In the Lok Sabha, the 'Central Educational Institutions (Reservation in Teacher Selection) Bill' has been approved

 1. संसदेच्या लोकसभेत विद्यापीठात शिक्षकांच्या नियुक्तीमध्ये आरक्षणाच्या संदर्भातला ‘केंद्रीय शैक्षणिक संस्था (शिक्षक संवर्गात आरक्षण) विधेयक-2019’ मंजूर करण्यात आले आहे.
 2. हे विधेयक आरक्षण देण्याच्या प्रस्तावासाठी विद्यापीठ किंवा महाविद्यालयाला एक विभाग गृहीत धरण्याऐवजी एक एकक बनविण्याचे प्रस्तावित करते. हे विधेयक सर्व केंद्रीय विद्यापीठांना लागू असेल.
 3. या विधेयकान्वये देशातल्या 41 केंद्रीय विद्यापीठांमधील सुमारे 8,000 रिक्त पदे भरणार आणि सर्वसाधारण प्रवर्गामधील आर्थिकदृष्ट्या कमकुवत प्रवर्गासाठी 10% आरक्षण देखील दिले जाणार.
 4. पार्श्वभूमी:-
  1. एप्रिल 2017 या महिन्यात अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या आदेशावरून हा आरक्षणाचा मुद्दा उद्भवला आहे, ज्यामध्ये विद्यापीठात अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी आरक्षणाच्या संदर्भात होता.
  2. आरक्षण देण्यासाठी शिक्षकांच्या जागांची संख्या मोजण्यासाठी स्वतंत्र विभागांना मूलभूत एकक मानली जावी.
  3. उच्च न्यायालयाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते आणि तो आदेश रद्द करण्यात आला.


National campaign on 'Natural Language Interpretation'

 1. भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने “नैसर्गिक भाषा भाषांतरण’ विषयक राष्ट्रीय मोहीम” राबविण्याची योजना आखली आहे.
 2. हा प्रस्ताव मंत्रालयाच्या 100 दिवसांच्या कृती योजनेचा एक भाग आहे. प्रकल्पासाठी पुढील तीन वर्षांसाठी 450 कोटी रुपयांचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे.
 3. पंतप्रधान विज्ञान, तंत्रज्ञान आणि अभिनवता सल्लागार परिषद (PM-STIAC) कडून याला मान्यता दिली गेली आहे.
 4. लोकांना इंग्रजी तसेच स्थानिक भाषांमध्ये शैक्षणिक व संशोधन सामुग्री उपलब्ध व्हावी आणि त्यांना विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्राबाबत माहिती मिळावी हे उद्दीष्ट ठेवण्यात आले आहे. लोकांना शिक्षित करण्यासोबतच बेरोजगारांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण होण्यास मदत होऊ शकते. त्यामुळे विद्यार्थी, शिक्षक, लेखक, प्रकाशक, सॉफ्टवेअर विकसक आणि सामान्य वाचकांना मदत होणार.
 5. मनुष्यबळ विकास मंत्रालय आणि विज्ञान व तंत्रज्ञान विभाग यांच्याबरोबरीने माहिती तंत्रज्ञान मंत्रालय ही मोहीम राबवविणार आहे. केंद्र आणि राज्य संस्था तसेच स्टार्टअप उद्योगांच्या मदतीने हा उपक्रम चालवला जाणार आहे.


