India-Indonesia 15 Agreement

 1. आग्नेय आशियातल्या इंडोनेशिया, सिंगापूर आणि मलेशिया या तीन देशांचा दौरा पंतप्रधान नरेंद्र मोदी करीत आहेत.
 2. 29-30 मे 2018 रोजी प्रथम त्यांनी इंडोनेशियाला भेट दिली.
 3. इंडोनेशियाचे राष्ट्रपती जोको विडोडो यांच्या निमंत्रणावरून पंतप्रधानांची इंडोनेशियाची ही पहिलीच भेट आहे.
 4. याप्रसंगी दोन्ही नेत्यांकडून करण्यात आलेल्या घोषणा -
 5. भारत आणि इंडोनेशिया यांनी द्विपक्षीय व्यापाराला सन 2025 पर्यंत USD 50 अब्जपर्यंत वाढविण्यासाठी त्यांच्या प्रयत्नांना दुप्पट करण्याचे मान्य केले आहे.
 6. सन 2016 मध्ये दोन्ही देशांमधील व्यापार USD 12.9 अब्ज इतका होता, जो सन 2017 मध्ये 28.7% नी वाढून USD 18.13 अब्ज होता.
 7. इंडोनेशियाच्या नागरिकांसाठी भारतामध्ये 30 दिवसांचा विनामूल्य व्हिसा सवलतीची घोषणा केली.
 8. भारत आणि इंडोनेशिया यांच्यात झालेले करार:-
  1. संरक्षणाच्या क्षेत्रात सहकार्यासाठी करार
  2. शांततापूर्ण हेतूने बाह्य अंतराळाचा वेध घेण्यासाठी आणि उपयोगासाठी सहकार्यासाठी कार्यचौकट तयार करण्यासाठी करार
  3. वैज्ञानिक व तांत्रिक सहकार्याबाबत सामंजस्य करार
  4. रेल्वे क्षेत्रातील तांत्रिक सहकार्याबाबत सामंजस्य करार
  5. आरोग्य क्षेत्रात सहकार्याबाबत सामंजस्य करार
  6. औषधीनिर्माण, जैविक आणि सौंदर्यप्रसाधने नियामक कार्यांबाबत सामंजस्य करार
  7. सरकार आणि वैचारिक संस्था दरम्यान धोरणात्मक संवाद आणि विचारांची देवाणघेवाण करण्याबाबत सामंजस्य करार
  8. भारताच्या लाल बहादूर शास्त्री नॅशनल अॅकॅडमी ऑफ अॅडमिनिस्ट्रेशन आणि इंडोनेशियाचे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक अॅडमिनिस्ट्रेशन (NIPA) यांच्यात सामंजस्य करार
  9. वर्ष 2019-20 मध्ये भारत-इंडोनेशिया संबंधांचे 70 वे वर्ष साजरे करण्यासाठी कार्यक्रमांची योजना
  10. काइट म्युजियम (अहमदाबाद) आणि इंडोनेशियाचे लाआंग लायंग यांच्यात सामंजस्य करार
  11. प्रम्बनान मंदिर आणि ताज महाल यांच्या संदर्भात भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण (ASI) आणि इंडोनेशियाचे पी.टी. तामन विसाता कंडी बोरोबुदुर, प्रम्बनान आणि रातू बोको यांच्यात सामंजस्य करार
  12. इंडोनेशियाचे पी.टी. पिंदाद (PERSERO) आणि भारताचे भुखानवाला यांच्यात सामंजस्य करार
  13. भारतीय उद्योग संघ (CII) आणि इंडोनेशियाचे KADIN यांच्यात सामंजस्य करार
  14. इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी (बेंगलोर, भारत) आणि इंडोनेशियाचे मनुष्यबळ विकास तसेच दळणवळण व माहितीशास्त्र संशोधन विभाग यांच्यात सामंजस्य करार
  15. भारताची हिमालय ड्रग कंपनी आणि इंडोनेशियाचे पी.टी. कल्बे फार्मा यांच्यात सामंजस्य करार
 9. यादरम्यान करण्यात आलेल्या घोषणा -
  1. टाटा कंपनीच्या ट्रकांचा पुरवठा करण्यासाठी भारताची टाटा कंपनी आणि इंडोनेशियातील पी.टी. पिंदाद यांच्यातील सहयोगाची घोषणा
  2. भारतीय उद्योग संघ (CII) ने जकार्तामध्ये त्याचे पहिले परराष्ट्र कार्यालय उघडणार असल्याची घोषणा
  3. एप्रिल 2018 मध्ये बाली (इंडोनेशिया) आणि उत्तराखंड (भारत) यांना एकाच संकल्पनेखाली रचण्याच्या उद्देशाने एका इच्छापत्रावर स्वाक्षरी केल्याची घोषणा


