UNSC ने पहिला स्फोटकांच्या कृतीसंबंधातील ठराव मंजूर

 1. संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेकडून (UNSC) पहिले स्फोटकांच्या कृतीसंबंधातील असलेला ठराव 2365 मंजूर करण्यात आला आहे.
 2. भूमिगत स्फोटके, युद्धातील स्फोटकांचे अवशेष आणि अद्ययावत स्फोटक साधने यांच्याद्वारे उद्भवणार्या गंभीर आणि स्थायी धोक्याच्या समस्येला गृहीत धरून हा ठराव तयार केला गेला आहे.
 3. तसेच हे शाश्वत शांतता आणि स्थिरतेमधील स्फोटक कार्याची सकारात्मक भूमिका दर्शवणारे आहे.
 4. याव्यतिरिक्त, सदस्य देशांना त्यांच्या वापरामुळे उद्भवणार्या धोक्यांच्याबद्दल माहिती प्रदान करण्यासाठी विनंती करण्यात आली आहे.
 5. ठराव 2365 स्पष्ट करते की - "सशस्त्र संघर्षांना ताबडतोब संपुष्टात आणण्यासाठी आणि आंतरराष्ट्रीय मानवीय कायद्याचा भंग करण्यासाठी विस्फोटक साधणांच्या अंदाधुंद वापरास मर्यादा घालण्यासाठी सर्व सभासदांना गोळा होण्यास सूचना दिली जाणार."

ठरावाचे  महत्त्व:-

 1. 15-सदस्यीय संचालक मंडळाने हा सर्वसमावेशक ठराव अंगिकारला आहे.
 2. मुलांसह घरी परतणारे निर्वासित, शांतीरक्षक, मदतकार्य करणारे कर्मचारी, कायद्याची अंमलबजावणी आणि अन्य कर्मचारी अश्या नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने हा ठराव आहे.
 3. शिवाय, हे निगा, पुनर्वसन, पीडितांची आर्थिक आणि सामाजिक पुनर्बांधणी आणि शारीरिकदृष्ट्या अपंगांना मदत देण्यास समुदायांना प्रोत्साहन देत आहे.

UNSC:- 

 1. UNSC हा संयुक्त राष्ट्रसंघाच्या सहा प्रमुख अवयवांपैकी एक आहे आणि याची 1945 साली स्थापना करण्यात आली.
 2. या संघटनेकडून आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षेसंदर्भात कार्य केले जाते.
 3. ही संघटना देशांमध्ये शांती निश्चित करण्याकरिता आंतरराष्ट्रीय पातळीवर कार्य करते. संघटनेचे चीन, फ्रान्स, रशिया, ब्रिटन, अमेरिका हे 5 स्थायी सदस्य आहे.
 4. 1956 साली सुएझ संघर्ष संपुष्टात आणण्यासाठी पहिले UN शांतिरक्षक दल स्थापन करण्यात आली.


पुढील मुख्य निवडणूक आयुक्त: ए. के. ज्योती

 1. अचल कुमार ज्योती यांची भारताचे पुढील म्हणजेच 21 वे मुख्य निवडणूक आयुक्त पदासाठी निवड करण्यात आली आहे.
 2. ज्योती 6 जुलै 2017 रोजी निवृत्त होणारे नसीम झैदी यांच्याकडून पदभार स्वीकारतील.
 3. 64 वर्षीय ज्योती सध्या भारताचे निवडणूक आयुक्त म्हणून ओ. पी. रावत यांच्या बरोबर कार्य करीत आहेत.
 4. ज्योती हे गुजरात संवर्गातील IAS अधिकारी आहेत.
 5. मुख्य निवडणूक आयुक्त पदाची नेमणूक भारताचे राष्ट्रपती करतात.
 6. त्यांचा कार्यकाळ सहा वर्षांचा किंवा वयाच्या 65 वर्षांपर्यंतचा असतो, यापैकी जो अगोदर पूर्ण होईल तो मानण्यात येतो.
 7. त्यांना केवळ संसदेद्वारे महाभियोगाच्या माध्यमातून काढू शकता येते.


दोन भारतीय वंशाच्या व्यक्तींना ग्रेट इम्मिग्रंट्स पुरस्कार

 1. एडोब कंपनीचे प्रमुख शंतनु नारायण आणि माजी सर्जन जनरल विवेक मूर्ती या दोन भारतीय वंशाच्या अमेरिकेतल्या रहिवास्यांना इतर 36 व्यक्तींसोबत वर्ष 2017 साठी ग्रेट इम्मिग्रंट्स पुरस्काराने सन्मानित करण्यात येत आहे.
 2. याशिवाय जेफ स्कोल यांना 2017 कार्नेगी मेडल ऑफ फिलॅनथ्रोपी, पेपलचे सह-संस्थापक मॅक्स लेव्हचिन, हुशांद अन्सारी यांचा सन्मान केला गेला आहे.
 3. ग्रेट इम्मिग्रंट्स पुरस्कार 2006 सालापासून दरवर्षी अमेरिकेच्या स्वातंत्र्यदिना निमित्त 4 जुलै रोजी न्यूयॉर्क स्थित कार्नेगी कॉर्पोरेशनकडून दिला जातो.


FIFA चा कन्फेडरेशन चषक विजेता - जर्मनी

सेंट पिटर्सबर्ग (रशिया) येथे खेळल्या गेलेल्या FIFA च्या 2017 कन्फेडरेशन चषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात जर्मनीने चिलीवर मात करत विजेतेपद मिळवले आहे.

स्पर्धेचे पुरस्कार विजेते:-

 1. गोल्डन बॉल – जर्मनीचे जूलियन ड्राक्स्लर व लियोन गोरेटज्का, चिलीचा एलेक्सिस सॅंचेझ;
 2. गोल्डन बूट - जर्मनीचे टिमो वर्नर, लियोन गोरेटज्का, लार्स स्टिंडल;
 3. गोल्डन ग्लोव - चिलीचा क्लाउडियो ब्रावो;
 4. फेयर प्ले पुरस्कार - जर्मनी

कन्फेडरेशन चषक ही स्पर्धा 1992 सालापासून सध्या प्रत्येक चार वर्षांनी आयोजित केली जाते.

ही स्पर्धा

 1. UEFA,
 2. CONMEBOL,
 3. CONCACAF,
 4. CAF,
 5. AFC,
 6. OFC

या सहा प्रादेशिक विजेत्या संघांमध्ये खेळण्यात येते.


Top

Whoops, looks like something went wrong.