'STRIDE' venture promoting UGC's research

 1. भारताच्या सामाजिक-आर्थिक विकासासाठी भारतात संशोधनात्मक संस्कृती रुजविण्याच्या उद्देशाने विद्यापीठ अनुदान आयोगाने (UGC) स्किम फॉर ट्रान्स-डिसिप्लीनरी रिसर्च फॉर इंडियाज डेव्हलपिंग इकॉनॉमी (STRIDE) नावाचा एक नवीन उपक्रम मंजूर केला आहे.
 2. सामाजिकदृष्ट्या संबंधित, स्थानिक गरजांवर आधारित, राष्ट्रीय महत्त्वपूर्ण आणि जागतिक स्तरावर महत्त्वपूर्ण संशोधन प्रकल्पांना पाठिंबा देण्यासाठी हा पुढाकार घेण्यात आला आहे.
 3. अर्ज प्राप्त करण्यासाठी योजनेचे संकेतस्थळ दि. 31 जुलै 2019 पासून सुरू करण्यात आले आहे.
 4. ही योजना महाविद्यालये आणि विद्यापीठांमध्ये संशोधन आणि अभिनव कल्पना याची संस्कृती रुजविण्यात बळकटी आणणार आणि सहकारी संशोधनासोबत भारताच्या विकसनशील अर्थव्यवस्थेमध्ये योगदान देण्यासाठी विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना मदत करेल.
 5. शिवाय, मानवता आणि मानवशास्त्र या क्षेत्रात बहु-संस्थात्मक जाळे उभारून शोध प्रकल्पांना निधी देखील पुरविला जाणार.
 6. या कायद्यान्वये तरुण प्रतिभावंतांची ओळख पाठवणे, संशोधनाची संस्कृती बळकट करणे, क्षमता बांधणी, राष्ट्रीय विकासासाठी नवकल्पनांना प्रोत्साहन देणे हे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.


By 2025, the target of the $ 50 billion Indo-Indonesia bilateral trade was targeted

 1. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इंडोनेशियाचे राष्ट्रपती जोको विडोडो यांनी जपानच्या ओसाका या शहरात जी-20 परिषदेच्या दरम्यान भेट घेतली.
 2. दोन्ही देशांमधील द्वैपक्षीय व्यापार 2025 सालापर्यंत 50 अब्ज डॉलरपर्यंत पोहचविण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. अर्थव्यवस्था, संरक्षण आणि सागरी सुरक्षा यासह अनेक महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये सहकार्याला चालना देण्यावर चर्चा केली गेली.
 3. भारत-इंडोनेशिया संबंध:-
  1. इंडोनेशिया हा आग्नेय आशिया व ओशनियामधील एक देश आहे. हा देश हिंद महासागरातील 17,508 बेटांचा एक द्वीपसमूह आहे.
  2. जकार्ता ही देशाची राजधानी आहे आणि इंडोनेशियन रुपिया हे राष्ट्रीय चलन आहे.
  3. भारतीय व चिनी संस्कृतीचा मिलाफ येथे दिसून येतो.
  4. या देशाचा भारताशी पुरातन संबंध आहे. भारतातल्या पुराणांमध्ये याचा उल्लेख दीपांतर भारत म्हणजेच समुद्रापारचा भारत असा आढळतो.
  5. दीपांतर हे नाव इंडोनेशिया मध्ये अजूनही प्रचलित आहे.
  6. इंडोनेशियाच्या केंद्रीय सांख्यिकी संस्थेनुसार, भारतासोबतचा व्यापार 2016 साली 12.90 अब्ज डॉलर झाला.
  7. सन 2017 मध्ये दोन्ही देशांचा द्वैपक्षीय व्यापार 28.70% ने वाढून 18.13 अब्ज डॉलरवर पोहचला आहे.


8878 schools to set up Atal Tinkering Laboratories

 1. शाळांमध्ये संशोधन आणि नवकल्पनांना प्रोत्साहन देण्यासाठी भारत सरकारने शाळांमध्ये “अटल टिंकरिंग लॅब (ATL)” यांची स्थापना करण्यासाठी आतापर्यंत 8878 शाळांची निवड केली आहे.
 2. अभियानाबाबत:-
  1. देशात अभिनवता आणि उद्योजकता रुजविण्यासाठी राष्ट्रीय भारत पारिवर्तन संस्था (NITI) आयोगाने देशात अटल अभिनवता अभियान (Atal Innovation Mission -AIM) चालविले आहे.
  2. या अभियानाच्या अंतर्गत शालेय पातळीवर अटल टिंकरिंग लॅब स्थापन करण्यासाठी आर्थिक मदत दिली जाते.
  3. या प्रयोगशाळेमध्ये इयत्ता 6 वी ते 12 वी यामधील विद्यार्थ्यांना कौशल्य प्रदान केले जात आहे.
  4. एक शोधक म्हणून भारतात एक दशलक्ष विद्यार्थ्यांचा विकास करणे या दृष्टिकोनातून भारत सरकारच्या या अभियानाच्या अंतर्गत देशभरातल्या शाळांमध्ये प्रयोगशाळा उभारल्या जात आहेत. सरकारी, स्थानिक संस्था किंवा खासगी मंडळ / संस्थाद्वारे व्यवस्थापित होणार्‍या शाळा प्रयोगशाळा उभारू शकतात.
  5. प्रयोगशाळेसोबतच विद्यापीठ आणि उद्योगांसाठी जागतिक दर्जाचे अटल इनक्यूबेशन सेंटर (AIC) आणि अटल कम्युनिटी इनोवेशन सेंटर (ACIC) यांची स्थापना देखील केली जात आहे. शिवाय, अटल न्यू इंडिया चॅलेंज (ANIC) कार्यक्रमांच्या अंतर्गत 24 आव्हाने जाहीर करण्यात आली आहेत.


