A bench of full-time women judges in the Supreme Court

 1. न्या. आर. भानुमती आणि न्या. इंदिरा बॅनर्जी यांचे पीठ या दिवशी सुनावणी घेणार आहे.
 2. यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या कामकाजातील २०१३मधील इतिहासाची पुनरावृत्ती होणार आहे. 
 3. याआधी सन २०१३मध्ये संपूर्णपणे महिला न्यायमूर्तींच्या खंडपीठाने न्यायदान केल्याचा योग सर्वोच्च न्यायालयाच्या इतिहासात प्रथमच आला होता.
 4. त्यावेळी न्या. ज्ञानसुधा मिश्रा आणि न्या. रंजना प्रकाश देसाई यांच्या पीठाने न्यायदान केले होते. 
 5. ऑगस्ट महिन्यात न्या. इंदिरा बॅनर्जी यांची सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती झाल्यानंतर, प्रथमच एकाच वेळी तीन महिला न्यायमूर्ती असण्याची स्थिती निर्माण झाली आहे.
 6. न्या. बॅनर्जी या स्वातंत्र्योत्तर काळातील केवळ आठव्या महिला न्यायमूर्ती आहेत. 
 7. विद्यमान महिला न्यायमूर्तींमध्ये न्या. भानुमती या सर्वात ज्येष्ठ असून १३ ऑगस्ट २०१४ रोजी त्यांची सर्वोच्च न्यायालयात नियुक्ती झाली होती.
 8. त्या १९ जुलै २०२० रोजी निवृत्त होणार आहेत.


CJI Dipak Misra recommends Justice Ranjan Gogoi as next Chief Justice of India

 1. सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांनी सरन्यायाधीश पदासाठी रंजन गोगोई यांच्या नावाची शिफारस सरकारकडे केली आहे.
 2. न्यायमूर्ती रंजन गोगोई यांची सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशपदी नियुक्ती जवळपास निश्चित मानली जात आहे.
 3. विद्यमान सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांनी सरन्यायाधीश पदासाठी रंजन गोगोई यांच्या नावाची शिफारस केंद्र सरकारच्या विधी मंत्रालयाकडे केली आहे.
 4. सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या शिफारशीला केंद्र सरकार अंतिम मंजूर देईल. न्यायमूर्ती गोगोई 3 ऑक्टोबरला सरन्यायाधीश पदाची शपथ घेतील अशी माहितीही सूत्रांकडून दिली जात आहे.
 5. ज्येष्ठ न्यायमूर्तींना सरन्यायाधीशपदी नियुक्त करण्याची परंपरा आहे. मात्र औपचारीकरित्या नाव पाठवण्याचा अधिकार सरन्यायाधीशांना असतो.
 6. त्यामुळे विद्यमान सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांनी ही पंरपरा कायम ठेवली आहे.
 7. न्यायमूर्ती रंजन गोगोई फेब्रुवारी 2001मध्ये गुवाहाटी उच्च न्यायालयाचे न्यायाधीशपदाची सूत्रे हाती घेतले होते.
 8. फेब्रुवारी 2011मध्ये त्यांची पंजाब आणि हरयाणा उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी नियुक्ती झाली.
 9. त्यानंतर एप्रिल 2012 पासून ते सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती म्हणून कार्यरत आहेत. 
 10. गेल्यावर्षी जानेवारी महिन्यात सरन्यायाधीशांविरोधात बंड पुकारणाऱ्या चार न्यायमूर्तींमध्ये गोगोई यांचाही समावेश होता. या घटनेनंतर त्यांचं नाव सरन्यायाधीश पदासाठी पाठवलं जाणार की नाही याबाबत चर्चा रंगली होती.
 11. लवकरच सरकारच्या सल्ल्यानुसार राष्ट्रपतींकडून सरन्यायाधीशांच्या नावाची घोषणा केली जाईल.


The search committee will be appointed for the appointment of Lokpal

 1. लोकपाल समितीची महत्त्वाची बैठकित पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभाध्यक्षा सुमित्रा महाजन, सरन्यायाधीश दीपक मिस्रा आणि प्रसिद्ध वकील मुकुल रोहतगी यांची या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.
 2. लोकपाल निवड प्रक्रिया गतीने व्हावी, अशी पंतप्रधानांची इच्छा आहे. समितीची ही पाचवी बैठक १५ दिवसांच्या आत होत आहे. २२ आॅगस्टला चौथी बैठक झाली होती.
 3. नियोजनानुसार, पंतप्रधानांसह समितीवरील सर्व चार सदस्य प्रत्येकी पाच नावे शोध समितीसाठी सुचवतील. काँग्रेस नेते मल्लिाकार्जुन खरगे यांनाही नावे सुचविण्यास सांगितले आहे.
 4. पण संपूर्ण सदस्य दर्जा मिळत नाही, तोपर्यंत आपण या प्रक्रियेचा भाग बनू शकत नाही, असे सांगत खरगे यांनी उपस्थित राहण्यास नकार दिला आहे. त्यामुळे शोध समितीसाठी २० नावांवरच विचार होण्याची शक्यता आहे.
 5. लोकपाल स्थापनेचे वचन भाजपाने निवडणूक जाहीरनाम्यात दिले होते. परंतु स्थापना लटकल्याने सर्वोच्च न्यायालयाने मोदी सरकारवर ताशेरेही ओढले आहेत.
 6. त्यामुळे हा मुद्दा मोदी सरकारसाठी महत्त्वाचा आहे. लोकपाल ही संस्था ९ सदस्यांची असणार आहे. वृत्तपत्रात जाहिरात देऊन त्यासाठी अर्ज मागविण्यात येणार आहेत.


World coconut day at Sawantwadi

 1. जिल्ह्यात नारळ लागवड क्षेत्र वाढण्याबरोबरच येथील शेतकऱ्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ कसा मिळवून देता येईल याकरिता नारळ विकास बोर्ड ठाणे आणि सिंधुदुर्ग जिल्हा श्रीफळ उत्पादक संघ यांच्यावतीने जागतिक नारळ दिन कार्यक्रम सावंतवाडी येथे होणार असल्याची माहिती नारळ विकास बोर्डाचे प्रमोद कुरियन यांनी दिली.
 2. यावेळी नारळ विकास बोर्डाचे शरद आगलावे, श्रीफळ उत्पादक संघाचे रामानंद शिरोडकर, रणजित देसाई आदी उपस्थित होते. कोकणातनारळालापोषक वातावरण आहे. मात्र त्यादृष्टीने नारळाची लागवड होताना दिसून येत नाही.
 3. शासनाच्या कृषी विभागाकडूनही वेगवेगळ््या योजना उपलब्ध आहेत. मात्र त्याची अंमलबजावणी स्थानिक पातळीपर्यंत न झाल्याने या योजना म्हणाव्या तशा प्रत्यक्षात उतरल्या नाहीत. त्यासाठी भविष्यात कृषी विभागाने पुढाकार घ्यावा, असे कुरियन यांनी सांगितले.
 4. पालकमंत्री दीपक केसरकर, खासदार विनायक राऊत, नारळ विकास बोर्डाचे राजाभाऊ लिमये, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुरेश गवस, नगराध्यक्ष बबन साळगावकर उपस्थित राहणार आहेत. जिल्ह्यातील सर्व नारळ उत्पादक तसेच सावंतवाडी दोडामार्ग, कुडाळ, वेंगुर्ले, देवगड येथील नारळ उत्पादक हितवर्धक क्लस्टरमधील लाभार्थी यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन रामानंद शिरोडकर यांनी केले.


Top