MPSC chalu ghadamodi, current affairs

1. भारतासाठी अत्यंत महत्त्वाची असलेली चांद्रयान-2 मोहीम अखेरच्या टप्प्यात अपयशी ठरली. चंद्रापासून 2.1 कि.मी. उंचीवर असतानाच अखेरच्या टप्प्यात अचानक ‘विक्रम लँडर’चा नियंत्रण कक्षाशी संपर्क तुटला. तेव्हापासून विक्रम लँडरचे ठिकाण शोधण्याचे प्रयत्न सुरू होते. अखेर विक्रम लँडरचा पत्ता लागला आहे.

2. अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था नासानं ठिकाण शोधले असून, याची माहिती ट्विटरवरून दिली आहे. नासाच्या ऑर्बिटरला चंद्राच्या भूपृष्ठावर विक्रमचे अवशेष सापडले आहे.

3. तर चांद्रयान 2 जीएसएलव्ही मार्क 3 एम 1 या प्रक्षेपकाच्या मदतीने 22 जुलै रोजी अवकाशात झेपावले होते. त्यानंतर कक्षाबदलाचे प्रयोग करीत ते 14ऑगस्टला चंद्राच्या दिशेने मार्गस्थ झाले. 20 ऑगस्टला यान चंद्राच्या कक्षेत गेले.

4. त्यानंतर 2 सप्टेंबरला लँडर विक्रम मूळ चांद्रयानापासून वेगळे झाले होते, नंतर त्याची कक्षा कमी करण्याचे प्रयत्न यशस्वी झाले होते. 7 सप्टेंबरला चांद्रभूमीवर उतरणे अपेक्षित होते. मात्र, 15 मिनिटांच्या शेवटच्या थरारक टप्प्यावर अचानक लँडरचा संपर्क तुटल्याने ही मोहीम अपयशी ठरली.

5. तसेच त्यानंतर विक्रम लँडरशी संपर्क करण्याचे प्रयत्न इस्रोकडून करण्यात आले. मात्र, संपर्क होऊ शकला नाही.

6. त्यानंतर दोन महिन्यानंतर चांद्रयानासंदर्भातील महत्त्वाची माहिती समोर आली आहे. अमेरिकन अंतराळ संशोधन संस्थेच्या Lunar Reconnaissance Orbiter (LRO) या ऑर्बिटरच्या कॅमेऱ्यानं विक्रमच्या अवशेषाचे फोटो टिपले आहेत. भारतीय कम्प्युटर प्रोग्रामर आणि मेकॅनिकल इंजिअर शनमुगा सुब्रमणियम यांनी नासाशी संपर्क साधला होता. त्यानंतर नासानं विक्रम लँडरचे अवशेष सापडले असल्याची माहिती दिली.


MPSC chalu ghadamodi, current affairs

1. उत्तर प्रदेशचा फलंदाज प्रियम गर्ग दक्षिण आफ्रिकेत पुढील वर्षी होणाऱ्या आयसीसी 19 वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत गतविजेत्या भारताच्या 15 सदस्यीय संघाचे नेतृत्व करेल.

2. अखिल भारतीय ज्युनिअर निवड समितीने रविवारी येथे झालेल्या बैठकीनंतर 17 जानेवारी ते 9 फेब्रुवारी या कालावधीत खेळल्या जाणार्‍या स्पर्धेसाठी संघाची निवड केली.

3. आघाडीच्या फळीतील फलंदाज गर्गच्या नावावर प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये द्विशतक आणि लिस्ट ‘अ‘ सामन्यात शतकाची नोंद आहे. त्याचवेळी, यशस्वी जैस्वाल, अथर्व अंकोलेकर आणि दिव्यांश सक्सेना या मुंबईकरांचीही भारतीय संघात वर्णी लागली आहे.

4. गेल्या महिन्यात देवधर ट्रॉफी स्पर्धेत उपविजेता ठरलेल्या भारत ‘सी’ संघात गर्गने प्रतिनिधित्व केले होते. त्याने अंतिम सामन्यात भारत ‘ब’विरुद्ध 74 धावांची खेळी केली होती. रणजी टचषक 2018-19 च्या मोसमात गर्ग उत्तर प्रदेशतर्फे दुसरा सर्वोत्तम धावा फटकावणारा फलंदाज होता.

5. भारत या स्पर्धेतील सर्वांत यशस्वी संघ आहे. भारताने 2018 च्या गेल्या स्पर्धेसह एकूण चारवेळा जेतेपद पटकावले आहे.

6. भारताने 2018 मध्ये एकही सामना न गमावता अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाचा 8 गडी राखून पराभव केला होता.


MPSC chalu ghadamodi, current affairs

1. सलग दोन जीएसटी विवरणपत्रे न भरणार्‍या व्यावसायिकांना आता ई-वे बिल तयार करता येणार नाही. यामुळे त्याला मालवाहतूकही करता येणार नाही.

