11 educational institutes in Maharashtra in the National Organizational Ranking

केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज नवी दिल्ली येथे देशातील उच्च शिक्षण संस्थांची राष्ट्रीय संस्थात्मक रँकिंग जाहीर केली. देशभरातील ४ हजार ५०० शैक्षणिक संस्था यामध्ये सहभागी झाल्या होत्या. यापैकी देशातील शंभर उत्कृष्ट संस्थांमध्ये महाराष्ट्रातील ११ शैक्षणिक संस्थांचा समावेश आहे.

संस्थात्मक रँकिंगमध्ये महाराष्ट्रातील ११ शैक्षणिक संस्थांचा समावेश आहे.

यामध्ये इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मुंबई या क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर आहे तर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ १६ व्या स्थानावर आहे. तर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या संस्थेस ३० वे रँकिंग मिळाले आहे.

विद्यापीठांच्या रँकिंग मध्ये राज्यातील ९ विद्यापीठे

देशातील १०० विद्यापीठांच्या रँकिंगमध्ये महाराष्ट्रातील ९ विद्यापीठाचा समावेश आहे. यामध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ हे रँकिंगमध्ये ९ व्या स्थानावर आहे. इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी या विद्यापीठास १९ वे स्थान, तर होमी भाभा राष्ट्रीय संस्थेला २६ वी रँकिंग देण्यात आली आहे.

औषधीय संस्थांमध्ये राज्यातील ११ संस्था

देशातील उत्कृष्ट ५० औषधीय संस्थांमध्ये महाराष्ट्रातील ११ संस्थांचा समावेश आहे. पहिल्या १० औषधीय संस्थांमध्ये राज्याच्या ३ संस्थांचा समावेश आहे. इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी चौथ्या क्रमांकावर, बॉम्बे कॉलेज ऑफ फार्मसी ८ व्या तर नरसी मोंजी संस्थेला ९ वी रँकिंग मिळाली आहे.

राज्यातील नऊ अभियांत्रिकी संस्थाना रँकिंग

अभियांत्रिकी शिक्षण संस्थेच्या रँकिंग मध्ये देशातील १०० अभियांत्रिकी संस्थांमध्ये महाराष्ट्रातील ९ संस्थांचा समावेश आहे. यामध्ये इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी बॉम्बे ही संस्था दुसऱ्या क्रमांकावर तर इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी या संस्थेला १० वे स्थान मिळाले आहे. तसेच नागपूरच्या विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थेला ३१ वी रँकिंग प्राप्त झाली आहे.

राज्यातील ६ व्यवस्थापन संस्थांना रँकिंग

देशातील ५० उत्कृष्ट व्यवस्थापन संस्थामध्ये महाराष्ट्रातील ६ संस्थांचा समावेश आहे. यामध्ये इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी बॉम्बे ही संस्था ५ व्या स्थानावर तर मुंबईच्या राष्ट्रीय औद्योगिक अभियांत्रिकी संस्थेला १४ वी रँकिंग प्राप्त झाली आहे. पुण्याच्या सिंबायोसिस संस्थेला १८ वे स्थान मिळाले आहे. देशातील पहिल्या दहा विधी महाविद्यालयांमध्ये राज्यातील पुण्याच्या सिबायोसिस विधी महाविद्यालयाला 9 वे रँकिंग प्राप्त झाले आहे.

महाविद्यालय रँकिंगमध्ये राज्यातील 4महाविद्यालयांचा समावेश आहे, तर वैद्यकीय शिक्षणाच्या रँकिंगमध्ये राज्यातील1 वैद्यकिय शिक्षण संस्था सामील आहे. पहिल्या दहा रँकिंगप्राप्त उच्च शिक्षण संस्थांना केंद्रीय मंत्री श्री. जावडेकर यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.


'Drumhead' is developing which gives us the ability to listen like a cat

संशोधक एक नवे उपकरण विकसित करण्याच्या प्रयत्नात आहेत, जे मानवाला मांजरांप्रमाणे ऐकण्याची क्षमता प्रदान करणार.

अमेरिकेच्या केस वेस्टर्न रिझर्व्ह विद्यापीठ येथील संशोधक एक असे अणुतत्वावर आधारित अतिशय पातळ 'ड्रमहेड' तयार करीत आहेत, जे रेडियो फ्रिक्वेंसी रेंजमध्ये संकेत प्राप्त करणे आणि त्याला प्रक्षेपित करण्यामध्ये सक्षम असणार. हे नवे उपकरण मानवी श्रवण शक्तीला बहूपटीने वाढविण्यास मदत करणार. या शोधाचे परिणाम 'सायन्स अडवांसेज' नियतकालिकेत प्रकाशित झाले आहेत.

