Air Marshal D. Chaudhary took charge as the senior Air Force officer of the Air Command's Western Command

 1. एअर मार्शल डी. चौधरी एव्हीएसएम व्हीएम व्हीएसएम यांनी हवाई दलाच्या पश्चिम कमांडचे वरिष्ठ हवाई दल अधिकारी म्हणून कार्यभार स्वीकारला.
 2. एअर मार्शल डी. चौधरी एव्हीएसएम व्हीएम व्हीएसएम हे राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचे माजी विद्यार्थी असून, 22 डिसेंबर 1983 रोजी सेवेत रुजू झाले.
 3. ते फायटर कॉम्बॅट लिडर आणि इन्स्ट्रुमेंट रेटींग इन्स्ट्रक्टर आणि एक्झामिनर आहेत.
 4. त्यांनी ब्रिटन आणि लंडन मधे पदव्युत्तर शिक्षण घेतले.
 5. मिग 21, मिग 27, मिग 29 आणि एसयु-30 विमानांची 5 हजार उड्डाणे केली आहेत.
 6. एअर मार्शल चौधरी यांना ऑगस्ट 1992 मधील सीएएस प्रशस्ती पत्र, जानेवारी 2007 मधे विशिष्ट सेवा मेडल, जानेवारी 2011 मधे वायूसेना मेडल आणि जानेवारी 2018 मधे अतिविशिष्ट सेवा मेडल देऊन गौरवण्यात आले आहे.


The fourth meeting of the Ukraine Action Group on Trade and Economic Cooperation in New Delhi concludes in New Delhi

 1. व्यापार आणि आर्थिक सहकार्यावरील भारत युक्रेन कृती गटाची चौथी बैठक आज नवी दिल्लीत पार पडली.
 2. वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या परराष्ट्र व्यवहार विभागाचे अतिरिक्त सचिव विद्युत बेहारी स्वईन यांनी भारतीय प्रतिनिधी मंडळाचे नेतृत्व केले.
 3. युक्रेनच्या आर्थिक व्यापार आणि विकास मंत्रालयाच्या आंतरराष्ट्रीय व्यापार संचालनालयाचे संचालक ओलेक्सी रोझकोव यांनी युक्रेनचे प्रतिनिधीत्व केले.
 4. बैठकीनंतर प्रोटोकॉलवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.
 5. लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्रातील व्यापार आणि सहकार्याचा आढावा, तांत्रिक नियमन क्षेत्रात सहभागी, खाजगी – सार्वजनिक भागिदारी, बँकिंग आणि पर्यटन क्षेत्रात सहकार्य आदींचा यात समावेश आहे.


Launch of "AUSINDEX-19" bilateral maritime practice at Visakhapatnam

 1. 2 एप्रिल ते 16 एप्रिल या काळात विशाखापट्टणम येथे “AUSINDEX-19” हा भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन देशांच्या नौदलांचा द्वैपक्षीय सागरी सराव आयोजित करण्यात आला आहे.
 2. AUSINDEX हा भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन देशांचा द्वैपक्षीय सागरी सराव असून या सरावाला 2015 साली सुरुवात झाली.
 3. ऑस्ट्रेलिया हा ऑस्ट्रेलियाच्या राष्ट्रकुल दक्षिण गोलार्धाच्या खंडाच्या अंतर्गत असलेला एक देश आहे.
 4. जो जगातला सर्वात छोटा खंड आहे आणि जगातला सर्वात मोठा बेट देखील आहे, जो हिंद व प्रशांत महासागरात पसरलेला आहे. 
 5. ऑस्ट्रेलिया हा एकमेव असा प्रदेश आहे, जो एक खंड, एक राष्ट्र आणि एक बेट आहे.
 6. कॅनबेरा हे देशाचे राजधानी शहर आहे आणि ऑस्ट्रेलियाई डॉलर हे राष्ट्रीय चलन आहे.


GI tag received in Odisha's Kandhamal Halle

 1. ओडिशाच्या कंधमाल जिल्ह्यात उगवली जाणारी गुणवत्तापूर्ण ‘कंधमाल हळद' लोकप्रिय आहे.
 2. त्याला आता भौगोलिक खूण (GI) टॅग प्राप्त झाले आहे.
 3. कंधमाल जिल्ह्यातली हळद तेथील आदिवासी लोकांकडून उगवली जाते आणि ती त्याच्या औषधी गुणधर्मांसाठी प्रसिद्ध आहे.
 4. भौगोलिक खूण (GI):-
  1. भौगोलिक खूण (Geographical Indication) हे उत्पादनांवर छापले जाणारे चिन्ह आहे.
  2. या चिन्हामुळे उत्पादनाला विशेष भौगोलि क ओळख मिळते आणि त्याची मूळ गुणवत्ता दर्शवते.
  3. उदा. दार्जीलिंगची चायपत्ती, महाबळेश्वरची स्ट्रॉबेरी.
  4. ‘वस्तूंची भौगोलिक खूण (नोंदणी व संरक्षण) अधिनियम-1999’ याच्या अंतर्गत भारताच्या बौद्धिक संपदा अधिकार जाहिरात व व्यवस्थापन विभाग (Cell for IPR Promotion and Management -CIPAM) कडून भारतीय उत्पादनांना GI टॅग प्रदान केला जातो.


