Central Cabinet Approval for Human Trafficking (Prevention, Protection and Rehabilitation) Bill-2011

 1. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने मानवी तस्करी (प्रतिबंध, संरक्षण आणि पुनर्वसन) विधेयक-2018 मंजुरी दिली आहे. आता हे विधेयक संसदेत चर्चेसाठी सादर केले जाणार आहे.
 2. हे विधेयक जिल्हा, राज्य आणि केंद्र पातळीवर समर्पित संस्थागत यंत्रणा तयार करते.
 3. हे विधेयक तस्करी प्रतिबंध, सुरक्षा तपासणी आणि पुनर्वसन कार्यासाठी जबाबदार असेल. राष्ट्रीय तपास संस्था (NIA) गृह मंत्रालयांतर्गत राष्ट्रीय पातळीवर तस्करी विरोधी संस्था म्हणून काम करणार आहे.
 4. मानवी तस्करीला प्रोत्साहन देणे आणि तस्करीत मदतीसाठी बनावट प्रमाणपत्र बनवणे, छापणे, प्रसिद्ध करणे किंवा वितरित करणे, नोंदणी किंवा सरकारी आवश्यकतेनुसार साक्ष म्हणून स्टिकर आणि शासकीय संस्थांकडून मंजुरी आणि आवश्यक कागदपत्रे मिळवण्यासाठी कट कारस्थान करणाऱ्या व्यक्तीला शिक्षेची तरतूद आहे.
 5. राष्‍ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर संघटित गुन्हेगारी रोखण्यासाठी संपत्तीची जप्ती किंवा गुन्हा करून मिळवलेले धन जप्त करण्याची तरतूद आहे.
 6. राष्ट्रीय तस्करी विरोधी संस्था परदेशी आणि अंतरराष्ट्रीय संघटनांच्या अधिकाऱ्यांसह आंतरराष्ट्रीय ताळमेळ राखणार, तपासात आंतरराष्ट्रीय सहकार्य देईल आणि साक्ष, साक्षीदारांचे सीमापार हस्तांतरण यात साहाय्य केले जाणार आणि न्यायिक कारवाईत आंतरराज्य आणि आंतरराष्ट्रीय व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमध्ये साहाय्य करणार आहे. 
 7. मानवी तस्‍करी मूलभूत मानवाधिकारांचे उल्‍लंघन करणारा तिसरा सर्वात मोठा संघटित गुन्हा आहे. भारतात या गुन्हेगारीला रोखण्यासाठी कोणताही विशेष कायदा नाही. 
 8. नवा कायदा भारताला मानवी तस्‍करी विरोधात लढा देण्यामध्ये दक्षिण आशियाई देशांमध्ये अग्रणी  देश बनविणार. विधेयक मंत्रालय, विभाग, राज्‍य शासने, स्‍वयंसेवी संस्था आणि या क्षेत्राचे तज्ञ यांच्या शिफारशींनी तयार करण्यात आले आहे.

विधेयकाची वैशिष्ट्ये

 1. मानवी तस्करीमध्ये गंभीर स्वरूपात जबरदस्तीने मजुरी, भीक मागणे, निर्धारित वेळेपूर्वी लैंगिक परिपक्वतेसाठी एखाद्या व्यक्तीला रासायनिक पदार्थ किंवा हार्मोन देणे, विवाह किंवा वैवाहिक छळ अंतर्गत किंवा विवाहानंतर महिलांची आणि मुलांची तस्करी अश्या प्रकारांचा समावेश आहे.
 2. पीडित/साक्षीदार आणि तक्रार करणाऱ्यांची ओळख उघड न करणे, गोपनीय ठेवणे. पीडितांचा जबाब व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे नोंदवून पडताळता येऊ शकेल.
 3. एक वर्षाच्या आत कालबद्ध न्यायालय सुनावणी करणे आणि पीडितांना परत पाठवणे.
 4. वाचवण्यात आलेल्या लोकांना त्वरित संरक्षण देणे आणि त्यांचे पुनर्वसन करणे. पीडितेला शारीरिक, मानसिक आघातांपासून बरे होण्यासाठी तात्काळ 30 दिवसांच्या आत अंतरिम साहाय्य मिळण्याचा अधिकार आहे.
 5. आरोपीविरुद्ध फौजदारी कारवाई सुरु होण्यावर किंवा खटल्याच्या निकालावर पीडित व्यक्तीचे पुनर्वसन अवलंबून नाही.
 6. प्रथमच पुनर्वसन निधी स्थापन करण्यात आला. याचा उपयोग पीडित व्यक्तीच्या शारीरिक, मानसिक आणि सामाजिक सांभाळासाठी होईल. त्यात त्याचे शिक्षण, कौशल्य विकास, आरोग्यविषयक निगा, मानसिक पाठिंबा, कायदेशीर मदत आणि सुरक्षित आसरा अश्या बाबींचा समावेश आहे.
 7. खटल्यांच्या जलद सुनावणीसाठी प्रत्येक जिल्ह्यात विशेष न्यायालयाची स्थापना करण्यात येणार आहे.
 8. 10 वर्षे सश्रम कारावास ते जन्मठेप आणि किमान 1 लाख रुपये दंड शिक्षा म्हणून तरतूद आहे.


