुय्यम आणि दर्जात्मक उपचार देण्यासाठी जगातील सर्वात मोठ्या आरोग्य सुविधा योजना सुरू करण्यात आली आहे.
 11. राजकोषीय तूट 3.5% पर्यंत निश्चित केले गेले. ही तूट वर्ष 2018-19 मध्ये 3.3% असण्याचा अंदाज आहे.
 12. पायाभूत सुविधा क्षेत्रासाठी 5.97 लाख कोटी रूपयांच्या निधीची तरतूद केली गेली.
 13. आदर्श पर्यटन स्थळे म्हणून 10 प्रमुख ठिकानांचा विकास केला जाणार.
 14. NITI आयोग कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) संदर्भात एक राष्ट्रीय कार्यक्रम सुरु करणार.
 15. रोबोटिक्स, AI, इंटरनेट आदि संदर्भात उत्कृष्ट केंद्रांची स्थापना केली जाणार.
 16. निर्गुंतवणूकीचे 72500 कोटी रुपयांचे लक्ष्य साधताना 100000 कोटी रुपयांपर्यंत पोहचले.
 17. सोन्याला संपत्ती श्रेणीच्या रूपात विकसित करण्यासाठी सर्वसमावेशक सोनं धोरण बनविण्याची तयारी होत आहे.
 18. शेतकरी उत्पादक कंपनी म्हणून नोंदणीकृत असलेल्या आणि 100 कोटी रुपये वार्षिक उलाढाल असलेल्या कंपन्यांना वर्ष 2018-19 पासून पुढील पाच वर्षांसाठी कमवलेल्या नफ्यावर 100% कपातचा प्रस्ताव सादर केला गेला.
 19. रोजगार निर्मितीला चालना देण्यासाठी JJAA च्या कलम 80 अंतर्गत नव्या कर्मचाऱ्यांना देण्यात येणाऱ्या वेतनावर 30% कपात मध्ये सवलत देत त्याला पादत्राणे आणि चर्म उद्योगासाठी 150 दिवस केले जाणार.
 20. ज्यात सर्कल रेट मूल्य रकमेच्या 5% पेक्षा कमी असेल, अश्या स्थावर मालमत्तेत घेण्या-देण्या संबंधित व्यवहारांमध्ये कोणतेही समायोजन नसणार.
 21. सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगांच्या फायद्यासाठी, वित्त वर्ष 2016-17 मध्ये 50 कोटी रुपयांपेक्षा कमी वार्षिक उलाढाल असलेल्या कंपन्यांना सध्या देण्यात येणारी 25% सवलत 250 कोटी रुपयांपर्यंत वार्षिक उलाढाल असलेल्या कंपन्यांनाही देण्याचा प्रस्ताव आहे.
 22. सध्याच्या प्रवास भत्ता आणि वैद्यकीय खर्चामधील सवलतीऐवजी सरसकट 40000 रुपये मानक कपात केली जाणार. यामुळे अडीच कोटी पगारदार आणि निवृत्तीवेतनधारकांना लाभ मिळणार.
 23. शेअर बाजारांमधील व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र (IFSC) मधील स्टॉक एक्सचेंजांमध्ये IFSC साठी आणखी अधिक सवलती दिल्या जातील.
 24. रोख अर्थव्यवस्था नियंत्रित करण्यासाठी विश्वस्त मंडळ किंवा संस्थांना 10,000 रुपयांपेक्षा अधिक रकमेच्या व्यवहारांना परवानगी नसणार आणि त्यावर कर आकारला जाणार.
 25. दीर्घकालीन भांडवली नफा 1 लाख रुपयांपेक्षा अधिक असल्यास 10% कर आकारला जाणार, ज्यामध्ये कोणतेही निर्देशित लाभ मिळणार नाहीत. मात्र 31 जानेवारी 2018 पर्यंतच्या लाभांना संरक्षित केले जाणार.
 26. समभाग संलग्न म्युच्युअल फंडांच्या लाभांशावर 10% कर आकारण्याचा प्रस्ताव आहे.
 27. वैयक्तिक प्राप्तीकर आणि कंपनी करावरील उपकर चालू 3% वरुन 4% करण्याचा प्रस्ताव आहे.
 28. प्रत्यक्ष कर संकलनात अधिक कार्यक्षमता आणि पारदर्शकता आणण्यासाठी देशभरात ई-मूल्यमापन व्यवस्था सुरु करण्याचा प्रस्ताव आहे.
 29. देशात रोजगार निर्मितीला चालना देण्यासाठी तसेच अन्न प्रक्रिया, इलेक्ट्रॉनिक्स, पादत्राणे, फर्निचर यांसारख्या क्षेत्रांमध्ये ‘मेक इन इंडिया’ आणि देशांतर्गत मूल्यवर्धनाला चालना देण्यासाठी सीमाशुल्कात फेरबदल करण्याचा प्रस्ताव आहे.
 30. ज्येष्ठ नागरिकांसाठी प्रस्तावित सवलती -
 31. बँका आणि टपाल कार्यालयातील ठेवींवरील व्याज सवलतीची मर्यादा 10,000 रुपयांवरुन 50,000 रुपयांपर्यंत वाढवली.
 32. कलम 194A अंतर्गत TDS कापण्याची आवश्यकता नाही. सर्व मुदत ठेव योजना आणि आवर्ती ठेव योजनांतर्गत प्राप्त व्याजांवरही लाभ मिळणार.
 33. कलम 80D अंतर्गत आरोग्य विमा हप्ता आणि/किंवा वैद्यकीय खर्चासाठीची कपात मर्यादा 30,000 रुपयांवरुन 50,000 रुपयांपर्यंत वाढवली.
 34. जेष्ठ नागरिकांसाठी काही विशिष्ट आजारांमधील वैद्यकीय खर्चासाठी कपात मर्यादा 60,000 रुपयांवरुन 1 लाख रुपयांपर्यंत, तर अति जेष्ठ नागरिकांसाठी देखील 80,000 रुपयांवरुन 1 लाख रुपयांपर्यंत वाढवली.
 35. प्रधानमंत्री वय वंदना योजनेचा कालावधी मार्च 2020 पर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव आहे. सध्याची गुंतवणूक मर्यादा 7.5 लाख रुपयांवरुन 15 लाख रुपयांपर्यंत प्रत्येक ज्येष्ठ नागरिकांसाठी वाढवण्याचा प्रस्ताव आहे.


