1. शतकीय वर्षे परंपरा असलेला गंगागिरी महाराज यांचा अखंडपणे सुरू असलेला हा सप्ताह जगातील आणखी एक आश्चर्यच आहे. उपस्थित जनसागर बघितल्यावर योगिराज श्री गंगागिरी महाराज यांच्या कार्याचे मूर्त स्वरूप दिसून येते, यामुळेच या सप्ताहाची गिनीज बुकामध्ये नोंद झाली.
 2. जलसागर अनेकदा मी पाहिला, पण असा जनसागर प्रथमच बघतो आहे, असे भावनिक उद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाखो भाविकांकडे पाहून काढले.या सप्ताहाचा मुख्य उद्देश अन्नदान आहे. दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांची उपासमार होऊ नये व व्यसनमुक्त समाज निर्माण व्हावा, ही दूरदृष्टी ठेवून 1847 मध्ये योगिराज श्री गंगागिरी महाराजांनी या सप्ताहाची सुरुवात केली होती, अशी माहिती महंत रामगिरी महाराज यांनी काल्याच्या कीर्तनातून उपस्थितांना दिली.
 3. प्रसादाच्या स्वरूपात 10 लाख भक्तांना बुंदीचे महाप्रसादाचे लाडू 8 मिनिटांमध्ये वाटणे आणि एकाच वेळी 10 लाख भाविकांनी एकत्र येऊन सत्संगात सहभागी होणे, असे दोन जागतिक विक्रम यावेळी घडले.विक्रमाचे प्रमाणपत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते महंत रामगिरी महाराजांना लाखो भाविकांच्या साक्षीने प्रदान करण्यात आले. 


 1. व्यापार, वाणिज्य आणि संक्रमण यावर भारत आणि भूटान यांच्यात झालेल्या नवीन द्वैपक्षीय कराराला अंमलात आणण्यात आले आहे आणि ते २९ जुलै २०१७ पासून लागू झाले.
 2. दोन्ही देशांच्या दरम्यान मुक्त व्यापार चालविण्यासाठी नियमावली प्रदान करण्यात आली आहे. कोणत्याही तिसऱ्या देशांसोबत होणार्‍या व्यापारासाठी भूटानच्या उत्पादनांच्या करमुक्त संक्रमणासाठी करारात तरतूद आहे.


 1. भारतास "काही बंधने" पाळून सिंधु पाणीवाटप करारांतर्गत झेलम व चिनाब या नद्यांवर सिंधु पाणी वाटप करारांमधील कलमांचे उल्लंघन न करता जलविद्युत प्रकल्प बांधण्याची परवानगी असल्याचे जागतिक बॅंकेने स्पष्ट केले.
 2. सिंधु नदीच्या या उपनद्यांवर भारताकडून किशनगंगा (क्षमता ३३० मेगावॅट) व रतल (क्षमता ८५० मेगावॅट) हे जलविद्युत प्रकल्प बांधण्यात येत आहेत. मात्र पाकिस्तानचा या प्रकल्पांस विरोध आहे. या प्रकल्पांमुळे पाकिस्तानला मिळणाऱ्या पाण्यावर "परिणाम" होण्याची भीती या देशास आहे.
 3. या पार्श्‍वभूमीवर, जागतिक बॅंकेकडून या प्रकल्पांसंदर्भात एक निवेदन प्रसिद्ध करण्यात आले आहे. या प्रकल्पांच्या तांत्रिक रचनांसंदर्भात असलेल्या आक्षेपांच्या सुनावणीसाठी एक न्यायालयीन  वाद नेमण्यासंदर्भातील पूर्वतयारी पाकिस्तानने करावी, असे जागतिक बॅंकेने म्हटले आहे.


 1. 1 ऑगस्ट 2017 पर्यंत ऊर्जा कार्यक्षम सेवा लिमिटेड अर्थात ईईएसएलने देशात 25.28 कोटी एलईडी बल्बचे वाटप केलेU असल्याचे ऊर्जा आणि नवीकरणीय ऊर्जा राज्यमंत्री पियुष गोयल यांनी लोकसभेत एका लेखी उत्तरात सांगितले.
 2. तसेच खाजगी क्षेत्रात देशांतर्गत ग्राहकांना जून 2017 पर्यंत 41.44 कोटी एलईडी बल्ब विकल्याची माहिती दिली आहे. मार्च 2019 पर्यंत देशातल्या उष्णतेने प्रकाशमान होणाऱ्या बल्बच्या जागी एलईडी दिवे लावण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे.
 3. देशातील 36 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशात वितरित करण्यात आलेल्या  25.28 कोटी एलईडी बल्बमुळे 32.84 अब्ज kWh ची बचत होऊन कार्बन उत्सर्जनात 26.60 दशलक्ष टन घट झाल्याची माहितीही गोयल यांनी या उत्तरात दिली आहे.
 4. महाराष्ट्रात 2 कोटी 12 लाख, 92 हजार 816 एलईडी बल्बचे वितरण करण्यात आले. यामुळे दरवर्षी 2 हजार 768.07 MU ऊर्जा बचत झाली. तसेच ऊर्जा मागणीत 553.06 मेगावॅटची घट झाली.


Top