chalu ghadamodi

1. टपाल खात्याद्वारे एखादी वस्तू, पार्सल पाठवल्यास ते समोरच्या व्यक्तीपर्यंत पोचले की नाही याबाबत त्याची नेमकी स्थिती जाणून घेण्यासाठी टपाल खात्याच्या पोस्टमन मोबाइल अ‍ॅपचा (पीएमए) लाभ होत आहे.

2. तर हे अ‍ॅप पोस्टमनसाठी तयार केले असून याद्वारे डिलिव्हरी झाल्यानंतर तत्काळ त्याची माहिती या अ‍ॅपवर अपलोड करत ज्यांना पार्सल दिले त्यांची डिजिटल स्वाक्षरी घेतली जाते. त्यामुळे टपालाद्वारे पाठवलेल्या पार्सल व इतर वस्तूंची माहिती आता क्षणाक्षणाला मिळणे शक्य झाले आहे.

3. डिजिटल इंडिया उपक्रमाच्या वर्धापन दिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात मुंबई जीपीओचे संचालक के. मुनीरमय्याह यांनी ही माहिती दिली.

4. मोबाइल अ‍ॅपसाठी राज्यातील सुमारे सव्वासात हजार पोस्टमनना स्मार्ट फोन देण्यात आले आहेत. पार्सल व इतर वस्तू पोचवल्यानंतर त्वरित त्याची नोंद या अ‍ॅपवर करणे बंधनकारक आहे. त्यामुळे पूर्वी पोस्टमन सायंकाळी काम संपवून कार्यालयात आल्यावर माहिती अपडेट केली जात होती. आता ही माहिती वेळोवेळी अपडेट होणार असल्याने ती ग्राहकांना मिळू शकेल.

5. तसेच पोस्ट ऑफिस सेव्हिंग्ज बँकेच्या (पीओएसबी) खातेदारांसाठी इंटरनेट बँकिंगची सुविधा पुरवण्यात आली असून टपाल खात्याच्या महाराष्ट्र सर्कलमध्ये सध्या सुमारे 3 हजार ग्राहकांद्वारे त्याचा लाभ घेतला जात आहे.

6. महाराष्ट्र व गोवा सर्कलच्या इंडिया पोस्ट पेमेंट बँकेच्या (आयपीपीबी) 42 शाखांद्वारे व 12 हजार 2 अ‍ॅक्सेस पॉइंटच्या माध्यमातून 5 लाख 36 हजार 465 जणांनी खाते उघडले असून पीओएसबीच्या 71 हजार 531 खातेदारांनी त्यांचे खाते आयपीपीबीला संलग्न केले आहे. याचाच पुढचा भाग म्हणून डिजिटल ग्राम संकल्पना राज्यात राबवण्यात येत आहे.


chalu ghadamodi

1. युद्धकाळात जपानच्या काही कंपन्यांनी कोरियाच्या लोकांना सक्तीने कंपन्यात काम करायला लावल्याच्या प्रकरणातील जुना वाद चिघळला असून जपानने दक्षिण कोरियाला चिप, स्मार्टफोन सुटे भाग यांची निर्यात बंद केली आहे.