Three out of 10 young people are uneducated: UNICEF

 1. UNICEF च्या एका अभ्यासानुसार असे आढळून आले आहे की, संघर्षाने ग्रस्त आणि आपत्तीग्रस्त देशांमध्ये 15-24 वर्षे वयोगटातील दर 10 पैकी 3 (म्हणजेच 30%) तरुण अशिक्षित आहेत आणि त्यामुळे वंचित बालक व युवांसाठी शिक्षण क्षेत्रात मोठी गुंतवणूक करण्याची आवश्यकता भासत आहे.
 2. UNICEF ने देशांच्या सरकारांना आणि इतर भागीदारांना ही समस्या प्रभावीपणे हाताळण्यासाठी पुढील बाबींचा आग्रह केला आहे -
  1. तरुण मुलांच्या विकासास चालना देण्यासाठी आणि त्यांच्या बालपणात शिक्षण सुरू ठेवण्यासाठी दर्जेदार प्रारंभिक शिक्षण कार्यक्रमांमध्ये प्रवेश प्रदान करणे.
  2. अशिक्षित तरुणांना शिकण्याची संधी उपलब्ध करून देणे आणि खास त्यांच्यासाठी तयार केलेल्या पर्यायी शिक्षणाद्वारे त्यांचे शिक्षण पुढे चालू ठेवणे.
  3. शिक्षणात विशेषतः सर्वात वंचित बालकांसाठी आणि तरुणांसाठी वाढीव गुंतवणूक करणे.
  4. परिस्थिती सुधारण्यासाठी शैक्षणिक कार्यक्रमांसाठी पुरेसा निधी सुनिश्चित करणे महत्त्वपूर्ण आहे.
तुम्हाला हे माहीत आहे का?
 1. वर्तमान जागतिक परिस्थिती:-
 2. आपत्कालीन स्थितीत असलेल्या देशांमध्ये 24% तरुण मुलांना मूलभूत शिक्षणही मिळत नाही, तर मुलींच्या बाबतीत हे प्रमाण 33% आहे.
 3. संघर्षाने ग्रस्त आणि आपत्तीग्रस्त देशांमध्ये लहान मुलांचे शिक्षणा आणि त्यांचे भवितव्य तसेच त्या देशांची अर्थव्यवस्था व समाज यांची स्थिरता व विकास यावर अत्याधिक गंभीर परिणाम दिसून येत आहेत.
 4. संयुक्त राष्ट्रसंघ शैक्षणिक, विज्ञान व सांस्कृतिक संघटना (UNESCO) कडील 27 आपत्तीग्रस्त देशांसंबंधित महितीनुसार, नायजर, चाड, दक्षिण सूदान आणि मध्य आफ्रिका प्रजासत्ताक यांसारख्या देशांमध्ये अस्थिरता आणि अतीव दारिद्य अजूनही दिसून येत आहे. या देशांमध्ये 15-24 वर्ष वयोगटातील तरुणांमधील निरक्षरता दर अनुक्रमे 76%, 69%, 68% आणि 64% आहे.
 5. वर्तमानात मानवता कार्यांसाठीच्या मदतीसाठी जमविण्यात येणार्‍या निधीच्या फक्त 3.6% आपत्तीग्रस्त देशांमधील बालकांना शिक्षण प्रदान करण्यात खर्च केला जात आहे.