2. तर जीएसटी चुकवेगिरीला आळा घालण्यासाठी अर्थ मंत्रालयाने घेतलेल्या या निर्णयाची अंमलबाजवणी 1 डिसेंबरपासून सुरू झाली आहे.

3. जीएसटीकडे नोंदणीकृत व्यावसायिकांना पन्नास हजारांपेक्षा अधिक किमतीच्या मालवाहतुकीसाठी संगणकीकृत बिल बनवावे लागते. त्याला ई-वे बिल म्हणतात. वाहतुकीदरम्यान तपासणी झाली तर ते दाखवणे सक्तीचे आहे. त्यामुळे बिलाशिवाय मालवाहतूक शक्य होत नाही.

4. एखाद्या व्यावसायिकाने सलग दोन मासिक किंवा सहामाही विवरणपत्रे भरली नसतील तर. त्याची नाकेबंदी केली जाणार आहे. पुरवठादार आणि खरेदीदाराचे ई-वे बिल फायलिंग पोर्टल ब्लॉक केले जाईल. त्यामुळे दोघांनाही ई-वे बिल बनवता येणार नाही. कुरिअर व्यावसायिक आणि ऑनलाईन व्यावसायिक कंपन्यांनाही हा नियम लागू
आहे.

5. तसेच आंतरराज्य अणि राज्यांतर्गत अशा दोन्ही वाहतुकीला हा नियम लागू असेल. अर्थमंत्रालयाच्या माहितीनुसार सध्या 28 टक्के करदाते विवरणपत्रे नियमित भरत नाहीत. तरीही ई-वे बिल तयार करून मालवाहतूक करतात. व्यवसाय करूनही त्याचा कर भरला जात नसल्याचा संशय आहे.


MPSC chalu ghadamodi, current affairs

1. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भोगवे समुद्र किनाऱ्याला केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने मानाचे ‘ब्लू फ्लॅग प्रमाणपत्र’ दिले आहे. यामुळे महाराष्ट्र शासनाने पर्यटन जिल्हा म्हणून घोषित केलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.

2. केंद्रीय वने व पर्यावरण तथा हवामानबदल मंत्रालयाने ‘पर्यावरण अभ्यास संस्था, डेन्मार्क’ या आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या संस्थेकडून विविध मानकांच्या आधारे भारतातील समुद्र किनाऱ्यांचा अभ्यास केला.

3. एकूण 4 उत्कृष्ट मानकांच्या 33 घटकांआधारे ब्लू फ्लॅग प्रमाणपत्रासाठी देशातील सर्वोत्कृष्ट 13 समुद्र किनाऱ्यांची निवड करण्यात आली आहे. यात महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भोगवे समुद्र किनाऱ्याचा समावेश आहे.


MPSC chalu ghadamodi, current affairs

1. हवाई दलानंतर आता नौदलालादेखील देशातील पहिली महिला पायलट मिळणार आहे. बिहारची शिवांगी स्वरूप ही देशातील पहिली नौदल पायलट बनणार आहे. ती कोच्चीमध्ये प्रशिक्षण घेत आहे.

2. तिला ४ डिसेंबर रोजी नौदल दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बॅच लावण्यात येणार आहे.
नौदल कोच्चीच्या ऑपरेशन ड्यूटीमध्ये शिवांगी सहभागी होईल. ती
फिक्स्ड विंग डोर्नियर सर्विलांस विमान उडवेल. हे विमान कमी अंतराच्या समुद्री मिशनसाठी पाठवले जाते. यामध्ये आधुनिक सर्विलांस, रडार, नेटवर्किंग आणि इलेक्ट्रॉनिक सेंसर आहेत.

3. शिवांगीला मागील वर्षी जूनमध्ये व्हाइस एडमिरल एके चावला यांनी औपचारिकरित्या नौदलात सहभागी केले होते.


MPSC chalu ghadamodi, current affairs

1. 3 डिसेंबर हा दिवस ‘जागतिक अपंग दिन‘ आहे.

2. सन 1870 मध्ये बॉम्बे म्युच्युअल लाईफ अ‍ॅश्युअरन्स सोसायटी या भारतातील पहिल्या विमा कंपनीची स्थापना झाली.

3. जगविख्यात चित्रकार नंदलाल बोस यांचा जन्म 3 डिसेंबर 1882 मध्ये झाला.

4. भारताचे पहिले राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद श्रीवास्तव यांचा जन्म 3 डिसेंबर 1884 मध्ये झाला.

5. 3 डिसेंबर 1951 हा दिवस कवियत्री ‘बहिणाबाई चौधरी’ यांचा स्मृतीदिन आहे.


Top

Whoops, looks like something went wrong.