States that do not comply with the Social Security Act for unorganized workers will not get subsidy: the court

 1. सर्वोच्च न्यायालयाने असंघटीत कामगारांसाठीच्या सामाजिक सुरक्षा कायद्याअंतर्गत स्थानिक कामगारांची नोंदणी न केलेल्या राज्यांना आता पुढे निधी वितरित करण्यापासून केंद्र सरकारला रोखले आहे. 
 2. न्यायमूर्ती कुरियन जोसेफ यांच्या खंडपीठाने हा आदेश दिला आहे.
 3. वर्तमानात भारतामध्ये सुमारे 4 लक्ष स्थानिक कामगार आहेत, यात 30 लक्ष स्त्रियांचा समावेश आहे, परंतु बहुतेक असंगठित कार्यबल अजूनही सामाजिक सुरक्षेपासून वंचित आहेत.
 4. भारताचे सर्वोच्च न्यायालय भारताचे शीर्ष न्यायिक प्राधिकरण आहे.
 5. ज्याला भारतीय संविधानाच्या खंड 5 अध्याय 4 अंतर्गत स्थापित केले गेले आहे.
 6. 28 जानेवारी 1950 रोजी भारताचे सर्वोच्च न्यायालय अस्तित्वात आले.
 7. सर्वोच्च न्यायालय बार असोसिएशन (SCBA) सर्वोच्च न्यायालयाची बार आहे.
 8. नवी दिल्लीतील मुख्य कार्यालयाच्या वास्तूची निर्मिती केंद्रीय लोक निर्माण विभागाचे प्रथम भारतीय अध्यक्ष मुख्य वास्तुकार गणेश भीकाजी देवलालीकर यांनी केली.
 9. संविधानात सर्वोच्च न्यायालयात 30 न्यायाधीश आणि 1 सरन्यायाधीश नियुक्त करण्याची तरतूद आहे.
 10. न्यायमूर्ती एच. जे. कनिया हे भारताचे पहिले सरन्यायाधीश आहेत.


E-way bill mechanism will be applicable in 8 more states till June 3

 1. 1 जून 2018 पासून पंजाब, ओडिशा, मिझोराम, छत्तीसगड, गोवा आणि जम्मू-काश्मीर या सहा राज्यांमध्ये वस्तूंच्या आंतर-राज्य चळवळीसाठी ‘ई-वे बिला’ची यंत्रणा लागू करण्यात आली आहे.
 2. तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये अनुक्रमे 2 जून आणि 3 जून रोजी ही यंत्रणा लागू करण्यात येणार आहे.
 3. यासोबतच 3 जूनपासून देशभरात ई-वे बिल यंत्रणा अनिवार्य होईल.
 4. आतापर्यंत, 27 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी ई-वे बिल यंत्रणा अंगिकारली आहे.
 5. वस्तू व सेवा कर (GST) प्रणाली अंतर्गत मोटर मालवाहकांसाठी आंतर-राज्य मालवाहतुकीसाठी आवश्यक इलेक्ट्रॉनिक वे बिल (e-way bill) यंत्रणेचा वापर 1 एप्रिल 2018 पासून देशभरात सुरू करण्यात आला आहे. 
 6. ई-वे बिल यंत्रणेमधून 50,000 रुपयांहून अधिक किंमतीचा माल एका राज्यातून दूसर्‍या राज्यात पाठविण्याआधी त्याची ऑनलाइन नोंदणी करणे आवश्यक असणार आहे.