"Drypets Kalami" - The plant found in West Bengal was named former President Kalam

 1. बॉटनीकल सर्व्हे ऑफ इंडियाच्या डॉ. गोपाळ कृष्ण यांच्या नेतृत्वात संशोधकांनी पश्चिम बंगालमधील दोन राष्ट्रीय उद्यानांमध्ये वनस्पतीची एक नवीन प्रजाती शोधून काढली आहे. त्यांनी या नव्या वनस्पतीला ‘ड्रायपेटेस कलामी (Drypetes Kalamii)’ असे नाव दिले आहे.
 2. भारताचे माजी राष्ट्रपती व शास्त्रज्ञ ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या सन्मानार्थ हे नाव देण्यात आले आहे. ही एक फूल वनस्पती आहे आणि ‘ड्रायपेटेस एलिसी’ या गटाशी संबंध असणार्‍या वनस्पतीचे छोटे रूप आहे.
 3. पश्चिम बंगालमध्ये बक्सा राष्ट्रीय उद्यान (बक्सा व्याघ्र प्रकल्पाचा प्रमुख क्षेत्र) येथे 2011 साली केल्या गेलेल्या वनस्पतींच्या सर्वेक्षणात ही वनस्पती आढळून आली.
 4. मात्र त्यावेळी याला ओळखल्या जाऊ शकले नाही. पुढे आणखी एकाने राज्यातल्या जलडापारा राष्ट्रीय उद्यानातून स्त्रिलिंग गटातली ही वनस्पती फळासकट गोळा केली. फळामुळे याला ओळखण्यास सहजता आली. त्यानंतर घेतलेल्या शोधत असे आढळून आले की, दोन्ही वनस्पती ड्रायपेटेस कुटुंबाशी संबंध ठेवतात. 

ड्रायपेटेस कलामीची वैशिष्ट्ये

 1. वनस्पतीची वाढ साधारणतः 1 मीटरपर्यंत आहे. ही एकलिंगी प्रजाती आहे, म्हणजेच त्यामध्ये स्त्रिलिंग व पुल्लिंग हे प्रकार आहेत.
 2. ही वनस्पती समुद्रसपाटीपासून 50-100 मीटर उंचीवर, उपोत्पादनयुक्त आर्द्र अर्ध-सदाहरित जंगलातील ओल्या, सावली असलेल्या भागात आढळते.
 3. वनस्पती झुडुप स्वरुपात आढळून येते आणि त्याला फिकट पिवळ्या रंगाची फुले आणि नारिंगी-लाल फळे लागतात.
 4. ही वनस्पती संस्कृतमध्ये उल्लेखलेल्या ‘पुत्रजिवाह’ नामक औषधी वनस्पतीशी संबंध ठेवते.
 5. आंतरराष्ट्रीय निसर्ग संवर्धन संघ (International Union for Conservation of Nature -IUCN) च्या नियमांनुसार, या वनस्पतीला "अत्याधिक धोक्यात असलेल्या" वनस्पतींच्या श्रेणीत तात्पुरते नोंदवलेले आहे.
 6. जगभरात ड्रायपेटेस कुटुंबातल्या 220 प्रजाती आढळतात आणि त्यापैकी 20 भारतात आढळून येत असल्याची नोंद आहे.


PMEGP approval to continue after 12th Five Year Plan

 1. मंत्रिमंडळाच्या अर्थविषयक समितीने प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम (PMEGP) ला 5,500 कोटी रुपयांच्या तरतूदीसह 12 व्या पंचवार्षिक योजनेच्या कालावधीनंतर पुढे सन 2017-18 ते सन 2019-20 अश्या तीन वर्षांकरिता सुरू ठेवण्यास मंजूरी दिली आहे.
 2. या कार्यक्रमामधून या कालावधीत 15 लक्ष लोकांसाठी रोजगाराची संधी निर्माण होणार आहे.
 3. देशातल्या सर्व जिल्ह्यांना 75 प्रकल्प/जिल्ह्याचे किमान लक्ष्‍य ठरवून देण्यात आले आहे.
 4. अनुदानाचे उच्च दर (25-35%) स्त्रिया, SC/ST, OBC, दिव्‍यांग, ईशान्य क्षेत्रातल्या ग्रामीण क्षेत्रामधील अर्जदारांसाठी लागू असतील.
 5. पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम (PMEGP) याची 15 ऑगस्ट 2008 रोजी भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी घोषणा केली होती.
 6. ही भारत सरकारची क्रेडिट लिंक योजना आहे.
 7. राष्‍ट्रीय पातळीवर खादी व ग्रामोद्योग आयोग (KVIC) तर राज्‍य/जिल्हा पातळीवर KVIC चे राज्य कार्यालय, खादी व ग्रामोद्योग मंडळ (KVIB) आणि जिल्हा उद्योग केंद्र (DIC) या PMEGP च्या अंमलबजावणीसाठीची मध्यवर्ती संस्था आहेत.