ड्रमहेड उपकरणाविषयी

 1. विकसित करण्यात येत असलेले ड्रमहेड मानवी कानातील पडद्यांपेक्षा (eardrum) 100,000 पटीने पातळ असतील. यामुळे मानव अगदी कमकुवत संकेत, जसे ध्वनी, कंपन आणि रेडियो तरंग आदि, यांची ओळख पटविण्यासाठी एक व्यापक गतिशील रेंज प्राप्त करण्यात सक्षम होणार.
 2. त्यासाठी लागणारे ट्रांसड्यूसर अर्धचालक क्रिस्टलच्या अणुसदृश्य थरापासून नॅनोफॅब्रिकेशन आणि मायक्रोमॅनिप्युलेशन तंत्रज्ञानाचा वापर करून तयार केले जात आहे. ट्रांसड्यूसर म्हणजे असे उपकरण जे ऊर्जेला दुसर्‍या ऊर्जेत रूपांतरित करते. या प्रकरणात हे तरंगांना (कंपन) विद्युत ऊर्जेच्या स्वरुपात प्राप्त करतील.

 

मानवी पडद्याची क्षमता

 1. मानवी श्रवण क्षमता सामान्यपणे 10Hz ते 10kHz या दरम्यान जवळपास 60-100 dB च्या शक्तीत ध्वनी ऐकू शकते.
 2. 10Hz-10kHz या बाहेरील तरंगांना मानवी श्रवण शक्ती कमी पडते.
 3. ब्ल्यु व्हेल आणि मांजरी यांची श्रवण शक्ती मानवाच्या तुलनेत अधिक असते.

 


Nelson Mandela's wife, Winnie's death

 1. दक्षिण आफ्रिकेचे माजी अध्यक्ष नेल्सन मंडेला यांची पत्नी आणि वर्णभेदविरोधी कार्यकर्त्यां विनी मंडेला (वय 81) यांचे 2 एप्रिल रोजी प्रदीर्घ आजाराने निधन झाले. जोहान्सबर्गमधील रुग्णालयात त्यांची प्राणज्योत मालवली.
 2. नेल्सन मंडेला यांच्याशी विनी 1958 ते 1996 अशी 38 वर्षे विवाहबद्ध राहिल्या. नेल्सन मंडेला यांचे 2013 साली निधन झाले होते. दक्षिण आफ्रिकेतील वंशवादविरोधी लढय़ाचे नेतृत्व नेल्सन मंडेला यांनी केले असले तरी विनी-मडिकीझेला मंडेला यांचीही वंशवादविरोधी कार्यकर्ती म्हणून स्वतंत्र ओळख होती.
 3. पतीप्रमाणेच त्यांचीही उमेदीची बहुतांशी वर्षे कारावासात गेली. प्रत्यक्ष कारावास संपल्यानंतरही अनेक वर्षे त्या घरी स्थानबद्धतेत होत्या. नेल्सन मंडेला तुरुंगात असताना विनी यांनी त्यांचा लढा तेवत ठेवला होता.
 4. विनी यांची नंतरची कारकीर्द मात्र अनेक आरोपांनी डागाळली गेली होती. मात्र वर्णभेदविरोधी लढय़ादरम्यान झालेल्या अत्याचारप्रकरणी त्यांच्यावर खटला चालवण्यात आला होता. अपहरण आणि हल्ल्याच्या प्रकरणात 1991 साली त्या दोषी ठरल्याने त्यांना दंडही भरावा लागला होता.
 5. 1997 साली त्यांच्यावर या प्रकरणात पुन्हा आरोप झाले. दक्षिण आफ्रिकेला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर झालेल्या पहिल्या बहुवांशिक निवडणुकीत त्या संसदेत निवडून गेल्या. त्यानंतर त्या भ्रष्टाचार प्रकरणात दोषी ठरल्या होत्या.


Debjani Ghosh is the new chairman of NASSCOM

 1. इंटेल (दक्षिण एशिया) चे माजी व्यवस्थापकीय संचालक देबजानी घोष यांची राष्ट्रीय सॉफ्टवेयर व सेवा कंपनी संघ (NASSCOM) चे अध्यक्ष (प्रेसिडेंट पदी) म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.
 2. ही नियुक्ती आर. चंद्रशेखर यांच्या जागी करण्यात आली आहे. त्यांचा या पदाचा पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झालेला आहे. कॉरपोरेट भारतात देबजानी घोष या इंटेल इंडिया व MAIT (मॅनुफॅक्चर्स असोसिएशन फॉर इन्फॉर्मेशन टेक्नॉलजी) यांच्या प्रथम स्त्री प्रमुख होत्या.
 3. राष्ट्रीय सॉफ्टवेयर व सेवा कंपनी संघ (National Association of Software and Services Companies -NASSCOM) हे भारतीय माहिती तंत्रज्ञान (IT) आणि बिझनेस प्रोसेस आउटसोर्सिंग (BPO) उद्योगाची व्यापार संघटना आहे.
 4. 1988 मध्ये स्थापना करण्यात आली. याचे मुख्यालय नवी दिल्ली येथे आहे. NASSCOM ही एक जागतिक व्यापार संघटना आहे, ज्याचे जगभरात 2000 हून अधिक सदस्य आहेत. NASSCOM चे वर्तमान अध्यक्ष (चेअरमन) रमन रॉय हे आहेत.


Top