1. 'इज ऑफ डुईंग बिझनेस २०१७' या उद्योगानुकूल वातावरणनिर्मितीमध्ये जागतिक बॅंकेने भारताच्या मानांकनात मोठी सुधारणा केली आहे. यामुळे भारताचे मानांकन १३० वरून १०० झाले आहे. मात्र जागतिक बॅंकेने यंदा यात 'जीएसटी'चा विचार केला नाही.२०१४ मध्ये भारताचे स्थान १४२वे, तर गेल्या वर्षी १३०वे होते.
 2. अल्पमतातील गुंतवणूकदारांना संरक्षण देणे यात भारताचे चौथे मानांकन मिळाले आहे. उद्योगांना सुलभतेने पतपुरवठा मिळणे यातील भारताचे मानांकन ४४ वरून २९ झाले आहे. उद्योगांना सहजपणे विजेची जोडणी मिळणे या निकषांमध्येही मानांकन २९ वर पोचले आहे.
 3. करवसुलीच्या क्षेत्रातील ऑनलाइन सुधारणांमुळे भारताचे मानांकन १७२ वरून ५३ झाले आहे.
 4. 'इन्सॉल्व्हन्सी आणि बॅन्करप्सी कोड'मुळे दिवाळखोरीच्या अडचणींवर मात करण्यात आलेल्या यशामुळे या निकषात भारताचे मानांकन १३६ वरून १०३ झाले आहे.


 1. २ ते १६ नोव्हेंबर २०१७ या कालावधीत इस्राइलमधील उवाडा हवाई दल तळावर 'ब्लू फ्लॅग-१७' सराव आयोजित केला जात आहे.
 2. भारतीय वायुसेनेचे (IAF) ४५ सदस्यांची तुकडी सरावामध्ये भाग घेणार आहे. यामध्ये IAF चे गरुड कमांडो आणि C-130J विमान सामील करण्यात आले आहे. यावेळी प्रथमच एखाद्या बहुपक्षीय सरावादरम्यान भारतीय वायुसेना इस्रायली हवाई दलासोबत एकत्र येणार आहे.
 3. 'ब्लू फ्लॅग' सराव हा इजरायली वायुसेनेद्वारे आयोजित केला जाणारा एक सर्वात मोठा बहूराष्ट्रीय हवाई सराव आहे. यावर्षी यात अमेरिका, इटली, फ्रान्स, जर्मनी, ग्रीस आणि पोलंड यांच्यासह सुमारे ३५ देश सहभागी होणार आहेत.
 4. 'ब्लू फ्लॅग' सराव हा सहभागी राष्ट्रांमध्ये लष्करी सहकार्य बळकट करण्याच्या हेतूने आयोजित करण्यात येत असलेला द्विवार्षिक बहुपक्षीय उपक्रम आहे.
 5. सरावादरम्यान राष्ट्रांमध्ये ज्ञान, लढाईचा अनुभव आणि सुधारणा याबाबत माहितीचे आदानप्रदान केले जाणार आहे.
 6. नोव्हेंबर २०१३ मध्ये प्रथम ‘ब्लू फ्लॅग’ सराव आयोजित केला गेला होता.


 1. दरवर्षी ३१ ऑक्टोबरला जगभरात जागतिक शहर दिवस (World Cities Day) साजरा केला जातो.
 2. यावर्षी 'इनोव्हेटीव गवर्नेंस, ओपन सिटीज' या संकल्पनेखाली हा दिवस साजरा केला गेला.
 3. या दिवशी शहरीकरणाबाबतीत असलेल्या संधी, आव्हानांना संबोधित करण्यासाठी जागतिक शहरीकरणासाठी आंतरराष्ट्रीय समुदायाचा स्वारस्य वाढविण्याच्या उद्देशाने जागृती निर्माण केली जाते.
 4. या पार्श्वभूमीवर जागतिक शहरी आव्हाने पेलण्यासाठी UN-अधिवास (UN-Habitat) कडून २०१४ साली 'अर्बन ऑक्टोबर' हा कार्यक्रम सुरू करण्यात आला होता.


Top