1. आयर्लंडचे नवे पंतप्रधान म्हणून भारतीय वंशाचे नागरिक लिओ वराडकर यांची निवड झाली. पंतप्रधानपदाच्या निवडणुकीत वराडकर यांनी सिमोन कोव्हीने यांचा 73 विरुद्ध 51 अशा मतांनी पराभव केला. एका मराठी माणसाने आयर्लंडच्या निवडणुकीत बाजी मारल्याने राज्यात सर्वत्र आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. वराडकर हे केवळ 38 वर्षाचे आहेत.
  2. आयर्लंड देशाच्या पंतप्रधानपदी विराजमान झालेले वराडकर हे मूळचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वराड गावचे रहिवासी आहेत. अशोक वराडकर आणि पत्नी मरियम यांचे तिसरे अपत्य आहे. वराडकर कुटुंबियांचे गावात घर आणि बागायती शेती आहे. त्यांची शेती आणि घर हे त्यांचे चुलत बंधू वसंत वराडकर सांभाळतात. लिओची आई मरियम आणि बाबा अशोक वराडकर वर्षातून एक-दोनदा मूळ गावी येतात.
  3. लिओ यांचे वंशज भारत आणि आर्यलंड या दोन्ही देशात 1960 पासून वास्तव्यास आहे. मुंबईत बोरिवलीमध्येही त्यांचे विस्तारित कुटुंब राहते. 1960 च्या दशकात मुंबई आणि आर्यलंड या दोन्ही ठिकाणी त्यांचे वंशज विखुरले. वैद्यकीय तज्ज्ञ असलेल्या लिओ यांनी काही वर्षांपूर्वी मुंबईच्या केईएम रुग्णालयामध्ये इंटर्नशिपही केली होती. आर्यलंडचे क्रीडामंत्री असताना त्यांनी तेथील क्रिकेट चमूला मुंबईची सैर घडवली होती. युरोपियन समाजाने भारतीय व्यक्तीची नेता म्हणून सर्वोच्चपदी स्वीकारणे ही अभिमानास्पद बाब असल्याची भावना लिओ यांच्या मुंबईतील नातलगांनी व्यक्त केली आहे.


 

  1. मुंबई रणजी संघाच्या प्रशिक्षकपदाची धुरा माजी भारतीय संघाचे यष्टीरक्षक समीर दिघे यांच्याकडे शुक्रवारी सोपवण्यात आली. दिघे यांच्याबरोबर भारताचे माजी फलंदाज आणि मुंबईचे माजी प्रशिक्षक प्रवीण अमरेदेखील या शर्यतीत होते. या दोघांमध्ये अमरे यांच्याकडे प्रशिक्षकपदाचा दांडगा अनुभव असला, तरी मुंबईच्या प्रशिक्षकपदी दिघे यांची निवड करण्यात आली आहे.
  2. ‘समीर दिघे यांना मुंबईच्या रणजी संघाचे प्रशिक्षकपद २०१७-१८ या कालावधीसाठी सोपवण्यात आले आहे,’ असे मुंबई क्रिकेट असोसिएशनने (एमसीए) पत्रकात म्हटले आहे.
  3. एमसीएच्या क्रिकेट सुधारणा समितीची अजित आगरकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली आणि यामध्ये मोठय़ा स्तरावर प्रशिक्षकपदाचा अनुभव नसलेल्या दिघे यांना प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला. दिघे यांनी सहा कसोटी सामन्यांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे, त्याचबरोबर २३ एकदिवसीय सामने त्यांच्या नावावर आहेत.

 


Top

Whoops, looks like something went wrong.