Bharat shree sunit jadhav

 1. काही दिवसांपूर्वीच सलग सहाव्यांदा ‘महाराष्ट्र-श्री’ किताब पटकावणाऱ्या सुनीत जाधवने चेन्नईत रंगलेल्या 12व्या राष्ट्रीय अजिंक्यपद शरीरसौष्ठव स्पर्धेत ‘भारत-श्री’ किताबाला गवसणी घातली. या विजयासह सुनीतने गेल्या वर्षी राम निवासकडून पत्करलेल्या पराभवाचा वचपा काढला आणि गेल्या चार वर्षांत तिसऱ्यांदा ‘भारत-श्री’ जिंकण्याची करामात केली.

 2. महाराष्ट्राच्या दिनेश कांबळे आणि अनिल बिलावा यांनी अनुक्रमे 65 आणि 75 किलो वजनी गटात गटविजेतेपदाचा मान पटकावला. त्याचबरोबर रेल्वे आणि सेनादलाचे वर्चस्व मोडीत काढत महाराष्ट्राने पहिल्यांदाच सांघिक विजेतेपदावर नाव कोरले.

 3. भारतीय शरीरसौष्ठव महासंघाच्या मान्यतेने झालेल्या या स्पर्धेत सुनीत, दिल्लीचा नरेंदर यादव आणि सेना दलाच्या अनुज कुमार तालियन यांच्यात अंतिम विजेतेपदासाठी कडवी चुरस रंगली होती.

 4. महिलांच्या मॉडेल फिजिक प्रकारात महाराष्ट्राच्या दिपाली ओगले हिने रौप्यपदक पटकावले. ‘मिस-महाराष्ट्र श्री’ ठरलेल्या मंजिरी भावसार हिला चौथ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.

 5. महिलांच्या शरीरसौष्ठव स्पर्धेत हरयाणाची गीता सैनी विजेती ठरलीमहाराष्ट्राच्या अमला ब्रह्मचारी हिने चौथे स्थान प्राप्त केले.


ICC Cricket ranking

 1. विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने सलग तिसऱ्यांदा क्रमवारीत अव्वल स्थान कायम राखत ICC Test Championship Mace म्हणजे ICC कडून मानाची गदा मिळवली. या मनाच्या गदा पुरस्कारासोबतच टीम इंडियाला 1 मिलियन डॉलरचे रोख रकमेचे बक्षीसही देण्यात आले.

 2. 1 एप्रिल ते 31 मार्च या कालावधीत प्रत्येक संघाची कसोटी कामगिरी पाहून जो संघ वर्षाअखेरीस (1 एप्रिल) अव्वल स्थानी विराजमान होतो, त्या संघाला ही मानाची गदा आणि रोख रकमेचा पुरस्कार दिला जातो.

 3. तर टीम इंडियाला सलग तिसऱ्यांदा हा मानाचा पुरस्कार मिळाला. ICC कडून विराट कोहलीला मानाची गदा प्रदान करून टीम इंडियाचा सन्मान करण्यात आला.

 4. संघाच्या कसोटी क्रमवारीत न्यूझीलंडने दुसरे स्थान पटकावले आहे. बांगलादेशविरुद्ध मिळवलेल्या कसोटी मालिका विजयाच्या बळावर त्यांना वर्षअखेरीस दुसऱ्या स्थानी विराजमान होता आले आहे. या यादीत दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया हे संघ अनुक्रमे तिसऱ्या आणि चौथ्या स्थानी आहेत.


APURVA THAKUR RUNNER UP MISS TIN UNIVERSE

 1. अमेरिकेतील पनामा येथे नुकतीच मिस टिन युनिव्हर्स 2019 स्पर्धा पार पडली. या सौंदर्य स्पर्धेत अलिबागच्या अपूर्वा ठाकूर हिने भारताचे प्रतिनिधित्व केले. स्पर्धेत लक्षणीय कामगिरी बजावत तीने थर्ड रनर अपचा किताब पटकावला.

 2. या स्पर्धेत वेगवेगळ्या 28 देशातील सौंदर्यवती सहभागी झाल्या होत्या. यातील 16 जणींची उपांत्य फेरीत निवड करण्यात आली. अंतिम फेरीसाठी सहा स्पर्धकांची निवड झाली, ज्यात अपूर्वाचाही समावेश होता.

 3. तर चुरशीच्या फेरीत अपूर्वा मिस टिन युनिव्हर्स किताब पटकावण्यात अपयशी ठरली. मात्र स्पर्धेतील थर्ड रनर अपचा किताब तिनं पटकावला. ब्राझिल आणि मेक्सिकोच्या सौंदर्यवतींनी स्पर्धेवर वर्चस्व राखले.

 4. तसेच अपूर्वाला देशभरातून मोठय़ा प्रमाणावर पाठिंबा मिळाला होता. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये अपूर्वाने मिस टिन इंडिया युनिव्हर्सचा किताब 2018 मध्ये जिंकला होता.


Top