India's fast discus throw player Vikas Gowda retired

 1. भारताचा थाळीफेकपटू विकास गौडा याने १५ वर्षाच्या कारकिर्दीनंतर वयाच्या ३५व्या वर्षी निवृत्तीचा निर्णय घेतला आहे.
 2. विकासने अनेक मोठ्या स्पर्धांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले.
 3. भारतातर्फे राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०१४मध्ये पुरुष गटात सुवर्णपदक जिंकणारा विकास हा एकमेव खेळाडू आहे.
 4. विकासने चार वेळा ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये सहभाग घेतला होता.
 5. विकासने गेल्या वर्षी भुवनेश्वर येथे झालेल्या आशियाई स्पर्धांमध्ये कांस्यपदक पटकावले होते.
 6. म्हैसूरमध्ये जन्मलेला विकास ६ वर्षांचा असताना कुटुंबासमवेत अमेरिकेतील मेरीलँडमध्ये स्थायिक झाला.
 7. त्याचे वडील माजी खेळाडू आणि १९८८च्या ऑलिम्पिकमध्ये राष्ट्रीय प्रशिक्षक होते.
 8. २०१२ मध्ये विकासने नोंदविलेला ६६.२८ मीटर थाळीफेकीचा राष्ट्रीय विक्रम अद्याप अबाधित आहे.
 9. त्याने २०१३ आणि २०१५च्या आशियाई चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकले होते.
 10. तसेच त्याने २०१०च्या राष्ट्रकुल स्पर्धेत रौप्य व २०१४च्या ग्लास्गो राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णजिंकले.
 11. २०१०च्या आशियाडमध्ये कांस्य जिंकल्यानंतर २०१४च्या आशियाडमध्ये विकास रौप्याचा मानकरी ठरला.
 12. २००४, २००८, २०१२ व २०१६ अशा ४ ऑलिम्पिकमध्ये देशाचे प्रतिनिधित्व करणारा विकास २०१२च्या लंडन ऑलिम्पिकमध्ये थाळीफेकीत अंतिम फेरीत पोहोचला होता.


 Famous director and producer Mukta Srinivasan passes away

 1. ‘मुक्ता फिल्म्स’ कंपनीचे संस्थापक तसेच तमिळ चित्रपटसृष्टीतील प्रसिध्द दिग्दर्शक व निर्माते व्यंकटचारी श्रीनिवासन उर्फ मुक्ता श्रीनिवासन यांचे ३० मे रोजी वयाच्या ८८व्या वर्षी निधन झाले.
 2. १९५७साली श्रीनिवासन यांनी दिग्दर्शित केलेला पहिला ‘मुधलळ्ळी’ हा चित्रपट सर्वोत्कृष्ट तमिळ चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळवणारा ठरला होता.
 3. ‘दयावान’ हा हिंदी चित्रपट ज्याची अनुवादित आवृत्ती होता, त्या ‘नायकन्’ या मणिरत्नम दिग्दर्शित चित्रपटाचे मुक्ता श्रीनिवासन निर्माते होते.
 4. १९५७पासून पुढली ६० वर्षे ते चित्रपट क्षेत्रात कार्यरत होते. त्यांनी १९८४पासून चित्रपटांच्या पटकथा लिहिण्यासही सुरुवात केली.
 5. त्याआधी त्यांनी कथा, कादंबऱ्या, ललित निबंध असे साहित्यप्रकार त्यांनी हाताळले होते.
 6.  ९०हून अधिक कथासंग्रह आणि सुमारे २५० पुस्तकांचे त्यांनी लेखन केले.
 7. जयललितांसह अनेक प्रख्यात अभिनेत्री-अभिनेते त्यांच्या दिग्दर्शनातून झळकले.
 8. श्रीनिवासन यांच्यामुळे अभिनेते जेमिनी गणेशन यांची सामाजिक चित्रपटांमधील अभिनेता म्हणून कारकीर्द घडली.
 9. उग्र अभिनयाची दाक्षिणात्य शैली बदलण्यासही १९६५नंतरचा काळ आणि त्यातील श्रीनिवासन यांचे चित्रपट कारणीभूत ठरले होते.


Top