T.B.N. Radhakrishnan: Chief Justice of Telangana High Court

 1. न्या. थोट्टाथिल भास्करन नायर राधाकृष्णन यांनी दि. 1 जानेवारी 2019 रोजी  तेलंगणा उच्च न्यायालयाचे पहिले मुख्य न्यायाधीश म्हणून शपथ घेतली.
 2. तेलंगणा आणि आंध्रप्रदेश राज्यांचे राज्यपाल ई.एस.एल. नरसिंहन यांनी राजभवनात आयोजित कार्यक्रमात त्यांना शपथ दिली.
 3. न्यायमूर्ती राधाकृष्णन गेल्या वर्षी जुलैपासून तेलंगणा आणि आंध्रप्रदेश या दोन्ही राज्यांसाठी हैदराबाद न्यायपालिकेच्या उच्च न्यायालयालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून सेवेत होते.
 4. तर न्या. प्रवीण कुमार यांची आंध्रप्रदेशच्या उच्च न्यायालयाचे कार्यवाह मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

पार्श्वभूमी:-

 1. जून 2014 मध्ये जेव्हा आंध्रप्रदेशाचे विभाजन करून तेलंगणा हे नवे राज्य निर्माण करण्यात आले, तेव्हापासून आतापर्यंत हैदराबादमधूनच दोन्ही राज्यांसाठी उच्च न्यायालय चालवले जात होते.
 2. नवीन तेलंगणा राज्यात 360 जिल्हयांसाठी 12 न्यायाधीश आणि नागरी न्यायाधीशांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.
 3. तर आंध्रप्रदेश उच्च न्यायालयाच्या कार्यक्षेत्रात 500 पेक्षा अधिक जिल्हे आणि नागरी न्यायाधीशांचा समावेश आहे.


For Iran's oil, India waived the 'Withholding Tax' amount in rupees from the rupee

 1. अमेरिकेने आर्थिक निर्बंध लादल्याने अडचणीत सापडलेल्या इराणला मोठा दिलासा देत, भारत सरकारच्या वित्त मंत्रालयाने इराणच्या ‘नॅशनल इराणीयन ऑइल कंपनी (NIOC)’ याला भारतीय रुपयातून रक्कम देय केली आहे.
 2. त्यामुळे त्यावर द्यावा लागणारा ‘विथहोल्डिंग कर’ हा माफ केला आहे. हा निर्णय 28 डिसेंबरला घेण्यात आला. मात्र, त्याची अंमलबजावणी 5 नोव्हेंबरपासून होणार आहे.
 3. भारतीय बँकेमध्ये जमा होणाऱ्या रकमेवर  विदेशी कंपनीला मोठा विथहोल्डिंग कर भरावा लागतो.
 4. विथहोल्डिंग कर माफ केल्याने भारतीय तेल कंपन्या इराणच्या तेल कंपन्यांना USD 1.5 अब्ज एवढी रक्कम देय करू शकणार आहे.
 5. 2 नोव्हेंबर 2018 रोजी भारत आणि इराण यांच्यामध्ये झालेल्या करारानुसार दोन्ही देश तेल व्यापारासाठी डॉलर ऐवजी रुपयात आर्थिक व्यवहार करणार आहेत. त्यासाठी UCO बँकेच्या खात्यातून व्यवहार केला जाणार आहे. 
 6. भारत-इराण व्यापार संबंध:-
  1. भारत हा इराणचा चीननंतर दुसरा मोठा ग्राहक आहे. भारतीय तेल कंपन्यांना देयके देताना अडचणींना तोंड द्यावे लागणार नाही, त्यासाठी हा निर्णय आवश्यक होता.
  2. इराणकडून भारतात होणारी एकूण आयात सुमारे USD 11 अब्ज पर्यंत पोहचलेली आहे. तर एप्रिल-नोव्हेंबर 2018 या काळात एकूण तेल आयातीत इराणचा सुमारे 90% वाटा होता.
  3. शिवाय भारत सरकारच्या कर्जामध्ये गुंतवणूक करण्यास परवानगी दिल्यामुळे, इराण हा परकीय पोर्टफोलिओ गुंतवणूकदार म्हणून नोंदणी करण्यास सक्षम असेल. 


NHA approves reconstruction of 'National Health Authority'

 1. प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेच्या अधिक प्रभावी अंमलबजावणीसाठी सध्याच्या राष्ट्रीय आरोग्य संस्थेची (NHA) राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरण (NHA) म्हणून पुनर्रचना करण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे.
 2. यानुसार सध्याची राष्ट्रीय आरोग्य संस्था विसर्जित होऊन त्याची जागा राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरण घेणार. हे प्राधिकरण केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाशी संलग्न राहणार.
 3. यासाठी नवा निधी मंजूर करण्यात आलेला नाही. मंत्रिमंडळाने राष्ट्रीय आरोग्य संस्थेसाठी याआधी अर्थसंकल्पात मंजूर केलेला निधी या प्रस्तावित प्राधिकरणासाठी उपयोगात आणला जाईल.
 4. प्रधान मंत्री – जन आरोग्य योजना (PM-JAY) याची उत्तम अंमलबजावणी करण्यासाठी हा निर्णय महत्त्वाचा ठरला आहे.
 5. योजनेच्या सुलभ आणि त्वरित अंमलबजावणीसाठी एक प्रशासकीय मंडळ असणार आहे, ज्याचे अध्यक्ष केंद्र सरकारचे केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री असतील.


Top