2. तर 4 जुलैपासून हा निर्णय अमलात येत आहे. ही बातमी येताच सॅमसंगचा शेअर 0.74 टक्के तर एलजीचा 2.52 टक्क्य़ांनी घसरला आहे. इलेक्ट्रॉनिक व मोबाईल सुटे भाग तयार करणाऱ्या जपानी कंपन्यांचे शेअरही घसरले आहेत.

3. जपानी कंपन्यांनी तयार केलेले सुटे भाग व इतर वस्तूंच्या एकूण निर्यातीत 10 ते 20 टक्के वाटा दक्षिण कोरियाच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू व मोबाईल उत्पादक कंपन्यांचा आहे. त्यामुळे जपानी कंपन्यांना या निर्यातबंदीचा मोठा फटका
बसणार आहे.


chalu ghadamodi

1. भारताच्या पंतप्रधानांनी प्रत्येक मंत्रालयासाठी पाच वर्षांची दृष्टी योजना आखली. मानव संसाधन विकास मंत्रालयाच्या उच्च शिक्षणाच्या विभागाने शिक्षण गुणवत्ता सुधारणा आणि समावेशन कार्यक्रम (EQUIP) नामक पाच वर्षांच्या दृष्टीकोन योजनेचे अंतिम स्वरूप दिले.

2. वरिष्ठ शिक्षणशास्त्रज्ञांकडून काढलेल्या दहा तज्ञ गटांनी 50 पेक्षा जास्त उपक्रमांनी उच्च शिक्षण क्षेत्र पूर्णपणे बदलला असल्याचे सुचविले. उच्च शिक्षण क्षेत्रासाठी गटांनी पुढील लक्ष्य ठेवले आहेत:

* उच्च शिक्षणामध्ये दुप्पट नामांकन गुणोत्तर (जीईआर) ,ते भारतातील उच्च शिक्षण संस्थांमध्ये भौगोलिकदृष्ट्या आणि सामाजिकदृष्ट्या दुर्लक्षित प्रवेशाचे निराकरण करतात
* टॉप 1000 जागतिक विद्यापीठांमध्ये सुमारे 50 भारतीय संस्था उभारणे.
 *उच्च शिक्षणात प्रशासकीय सुधारणांसाठी चांगल्या प्रशासित कॅम्पसमध्ये सुधारणा करणे.
* प्रत्येक पुढाकारासाठी, गटांनी अंमलबजावणी, गुंतवणूकी आणि टाइमलाइनसाठी मोहिमांची शिफारस केली


chalu ghadamodi

1. 'तमिळ यमन', पश्चिम घाटांमध्ये आढळणारे एक प्रकारचे फुलपाखरू, त्याला तमिळनाडू राज्य बटरफ्लाय म्हणून घोषित केला आहे . याला 'तमिळ मरावन' असेही म्हणतात.
2. राज्य बटरफ्लाय घोषित करणारे
तमिळनाडु हे पाचवे राज्य आहे. त्याचे वैज्ञानिक नाव सिरोक्रोओ थाई आहे . 
3.
महाराष्ट्र हे बटर मॉर्मनला  (पापिलियो पोल्गनेस्टर) राज्य बटरफ्लाय म्हणून घोषित करणारे पहिले राज्य आहे.
4. त्यानंतर उत्तराखंड (कॉमन मोर), कर्नाटक (दक्षिणी पक्षी पंख) आणि केरळ (मालाबार बंद मोर) यांचा क्रमांक लागतो.


chalu ghadamodi

1. 2 जुलै हा दिवस जागतिक युएफओ (UFO) दिन म्हणून पाळला जातो.

2. सन 1865 मध्ये साल्व्हेशन आर्मी या सेवाभावी संस्थेची स्थापना झाली.

3. नेताजी सुभाषचंद्र बोस यांना कलकत्ता येथे 2 जुलै 1940 मध्ये स्थानबद्ध करण्यात आले.

4. पंतप्रधान इंदिरा गांधी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान झुल्फिकार अली भुट्टो यांनी सन 1972 मध्ये सिमला करारावर स्वाक्षऱ्या केल्या होत्या.

5. सन 2001 मध्ये बिहारमधील चंपारण्य जिल्ह्यातील केसरिया गाव येथे 104 फूट उंचीचा बौध्द स्तूप सापडला.


Top