Cabinet approval for signing four MoUs with Jordan

 1. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्‍यक्षतेत केंद्रीय मंत्रिमंडळाने भारताला जॉर्डनसोबत विविध क्षेत्रात सहकार्यासाठी चार सामंजस्य करार करण्यास मंजूरी दिली आहे.
 2.  आरोग्य क्षेत्र :- आरोग्य व आयुर्विज्ञान क्षेत्रात सहकार्यासाठी सामंजस्य करार
 3. मनुष्यबळ :- कंत्राटी रोजगाराचे प्रशासन, भरती प्रक्रियेत नव्या सुधारणा आणि जॉर्डनमधील भारतीय कामगारांच्या कल्याणासाठी मनुष्यबळ क्षेत्रात सहकार्यासाठी सामंजस्य करार
 4. सीमाशुल्‍क :- सीमाशुल्कासंबंधी जुळलेल्या मुद्द्यांमध्ये सहकार्य आणि आपसी प्रशासकीय सहकार्यासाठी सामंजस्य करार
 5. खनिज व खते :- रॉक फॉस्फेट आणि MOP च्या खणिकर्मासाठी आणि उपयोगासाठी तसेच भारतासाठी फॉस्फोरिक आम्ल/DAP/NPK खतांचे उत्पादन घेण्यासाठी जॉर्डनमध्ये उत्पादन सुविधा उभारण्यासाठी सामंजस्य करार


Approval for proposal to increase MP allowances

 1. केंद्रीय मंत्रिमंडळाने संसदेच्या खासदारांचा भत्ता वाढविण्यासाठीच्या प्रस्तुत प्रस्तावाला मंजूरी देत खालील नियमांमध्ये दुरूस्ती करण्यास मंजूरी दिली आहे.
 2. निवास व टेलीफोन सुविधा (संसद सदस्‍य) नियम-1956:- 
  1. संसद सदस्यांच्या निवासस्थानी बैठकीच्या समानासाठी 1 लक्ष रुपये भत्ता (पूर्वी 75,000 रुपये) (पाच वर्षांमध्ये एकदा),
  2. ऑगस्ट 2006 पासून ब्रॉडबॅंड इंटरनेट सुविधा
 3. संसद सदस्‍य (मतदारसंघ भत्‍ता) नियम-1986:- 
  1. मतदारसंघ भत्‍ता मासिक 70,000 रुपये (पूर्वी 45,000 रुपये)
 4. संसद सदस्‍य (कार्यालय खर्च भत्‍ता) नियम-1988:-
  1. कार्यालयीन खर्चाचा भत्ता मासिक 60,000 रुपये (पूर्वी 45,000 रुपये)


The Importance of Today's Day in History 1

 1. महत्वाच्या घटना:- 
  1. १८५७: जे. जे. स्कूल ऑफ आर्टस् मुंबई सुरु झाले.
  2. १९०३: जगातील पहिले फक्त महिलांसाठी असलेले मार्था वॉशिंग्टन हॉटेल न्युयॉर्क अमेरिका येथे सुरु झाले.
  3. १९५२: पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते सिंद्री येथील खत कारखान्याचे उद्घाटन झाले.
  4. १९६९: जगातील पहिल्या ध्वनीपेक्षा अधिक वेगाने जाणारया काॅन्कॉर्ड या फ्रेंच बनावटीच्या विमानाचे यशस्वी उड्डाण झाले.
 2. जन्म:-
  1. १७४२: नानासाहेब पेशव्यांचे ज्येष्ठ चिरंजीव विश्वासराव यांचा जन्म. (मृत्यू: १४ जानेवारी १७६१)
  2. १९२५: चित्रपट आणि रंगभूमी अभिनेत्री शांता जोग यांचा जन्म. (मृत्यू: १२ सप्टेंबर १९८०)
  3. १९३१: सोव्हिएत संघाचे शेवटचे अध्यक्ष आणि नोबेल पारितोषिक विजेते मिखाईल गोर्बाचेव्ह यांचा जन्म.
  4. १९३१: मराठी साहित्यिक राम शेवाळकर यांचा जन्म.
  5. १९७७: इंग्लिश क्रिकेटपटू अँड्र्यू स्ट्रॉस यांचा जन्म.
 3. मृत्यू:-
  1. १५६८: मीरा रत्‍नसिंह राठोड ऊर्फ संत मीराबाई यांचे निधन.
  2. १७००: मराठा साम्राज्याचे तिसरे छत्रपती राजाराम महाराज यांचे सिंहगडावर निधन. (जन्म: २४ फेब्रुवारी १६७०)
  3. १९४९: प्रभावी वक्त्या आणि स्वातंत्रसेनानी सरोजिनी नायडू यांचे निधन.
  4. १९८६: मराठी चित्रपट अभिनेते डॉ. काशिनाथ घाणेकर यांचे निधन.


Top