India is the cheapest country after South Africa

 1. भारत राहण्याच्या दृष्टीने दक्षिण आफ्रिकेनंतर जगातला दुसरा सर्वाधिक स्वस्त देश आहे.
 2. गो-बँकिंग-रेट्स द्वारे 112 देशांमध्ये केल्या गेलेल्या यासंबंधी सर्वेक्षणात चार मानकांना गृहीत धरले आहेत.
  1. स्थानिक खरेदी क्षमता निर्देशांक,
  2. किराया निर्देशांक,
  3. किराना सामान निर्देशांक
  4. ग्राहक मूल्य निर्देशांक.
गो-बँकिंग-रेट्स
 1. महाग देशांमध्ये बरमूडा (112), बहामास (111), हांगकांग (110), स्वित्झर्लंड (109) आणि घाना (108) यांचा समावेश होतो.
 2. भारताचे शेजारी पाकिस्तान (14), नेपाळ (28) आणि बांग्लादेश (40) हे प्रथम 50 मध्ये आहेत.
 3. जगातले 50 देश किरायाच्या दृष्टीने स्वस्त आहेत. यामध्ये नेपाळ पहिला तर भारत दुसर्‍या क्रमांकावर आहे.
 4. किराना सामान याबाबतीत भारत दुसर्‍या स्थानी आहे.
 5. भारतामधील मोठ्या शहरांमध्ये स्थानिक खरेदी क्षमता तुलनेने अधिक आहे.


Saina Nehwal is the runner-up of 'Indonesian Masters 2018'

 1. तायपेईची बॅडमिंटनपटू ताय झ्यू यिंग हिने 'इंडोनेशियन मास्टर्स 2018' या बॅडमिंटन स्पर्धेत अंतिम लढतीत सायना नेहवालचा पराभव करत महिला एकेरीचे विजेतेपद जिंकले आहे.
 2. ही इंडोनेशियन ओपन ग्रँड प्रिक्स गोल्ड या नावाने ओळखली जाणारी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धा आहे.
 3. प्रथम वर्ष 2010 मध्ये आयोजित केली गेली होती.
 4. स्पर्धेचे इतर विजेते:-
प्रकार विजेते
पुरुष एकल अँथनी सिनीसूका गिनटिंग (इंडोनेशिया)
पुरूष दुहेरी  मार्कस फर्नांल्डी गिदन आणि केवीन संजया सुकामुल्जो (इंडोनेशिया)
महिला एकल ताय झ्यू यिंग(तायपेई)
महिला दुहेरी मिसाकी मात्सूतोमो आणि अयाका ताकाहाशी (जपान) 
मिश्र दुहेरी                          झेंग सिवेयी आणि हुआंग याकिओंग (चीन)


India and Vietnam start the first military practice of 'VINBAX'

 1. भारत आणि व्हिएतनाम यांच्या लष्करांनी मध्यप्रदेशच्या जबलपुरमध्ये ‘VINBAX’ नामक एक संयुक्त लष्करी सराव सुरू केला आहे.
 2. सहा दिवस चालणारा हा युद्धाभ्यास भारत आणि व्हिएतनाम यांचा प्रथमच सराव आहे.
 3. व्हिएतनाम हा दक्षिण-पूर्व आशियातला एक देश आहे.
 4. याला दक्षिण चीन समुद्र लाभलेला आहे.
 5. या देशाचे राजधानी शहर हनोई हे आहे
 6. व्हिएतनामी दोंग हे चलन आहे.


Top